Monday, August 14, 2023

"१५ ऑगस्टपासून राज्यातील आरोग्य विभागाच्या "या" सर्व शासकीय रुग्णालयांमधून मोफत उपचार मिळणार; औषधे,आरोग्य तपासण्याही मोफत; पैसे आकारले किंवा बाहेरून औषधे आणायला सांगितल्यास "या" टोल फ्री नंबरवर तक्रार करता येणार"..



मुंबई, दि. १४ :  राज्यातील सर्वसामान्य नागरिकांवरती वैद्यकीय संकट, मोठ्या आजारपणाचे संकट आल्यानंतर आरोग्यावरच्या मोठया खर्चाला तोंड द्यावे लागते. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये १५ ऑगस्ट २०२३ पासून राज्यातील गरजू, गरीब रुग्णांना  मोफत उपचार मिळणार आहेत.




सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. महाराष्ट्र राज्य सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील गरजू, गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.



रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.




राज्यातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे किंवा अन्य साहित्य आणायला सांगू नये तसेच बाहेरून औषधे घेण्यासाठी प्रीस्क्रिप्शन ही लिहून देऊ नये. असा आदेश आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांना देण्यात आलेला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.




रुग्णाला क्वचित प्रसंगी बाहेरील औषधे द्यावी लागल्यास रुग्णालयाने रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून औषधे खरेदी करून रुग्णाला मोफत उपलब्ध करून द्यावीत. आरोग्य विभागाच्या कोणत्याही रुग्णालयामध्ये शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.


महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये  रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या मंगळवारपासून 15 ऑगस्ट २०२३ पासून करण्यात येणार आहे.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


राज्यातील सर्व रुग्णालयांनी निर्णयाची  अंमलबजावणी करावी असा आदेश आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी काढला आहे.


राज्यातील "या" रुग्णालयात मिळणार मोफत उपचार..  


राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय (Super Speciality Hospital) जिल्हा रुग्णालय येथे मोफत उपचार मिळणार आहेत.




सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2 कोटी 55 लाख नागरीक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शासकीय रुग्णालयात रुग्णावरील उपचारादरम्यान पैसे आकारले किंवा बाहेरून औषध आणण्यासाठी सांगितल्यास रुग्णाला तक्रार करता येणार आहे. रुग्णाला 104 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची असणार आहे. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांची असणार आहे.


आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराच्या निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भातील सूचना


1) सरकारने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोफत नोंदणी करावी.


2) वैद्यकीय उपचार व आरोग्य तपासण्यासाठी शुल्क आकारू नये.




3) इसीजी, एक्स-रे, सिटीस्कॅन, प्रयोगशाळेतील चाचण्या यांच्यासाठीही शुल्क आकारू नये.




4) आंतर रुग्ण विभागात दाखल असलेल्या रुग्णाला वैद्यकीय उपचार झाल्यानंतर घरी सोडताना पैसे मागू नये.




5) सरकारी निर्णयाच्या अंमलबजावणीपूर्वी  रुग्णांकडून गोळा केलेली रक्कम सरकारी खाते किंवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करावी.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला. यामुळे राज्यातील गरजू, गरिब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.




भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे. प्रत्येक नागरीकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयातून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




आरोग्य हक्क राज्यातील नागरिकांना उत्तमरित्या देण्याकरीता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधन - सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून रूग्णशुल्काचा यामध्ये समावेश होतो.


सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावरील रुग्ण शुल्क नि:शुल्क होणार असल्यामुळे सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेतंर्गत 5 लाख रूपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली आहे. 


या योजनांमधून राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलबध करून दिले आहे.




राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रूग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार, तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येणार आहेत.


 राज्य सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा देणारा हा चांगला निर्णय घेतलेला आहे. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.


Thursday, August 10, 2023

"महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण की दिल्लीची कावेबाज मुसंडी, तरुणाईचे ज्वलंत प्रश्न की जनतेची महागाईने झालेली होरपळ; महाराष्ट्राला 'नवा' ध्येयवादी राजकीय नेता मिळेल का?"... तरुण संपादक, पत्रकार, लेखक अजित जगताप यांचा खास लेख...



"महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारण की दिल्लीची कावेबाज मुसंडी, तरुणाईचे ज्वलंत प्रश्न की जनतेची  महागाईने झालेली होरपळ; महाराष्ट्राला 'नवा' ध्येयवादी राजकीय नेता मिळेल का?"


जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने व महान इतिहासाने पावन झालेली ही आपली महाराष्ट्राची महान भूमी. देशाला पुरोगामी विचार देणारी, प्रगतीची दिशा दाखवणारी ही महाराष्ट्राची महान भूमी. आजचे महाराष्ट्रातील स्वार्थी, सत्तापीपासू व गलिच्छ राजकारण पाहून सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय,संताप आल्याशिवाय व वेदना झाल्याशिवाय राहणार नाही.




महाराष्ट्रातील हजारो लोकांनी "मतदानकार्ड विकणे आहे." यासारख्या पोस्ट, मीम्स सोशल मीडियावरती  शेअर केल्या. व्हाट्सएप स्टेट्सला ठेवल्या. 




मागील 4 वर्षांतील महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा तथाकथित राजकीय भूकंपामुळे खूपच घसरलेला आहे. सत्तापीपासू पक्षीय राजकारण, पक्ष फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण,  ईडी - सीबीआय या केंद्रीय संस्थांचा राजकारणासाठी गैरवापर झालेला आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


राजकीय पक्षांच्या अभद्र, अनैसर्गिक युत्या, आघाड्या तसेच राजकारणात अनेक वर्ष एकमेकांवरती कडाडून राजकीय प्रहार करणारे,कठोर टीका करणारे, एकमेकांचे राजकीय वाभाडे काढणारे, 




कट्टर विरोधक असलेले राजकीय नेते आज सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसून तथाकथित विकासाचे व्हीजन दाखवण्यात मश्गुल असणारी आजची  राजकीय परिस्थिती व आपल्या राजकीय विचारसरणीला, पक्षीय धोरणांना या नेत्यांनी दिलेली तिलांजली या सगळ्या गोष्टी पाहून सामान्य मराठी माणसाचा राजकीय व्यवस्थेवरचा, स्वार्थी राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आज महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणूस महागाईने, बेरोजगारीने, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, तरुणाईचे ज्वलंत प्रश्न, इंधन दरवाढ,  घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती, खराब रस्ते, आरोग्याचे गंभीर प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, पाण्याचे गंभीर प्रश्न यामुळे होरपळत आहे.




आज पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये राहणारा सामान्य माणूस असो की, ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यात राहणारा सामान्य माणूस असो घरातून बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी जावो की व्यवसायासाठी, ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस भरपूर वेळा आपल्या शहरात, आपल्या गावात खराब रस्ते, वाईट झालेली गटार वाहिनीची अवस्था,कचरा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, सरकारी शाळांची दयनीय अवस्था, सरकारी दवाखान्यातील भोंगळ कारभार, विजेचा प्रश्न यासारख्या अनेक गंभीर समस्यांशी तोंड देत सामान्य माणूस संघर्ष करत आहे.




Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


केंद्र सरकार असो की राज्य सरकार सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घ्यावेत हीच सामान्य माणसाची माफक अपेक्षा असते. 80 रुपयाचे पेट्रोल ज्यावेळेस 117 रुपये पर्यंत जाते. 500 रुपयाचा घरगुती गॅस ज्यावेळेस 1150 रुपये पर्यंत जातो त्यावेळेस सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही.




सामान्य माणसाच्या आयुष्यात खरोखरचे "अच्छे दिन" येण्यासाठी खरंच केंद्र सरकार व राज्य सरकार योग्य धोरणं राबवते का? मनापासून प्रयत्न करते का? हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.




आई-वडील आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज काढून, काबाडकष्ट करून मुलांना इंजिनियर करतात. आज महाराष्ट्रातील लाखो इंजिनियर तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. निराशेच्या गर्देत अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नांमुळे तरुणाईला संघर्ष करावा लागतोय हे भयानक वास्तव आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सरकारी विभागातील क्लार्क, शिपाई, चतुर्थ श्रेणी  पदासाठी देखील उच्चशिक्षित लाखो तरुणाई का अर्ज करते? हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस बेरोजगारीची खरी समस्या कळेल.




महाराष्ट्रात  महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो मुलांच्या स्पर्धा परीक्षा वेळेवर होत नाहीत. निकाल वेळेवर लागत नाहीत. परीक्षेच्या अभ्यासक्रमा विषयी अडचणी असतात, निकाल लागल्यानंतर अधिकारी पदांच्या नेमणुका लवकर होत नाहीत. यामुळे हजारो तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.




"जगाच्या स्पर्धत टिकायचे असेल तर तरुणांना जागतिक पातळीवरचे दर्जेदार उच्च शिक्षण, व्यावसायिक कौशल्य मिळालेच पाहिजे. भारतातील आयआयटी व आयआयएम या दर्जेदार संस्थांमधील दर्जेदार शिक्षण महाराष्ट्रातील किती इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये मिळते? हा देखील संशोधनाचा प्रश्न आहे."


बेरोजगारीने ग्रासलेला मराठी उच्च शिक्षित तरुण ज्यावेळेस एखाद्या नवीन व्यवसायासाठी कर्ज काढून प्रयत्न करताना दिसतो त्यावेळेस त्याची काय अवस्था होते? त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते?


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"घरच्यांच्या विरोधापासून ते व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापासून ते मार्केटमधल्या असलेल्या जीवघेणी स्पर्धेपासून ते या व्यवसायातून चांगले उत्पन्न चालू होईपर्यंत  धोक्याची टांगती तलवार त्याच्यावर असते. त्याची काय अवस्था होत असेल? हे त्या तरुणांशी संवाद साधल्या शिवाय तरी कसे कळणार."


महाराष्ट्रातील  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व सर्वच राजकीय पक्षांनी व सर्व सामाजिक संघटनांनी तरुणाईच्या ज्वलंत प्रश्नांबाबतीत व सामान्य माणसांच्या गंभीर प्रश्नाबाबत गांभीर्याने काम केले पाहिजे.




दिल्लीत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या सरकारी शाळा सुरू करू शकतात तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरकारी शाळा का सुरू होऊ  शकत नाहीत? 




आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळांची काय दयनीय अवस्था आहे? शहरातील अनेक सरकारी शाळांची काय वाईट अवस्था आहे? हे राज्यातील 36 जिल्ह्यांमधील सरकारी शाळांची पाहणी केल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. 




सरकारी  शाळांमधून दर्जेदार शिक्षण दिले तर खाजगी शिक्षण संस्थाचालक श्रीमंत होणार नाहीत आणि सामान्य लोकांचा शिक्षणावरचा अवाजवी खर्चही वाचेल.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


दिल्लीत केजरीवाल यांनी सुरू केलेल्या "मोहल्ला क्लिनिक्स" या सरकारी दवाखान्यामुळे गरीब आणि वंचित लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनामूल्य आरोग्य सल्ला, औषधे, निदान आणि शेकडो पॅथॉलॉजिकल चाचण्या मोफत होत असल्यामुळे जनसामान्यांना याचा खूप फायदा होत आहे.




"दिल्लीत सरकारी दवाखान्यात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळतात. दिल्लीतील नागरिकांना 200 युनिट पर्यंत मोफत घरगुती वीज मिळते.मोफत दर्जेदार शिक्षण मिळते तर महाराष्ट्रातील मुलांना सरकारी शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण, महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारी दवाखान्यात दर्जेदार मोफत आरोग्यसेवा, 100 युनिट पर्यंत मोफत वीज का नाही मिळू शकत?"




महाराष्ट्रातील सर्वच पक्षात अभ्यासू,हुशार, मातब्बर  नेते असताना देखील हे महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? हा खरा सामान्य मराठी माणसाला पडलेला गहन प्रश्न आहे.




महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशात आघाडी वरती आहे. देशाला सर्वात जास्त कर देणारे महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील मोठी अर्थव्यवस्था आहे. राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचे 20% योगदान आहे. 




त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही ध्येयवादी राजकीय नेत्याने इच्छाशक्ती दाखवली, धोरणात्मक निर्णय घेऊन प्रामाणिक प्रयत्न केले तर महाराष्ट्रातील नागरिकांना  सरकारी दवाखान्यात जागतिक दर्जाच्या मोफत आरोग्यसेवा व 100 युनिट पर्यंत मोफत घरगुती वीज व मुलांना सरकारी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोफत  शिक्षण  मिळू शकते.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जगातील व भारतातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही ताकदवान असे मोठे पक्ष फोडलेले आहेत हे आता जग जाहीर झालेले आहे. दिल्लीतील विशिष्ट राजकीय गटाने नेहमीच महाराष्ट्रातील मराठी नेत्याने देशाच्या राजकारणात मोठे होऊ नये यासाठी अडचणी निर्माण करून, पंख कापण्याचे काम मागील अनेक वर्षांपासून केलेले आहे.


प्रगतशील महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ते आजच्या भारतीय राजकारणातील प्रभावशाली लोकनेते शरद पवार यांच्यापर्यंत सर्वांनाच या दिल्लीतल्या राजकीय लॉबीने राजकीय खेळया, कटकारस्थान करून नेहमीच अडचणीत आणण्याचा आणि त्यांची देशाच्या राजकारणातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.




"भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागील 75 वर्षात एकही मराठी माणूस भारताचा पंतप्रधान का होऊ शकला नाही? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच दिल्लीकरांचे कावेबाज राजकारण सगळ्यांच्या लक्षात येईल."

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तापीपासून राजकारण, फोडाफोडीचे स्वार्थी,कपटी राजकारण,गलिच्छ राजकारण पाहून सामान्य माणसाच्या मनात नक्कीच विचार येतो की महाराष्ट्रातील जनतेचे  गंभीर प्रश्न सोडवणारा व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, देशाला अभिमान वाटेल असे खरे विकासाभिमुख राजकारण करणारा एक तरी चांगला ध्येयवादी राजकीय नेता महाराष्ट्राला मिळेल का?"




महाराष्ट्राच्या प्रगतशील वाटचालीमध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते सहकारमहर्षी वसंतदादा पाटील, महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक, लोकनेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, लोकनेते शरद पवार यांच्यापर्यंत अनेक महान नेत्यांचे योगदान आहे.




महाराष्ट्राला अनेक महान राजकीय नेत्यांचा वारसा आहे. पण आजची महाराष्ट्रातील सत्तापीपासू, स्वार्थी राजकीय खेळ्या करून बरबटलेली, नैतिकता हरवलेली, जनतेची दिशाभूल करणारी, लोकशाहीला घातक असलेली राजकीय परिस्थिती पाहून... 




"महाराष्ट्रातील जनतेचे गंभीर प्रश्न सोडविणारा, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा व दिल्लीच्या गादीवर मराठी माणसाचा झेंडा फडकवणारा "नवा ध्येयवादी राजकीय नेता" महाराष्ट्राला मिळेल का? असा प्रश्न सामान्य मराठी माणसाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही."


असाच ध्येयवादी, प्रामाणिक, "विकासाभिमुख नवा" राजकीय नेता लवकरच महाराष्ट्राला मिळो हाच आशावाद ठेवुयात. 


लेखक :  पत्रकार - अजित जगताप, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.



Wednesday, July 19, 2023

शिवशाही बसचे "या" वर्षात "एवढे" झाले अपघात; एस.टी. महामंडळाच्या जेष्ठ नागरिक मोफत प्रवास योजनेत आतापर्यंत "इतक्या" कोटी लोकांनी घेतला लाभ; महिलांसाठीच्या तिकीट सवलत योजनेत "इतक्या" कोटी महिला प्रवाशांनी घेतला लाभ"....



मुंबई, दि.१९ : राज्यात एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी एसटीमार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.




शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अशोक उर्फ भाई जगताप यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. भुसे यांनी ही माहिती दिली.




मंत्री श्री.भुसे म्हणाले की, प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी 2017-18 मध्ये शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्य परिवहन स्व-मालकीच्या शिवशाही बसचे 245 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे 60 असे एकूण 305 अपघात झाले आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सन 2023-24 मध्ये मे 2023 अखेर स्वमालकीच्या शिवशाही बसचे 47 अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसचे चार असे एकूण 51 अपघात झाले असून यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.




स्वमालकीच्या शिवशाही बसवरील चालकांना शिवशाही बस चालविण्याचे पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय शिवशाही नियतावर कामगिरी देण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत. 



रा.प. बस चालकांना शिवशाही बसचे प्रशिक्षण देण्यासाठी रा.प. मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी येथे रा.प. महामंडळातील सुमारे 100 वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक विभागातील चार प्रशिक्षित चालकांमार्फत सर्व विभागातील चालकांना नियमितपणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी दिली.




ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आतापर्यंत 12 कोटी 89 लाखांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी एसटीला 662 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजनेचा 17 कोटी 42 लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी 505 कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आरोग्य तपासणीसाठी तीन हजार रुपये, वेतन व भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. 500 हून अधिक बसस्थानकांचे सुशोभीकरण, स्वच्छता, बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या ताफ्यात नवीन ई-बस घेण्यात येणार आहेत. तथापि, त्यांचा सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. 




विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी जेथे आवश्यकता आहे तेथे बससेवा सुरू करण्यात येईल, असे सांगून नाशिक येथील महानगरपालिकेची सध्या बंद असलेली बससेवा तातडीने सुरू होण्याबाबत आजच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नासंदर्भात बोलताना सांगितले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विधिमंडळ सदस्य अनिकेत तटकरे, किशोर दराडे, प्रवीण दरेकर, नरेंद्र दराडे, ॲड. अनिल परब, कपिल पाटील, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.