Thursday, November 25, 2021

"पुण्यातील "या" मेट्रो मार्गिका 'तीनच्या' कामाला सुरुवात; पीपीपी तत्वावरचा देशातील पहिलाच प्रकल्प' तीन वर्षात काम होणार पूर्ण"...



मुंबई, दि. २५ : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. 



हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधिच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात. त्यामुळेच हे काम वेगाने मार्गी लागले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now



‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. 


या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. 





प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. 


त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now



या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. 

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Thursday, November 18, 2021

"महाराष्ट्रातील गोरगरीब,वंचित रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून न्याय मिळण्यासाठी, "या" 'रुग्णसेवक शिलेदारांची' सोमवारी मंत्रालयावर धडक; मुख्यमंत्री कार्यालयाला "या" इमेलद्वारे कळवली गोरगरीब रुग्णांची व्यथा"...

 


पुणे, दि.18 : महाराष्ट्रातील गरीब घटकातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'तुन अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दुर्दैवाने राज्यातील गोरगरीब जनतेला फायदा मिळत नसल्याचे चित्र सर्वच रुग्णालयात पाहायला मिळत असून, राज्यातील गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी तसेच गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी आम्ही मंत्रालयावरती धडक देऊन गोरगरीब रुग्णांच्या  गंभीर  प्रश्नांसाठीच्या आंदोलनाच्या माध्यमातून गरीब रुग्णांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया प्रहारचे रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ते नयन पुजारी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुणे जिल्ह्यातील रुग्णसेवक नयन पुजारी आणि रुग्णसेवक संजय गायखे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 22 नोव्हेंबर) गोरगरीब रुग्णांच्या गंभीर प्रश्नांसाठी थेट मंत्रालयावर धडक देण्यात येणार आहे. 





प्रहार पक्षाचे रुग्णसेवक नयन पुजारी, संजय गायखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही रुग्णालयांमध्ये जाऊन याठिकाणच्या रुग्णांशी तसेच आरोग्य योजना कार्यालयाशी संपर्क साधला असता अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत. 




यावेळी  रुग्णसेवक उमेश महाडिक, रुग्णसेवक नौशाद शेख, रुग्णसेवक अमोल मानकर, रुग्णसेवक संतोष साठे, संतोष अभंग, शुभम शहा, साई शेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



यावेळी त्यांनी रुग्णांची कागदपत्रे तपासली असता अनेक रुग्णांचा योजनेत समावेश होत असतानाही रुग्णालयांकडून नियमांवर बोट ठेवून किंवा कागदपत्रांच्या पुर्ततेच्या नावाखाली त्यांना या योजनांचा लाभ मिळून देत नसल्याचे पाहून नयन पुजारी यांनी संताप व्यक्त केला.




या पार्श्वभूमीवर सोमवारी थेट मंत्रालयावर धडक देत यासंदर्भात मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाला भेट देऊन संबंधीत अधिकाऱ्यांकडे याचा जाब विचारण्यात येणार असल्याचे व मुख्यमंत्री कार्यालयालाही गोरगरीब रुग्णांच्या या गंभीर विषयासंदर्भात अगोदरच इमेल केला असल्याचे रुग्णसेवक नयन पुजारी यांनी सांगितले.




राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्व शासकीय योजनांचा व मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास, नयन पुजारी यांनी व्यक्त केला.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी तसेच  मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा रुग्णालय प्रशासन सहकार्य करत नाहीत. तसेच गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त देखील सहकार्य करत नाहीत असा आमचा अनुभव आहे." अशी प्रतिक्रिया पुण्यातील प्रहारचे रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ते उमेश महाडिक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु अनेक वेळा रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात. पुणे शहरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना मदत मिळत नाही. गरीब रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी आमचा प्रहार जनशक्ती पक्ष सदैव तत्पर असतो." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"गोरगरीब लोकांना, सर्वसामान्य  लोकांना तसेच मध्यमवर्गीय सामान्य लोकांना पुणे, मुंबई सारख्या शहरात खाजगी रुग्णालयात सरकारी योजनांच्या माध्यमातून चांगले उपचार मिळण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते. खूप संघर्ष करावा लागतो. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना मदत मिळत नाहीये हे फार गंभीर वास्तव आहे." अशी प्रतिक्रिया  रुग्णसेवक अमोल मानकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात चांगले उपचार मिळण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मदत मिळण्यासाठी सरकारने या गंभीर  विषयात विशेष लक्ष घालून, गोरगरीब रुग्णांना न्याय मिळण्यासाठी चांगली धोरणे राबवून योग्य पाऊल टाकणे गरजेचे आहे.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 





Sunday, November 14, 2021

"एक पणती शहीद जवानांसाठी, छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या 'राजहंस गडाची प्रतिकृती', 'पोलीस बांधवांसाठी प्रकाशमय' पुढाकार; या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे 'एकता मित्र मंडळाने' जिंकली पुणेकरांची मने"...

 


पुणे, दि.14 :  भारताचे रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावून, प्राण अर्पण करणाऱ्या "शहीद जवानांसाठी एक पणती", छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या "राजहंस गडाची प्रतिकृती" तसेच "पोलीस बांधवांसाठी एक प्रकाशमय पुढाकार" यासारख्या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमांमुळे पुण्यातील अरण्येश्वरनगर, तावरे कॉलनी येथील एकता मित्र मंडळाने(ट्रस्ट) पुणेकरांची मने जिंकली.



"छत्रपती शिवाजी राजे यांच्या महान इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या राजहंस गडाची प्रतिकृती"


पुणे शहराला फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. दिवाळी सण म्हणजे सर्वांचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. यंदाच्या वर्षी एकता मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या, बेळगाव येथील येल्लूरच्या "राजहंस गडाची प्रतिकृती" उभारण्यात आली. 




एकता मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कल्पकता, अथक परिश्रम व मोठ्या मेहनतीने राजहंस गडाची प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


राजहंस गडाच्या प्रतिकृतीचा अप्रतिम, सुंदर व्हिडिओ : -





"एक प्रकाशमय पुढाकार... आपल्या पोलिस बांधवांसाठी"..!


एकता मित्र मंडळ (ट्रस्ट), पोलिस मित्र संघ, सहकारनगर व वीर शिवराज मित्र मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  दिवाळी सणानिमित्त पुणे शहरातील सारंग येथील दत्तवाडी पोलिस स्टेशन अंकित लक्ष्मीनगर पोलिस चौकीमध्ये  सर्व पोलिस बांधवांसाठी संपूर्ण पोलीस चौकीची साफसफाई केली.




सर्वत्र रोषणाईच्या माळा  लावून, सुंदर विद्युत रोषणाई करून, पोलिस चौकीचा संपूर्ण परिसर प्रकाशमय करण्यात आला. पोलीस बांधव संपूर्ण वर्षभर रात्रंदिवस जनतेच्या  सुरक्षितेसाठी व सेवेसाठी कर्तव्यदक्षपणे कार्यरत असतात. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


अनेक वेळा पोलीस बांधवांना वर्षभरातील महत्त्वाचे सण कुटुंबासोबत साजरे करता येत नाहीत यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पोलीस ठाण्यामध्ये विद्युत रोषणाई करून, दिव्यांची सजावट करून पोलीस बांधवांसोबत दीपावली साजरी करण्यात आली.




"एक पणती त्यांच्यासाठी, भारत मातेचे रक्षण करताना प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जवानांसाठी"..!


 ५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं ८ वा. दीपावली पाडव्याचे औचित्य साधून एकता मित्र मंडळातर्फे सर्व लहान-थोर, ज्येष्ठ-श्रेष्ठ कार्यकर्ते, एकता महिला मंडळ यांच्या पुढाकारातून "एक पणती शहीद जवानांसाठी" या उपक्रमाच्या माध्यमातून "दिपोत्सव" साजरा करण्यात आला.




दिवाळी सणातील पाडव्या दिवशी हा दिपोत्सव साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे देशाचे रक्षण करणारे जवान आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र अनेक संकटांना सामोरे जात उभे असतात आणि रक्षण करताना राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवतात.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करतात, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवत भारतीय लष्कर आपली प्रमुख कर्तव्य पार पाडताना आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी हौतात्म्य पत्करतात. भारतीय जवान नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जातात. 




"आपल्या देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शूर वीर, शहीद जवानांच्या स्मरणार्थ "एक पणती शहीद जवानांसाठी" हा सामाजिक उपक्रम आमच्या मंडळातर्फे दिवाळी पाडव्या निमित्त राबवण्यात आला." अशी प्रतिक्रिया एकता मित्र मंडळाचे तरुण कार्यकर्ते विनायक इंगवले यांनी दिली.



"नुकतेच काही दिवसांपूर्वी लेफ्टनंट ऋषी रंजन सिंग (वय २३) राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथील लाम सेक्टरमधील कलाल भागात गस्त घालत असताना शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ आणि आजवरच्या सर्व शहीद जवानांच्या आठवणीत हा दीपोत्सव संपन्न झाला. एकता मित्र मंडळ नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते." अशी प्रतिक्रिया एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुणे शहरातील अरण्येश्वरनगर येथील एकता मित्र मंडळ(ट्रस्ट) आगळे वेगळे सामाजिक उपक्रम राबवून, पुणेकरांची मने जिंकून, सामाजिक बांधिलकी जोपासत असते.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 





Thursday, November 11, 2021

मुले हिंसक का बनत आहेत? अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट का बनत आहेत? यात दोष कुणाचा? पालकांचा की मुलांचा? शिक्षणव्यवस्थेचा की समाजाचा? : - प्रसिद्ध लेखक, आदर्श शिक्षक लक्ष्मण जगताप यांचा विशेष लेख...

 


              मुले हिंसक का बनत आहेत?

 

सीआयडी मालिका पाहून तेरा व चौदा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलांनी चोरीची योजना आखली. चोरी करताना प्रतिकार केला म्हणून एकट्या राहणाऱ्या वृद्ध आजीचा खून केला. ही पुण्यातील अगदी ताजी घटना. दुसरी  घटना बीडच्या परळीतील. पोटच्या मुलाकडून बापाचा गळा आवळून खून. कारण काय तर बापाचे माझ्यावर प्रेम नाही. तिसरी घटना मुंबईतील,अभ्यास करत नाही म्हणून आई मुलीला रागवते. मायलेकीचे भांडण लागते. या भांडणात अवघ्या पंधरा वर्षाची मुलगी रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून करते. डॉक्टर होण्याकरीता आई  अभ्यासासाठी सतत मागे लागते हे त्यामागील कारण. या झाल्या प्रातिनिधीक  तीन घटना.  खून,चोरी,मारामारी,अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतात. यामधील  मुले ही अल्पवयीन असल्याचे आपणास आढळून येते.




अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट का बनत आहेत? यात दोष कुणाचा. पालकांचा की मुलांचा? शिक्षण व्यवस्थेचा की  समाजाचा?  यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कोरोना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.  शाळा बंदच्या काळात  आॕनलाइन शिक्षण सुरू झाले.  मोबाईल, लॕपटॉप, टिव्ही, टॕब इ. साधनांचा प्रचंड प्रमाणात वापर वाढला. 


विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर क्राईम मालिका दाखविल्या जातात. अनेक चित्रपटात खून,मारामारी, बलात्कार आणि अश्लिल दृश्यांचा भडिमार केला जातो.अशी दृश्ये सतत बघितल्याने या वयोगटातील मुलांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.आपणही असे करुन बघावे असा विचार त्यांच्या  मनात येतो.मग त्याविषयी नियोजन केले जाते.अशी कृत्ये करणे वाईट आहे.यात धोके असतात. याची जाणीव मुलांना होत नाही.




चित्रपटातील नायकाला  आदर्श मानण्यात मुलांना आनंद वाटतो.नायकाप्रमाणे आपणही खून,मारामारी करायला मुलांचे मन उद्युक्त होते. परंतु मालिका,चित्रपट हे मनोरंजनासाठी असतात .त्यातील खून, मारामारी किंवा भडक दृश्ये कथानकाला आवश्यक म्हणून खोटीच चित्रित केलेली असतात.हे मुलांच्या लक्षात येत नाही.अनुकरण करण्याकडे मुलांचा कल असतो.मग नको त्या घटना मुलांच्या हातून घडून जातात.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


मुले  कोणते कार्यक्रम   पाहतात? किती वेळ पाहतात? टिव्ही, मोबाईल व यु-ट्युबवर  काय पाहतात?  खरंच मुलांना असे  कार्यक्रम पाहणे गरजेचे असते का? वाईट गोष्टीचे अनुकरण करण्यास मुले आघाडीवर असतात.म्हणून मुलांना या वयात खूप जपायला हवे.



पालकांचा मुलांशी संवाद असला पाहिजे.दूरचित्रवाणी वाहिन्यांवर  काय पाहावे?  काय पाहू नये? हे मुलांना समजावून सांगायला हवे.अशा गोष्टी केवळ मनोरंजनासाठी असतात.यापलीकडे त्याकडे पाहू नये.हे त्यांच्या निदर्शनास आणून देणे पालक म्हणून आपली जबाबदारी  आहे.मुलांच्या डोळ्यांना चांगले पाहायला मिळावे ,चांगले ऐकायला मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत.


ही अल्पवयीन मुले गुन्हेगारी कृत्यांकडे वळणार नाहीत याकडे आपले लक्ष असणे महत्त्वाचे आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


महामारीच्या काळात  घरात बंदिस्त राहावे लागल्याने मुलांच्या मन स्वास्थ्यावर   परिणाम झाला आहे. मुक्तपणे वावरणे, फिरणे,खेळणे, भटकणे, मित्रमैत्रिणींना भेटणे अशा अनेक गोष्टीवर आपोआप मर्यादा आल्या. मानसिक स्वास्थ  बिघडविणा-या अशा अवघड  परिस्थितीला मुलांना तोंड द्यावे लागले. 


अशा वातावरणात मुलांचे संगोपन करणं ,त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणं हे महत्त्वाचे आहे. नैराश्याच्या, भीतीच्या,दडपणाच्या  वातावरणात राहिल्याने मुलांचा  एकलकोंडेपणा वाढतो.मित्रांशी  संवाद न झाल्याने व्यक्त होता येत नाही.मनातील भावनांचा निचरा होत नाही.अशा अनेक गोष्टींचा मुलांच्या मनावर  नकारात्मक परिणाम होत असतो.त्यामुळे मुलांचा चिडचिडपणा व रागीटपणा वाढतो.


भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे? रागाला आवर कसा घालावा? संयम कसा ठेवावा? हे सगळ्याच मुलांना जमत नाही.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


अनेकांच्या कौटुंबिक समस्या आणि अडचणी वेगवेगळ्या  आहेत.अशा परिस्थितीत माझ्या पाल्याने  उत्तम शिक्षण घेतले पाहिजे.त्याने  शिक्षण घेऊन डॉक्टर ,इंजिनियर तसेच विविध क्षेत्रात करिअर करावे  यासाठी  पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते.मुलांच्या मनाचा फारसा विचार केला जात नाही.त्याचा कल, त्याची आवड याकडे दुर्लक्ष केले जाते. 


किशोरवयीन मुलांच्या शरीरात  हार्मोन्समुळे अनेक बदल घडून येतात. या वयात मुले रागीट व चिडखोर बनतात.मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो.


अशा वेळी  मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे.प्रत्येक वेळी रागवून, चिडून उपयोग होत नसतो. त्यांना ताण येईल,दडपण येईल असे वातावरण घरात असता  कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून  अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान,प्राणायाम  यांचा चांगला उपयोग होतो. 


Ajio Diwali Loot is LIVE!. Best Offer.. Get 3 Shoes @ Rs 345 each only on Ajio... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                               Buy Now


आज शिक्षणात कमालीची  जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे.माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल? त्याच्या करिअरचे काय होईल?असे  असंख्य प्रश्न  पालकांच्या मनाला सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात.रागवतात. याचा मुलांना राग येतो. मुलांना  हाताळताना त्यांच्या भावना, त्यांची मते यांचाही विचार केला पाहिजे. 


मुलांची बुद्धिमत्ता,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे.तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते मैत्रीचे,मायेचे राहू शकेल.



लेखक : - आदर्श शिक्षक, प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप, बारामती.








Tuesday, November 2, 2021

"कोरोनाकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी "ही" सरकारी योजना लागू; ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी"....

 


मुंबई, दि. 2 : कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी "वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना" राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.



महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद )च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृद्ध व आत्मसन्मानाचे तसेच सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती होण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. 



याचाच भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृतीसंगमाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Myntra Diwali Sale..Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now


या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावरून गावनिहायमाहिती प्राप्त करून एकल/विधवा महिलांना स्वयंसहाय्यता समुहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार विशेष बाब म्हणून एकल/विधवा महिलांचा किमान पाच महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 




या समुहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधीही अदा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या एकल/विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे 342 रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. 


आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


केंद्र सरकारच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य असणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही अशा एकल/विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बिज भांडवल देण्यात येणार आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविली, ती या शासन निर्णयाद्वारे काही प्रमाणात तरी दूर होईल, असा विश्वास हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मंत्री श्री.मुश्रीफ यांनी व्यक्त केला.