Monday, November 13, 2023

"पेपर टाकणारा सामान्य मुलगा ते मुख्यमंत्र्यांसमोर समाजाचे गंभीर प्रश्न मांडणारा शिलेदार ते पुण्यात जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी आवाज उठवणारा, आक्रमक आंदोलने करणारा, सामाजिक कार्यकर्ता; आईकडून प्रेरणा मिळालेले मराठा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे पाटील "प्रेरणादायी शिलेदार"...खास लेख वाचा शिलेदारांच्या शब्दात...



"पेपर टाकणारा सामान्य मुलगा ते मुख्यमंत्र्यांसमोर समाजाचे गंभीर प्रश्न मांडणारा शिलेदार ते पुण्यात जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी आवाज उठवणारा, आक्रमक आंदोलने करणारा, सामाजिक कार्यकर्ता; आईकडून प्रेरणा मिळालेले मराठा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे पाटील "प्रेरणादायी शिलेदार"...


कुठल्याही समाजातील सामान्य कार्यकर्त्याचे आयुष्य अनेक अडचणींशी आणि संकटांशी संघर्ष करूनच समृद्ध होत असते. माझा जन्म 1982 चा सर्वसामान्य मराठा गरीब कुटुंबात झालेला.त्यामुळे गरिबीची झळ काय असते याची जाणीव ठेवून समाजात वावरणारा मी सामान्य कार्यकर्ता.


पूर्वीच्या काळी पुणे शहरात वाडे होते,पुण्यातील मामलेदार कचेरी समोरील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल व वाडिया हॉस्पिटलच्या मधोमध असणाऱ्या व्हाईट हाऊस मित्रमंडळामधील अशाच एका वाड्यात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असताना माझं बालपण खय्रा अर्थाने समृद्ध झालं.बालपणापासूनच मी प्रचंड सकारात्मक वागत असल्याचं माझी आई कायम सांगत असते,स्मरणशक्तीची अमुल्य घडणावळ ईश्वराने मला दिली असल्याने बालपणातील बय्राच गोष्टि आज ही जशाच्या तशा आठवतात.



यानंतर १९८७ साला पासून माझा जीवन प्रवास शालेय जीवनातुन सुरू झाला,बालपणापासूनच अभ्यासु वृत्ती होतीच, परंतु कुठलंही ज्ञान अर्धवट न घेता त्याच्या सखोल जाऊन त्याची पूर्ण माहिती घेणे हे आजही  माझ्या जीवनाचं अतुट नातं बनलं आहे.याचाच फायदा घेत शालेय जीवनात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणं असेल किंवा स्नेहसंमेलनात भाग घेणं असेल, या माध्यमातुन मैदानी खेळा बरोबरच  "स्टेज डेरिंग" देखिल नसानसात भिनत गेली याचा फायदा पुढील सामाजिक जीवनात होत गेला.




शालेय जीवनापासून मित्र जपण्याचे आणि मिळवण्याचे जणू व्यसनच लागले, आणि असं ही मला कोणतंही व्यसन नाही,आणि आहे ते फक्त मैत्री जपण्याचे.यामुळेच आजमितीला शेकडो मित्रांच्या सानिध्यात रहात आहे हि फार भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल.


शालेय जीवनात वावरत असताना शाळेतील सर्व शिक्षकांबरोबर माझे खुप जमायचे, त्यामूळे शिक्षकांचे संस्कार चांगल्या रितीने मिळाले.ज्यामुळे आज २३ वर्षांनंतर शाळा सोडल्या नंतर देखिल सुद्धा शाळेतील शिक्षकांशी आजही नातं टिकून आहे.शालेय जीवन जगत असताना,घरची परीस्थिती बदलावी यासाठी मनात अगदी पक्कं केलं,आणि आईला मदत व्हावी या उद्देशाने पहाटे पेपर टाकण्याचे काम करू लागलो.तब्बल ४/५ वर्षे पुण्याच्या शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि  स्वारगेटच्या पुढील मुकुंद नगर, महर्षी नगर पर्यंत पेपर टाकत होतो. त्याकाळी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रसिद्ध नव्हता पण प्रिंट मीडिया खूप जास्त प्रसिद्ध होता. त्यामूळे वृत्तपत्रांना खूप महत्त्व होते.



वेळेचा शिरस्ता काय असतो त्याची जडनघडण जणू ईश्वराने मला शिकवण्यासाठीच पेपर टाकण्याचे काम दिले. त्याचे कारण ही तसेच आहे,कारण त्याकाळी काही मोजकीच वर्तमानपत्रे असायची. ते टाकण्यासाठी घेण्याआगोदर पेपर एजन्सीचे मालक पुण्यातील बाजीराव रोडवरील प्रभात टाॅकिज चौकात मुख्य वितरक बसायचे त्यांच्याकडून ते खरेदी करण्यासाठी भल्या पहाटे म्हणजे ४ वाजताच जायचे.आणि मग मी ५:३० पर्यंत तिथे पोहचायचो.पेपर हातात पडले की तिथेच जवळ असलेल्या एका साड्यांच्या दुकानाबाहेर बसून पेपर आणि पुरवण्या जुळवण्याचे काम अवघ्या काही मिनिटांमध्ये उरकून मार्गक्रमणाप्रमाणे पेपर एकावर एक रचुन, सायकलच्या कॅरीअरला अडकवायचे आणि निघायचे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या कामात दोन गोष्टी खुप शिकायला मिळाल्या.पहिली म्हणजे वेळेनुसार कामाचं नियोजन करणे.दुसरी मार्गक्रमणाप्रमाणे कामाची आखणी करणे आणि तिसरी आणि महत्वाची म्हणजे योग्य वेळेत काम मार्गी लावणे. "योग्य वेळ" हा शब्द मी यासाठी वापरत आहे की, त्याकाळी पेपर वाचक अतिशय शिस्तिचे असायचे, आत्ता मी बघतो अगदी दुपार पर्यंत लोक पेपर टाकत असतात,वाचणारे लोक सुद्धा निवांत असतात. परंतु त्याकाळी पहाटे अंधार असे पर्यंत पेपर वाचक, ग्राहकांना हातात हवा असायचा.दिवस थोडासा उजाडू लागला कि छातीत धडधड वाढायची आणि त्यामुळे सायकलच्या पॅण्डलवर नीट न पोहोचणारे पाय अगदी पायातली चप्पल सटके पर्यंत जोरदार चालायचे.


कधी कधी तर तिच चप्पल सायकलच्या हॅण्डलमध्ये अडकवून सायकल जोरात पळवावी लागायची.जर एखादा पेपर वर माडीवर असेल तर वर चढून जावं लागायचं,कारण पेपरला सिगारेटच्या पाकिटाची तुकडे करुन ते पेपर गुंडाळून त्याच्या भोवती लावून, तो पेपर उंचावर फेकण्याएवढी माझी उंची नसायची,आणि काही ठिकाणी तर लोक "पेपर वर टाकल्यावर आवाज खुप होतो,वर येऊन टाकत जा" अशा सुचनांचे पालन देखील करावं लागायचं. त्यावेळेस मला महिन्याला रू.४०/- (चाळीस रुपये) पगार मिळायचा.आणि एजन्सिच्या मालकांना देखील एक रकमी ४० रूपये देणे शक्य होत नसायचे,म्हणुन ४० रूपयांचे दोन किंवा तीन भाग होऊन महिना अखेर पर्यंत पगार पूर्ण व्हायचा.




ही रक्कम ऐकायला जरी कमी आणि गमतीशीर वाटत असली तरी देखील, त्या काळी ही मोठीच रक्कम असायची.झालेला संपूर्ण पगार आईच्या हातात द्यायचो. आणि त्या पैशांचं काय केलं?हे मी कधीही तिला विचारलं नाही, कारण ती स्वत: घरकाम व पोळ्यांची कामं करुन आम्हां तिघा भावंडांवर यापेक्षा अधिक पटीने खर्च करीत होती.तिच्या कष्टांना आपला हातभार लागावा या उद्देशानेच मी देखील जमेल ते कष्ट करत होतो.पुढे जाऊन उपाशी पोटी सतत पेपर टाकत असल्याने मला पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि मग आईच्या सांगण्याने पेपरची लाईन बंद केली. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे,"असं कुठलंही काम करण्यापेक्षा तु चांगला अभ्यास कर आणि आपलं घर वर काढ" हेच माझ्या आईचं कायम सांगणं असायचं.पण मीच तिला मदत व्हावी म्हणुन अशी कामं करायचो.


काहीही झालं तरी आपलं घर आपण वर काढायचंच या उद्देशाने मी  माझं शिक्षण सन २००० रोजी  १० वी पर्यंत अर्धवट ठेवून पुढे नोकरीसाठी घराबाहेर पडलो.आणि या दरम्यान आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आमच्या वाड्यातील भाजी व कडिपत्ता पुरवण्याचा व्यवसाय करणारे कै. नंदु मांढरे उर्फ नंदु काका यांच्या बरोबर शाळेला सुट्टी असेल तेंव्हा किंवा शाळा लवकर सुटेल तेंव्हा भाजी विक्रीसाठी लागणारा कडिपत्ता तोडायला सहकार नगर, सारंग, तळजाई परीसरातील बंगल्यांमध्ये जायचो. ते मला रू.५/- प्रत्येकी दिवसाला द्यायचे.कधी फर्निचरच्या कामालाही मदत म्हणुन जायचो. त्यावेळी मला कामाच्या दिवशी रू.५०/- मिळायचे. तर काही दिवस मंडळाचे कार्यकर्ते श्री प्रमोद उर्फ आण्णा वराडकर याच्या सोबत लाईटच्या कामामध्ये मदती साठी जायचो, तो देखिल मला  ५० रुपये द्यायचा.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

आमच्या भागातील माजी नगरसेविका व माजी स्थायी समिती अध्यक्षा नीताताई रजपूत (परदेशी)यांनी पुणे शहरातील सदाशिव पेठेमधील टिळकरोड जवळील कपडे व स्वेटर विणायच्या मशीनचे उद्योजक आर. जी. दफ्तरदार यांच्याकडे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काम शिकण्यासाठी पाठवलं.ज्यावेळी मे महिन्याची सुट्टी अनेक मुलं खेळण्यात घालवत होती त्यावेळी मी मात्र दररोज कामावर झालेले काळे कपडे घालून आमच्या पाठीमागे वाडिया हॉस्पिटलच्या भिंतीवरून उडी टाकून मी सदाशिव पेठ येथे कामाला जात असे व तिथूनच परत येत असे.या महिन्याभरात मला मिळालेला माझ्या आयुष्यातील पहिलाच एकरकमी पगार रू. ५००/- मिळाला. नीताताईंचे पती कै. जयंत रजपूत यांनी त्यांच्याकडचे दोनशे रुपये त्यामध्ये टाकून मला शालेय साहित्य खरेदीसाठी मदत केली ती आजही स्मरणात आहे.


माझ्या आईची आई म्हणजे आमची मामाची आई, (हिने आम्हा भावंडांच्या आनंदाला कुठलाही नाट लागू नये,म्हणून आमचे सगळे सण, उत्सव साजरे केले) तिने तिच्या ओळखीच्या "महाडिक" नावाच्या ग्रहस्थांकडे मला घेऊन गेली, त्यांचा "सक्सेस एम्प्लाॅयमेंट" नावाचा व्यवसाय होता की ज्याच्या माध्यमातुन अनेक प्रकारच्या नोकऱ्या दिल्या जायच्या आणि बदल्यात संबंधित कंपनीकडुन ठरलेल्या पगारातुन निम्मि रक्कम सलग दोन महिने सेवामूल्य (कमिशन) म्हणुन घेतली जायची. तेंव्हा महाडिक यांनी त्यांच्या मुलाकडे मला पाठवल्यावर त्यांनी मला त्यांच्याच ऑफिसमध्ये काम दिलं.


 

ज्या उमेदवारांना कंपनी बोलावत असेल अशा उमेदवारांचे नाव व पत्ते मला दिले जायचे, बहुतांश उमेदवार हे धनकवडी,बालाजी नगर, आंबेगांव पठार आदी परीसरात पुणे शहरातुन सायकलवर जाऊन,त्यांना शोधुन काढून संबंधित विषय सांगणे हेच माझे काम होते,त्या कामाचा मला महिन्याला रू. ८००/- पगार दिला. परंतु पुढे ते काम कमी झाल्यामुळे ते काम सोडावं लागलं.


असं करत करत आमच्या मंडळाचा कार्यकर्ता श्री प्रशांत उर्फ काका जगताप याच्या ओळखीच्या शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये आफिसबाॅय  म्हणुन नोकरीसाठी आमच्याच मंडळाचे दोन कार्यकर्ते जाऊन आले, पण त्यांना ते काम पटले नाही.आणि मग प्रशांतला मी म्हणालो, "मी जाऊ का त्या ऑफिसमध्ये कामाला?"तर त्याने माझी ओळख करून दिल्या नंतर तब्बल सन २००० ते २०१३  अशी सलग १३ वर्षे  अजिबात वायफळ सुट्ट्या न घेता प्रामाणिकपणे काम केलं.




यादरम्यान लहानपणापासूनच आमच्या सार्वजनिक चिंचेची तालीम गणेशोत्सव मंडळ व व्हाईट हाऊस मित्र मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये व सामाजिक कार्यामध्ये सहभाग नोंदवत असताना मला अधिक सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा आमच्या मंडळातून मिळत गेली.आणि समाजसेवेची आवड बालपणापासूनच माझ्या मनात कोरली गेली.



एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फार काळ राहू शकत नसल्यामुळे घरातील इतर मंडळींची सल्ला मसलत करून आम्ही निर्णय घेत घराच्या बाहेर पडलो.आईच्या मदतीने स्वत:ची जागा घेऊन आम्ही भावंडांनी घर बांधले आणि आमच्या बहिणीचे लग्न करून दिले.


या दरम्यान मी माझ्या शाळेतल्या बालिमित्रांशी एक भावना बोलून दाखवली, "आपल्या मराठा समाजाला  आरक्षण नाही,सरकारी नोकऱ्या नाही, मराठा तरुणाईचे गंभीर प्रश्न आहेत. त्यामुळे हे असं किती दिवस चालायचं? आपण यासाठी मराठा समाजाची एखादी संघटना स्थापन करु."आणि मग सन २००० साली  "मराठा युवा फाऊंडेशन" नावाची संघटना आम्ही स्थापन केली.मी सुचवलेल्या संकल्पनेला आणि संघटनेच्या नावाला सर्वांनी सहमती दिली.




कामाची सुरुवात करत असतानाच,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातुन समाजसेवा करावी असं माझ्या मनात आल्यावर, मी मराठा महासंघाचा शोध सुरू केला. आणि ऑगस्ट २००४ रोजी,आणि तत्कालिन राष्ट्रिय सरचिटणीस व आजचे राष्ट्रिय अध्यक्ष मा. श्री राजेंद्र कोंढरे साहेबांची पुण्यातील "रायरेश्वर" येथील कार्यालयात भेट झाली. तिथे भेटलेले तत्कालिन पुणे शहर सरचिटणीस मा. श्री बाळासाहेब खैरे यांनी माझी "कसबा मतदार संघ अध्यक्ष" पदी निवड केली. पुढे मी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलने केली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

प्रशासनाचे प्रतिकात्मक पुतळे जाळणे असेल,किंवा जाहिर प्रसिद्धि पत्रकाद्वारे सरकारचा निषेध करणं असेल,या प्रकारे मराठा समाजाच्या गंभीर प्रश्नांसाठी समाजकार्य सुरू केलं. या बरोबरच पुणे शहरातील अनेक नागरी समस्यांबाबत,जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी वेळोवेळी आवाज उठवत लाखो पुणेकरांच्या हितासाठी आवाज उठवला. मराठा महासंघाच्या सन २००४ ते २०१३ पर्यंतच्या काळात, कसबा मतदार संघ अध्यक्ष, पुणे शहर सरचिटणीस, पुणे शहर युवक अध्यक्ष या पदांवर काम केलं. या दरम्यान मराठा महासंघाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं सान्निध्य लाभलं.



एक प्रकारे माझ्या कुटूंबातीलच हे लोक मला वाटू लागले, आणि आज ही तशीच परीस्थिती आहे. अनेक जिवाभावाची माणसं देवासमान मला इथे भेटली यासाठी मी आणि माझा परिवार आजही ईश्वराचे आभार मानतो.मराठा महासंघ आणि मराठा युवा फाऊंडेशन बरोबर पुणे शहरातील सर्वसामान्य रिक्षाचालकांच्या न्याय हक्कासाठी झटणाऱ्या मराठा महासंघ प्रणित शिवनेरी रिक्षा संघटनेच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदावर देखिल मी कार्यरत असून आजवर संघटनेने रिक्षाचालकांच्या हितासाठी पुकारलेल्या अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवला आहे.


सलग १३ वर्षे मराठा महासंघाच्या विविध पदांवर काम केल्यानंतर, मी स्वतः असा निर्णय घेतला की, आपल्यानंतर आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी,याकरिता उदात्त हेतूने मी माझ्या पुणे शहर युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.यानंतर माझे शालेय जीवनातील बालमित्र व आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळाचे माझे बालमित्र यांनी, "आपण मराठा युवा फाऊंडेशनचे कार्य पुन्हा सुरू करू " असे मत बोलून दाखवले,आणि मग पुन्हा सन २०१३ पासून मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने पुन्हा कार्य सुरू केले. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसह,पुणे शहरातील अनेक नागरी समस्यांच्या विषयांवर,जनतेच्या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवायला पुन्हा सुरुवात केली.



त्यावेळी,आपण समाजामध्ये जन्माला आल्या नंतर अनेक प्रकारचा संघर्ष करत जीवन जगत असतो,आणि आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत असतो, अशाच प्रकारे कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर, शुन्यातुन स्वत:चं अस्तित्व निर्माण करणाय्रा मराठा समाजातील कर्तृत्ववान बांधवांना कधीही कोणतेही व्यासपीठ सहजपणे उपलब्ध होत नाही, हिच बाब अग्रस्थानी धरुन,मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने "मराठा समाज भुषण" पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं.यामध्ये सुरुवातीलाच १२ समाज बांधवांचा मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव केला.



या सोहळ्याला कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता आम्ही मित्र परिवारानी त्याचा खर्च उचलला, यामध्ये प्रामुख्याने माझे मित्र हेमंत इंगवले पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महत्वाचा उद्देश म्हणजे, समाजातील काही लोक हे फक्त अशांना पुरस्कार देतात ज्यांना आगोदरच वलय प्राप्त झालेलं असतं, किंवा ज्यांनी कोणत्याही संघर्षाशिवाय यश प्राप्त केलेलं असतं, परंतु असे अनेक लोक असतात ज्यांनी कोणत्याही आधाराशिवाय संघर्षाशी दोन हात केलेले असतात, आणि खरतर प्रवासाअंती यश प्राप्त केलेलं असतं अशा घटकांना शोधून त्यांना समाजाच्या व्यासपीठावर बोलावून सन्मानित केल्याने त्यांचे मनोबल वाढून ते समाजातील इतर घटकांसाठी  मदत करुन अजून चांगले कार्य करतात.



याबरोबरच सामाजिक कार्य करत असताना, आम्ही सभोवताली घडणाऱ्या अनेक जनसामान्यांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवरती आवाज उठवले, अनेक वेळा तर आंदोलनांच्या माध्यमातुन सरकार व प्रशासनाला जाब विचारण्याचे धाडस दाखवले.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


काही वर्षांपूर्वी पुणे शहरात कॅशलेस मेडिक्लेम सेवा बंद पडल्याने हजारो पुणेकरांचे हाल सुरू झाले होते,आणि काही हाॅस्पिटल्स् या सेवा नाकारत होते.असेच एक व्यथित झालेले वृद्ध ग्रहस्थ माझा शोध घेत आमच्या व्हाईट हाऊस मित्र मंडळ या ठिकाणी असलेल्या हेअर सलून दुकानातील रोहन सुर्यवंशी यांच्याकडे माझ्याबाबत माहिती विचारली, माझा संपर्क क्रमांक घेऊन त्यांनी माझी भेट घेतली.आणि हा गंभीर प्रकार सांगितला. मी दुसऱ्याच दिवशी लागलीच या विषयांसबंधी माहिती घेऊ लागलो! आणि हे वास्तव मला समजले. मग मी यावर आवाज उठवण्याचे ठरविले,आणि इंडियन मेडिकल असोशिएशन ( I M A ) चे पुण्यातील टिळक रोड येथील कार्यालय गाठले, आणि या विषयावरचे सविस्तर निवेदन तत्कालीन अध्यक्ष श्री अरुण हळबे यांचेकडे सादर केले.



त्यांच्याशी चर्चा करताना मी असे सांगितले की, " सर्वसामान्य नागरीक कायम असं म्हणत असतात की शहाण्याने सुद्धा कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये, आणि दवाखान्याबाबतचा विषय असल्याने आम्ही आपल्याला निवेदन देत आहे, सर्वसामान्य नागरिक हे अतिशय तुटपूंज्या पगारात आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असताना त्याच पैशातून कुटुंबातील सदस्यांच्या मुखातील घास काढून, पैसे राखून अशा आरोग्य विम्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतो.जर एखादी घटना घडली तर जवळ पैसे नसले तरीही ही योजना कामाला येईल असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो.आणि ज्या वेळेला असा वाईट प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये येतो आणि हॉस्पिटलला गेल्यावर अशा प्रकारच्या कॅशलेस मेडिक्लेम सेवांना काही हॉस्पिटल कडून पायबंद घातला जातो, मग अशा अचानक आलेल्या परिस्थितीला सामोरे जाताना त्यांना मोठ्या अग्नीपरीक्षा द्याव्या लागतात.




ज्यादा व्याजाने सावकाराकडून त्यांना पैसे काढावे लागतात,कारण या पॉलिसींच्या अगेन्स कोणीही लोन द्यायला तयार नसते.मग नागरिक अशा आरोग्य विम्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून काही चूक करतात का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याकरिता आपण या विषयात गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती त्या अधिकाऱ्यांना केली. यावर सन्माननीय अध्यक्षांनी माझी गोष्ट गांभीर्याने घेत त्यांच्या स्वीय सहाय्यकाला बोलावून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद बोलावून आपली भूमिका मांडण्यासाठी तयारी करण्याचे सांगितलं.दोनच दिवसांनी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या झळकल्या, आणि कॅशलेस सेवा नाकारणाऱ्या हॉस्पिटलला तंबी दिल्याचे वाचनामध्ये आले.


हे मी मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फार मोठे यश होते.यामुळे हजारो रुग्णांना फायदा झाला व भविष्यातील अडचण कायमची दूर झाली.


काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाने बहिस्त मुलांवर बंदी घातली असल्याकारणाने त्या विरोधात मी मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने सर्वप्रथम आवाज उठवला. यासंबंधी विद्यापीठाचे कुलगुरू श्री वासुदेव गाडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलं, सदरच्या निवेदनात सांगितले की "ग्रामीण भागातून येणाऱ्या मुख्यतः सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या घरातील, स्वकष्टाने शिक्षण घेवू पाहणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, कारण यातील बरेचसे विद्यार्थी हे उपजीविकेचे साधन म्हणून नोकरी, कामधंदा व शेती व्यवसाय सांभाळत असतात आणि आपले शैक्षणिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात त्यामुळे ते बहिस्थ पद्धतीची शिक्षण पद्धती अवलंबतात,परंतु विद्यापीठ प्रशासनाने जर त्यांच्यावर बंदीचा निर्णय घेतला तर त्यांचं कधीही भरून न येणारे असं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. या बंदीमध्ये तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला असल्यामुळे, तीन वर्षानंतर जर शिक्षण पूर्ण झालं तर पुढील सरकारी सेवांमध्ये वयोमर्यादेचे बंधन लागू पडून त्यांची स्वप्न धुळीस मिळू शकतात.



त्यामुळे अशा स्वकष्टाने व स्वावलंबाने शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय आम्ही कधीही सहन करू शकत नाही व अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.भलेही वेळप्रसंगी मोठी आंदोलन करण्याची वेळ आली तरीही आम्ही मागे हटणार नाही, याकरिता विद्यापीठ प्रशासनाने सदरचा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्य बहिस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा." असे सांगितले. यानंतर  अनेक वर्तमानपत्रांमध्ये या संदर्भात ठळक घडामोडींमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि विद्यापीठ प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला,यामुळे शेकडो, हजारो बहिस्थ पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न झाला याचे खूप मोठे समाधान वाटत आहे.


मा. श्री. नारायणराव राणे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना,तत्कालीन राज्य सरकारने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली, त्या समितीचे राज्यभर अभ्यास दौरे सुरू झाले, ही समिती पुणे शहरात आल्यानंतर मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने राणे समितीची प्रत्यक्ष भेट घेऊन पुणे शहर व जिल्ह्यासह, राज्यातील मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक झालेली पिछेहाट याचे गंभीर वास्तव आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मांडले.



यात प्रामुख्याने पुणे शहरातील मराठा समाजातील महिला उच्चवर्णीय कुटुंबांमध्ये घरकाम करणे व इतर मोलमजुरी करणे अशा प्रकारची कामे करत असून अनेक तरुण आरक्षणाच्या अभावामुळे शिक्षण घेऊ न शकल्याने गुन्हेगारीकडे वळल्याची अनेक उदाहरणे आहेत प्रसंगी अनेक तरुण व्यसनाधीन होऊन देशोधडीला लागल्याची देखील उदाहरणे सदरच्या निवेदनात दर्शवली होती.याप्रसंगी एक विशेष बाब म्हणजे श्री राणेसाहेबांनी आमच्याशी सदरच्या निवेदनासंबंधी सविस्तर चर्चा केली.



"अशास्त्रीय गतिरोधक पुणेकरांची डोकेदुखी..."

संपूर्ण पुणे शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर तसेच गल्लीबोळांमध्ये चुकीच्या पद्धतीचे रबरी गतिरोधक बसवण्यात आले होते जे की पुढे जाऊन निखळून पडल्यामुळे त्याचे खिळे रस्त्याच्या मधोमध धोकादायक पद्धतीने होते.




त्यामुळे अनेक वाहनाचे अपघात होत होते तसेच अनेक वाहनांचे नुकसान देखील होत होते,आणि या गतिरोधकांना कुठलीही शासकीय पद्धत नसल्यामुळे अनेक वाहने याच्यावर आदळत होती ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णा यांचे आतोनात हाल होत होते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या विषयावर आम्ही अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला,आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवत पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तीव्र आंदोलन केले या आंदोलनात अखिल भारतीय मराठा महासंघ प्रणित शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ साळेकर व संस्थापक आबा बाबर यांच्यासह शेकडो रिक्षा चालकांनी सहभाग नोंदवला.हे आंदोलन इतके तीव्र झाले की अनेक वर्तमानपत्रांनी मुख्य पानांवर ठळक घडामोडींमध्ये या आंदोलनाला प्रसिद्धी दिली. आणि याचा परिणाम होऊन संपूर्ण पुणे शहरातले अशास्त्रीय पद्धतीचे सर्व गतिरोधक काढण्यात आले.



मराठा युवा फाउंडेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यामागचा मुख्य हेतू हा होता की, मराठा समाजातील असे लोक ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये कोणतेही पाठबळ नसताना, कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शून्यातून आपले विश्व निर्माण केले. कर्तुत्वान कामगिरी केली. आम्हाला अशा समाज बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचा यथोचीत सन्मानित करून, समाजासमोर आणण्याचा प्रामाणिकपणे  प्रयत्न केला. अशा यशस्वी,कर्तृत्ववान समाज बांधवांमुळे समाजातील इतर घटकांना देखील आदर्श निर्माण व्हावा तसेच त्यांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता हा उपक्रम घेण्याचा संकल्प केला.


मराठा समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बारा मराठा कर्तृत्ववान शिलेदारांना, तसेच नंतरच्या काळात चार समाज बांधवांना,"मराठा समाज भूषण पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं झाल्यास, पहिल्या बारा कर्तृत्वान मराठा बांधवांमध्ये

1)श्रीमती वनमालाताई शिंदे : - सामाजिक कार्यकर्त्या - 

पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता कमिटीच्या सदस्या म्हणून वनमालाताई कार्यरत असताना,दर शनिवारी खडक पोलीस स्टेशन येथे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून, अनेक प्रकारचे कौटुंबिक व इतर होणाऱ्या कलहांमध्ये, सत्यता पडताळून,वादी - प्रतिवादीं मध्ये समझोता करून वाद मिटवणे, आणि कोर्टाची पायरी चढण्या अगोदर त्यांना थांबवणे.तसेच कौटुंबिक कलहांमध्ये समझोता घडवून आणून, तुटलेले अनेक संसार पुन्हा जोडणे, व तुटायच्या मार्गावर असलेल्या संसारांना सावरण्यासाठीच मोलाचं कार्य पार पाडणे यासाठी वनमालाताईंनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.

2)मा. श्री. श्रीकांतभाऊ लिपाने : -संस्थापक अध्यक्ष ऍक्टिव्ह फाउंडेशन - 

जांभुळवाडी रोड आंबेगाव परिसरातील अनेक नागरी समस्यांवर आवाज उठवणारे, वेळप्रसंगी उपाय योजना अमलात आणणारे,स्वतःच्या वाढदिवसा दिवशी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून विधायक कार्य करणारे, जांभुळवाडी तलाव या ठिकाणी गणेश विसर्जन प्रसंगी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत.




दुसऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये,

3)कर्तव्यदक्ष ATS पोलीस अधिकारी मा. श्री भानुप्रतापजी बर्गे साहेब यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.

मुंबईतील प्रसिद्ध एन्काऊंटर "शूटआउट लोखंडवाला" या मोहिमेत बर्गे साहेबांचा सहभाग.दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या पुणे शहरातील युवतीला वेळीच रोखून तिचं समुपदेशन करून, तिला दहशतवादापासून परावृत्त होण्यासाठी  साहेबांनी यशस्वी प्रयत्न केले.पुणे शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी बर्गे साहेबांनी अनेक यशस्वी प्रयत्न केले.पुणे शहरातील अनेक सामाजिक संस्थांसोबत असलेली जवळीक व त्या माध्यमातून समाज उपयोगी अनेक उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला.तसेच तरुणांना गुन्हेगारी पासून दूर ठेवण्यापासून ते त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बर्गे साहेबांनी अनेक मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.पुणे शहरातील असंख्य गणेश मंडळांच्या संपर्कात राहून सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.

4)पुणे शहराचे तत्कालीन महापौर,  मा श्री प्रशांतदादा जगताप : -

आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून पुणे शहरात संबंधित प्रभागांमध्ये प्रशांत दादांनी अनेक नागरी समस्यांचे निराकरण केले तसेच अनेक विकास कामे केली. आरोग्य सेवांबाबत विशेष लक्ष दिले.याबरोबरच महापौर पदाच्या काळात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस पायाला भिंगरी लावून फिरणारे महापौर म्हणून प्रशांत दादा प्रसिद्ध होते. बदलत्या पुणे शहराच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये प्रशासनाला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे,पुणे शहरातील गणेशोत्सव सारख्या उत्सवांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी प्रयत्न करणारे तसेच मराठा युवा फाऊंडेशनने उचललेल्या अनेक नागरिकांच्या समस्यांच्या विरोधातील आवाजाच्या पार्श्वभूमीवर ताबडतोब त्यासंबंधी प्रशासनाला योग्य ते आदेश देऊन नागरिकांना सहकार्य करणारे प्रशांत दादा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आहेत.नागरिकांमध्ये मिसळणारे तसेच "नागरिकांच्या मनातील आपला महापौर" या वाक्याला साजेशी भूमिका  पुणे शहराचे लाडके महापौर म्हणून प्रशांत दादा जगताप यांनी बजावली.


5)मा श्री रणजीतदादा बाबर : - प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र युवा परिषद. व पोलीस परिवार अध्यक्ष - 

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर भरवणारे तसेच योग्य ती मदत करणारे रणजित दादा यांनी संबंध महाराष्ट्रभर युवकांचं जाळं निर्माण करून,असंख्य युवकांच्या व्यवसाय, धंदा व रोजगारासंबंधी शासन दरबारी पाठपुरावा करून मदत केली. आपल्या कार्याची छाप समाजमनावर पाडल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.मराठा युवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास रणजित दादा नेहमीच सहकार्य करतात.

6)प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू मा श्री अजित थोपटे : - Mr India, Mr universe, Mr World, Mr Dubai, Mr Maharashtra, Mr Pune.

स्वकष्टाने निर्माण केलेल्या श्री विष्णू जिमच्या माध्यमातून विविध पदक प्राप्त केल्यानंतर श्री अजित थोपटे यांनी शेकडो युवकांना शरीरसौष्ठवपटू बनवून जागतिक स्तरावर पोहोचवले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


7)मा श्री मेघराजभैया राजेभोसले : - अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ -

चित्रपट क्षेत्रात पदार्पण करू पाहणाऱ्या अनेक कलाकारांना, तसेच चित्रपट निर्मिती क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता आजमावू पाहणाऱ्यांना मेघराज भैय्यांनी चांगले सहकार्य केले.मराठी चित्रपट अनुदानासाठी प्रयत्न करणे असो की स्टेजवर तसेच स्टेजच्या पाठीमागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करणे यासाठी ते आघाडीवर होते.मराठी चित्रपट कलाकारांच्या विविध प्रश्नांना शासन दरबारी पोहोचवून त्यासंबंधी मेघराजभैया यांनी सदैव लढा दिला तसेच नाट्य कलावंतांसाठी देखील सदैव कार्यरत असतात.

अशाप्रकारे समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने ज्या कर्तुत्वान व्यक्तींना  मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला त्या  व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती सांगावी म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या.



या पुरस्कार सोहळ्याला आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आमच्या कार्याचे कौतुक केले आहे.यामध्ये मा श्री बुधाजीराव मुळीक सर (अध्यक्ष भूमाता व ज्येष्ठ कृषी तज्ञ आणि अभ्यासक) मा श्री शिरीषभाऊ मोहिते, (अध्यक्ष सेवा मित्र मंडळ पुणे) मा श्री बाळासाहेब अमराळे (संचालक अमराळे ज्वेलर्स), मा श्री मदन कोठुळे सर (केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव),मा श्री राजेंद्रनाना शिंदे (उपशहर प्रमुख शिवसेना उ.बा.ठा), मा श्री शंकररावतात्या बेलदरे (माजी नगरसेवक दत्तनगर आंबेगाव), मा श्री अमरआबा चिंधे पाटील (आदर्श सरपंच पुरस्कार विजेते), मा श्री अशोकभाऊ साळेकर (अध्यक्ष शिवनेरी रिक्षा संघटना), मा श्री प्र. दी. उर्फ आबासाहेब शिंदे (अध्यक्ष राजर्षी शाहू बँक) इत्यादी मान्यवर लाभले, यापैकी कै. आबासाहेब शिंदे यांचे नुकतेच निधन झाले,त्यांनी केलेलं अमूल्य मार्गदर्शन आम्हा सर्वांच्या सदैवं स्मरनात राहील. कै आबासाहेब शिंदे यांना मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती नेहमीच समाजाला प्रेरणा देत असतात.


"प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला "शिक्षणाच्या आईचा घो" या चित्रपटाच्या शीर्षकाला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला."

यासंबंधी संबंध राज्यभर मराठा महासंघाच्या वतीने प्रतिक्रिया उमटत असताना सुद्धा देखील पुणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये महेश मांजरेकर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असल्याची माहिती,मराठा महासंघाचे ज्येष्ठ पदाधिकारी व आमचे मार्गदर्शक श्री सुनील हारपुडे साहेब त्यांच्या मुलीला आणण्यासाठी गेले असताना, त्यांना शाळेत मांजरेकर आले असल्याचे समजले,आणि मग त्यांनी मला संपर्क साधला,आणि मग मी मराठा महासंघाचे तत्कालीन हवेली तालुका युवक अध्यक्ष निलेशदादा काळभोर, बाळासाहेब दोरगे,आदींसह पुणे शहरातील आम्ही सर्व पदाधिकारी त्या शाळेत गेलो,आणि महेश मांजरेकरांना संबंधित चित्रपटाच्या शीर्षकाच्या बदलीसाठी निषेध म्हणून घेराव घातला.



त्यावेळेस महेश मांजरेकर यांनी आम्हाला ग्वाही दिली,आमच्या सर्व टीम सोबत बोलून एक चांगला मार्ग काढून समाजाची भावना जपण्याचा प्रयत्न करतो.आणि मग महेश मांजरेकर यांनी मुंबई येथे "शिक्षणाच्या आईचा घो" या चित्रपटाच्या एका विशेष शोचे आयोजन करत संबंधित चित्रपट आम्हा पदाधिकाऱ्यांना दाखवला, यावेळी मी आणि पदाधिकारी प्रमोद नागवडे देखील उपस्थित होतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये महेश मांजरेकर यांच्या सोबत चर्चा केली, महेश मांजरेकर यांनी चुक कबूल करत दिलगिरी व्यक्त केली.याचा परिणाम म्हणजे या चित्रपटाच्या सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी समाजाची भावना दुखावली गेली असल्यास दिलगिरी व्यक्त करत माफीनामा प्रसिद्ध केला आहे.


"पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या नवले पूल महामार्गावर होणारे भीषण अपघात रोखणे संदर्भात केलेल्या उपाय योजना" 

२०१९ मध्ये पुणे शहरातील कात्रज नवले पुलावर होणारे गंभीर अपघात रोखण्याकरता अभ्यास सुरू केला, आणि अभ्यासाअंती अपघात रोखण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या पुणे कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर दिले.आणि याचा सातत्याने पाठपुरावा करत यातील अनेक उपाय अमलात आणण्यास संबंधित प्रशासनाला भाग पाडले. आणि या महामार्गावर होणारे अपघात काही प्रमाणात कमी झाले. यातील दोन मागण्या अतिशय प्रभावशाली होत्या, त्या म्हणजे,संपूर्ण महामार्गावर कुठल्याही प्रकारची विजेची प्रकाश व्यवस्थाच नव्हती,तिचा सातत्याने पाठपुरावा करून विजेच्या खांबांची निर्मिती करून घेतली,आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड लिमिटची मागणी आग्रहीपणे केली होती, ती देखील आता अंमलात आणली गेली आहे.




मागणी केल्याप्रमाणे वेग मर्यादा ताशी ४० कि.मी. करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व वाहने वेगमर्यादेत धावत असतात.ठळक सूचना फलकांची मागणी करण्यात आली होती काही प्रमाणात ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे.तसेच अति तीव्र उतारावर रंबलर्सची निर्मिती करण्याची मागणी केली होती ती देखील पूर्णत्वास जात आहे. यामुळे पूर्वीपेक्षा अपघातांची मालिका खुप कमी झाली आहे.अजूनही थोड्याफार प्रमाणात अपघात होत आहेत त्यासंबंधीचा पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे सुरू आहे येणाऱ्या पुढील काळात तो विषय देखील पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हे मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने मी व माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचे फार मोठे यश आहे.


"मेट्रो प्रकल्प राबवताना पुणेकरांच्या हिताचा विचार व्हावा"

पुणे शहरात बी.आर.टीचा बोजवारा उडाला असताना,त्यात मेट्रोची भर पडल्याने स्थानिक वास्तव्यास असणाऱ्या सर्वासामान्य पुणेकरांना त्याचा फायदा कितपत होणार? या करीता "पुणे शहरात मेट्रो प्रकल्प राबवताना पुणेकरांच्या हिताचा विचार करावा" अशी भुमिका मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने घेऊन, मेंट्रो ऐवजी पुणे शहरात "उड्डानपूलांची" गरज महत्वाची असल्याची भुमिका घेतली. 



कारण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पेठांचा परिसर मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तसेच परिसरात ऐतिहासिक वारसा स्थळे असल्यामुळे या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाच्या निर्मितीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो ही बाब प्रशासनासमोर आणली. बी.आर.टी सबशेल फेल झाल्यानंतर मेट्रो प्रकल्प त्याच मार्गाने जाऊ नये अशी भावना व्यक्त करत ऐतिहासिक पुण्याचे मूळ स्वरूप अबाधित राहावे अशी मागणी त्यावेळी केली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले"...

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन निमित्त मराठा युवा फाउंडेशन च्या वतीने गुटखाजन्य पदार्थांची होळी शेकडो युवकांच्या उपस्थितीत करण्याचा उपक्रम सर्वप्रथम हाती घेतला. शाळा महाविद्यालयातील अनेक तरुणांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम त्यांना समजावेत यासाठी त्यांच्यामध्ये जागृती व्हावी याकरिता हा उपक्रम वर्दळीच्या रस्त्यावर घेण्यात येत असतो. 



या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक तरुणांनी व्यसनांपासून कोसो दूर राहण्याचा संकल्प केला असून, काही व्यसनाधीनाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी व्यसनं कायमची सोडून दिली आहेत,आणि ते स्वतः याबद्दल आमच्याकडे समाधान व्यक्त करीत आहेत.या उपक्रमातून अनेक तरुणांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे बोलून दाखवले आहे.


"लाखो पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार"...

काही वर्षांपूर्वी पुणे शहरात डेंगू मलेरियाच्या साथीने थैमान माजवले होते,अनेक रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत होती,सरकारी रुग्णालयांमध्ये चांगली सेवा न मिळता उद्धटपणाची वागणूक मिळत होती, तर खाजगी रुग्णालये आ वासून संबंधित रुग्णांकडून आवाच्या सव्वा बिलं रुग्णांकडून वसूल करत होती. अतिशय विदारक परिस्थिती पुणे शहरात असताना लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प होते.आणि मग आम्ही माहिती अधिकाराचा वापर करत आरोग्य विभागाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर मांडला.

या विषयाला अनेक पत्रकारांनी व वर्तमानपत्रांनी अत्यंत मोलाची साथ देऊन पुणेकरांची व्यथा प्रशासनासमोर आणण्यासाठी मदत केली. लोकसंख्येच्या प्रमाणात लाखो पुणेकरांना अशा गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी मोजकी सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी असल्याचं सर्वप्रथम आम्ही निदर्शनास आणलं. आणि पुणे मनपाच्या आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच पुणेकरांना चांगल्या आरोग्य सेवा मिळण्यासाठी मागणी केली, आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत निदान व उपचार सुरू करण्याची आग्रही मागणी केली. 



याचा परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आगामी बजेटमध्ये संबंधित वैद्यकीय यंत्र सामग्री वाढवण्यासाठी विशेष बजेटची तरतूद करण्यात आली. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये तत्परतेने व योग्य औषधोपचार देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. आणि त्यासंबंधी सदरचा आजार काही प्रमाणामध्ये आटोक्यात आला, व आजही संबंधित यंत्र सामग्री पुरेशा प्रमाणात पुणेकरांच्या उपयोगास पडत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. मराठा युवा फाउंडेशनच्या वतीने लाखो पुणेकरांच्या आरोग्यासाठी केलेली धडपड फळास आली याचे खूप समाधान लाभले आहे.


२०१० साली मी शेअर मार्केटच्या ऑफिसमध्ये काम करत असताना, रात्रीच्या वेळी काहीतरी व्यवसाय करायच्या उद्देशाने बाजीराव रस्त्यावरील बंद असलेल्या त्रिमूर्ती बँकेच्या बाहेर सँडविच स्टॉल लावला, पुढे कामाच्या वेळेअभावी तो चालवणे शक्य झाले नाही. वर्षभराच्या आत मध्ये तो बंद करावा लागला, यावेळी मला पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल जंजिराचे संचालक मा. श्री विलासशेठ चोरघे,यांनी सहकार्य केलं आणि अगोदरच सँडविच व्यवसायिक असलेले माझे बाल मित्र प्रदीप व संदीप डाळवाले (राणा) यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तेव्हापासून ते आज पर्यंत मला नोकरी देण्यापासून ते सध्याच्या दूध व्यवसायात मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचे आभार  मानणे हे अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते...

यामध्ये प्रामुख्याने मा श्री सचिन पाटील साहेब,मा श्री उदयभाऊ जगताप,मा श्री शिरीषभाऊ मोहिते,मा श्री शशांक (आप्पा) माने साहेब,मा श्री बाळासाहेब जगताप,मा श्री सुनीलजी खाटपे साहेब,मा श्री रणजीतदादा बाबर,मा श्री नितीनजी साळुंखे पाटील,मा श्री बाळासाहेब दोरगे,मा श्री अशोकभाऊ साळेकर, मा श्री अर्जुननाना भिलारे व त्यांचे चिरंजीव रोहित आणि रोशन,मा श्री उमेशभाऊ शिंदे आदींसह अनेक लोकांनी मला मार्गदर्शन व सहकार्य केलं आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.


आपल्या भारत देशातील तरुणांकडे प्रचंड ऊर्जा आहे. चांगले शिक्षण आहे. चांगली कौशल्य आहेत. त्या प्रत्येकाने जर समाजाच्या सेवेसाठी त्याचा वापर केला तर समाजाला खूप मोठा फायदा होऊ शकतो असे मला मनापासून वाटते. परिस्थितीचे कोणतेही कारण पुढे करून समाजाची सेवा होत नसते, याकरिता प्रचंड इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर काहीही अवघड नाही.


मी देखील सामाजिक कार्य करीत असताना हा सगळा प्रवास दिसतो एवढा सोपा कधीच नव्हता,या प्रवासात जितके सहकार्य करणारे सोबती व मार्गदर्शक लाभले, या उलट काही हितशत्रू देखील मिळाले, नानाविध प्रकारे मला थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले, माझे विविध सामाजिक उपक्रम बंद पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले. त्या प्रसंगी एकट्याने संबंधित लढा सुरू ठेवला. परंतु अशा हितशत्रूंसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत.कारण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श  मानतो.त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणा व ऊर्जेमुळे  मी कधीही सामाजिक कार्याच्या चळवळीमध्ये मागे वळून बघितलंच नाही. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अशी महापराक्रमी दैवतं घडल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, अशा अडवणुक करणाऱ्या अनेक शक्तींना धूळ चारण्यासाठी काफी होती.



पुणेकरांच्या गंभीर प्रश्नांसाठी केलेली वेगवेगळी आंदोलने तसेच प्रशासकीय कामाचा अनुभव,पुणे शहराच्या शैक्षणिक , कला , क्रीडा आणि आरोग्य तसेच वाढत्या शहरीकरणा बरोबरच इतर मुलभुत प्रश्नांवर वेळोवेळी उठवलेल्या आवाजाच्या पार्श्वभुमिवर आमच्या परिचित अनेक नागरीकांच्या मागणीमुळे, तमाम पुणेकरांच्या मूलभूत गरजांसाठी, जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठी आवाज उठवण्यासाठी पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा सन २०१४ रोजी प्रयत्न केला.परंतु काही तांत्रीक अडचणींमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. जर संधी मिळाली असती तर संधीचे नक्किच सोने करून दाखविले असते. परंतु ती संधी गेली तरी देखील  पुणेकर नागरीकांच्या हिताच्या दृष्टिने मराठा युवा फाऊंडेशनच्या माध्यमातुन आजही विविध सामाजिक विषयांवर काम सुरू आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते अखंडपणे सुरू राहील अशी ग्वाही मी तमाम पुणेकरांना देत आहे.


आज आम्ही महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गंभीर प्रश्नांसाठी तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठीच्या लढ्यासाठी सज्ज आहे. कारण माझ्या मराठा बांधवांच्या न्याय व हक्कांसाठीच्या समाजसेवेची सुरुवात मुळातच माथाडी कामगार नेते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेल्या पहिल्या बलिदानाच्या प्रसंगाला वाचून त्यामुळे प्रेरित होऊन झाली आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून "मराठा आरक्षण" या ज्वलंत विषयावर आरक्षणासाठी वेळोवेळी आवाज उठवत, राज्य सरकारच्या विरोधात पुतळे जाळले तसेच अनेक पत्रव्यवहार आणि निषेध आंदोलने केली.



शासनाशी पत्रव्यवहार करत अनेक मागण्या केल्या.त्याच पार्श्वभूमीवर, सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जालना अंतरवाली सराटी येथून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जी पुन्हा सुरुवात झाली, त्यासाठी मराठा युवा फाऊंडेशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देत या लढ्यामध्ये पुन्हा सहभाग नोंदवला आहे.


"माझे सामाजिक चळवळींचे आयुष्य सगळं ज्या व्यक्तीमुळे घडू शकलं ती व्यक्ती म्हणजे माझी आई.जिने माझ्या या कार्याला कायम पाठिंबा दिला. ज्या दिवशी आंदोलन असेल किंवा एखादी मिटींग असेल त्या दिवशी मला सकाळी लवकर उठवून,वेळेवर चहा नाश्ता देऊन, माझा पांढरा शर्ट धुवून इस्त्री करून तयार असायचा. माझ्या आईने माझ्या सामाजिक कार्याला कायमच पाठिंबा दिला."




त्याकाळी अनेक लोकांनी तिला मला या समाजकारण, राजकारणापासून लांब राहण्यासाठी शिकवण देण्यासाठी सांगितले,परंतु तिने कोणाचेही न ऐकता, "तो समाजासाठीच चांगले काम करतोय काही वाईट करत नाही" असं म्हणून माझी पाठराखण केली ती माझी आई. तिचे देखील मनापासून आभार आणि तिचे हे उपकार कधीही विसरू शकणार नाही. मराठा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीचा लढा तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा कायम चालू राहील.


लेखक : - सचिन शिंदे पाटील, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष - मराठा युवा फाउंडेशन.



Sunday, November 12, 2023

महाराष्ट्राचे "प्रेरणादायी शिलेदार" मिलिंद माने - जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय,असामान्य प्रवास... वाचा फक्त महाराष्ट्र गर्जना न्यूज पोर्टलवर...


महाराष्ट्राचे "प्रेरणादायी शिलेदार" मिलिंद माने - जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय,असामान्य प्रवास... 

जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान कार्याने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राला जशी महान संतांची,महापुरुषांची, क्रांतिकारकांची,समाजसुधारकांची परंपरा लाभली तशीच आजच्या प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीत सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा,साहित्य, विज्ञान,शिक्षण, तंत्रज्ञान यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महान कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वांनी  महाराष्ट्राला प्रगतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सचिन तेंडुलकर, शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बहूसंख्य लोकांना माहिती असतात.


पण महाराष्ट्राचे, भारताचे नाव आपल्या कर्तृत्वाने जगभर गाजवणारी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अश्या लोकप्रियतेपासून लांब राहून देखील आपल्या कर्तृत्वाने,प्रभावशाली कार्याने, संघर्षमय प्रवासाने तरुण पिढीला प्रेरणा देत असतात.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार TOT - TOP OF TABLE, COT - COURT OF TABLE, MDRT - MILLION DOLLAR ROUND TABLE शेकडो व्यक्तिमत्वांना मिळवून देण्याची अनमोल कामगिरी करणारे एल.आय. सी. ऑफ इंडियाचे, महाराष्ट्राचे,भारताचे प्रसिद्ध,कर्तृत्ववान विकास अधिकारी मिलींद माने यांचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. 


जगभरातील अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जीवन विमा, आर्थिक नियोजन यासारख्या महत्वाच्या विषयावर जगभरातून आलेल्या विमा, आर्थिक क्षेत्रातील प्रोफेशनल लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मिलिंद माने यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 


सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय जीवन जगत असतानाच महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर पुणे येथे  उच्च शिक्षणासाठी जायचे असे ठरविले असल्याने मिलिंद माने यांनी घरच्यांचा विरोध असतानाही दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी थेट पुणे गाठले.ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने घरच्यांचा विरोध डावलून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यासारख्या मोठया शहरात 1970 - 80 च्या दशकात उच्च शिक्षणासाठी जाणे हा धाडसीच निर्णय होता.फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाला प्रारंभ झाला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


अनेक अडचणींना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत मिलिंद माने यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातुन MSC - Statistics ही पदवी पूर्ण केली. यानंतर MBA - Marketing and Finance ही व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेऊन मुंबई येथील हिंदुस्तान लिवर लिमिटेड या नामांकित कंपनीत व्यस्थापकीय मोठया पदावर रुजू झाले. यानंतर 1987 - 88 मध्ये Volta's LTD Mumbai या नामांकित कंपनीत काम करत असताना मिलिंद माने यांच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. 


लोणावळा येथिल एका आलिशान हॉटेलमध्ये मिलिंद माने यांच्या कंपनीचा खास कार्यक्रम होता आणि त्याच हॉटेलमध्ये एल. आय.सी.ऑफ इंडियाचे देशभरातील वेगवेगळ्या अधिकारी लोकांची टीम आली होती. यामधील पुणे येथील एका अधिकाऱ्याचा त्या हॉटेलमध्येच दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झाले होते. देशभरातील हे सर्व अधिकारी खूप घाबरले होते कारण मृत्यू झालेल्या या पुण्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या घरी कोण,कसे घेऊन जाणार,काय सांगणार,कुणाला व्यवस्थित पत्ताही माहिती नव्हता अश्या संकट काळी मिलिंद माने या सर्व अधिकारी वर्गाच्या मदतीला धावून आले.मिलिंद माने यांनी मृत्यू झालेल्या त्या पुण्यातील अधिकाऱ्याची सर्व माहिती मिळवून त्यांना पुण्यातील घरी पोहचवण्यासाठी स्वता ते सर्व अधिकाऱ्यांबरोबर पुण्याला गेले, त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन पुढील सर्व व्यवस्था लावून मार्गक्रमण झाले. 


या घटनेमुळेच मिलिंद माने यांची एल.आय.सी. ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिलिंद माने यांना एल.आय. सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या विकास अधिकारी या महत्त्वाच्या पदाविषयी माहिती व महत्व सांगून त्यासाठी तयारी आणि अर्ज करण्यास सांगितले पण मिलिंद माने यांनी प्रथम साफ नकार दिला.




कारण त्यावेळी ते एका मोठया खासगी कंपनीत चांगल्या पदावर,मोठया पगाराची नोकरी करत होते. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पुन्हा ज्यावेळेस पुणे शहरात काम असे त्यावेळेस ते मिलिंद माने यांना भेटत आणि त्यांच्यातील सकारात्मक संवादामुळेच मिलिंद माने यांनी 1989 ला मोठया पगाराची Voltas LTD या नामांकित खासगी कंपनीतील नोकरी सोडून एल.आय.सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या पुणे डिव्हिजनला विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. खासगी कंपनीतील मोठया पगारापेक्षा  मिलिंद माने यांना  विकास अधिकारी या पदावर कमी पगार मिळणार होता हे माहिती असून देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला.


जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, ध्येयवादी दूरदृष्टी असलेल्या मिलिंद माने यांनी पहिल्याच वर्षी पुणे येथे एल.आय. सी.ऑफ इंडियाचे विकास अधिकारी म्हणून विमा क्षेत्रात दमदार,उल्लेखनीय,उत्कृष्ट कामगिरी करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.पुढील वर्षी आपल्या विमा क्षेत्रातील दमदार,विशेष कामगिरीने मिलिंद माने यांनी पुणे विभागात विकास अधिकारी म्हणून प्रथम स्थान पटकावले. यानंतर मिलिंद माने यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.जिद्दीने,चिकाटीने, निष्ठेने, प्रचंड मेहनतीने यशाची नवनवीन शिखरे गाठतच गेले. अवघ्या काही वर्षातच मिलींद माने या महाराष्ट्रातील प्रभावशाली वरिष्ठ विकास  अधिकाऱ्याने जीवन विमा क्षेत्रात दमदार, विशेष कामगिरी करत भारताच्या All India Ranking Top 5 - सर्वोत्कृष्ट 5 अधिकाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कारण एल.आय.सी.ऑफ इंडियाच्या विकास अधिकाऱ्याला एखादया शहरातील शाखेत दमदार काम करून देखील शाखेत कामगिरीच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवणेही अवघड असते. मग जिल्हा, राज्य,देश पातळीवर विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे स्थान मिळवणे तर खूप कठीण गोष्ट असते. पण मिलिंद माने या प्रचंड ध्येयवादी दृष्टिकोन असलेल्या,प्रामाणिक, मेहनती,बुद्धिमान,कर्तृत्ववान मराठी माणसाने आपल्या प्रभावशाली कार्याने महाराष्ट्राचे नाव देशभरातच नाही तर जगभर उंचावले. 


2005 मध्ये विमा क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार MDRT हा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतातील त्यांच्या टीममधील अनेक व्यक्तींना मिळवून देण्याची अनमोल विक्रमी कामगिरी करणाऱ्या मिलिंद माने यांचा विशेष सन्मान MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी केला. खरं तर ही प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विमा क्षेत्रातील MDRT या  जगातील एवढया मोठया संस्थेचा अध्यक्ष मिलिंद माने यांचा भारतातील विमा क्षेत्रातील  विशेष, विक्रमी कामगिरीमुळे विशेष सन्मान करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.


जीवन विमा, आर्थिक नियोजन, या विषयावरील मिलिंद माने यांचा एवढा दांडगा अभ्यास आहे की देशभरातील दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, मुंबई यासारख्या मोठया शहरातील हजारो अधिकाऱ्यांना मिलिंद माने मार्गदर्शन करत असतात. मिलिंद माने यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जीवन विमा, आर्थीक नियोजन याविषयी नवीन दृष्टिकोन देत असतात. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मिलिंद माने नेहमी सांगतात, "जीवन विमा ही लोकांना विकायची वस्तू नाही तर लोकांना आर्थिक साक्षर करायची मोहीम आहे. जीवन विम्याच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, रिटायरमेंट नियोजन, मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन,कुटुंबाची आर्थिक सुरक्षा, पेंशन नियोजन कसे करता येते याविषयी लोकांना साक्षर करा."


2006 ला मिलींद माने यांना अमेरिकेत MDRT या जागतिक संस्थेने आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून विशेष सन्मानित केले. जगभरातील विमा क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींना मार्गदर्शन करणारे मिलिंद माने यांचा जीवनप्रवास तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. MDRT या विमा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जेव्हा मिलिंद माने भारताचे प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा घेऊन अभिमानाने फडकवत असतात ते मनाला आनंद देणारे दृश्य पाहून वाटते की हा महाराष्ट्राचा,भारताचा प्रेरणादायी योद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन देखील शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर जगभरात देशाचे नाव उंचावतोय ही तरुणांसाठी खूप विलक्षण आणि प्रेरणादायी यशोगाथा आहे.


2006 मध्येच भारतातील प्रसिद्ध लेखक,प्रेरणादायी वक्ते शिव खेरा यांच्या हस्ते मिलिंद माने यांना भारतातील विमा क्षेत्रातील विशेष कामगिरी, योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2006 नंतर सलग अनेक वर्षे जगभरातील विविध देशांमध्ये मिलिंद माने यांना आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी आमंत्रित केले जायचे. 2012 ला पुन्हा एकदा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममधील 17 व्यक्तींना विमा क्षेत्रातील MDRT हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी मिलिंद माने यांचा  विशेष सन्मान केला.


मिलिंद माने यांचे जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था यावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना समजेल अश्या सोप्या भाषेतील, प्रभावशाली आणि मनाला विचार करायला भाग पाडणारे आहे. देशभरातील एल.आय. सी.ऑफ इंडियाच्या हजारो वरीष्ठ विकास अधिकाऱ्यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी All India Sr Business Associate Forum  या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे स्थापना केली त्याचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत.


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रातील यशाची एवढी मोठी शिखरे गाठल्यानंतरही शिक्षणाचा ध्यास काही सोडला नाही. 2018 ला MBA - Insurance and Financial Planning ही व्यस्थापन शास्त्राची पदवी मिळवली. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रात काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार,विमा सल्लागार यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी जीवन विमा या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रेनिंग प्रोग्राम बनवला आहे. नुकताच मिलिंद माने यांनी जीवन विमा विषयावरील शोधनिबंध PHD साठी विद्यापीठात सादर केला आहे. 


मिलिंद माने यांची भारतीय समाजाशी नाळ खूप घट्ट निर्माण झालेली आहे.2003 साली स्थापन केलेल्या Lend a Hand India या सामाजिक संस्थेचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि सल्लागार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीब, गरजू मुलांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास,रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठा झाला, यशस्वी झाला तरी त्याचे पाय जमिनीवर पाहिजे. सर्वांशी नम्रतेने आणि माणुसकीने वागले पाहिजे. या साऱ्या गोष्टींची प्रचिती मिलिंद माने यांना भेटल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील,भारतातील तरुण पिढीसाठी  प्रेरणादायी असणाऱ्या मिलींद माने यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. 

लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


Monday, November 6, 2023

"पुरंदरमधील प्रसिद्ध वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या व चुरशीच्या लढतीत मंजुषा संतोष धुमाळ यांचा मोठा विजय; ऐतिहासिक "वीर" ग्रामपंचायतीवर फडकला काँग्रेसचा झेंडा, वीर ग्रामपंचायत निवडणुकीतील "या" रोमहर्षक लढतींचा निकाल वाचा सविस्तर"...



पुरंदर,वीर, दि.6 :  महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा अतितटीच्या लढाईत 350 च्या मताधिक्याने मोठा विजय झाला.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे नऊ उमेदवार वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवून काँग्रेसने वीर ग्रामपंचायतीवर या निवडणुकीत झेंडा फडकवला.




महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र वीर.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.




पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेल्या गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रमुख तीन उमेदवारांमध्ये चुरशीची व अतितटीची लढत झाली. 


काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा वीर गावच्या सरपंच पदासाठीच्या चुरशीच्या लढतीत 350 च्या मताधिक्याने  मोठा विजय झाला. ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा संतोष धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1541 मते मिळाले.





वीर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या  पराभूत झालेल्या उमेदवार हर्षला ऋषिकेश धसाडे यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1191  मते मिळाली. वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या मंजुषा संतोष धुमाळ यांनी भाजप पुरस्कृत पॅनलच्या हर्षला ऋषिकेश धसाडे यांचा 350 मतांनी पराभव केला.


श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या पराभूत झालेल्या उमेदवार मिनल भरत धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून एकूण 1052 मते मिळाली.


वीर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवार कल्पना विलास वाघ यांना एकूण १४६ मते मिळाली.




वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत  नोटाला( वरीलपैकी कोणीही नाही) 13 जणांनी मतदान केले.


ऐतिहासिक वीर गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी गावातील एकूण 3943 नागरिकांनी मतदान केले.


"ऐतिहासिक वीर गावातील नागरिकांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्यावरती विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी  विजयी केले त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा धुमाळ यांनी दिली.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर गावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वीर ग्रामपंचायतीच्या 15 जागांपैकी काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलने 8 जागांवरती विजय मिळवला. भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलने 3 जागांवरती विजय मिळवला.  श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलने 2 जागांवरती विजय मिळवला  तसेच श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलने एका जागेवरती विजय मिळवला. एका जागेवरती अपक्ष उमेदवार निवडून आला.


"पुरंदर तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसेवकांना निवडून दिले. पुरंदर मधील मोठया असलेल्या वीर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. वीर गावच्या जनतेने विकास कामांना पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेली  विकास कामे तसेच आमदार फंडाच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आम्ही केलेल्या विकास कामांना हा जनतेने दिलेला कौल आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलचे 8 विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे  


प्रभाग क्रमांक 1  : - विजयी उमेदवार 

1) पुनम प्रमोद धुमाळ - 429  

2) अनिकेत राजेंद्र समगीर - 333 


प्रभाग क्रमांक 2 : - विजयी उमेदवार

3) मोहन अरुण चवरे - 349

4) जयश्री अनिरुद्ध धुमाळ - 348

5) युवराज प्रताप धुमाळ - 341


प्रभाग क्रमांक 5 : - विजयी उमेदवार

6) प्रतीक अशोक सोनवणे - 479

7) जयश्री रुपेश धुमाळ - 348

8) राहुल कुंडलिक खोमणे - 361




भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलचे विजयी 3 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 3 : - विजयी उमेदवार

1) गणेश लक्ष्मण तांदळे - 335

2) छाया संतोष धसाडे - 332

3) आशा प्रशांत जाधव - 310


श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलचे विजयी 2 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 4 : - विजयी उमेदवार

1) पूजा विनोद बुरुंगले - 501

2) दिपाली नानासो वाघ - 375


शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलचा विजयी 1 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 1 : -

1) जयश्री सोपान समगीर - 410


प्रभाग क्रमांक 4 मधील विजयी झालेला 1 अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


1) एकनाथ उत्तम वचकल : - 434



"श्रीक्षेत्र वीर येथील सरपंच पदाची निवडणूक अतिशय चुरशीची व प्रत्येकालाच थरारक अनुभव देणारी ठरली. या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार  सौं.मंजुषाताई संतोष धुमाळ  सरपंच पदावरती विराजमान झालेल्या आहे. त्यामुळे प्रथमता त्यांचे अभिनंदन. आणि या तिरंगी निवडणुकीत बाजी मारणं इतकं सोपं नव्हतं परंतु त्यांचे पती वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ यांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत असलेला संपर्क,तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून हा अवघड वाटणारा विजय सोपा झाला आहे. हेही विसरून चालणार नाही. म्हणून या विजयाचे शिल्पकार सर्व ज्येष्ठ मंडळी,सर्व कार्यकर्ते,श्रीक्षेत्र वीर मधील विकासासाठी मतदान करणारा सुजाण नागरिक होय. येणाऱ्या काळात संतोषबापू धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ मंजुषाताई धुमाळ या गावातील सर्व घटकांना समान न्याय देऊन गावाचा विकास करावा आणि गावाचं गावपण टिकवण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जावे." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे   संपादक  शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"ऐतिहासिक वीर गावच्या जनता जनार्दनाने या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला हा कौल वीर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल असेल. वीर गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न, गावच्या सर्व गंभीर समस्या, चांगल्या आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, चांगल्या शैक्षणिक सुविधा यावरती लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चांगले काम करतील व समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच एकजुटीने प्रयत्न करतील अशीच नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Friday, November 3, 2023

"पुरंदरच्या प्रसिद्ध 'वीर' गावची 'जनताजनार्दन' ठरवणार ऐतिहासिक "वीर" गावचा सरपंच; जनतेच्या "मनातील" सरपंच कोण?



पुरंदर,वीर, दि.3 : महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वीर.श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक - भक्त क्षेत्र वीर  येथे प्रत्येक वर्षी येत असतात.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.


पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेले गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीकडे आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील सरपंच पदाच्या प्रमुख चार उमेदवारांनी या निवडणूकीच्या  काळात आपले जाहीरनामे, वचननामे,गावातील गंभीर समस्या, गावातील विकास कामे यासंदर्भात निवडणुकीतील प्रचार काळात आपापली भूमिका मांडलेली आहे.



"महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सुजाण व जागरूक नागरिकाला वाटत असते "आपले गाव आदर्श गाव व्हावे. आपले गाव विकसित, समृद्ध व्हावे. आपल्या गावातील गंभीर समस्या सुटल्या पाहिजेत. तसेच आपल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे." अशी भावना प्रत्येक गावातील  सुजाण नागरिकांची असते.महाराष्ट्राच्या आदर्श गावांमधील तरुण पिढी ही प्रस्थापित स्वार्थी राजकारणाला तिलांजली देऊन गावातल्या समस्या सोडवण्यावरती तसेच गावचा सर्वांगीण विकास करण्याच्या भूमिकेवरती प्रामाणिकपणे काम करत असते."


सामान्य माणसाला लोकशाहीत, राजकीय व्यवस्थेत, संविधानाने विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी कायदेशीर अधिकार बहाल केलेले असतात.




"गावची जनता ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असते. गावच्या विकासाची दिशा जनतेच्या हातात असते त्यामुळेच आदर्श गावांमध्ये निवडणूक काळात सरपंच पदाचा उमेदवार निवडत असताना गावातील जनता उमेदवाराचे शिक्षण, पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, लोकसंपर्क, गावातील प्रमुख समस्यांची जाण, समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, विकास निधी आणण्यासाठी प्रशासकीय कौशल्य, गावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन या सर्व गोष्टी गांभीर्याने पाहत असते."




वीर गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, अवैध धंदे, व इतर समस्यांवरती वीर गावचे सुजाण नागरिक व पुरंदर मधील पुढारीचे निर्भीड,अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी प्रामाणिकपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"वीर गावातील सर्वच गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय नेते, सर्व विश्वस्त, गावातील सुजाण नागरिक तसेच सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.वीर गाव हे पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील एक आदर्श गाव घडण्यासाठी तसेच वीरगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, योगदान देणे गरजेचे आहे.वीर गावातील सर्व गंभीर समस्या सोडवून, वीर गावाचा सर्वांगीण विकास करून, गावाला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे व आदर्श वीरगाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील सरपंच असेल."


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जात, धर्म, पंथ, गावकी, भाऊकी, प्रस्थापित स्वार्थी नेत्यांचे गलिच्छ राजकारण, जेवणावळी, दारूच्या पार्ट्या, पैशातुन मतविक्री यासारखे समाजाचे अतोनात नुकसान करणारे घटक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


महाराष्ट्रातील गाव संस्कृतीला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर "माझा गाव माझा अभिमान माझे व्हिजन" या संकल्पनेप्रमाणे गावातील प्रत्येक सुजाण नागरिकांनी गावच्या विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान गांभीर्याने दिले पाहिजे.



"वीर गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, बंदिस्त गटार योजना, दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा, सरकारी शाळेत व सरकारी दवाखान्यात दर्जेदार सुविधा, उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार संधीसाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तरुणांना उद्योग - व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे यासारखे समाज हितवादी उपक्रम राबवणारे व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व जनतेच्या मनातील सरपंच असेल." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली."


"लोकशाहीच्या प्रक्रियेत जनता जनार्दन निवडणुकीत मतदानाद्वारे गावचा कारभारी ठरवत असते. पण गावातील प्रमुख समस्या सोडवणारे तसेच गावचा सर्वांगीण विकास करणारे, राज्यात आदर्श गाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील  सरपंच असेन."