बारामती, दि.४ : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चालू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच शरद पवार गटाच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवरती राहिलेल्या दिसल्या आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे 1 लाख 58 हजार 333 मताधिक्याने निवडून आल्या आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात मिळालेले यश पाहता, कामगिरी बघता, महाराष्ट्राचे योद्धे, लोकनेते, शरद पवार बारामतीचे व राज्यातील राजकारणाचे किंगमेकर ठरले. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या निवडणुकीत मोठा पराभव झाला.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेली असली तरी या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रणधुमाळीत लोकनेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार हा राजकीय संघर्ष यावेळी निवडणुकीत पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर ही लोकसभेची निवडणूक पार पडून, निकाल लागलेला आहे.
भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या राजकारणाचा, खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी फार मोठी ताकद लावलेली होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने महाराष्ट्राचे, लोकप्रिय, जेष्ठ नेते शरद पवार यांनी वयाच्या 84 व्या वर्षी दाखवलेली लढाऊ वृत्ती, बारामतीच्या सर्वांगीण विकासात असलेले मोठे योगदान व मागील 50 पेक्षा जास्त वर्षांमधील जनतेसाठी केलेले प्रभावशाली कार्य आणि सुप्रिया सुळे यांची दमदार कामगिरीला कौल दिलेला दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपच्या ताकदवान प्रचार यंत्रणेने या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात मोठे शक्ती प्रदर्शन केले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या 24 व्या अंतिम फेरीत सुप्रिया सुळे यांना 7 लाख 28 हजार 068 मते मिळाली. सुनेत्रा पवार यांना 5 लाख 74 हजार 538 मते मिळाली आहेत. या शेवटच्या मतमोजणी फेरीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी आघाडी घेतलेली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ निकालाच्या मिळालेल्या माहितीनुसार सहा तालुक्यातील उमेदवारांना मिळालेले मताधिक्य खालील प्रमाणे : -
1)बारामती तालुका : - 48,168 मताधिक्य - सुप्रिया सुळे
2)भोर तालुका : - 41,625 मताधिक्य - सुप्रिया सुळे
3)पुरंदर तालुका : - 34387 मताधिक्य - सुप्रिया सुळे
4)इंदापूर तालुका : - 25,689 मताधिक्य - सुप्रिया सुळे
5)दौंड तालुका : - 24,267 मताधिक्य - सुप्रिया सुळे
6)खडकवासला : - 21,696 मताधिक्य - सुनेत्रा पवार
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाला.बारामती लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतरच्या अंतिम आकडेवारीत सुप्रिया सुळे यांना 7 लाख 32 हजार 312 मते मिळाली. सुनेत्रा पवार यांना 5 लाख 73 हजार 979 मते मिळाली.सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 58 हजार 333 मताधिक्याने विजय झाला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला यावेळेस धक्का बसलेला असून, बारामतीच्या जनतेच्या हृदयावरती लोकनेते शरद पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राज्य केले असेच या निकालातून दिसून येते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा मतदारांकडून तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment