पुणे,दि.११ : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
"नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांना संधी देण्यात आलेली आहे. पुणे शहरात गणेश मंडळाचा सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक, महापौर, पहिल्यांदाच पुणे शहरातून खासदार ते केंद्रीय मंत्री अशी राजकीय गरुडझेप घेणारे पुणे शहराचे लोकप्रिय युवा नेते, नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुणे शहरातून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर केंद्रीय सहकार, हवाई वाहतूक राज्यमंत्री बनले."
पुणे जिल्ह्यातील, मुळशी तालुक्यातील मुठा गावचे असणारे मुरलीधर मोहोळ यांचा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म होऊन देखील भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता ते भाजप वॉर्डअध्यक्ष ते कार्यक्षम नगरसेवक हा प्रवास त्यांनी प्रामाणिक व प्रभावशाली सामाजिक कार्याच्या माध्यमातून, पुणेकरांचे मन जिंकून कष्टाने व मेहनतीने पूर्ण केला.
कोथरूड सांस्कृतिक महोत्सव, संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे महापालिका आवारात स्थापित केलेले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंहासनाधिष्ट स्मारक व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून शेकडो - हजारो तरुणांचे संघटन त्यांच्या पाठीशी असलेले दिसून आलेले आहे.
पुणे शहराचे महापौर म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे, कोरोना काळात पुणेकरांचे मन जिंकणारे, पुणे शहरातून प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी सहकार राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला.
पश्चिम महाराष्ट्रातील, पुणे शहरातील एक राजकीय ताकदवान मराठा चेहरा तसेच राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या सहकार क्षेत्रावर भाजपची पकड रहावी यासाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहराला तब्बल 28 वर्षानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद मिळालेले आहे. पुणे शहरात भाजपचे लोकप्रिय, युवा नेते म्हणून ख्याती असलेले खासदार मुरलीधर मोहोळ पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून मोठे योगदान देतील अशी पुणेकरांना अपेक्षा आहे.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला फारसं यश मिळालेलं नाही. पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आणि मराठा समाजातील नेत्याला संधी देण्याच्या भूमिकेतून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपद दिल्याचे म्हटलं जात आहे. मुरलीधर मोहोळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भाजपमध्ये त्यांनी बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही काम केलेले आहे. मोहोळ हे गेल्या ३० वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलेले आहे.
मुरलीधर मोहोळ हे २००२,२००७,२०१७ साली कोथरूडमधून नगसेवक म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये त्यांच्यावर स्थायी समितीची जबाबदारी सोपवली गेली. २०१९ ला त्यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. २०२० मध्ये त्यांना अखिल भारतीय महापौर परिषदेचं उपाध्यक्ष करण्यात आले.
महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस म्हणून २०२२ मध्ये त्यांची वर्णी लागली. तसेच पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. लोकसभेत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आता त्यांना भाजपने केंद्रात मंत्रीही केले.
पुणे महानगरपालिकेतून थेट संसदेत पोहचलेले मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते देण्यामागे भाजपची मोठी खेळी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय ताकदवान मराठा चेहरा म्हणून संधी देताना भाजपचे लक्ष्य सहकाराकडे असल्याची चर्चा सुरु आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर लोकनेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांची निवड केल्याची चर्चा रंगली आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह यांच्याकडे सहकार खात्याची कॅबिनेटची जबाबदारी आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांचे नेतृत्व उदयास आणले जात आहे.
महाराष्ट्रातील सहा खासदारांना केंद्रात संधी देण्यात आली असून यात विदर्भातील दोन, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतील एकाचा समावेश आहे. विदर्भातून भाजपचे नितीन गडकरी, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या रक्षा खडसे, पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, मुंबईत पीयूष गोयल यांना संधी दिलीय. तर रामदास आठवले यांनाही पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहा जणांचा समावेश आहे. त्यात पीयूष गोयल (वाणिज्य) आणि नितीन गडकरी (रस्ते व वाहतूक) या दोघांना कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. राज्यमंत्री असलेले रक्षा खडसे (क्रीडा), प्रतापराव जाधव (आयुष,आरोग्य) रामदास आठवले (सामाजिक न्याय) तर पुणे लोकसभा मतदार संघातील खासदार मुरलीधर मोहोळ यांना सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्रीपद दिलेले आहे.
"माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला केंद्रात मंत्रिपद मिळणे आणि सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री म्हणून माझ्या पक्षाने मला काम करण्याची संधी देणे हा खूप आनंदाचा क्षण आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशात, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम करण्याची संधी मिळते. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातून सामान्य माणसाचे आयुष्य सुकर करण्यासाठी, समृद्धी घडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल तसेच हवाई उड्डाण खात्याच्या माध्यमातून देशातील विमान प्रवासींना चांगली विमानसेवा देणे तसेच पुणे विमानतळ व पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल." अशी प्रतिक्रिया केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
![]() |
पुणे शहरात नागरिकांना भेडसावणारे अनेक गंभीर प्रश्न आहेत तसेच पुण्यासाठी विविध विकासाचे प्रकल्प आहेत यासाठी पुणे शहराचे नवनिर्वाचित खासदार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्याच्या माध्यमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठे योगदान मिळावे अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment