Sunday, June 2, 2024

"33 वर्ष शेतकरीराजाची सेवा करणारे पुरंदरचे शेती उद्योग भांडार ते 26 वर्ष रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे सासवडचे माधुरी मेडिकल ते व्यावसायात यशस्वी भरारी घेणारे सहा भावंडांचे आदर्श जगताप कुटुंब ते कोरोनाकाळात शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारे कोरोना योद्धे,ध्येयवादी फार्मासिस्ट, कार्यक्षम नगरसेवक,प्रेरणादायी शिलेदार नंदकुमार जगताप"


"33 वर्ष शेतकरीराजाची सेवा करणारे पुरंदरचे शेती उद्योग भांडार ते 26 वर्ष रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे सासवडचे माधुरी मेडिकल ते  व्यावसायात यशस्वी भरारी घेणारे सहा भावंडांचे आदर्श जगताप कुटुंब ते कोरोनाकाळात शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणारे कोरोना योद्धे,ध्येयवादी फार्मासिस्ट, कार्यक्षम नगरसेवक,प्रेरणादायी शिलेदार नंदकुमार जगताप"

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाने पावन झालेली ही पुरंदरची महान भूमी, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुरंदरची महान भूमी, श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या महान पराक्रमाचा वारसा जपणारी पुरंदरची ही महान भूमी. महान संत सोपानकाका, आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक, थोर समाजसुधारक महात्मा फुले, साहित्यिक,विविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारी ही पुरंदरची महान भूमी.


ऐतिहासिक सासवड नगरीचे संस्थापक तीर्थस्वरूप हरजीराजे जगताप यांचे वंशज श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या महान पराक्रमाचा वारसा जोपासणारे श्री बंडोबा भाऊसाहेब जगताप यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून कार्यकाळ गाजवणारे श्री बंडोबा जगताप यांची तीनही मुले गंगाधरअण्णा जगताप, विठ्ठलराव जगताप व चंद्रकांत जगताप यांनी वडिलांचा सामाजिक वारसा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन तसेच प्रगतशील शेतकरी म्हणून चांगले कार्य करून समर्थपणे जोपासला.


पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गात लोकप्रिय असणारे कै.गंगाधरअण्णा जगताप हे  जगताप कुटुंबीयांचे आधारस्तंभ म्हणून अनेक वर्ष कुटुंबातील सर्व सदस्यांना शेती व व्यवसायासाठी खूप मोठा आधार देऊन, मार्गदर्शन करत होते. "तुम्ही प्रामाणिकपणे,सचोटीने, चिकाटीने व्यावसाय केला तर परमेश्वर तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही" अशी शिकवण गंगाधरअण्णांनी कुटुंबातील व्यवसाय करणाऱ्या सर्वच लोकांना दिलेली होती. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


उच्च शिक्षण घेतलेल्या तरुण पिढीने फक्त नोकरीच्या मागे न धावता नवनवीन व्यावसायामध्ये उतरून लोकांना चांगली सेवा देऊन, प्रगती करावी अशी शिकवण गंगाधरअण्णांनी जगताप कुटुंबातील तरुण पिढीला दिलेली होती. यामुळेच गंगाधर अण्णांचे चिरंजीव विलास काका जगताप व विजय जगताप यांनी 1991 ला गंगाधरअण्णांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेतून सासवड येथे "शेती उद्योग भांडार" या शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देणाऱ्या नवीन व्यवसायाची जिद्दीने सुरुवात केली.

विलास काका जगताप यांचे 1987 ला पुणे विद्यापीठातून एमकॉम पूर्ण झाले होते. त्यानंतर 1988 ला बीपीएड झाले होते. त्या काळामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी या पदासाठी त्यांनी प्रयत्नही केला होता. परंतु तिथे काम न झाल्यामुळे त्यांनी गंगाधर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कृषी,शेतकरी सेवा क्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं. 35000 च्या भांडवलापासून पुरंदर तालुक्यातील सासवड येथे सुरू केलेला "शेती उद्योग भांडार" आज पुरंदर,भोर,बारामती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी मार्गदर्शन करून, प्रामाणिकपणे सेवा देत आहे.

शेती उद्योग भांडारच्या माध्यमातून आधुनिक शेतीसाठी आवश्यक सर्व बी- बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, शेतीची अवजारे, कृषी सेवा, शेतकरी राजाच्या प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून अल्पावधीतच "शेती उद्योग भांडारने" पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या हृदयात एक विश्वासाचे नातं निर्माण केलं.



"उत्तम व्यवहारे जोडोनिया धन या गंगाधर अण्णांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे  विलास काका जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी  पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर  जाऊन त्यांना आधुनिक शेतीसाठी मार्गदर्शन करून, त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा दिली.


1991 ला पुरंदरमध्ये गणेश डाळिंब गंगाधरअण्णांच्या मार्गदर्शनाखाली शेती उद्योग भंडाराच्या माध्यमातून, पुरंदरमध्ये  पहिल्यांदाच गणेश डाळिंबाची लागवड करून त्याचा प्रसार संपूर्ण तालुक्यामध्ये करण्यात यांचे खूप मोठे योगदान आहे. छत्तीसगडचा पेरू पुरंदर तालुक्यात पहिल्यांदा आणण्यामध्ये व त्याची लागवड करून तालुक्यात प्रसार करण्यामध्ये शेती उद्योग भांडारचे महत्वाचे योगदान आहे. 


भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी आधुनिक शेती पाहण्यासाठी दौरे करणे तसेच पुरंदर तालुक्यातील शेतकरी वर्गाला कृषीविषयक कार्यशाळांच्या माध्यमातून आधुनिक शेतीसाठी हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे यामुळे शेती उद्योग भांडारने पुणे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा अल्पावधीतच विश्वास संपादन केला.


आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीताफळ, डाळिंब, सूर्यफूल, ढोबळी मिरची, जांभूळ, चिंच,पेरू,अंजीर यांचे उत्पादन करून त्यांना जगभर पोहोचवण्यामध्ये, उत्तम दर्जाचा शेतमाल जगभरात निर्यात करण्यासाठी शेती उद्योग भांडार प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.


"शेतातील नवनव्या कोंबांचे उगमस्थान शेती उद्योग भांडार" हे ब्रीदवाक्य घेऊन शेती उद्योग भांडारने पुरंदर तालुक्यातील पाच हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सेवा देऊन, तसेच कृषी शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन, कृषी शिबिरे,कार्यशाळा, शेतातील नवनवीन प्रयोग, प्रगतशील शेतकरी यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. पुरंदर तालुक्याचे मा. आमदार, कृषिराज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व पुरंदरचे लोकप्रिय नेते, सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे गंगाधरअण्णा जगताप यांच्या कुटुंबियांना व्यावसायासाठी बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.


गंगाधरअण्णा जगताप यांची दूरदृष्टी, मार्गदर्शन, प्रेरणा यामुळे या जगताप कुटुंबियातील सहा भावंडांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली.


एकत्र कुटुंबाची ताकद काय असते. व्यावसायात प्रगती करण्यासाठी सर्व भावंडांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर यशस्वी वाटचाल कशी होऊ शकते. हे गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप कुटुंबातील सहा भावंडांनी व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी झेप घेऊन दाखवून दिले.

सहकार महर्षी, स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाधरअण्णा जगताप यांनी सासवड येथील प्रसिद्ध काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोदाराच्या कामात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे."गंगाधर अण्णांची दूरदृष्टी, मार्गदर्शन व प्रेरणा तसेच पुरंदरचे माजी आमदार,कृषिराज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व पुरंदरचे सहकारमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यामुळेच आम्हाला शेती उद्योग भांडारच्या माध्यमातून प्रगतशील वाटचाल करता आली." असे विलासकाका जगताप सांगतात. 


गंगाधरअण्णा जगताप यांनी त्यांची दोन मुले व चार पुतणे असे जगताप कुटुंबातील सहा भावंडांना योग्य मार्गदर्शन करून, व्यावसायाची दूरदृष्टी देऊन त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळण्यासाठी खूप मोठा आधार दिला.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पुरंदर तालुक्यात 26 वर्ष माधुरी मेडिकलच्या माध्यमातून हजारो लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणाऱ्या नंदकुमार जगताप यांचा जन्म ऐतिहासिक सासवडच्या भूमीत सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. नंदूबापु जगताप यांचे वडील विठ्ठल जगताप प्रगतशील शेतकरी आहेत तसेच ते पीएमटी बससेवेमध्ये कार्यरत होते तर त्यांच्या आई  गृहिणी म्हणून घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांवरती चांगले संस्कार केले.


बालपणापासूनच नंदकुमार जगताप यांना त्यांच्या आई- वडिलांचे संस्कार व त्यांचे चुलते गंगाधरअण्णा जगताप यांचे मार्गदर्शन व संस्कारांची शिदोरी मिळाल्यामुळे भावी प्रगतशील वाटचालीमध्ये ही सर्व नीतीमूल्य दिशादर्शक ठरली. नंदकुमार जगताप यांचे शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून सासवडमध्येच झाले. गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जडणघडण झालेल्या नंदकुमार जगताप यांनी दहावीला  विशेष प्राविण्य मिळवून, चांगले गुण मिळवून चमकदार कामगिरी केली.


लहान वयापासूनच व्यावसायिकतेचे धडे मिळत असल्यामुळे दहावीनंतर 1992 ला नंदकुमार जगताप यांनी सासवड येथे डिप्लोमा इन फार्मसीला, औषधनिर्माणशास्त्र पदविका कोर्स साठी सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीला प्रवेश घेतला. नंदकुमार जगताप यांना दहावीला विशेष प्राविण्यसह चांगले गुण मिळून देखील, डिप्लोमा इन फार्मसीच्या प्रवेशासाठी डोनेशन मागितले होते. त्यामुळे प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. परंतु गंगाधरअण्णा जगताप व विलास काका जगताप यांच्या सहकार्यामुळे त्यांचा डी - फार्मसी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला.

"सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगले मार्क्स असून देखील अनेक महाविद्यालये डोनेशन घेतात यामुळे खरंच खूप खंत वाटते. गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येता कामा नये." असे नंदकुमार जगताप सांगतात. नंदकुमार जगताप सासवड मधील फार्मसी महाविद्यालयात दोन वर्ष शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले. 


सासवडमध्ये त्याकाळी पाण्याचा दुष्काळ होता त्यामुळे खूपच बिकट परिस्थिती होती. अशा परिस्थितीत देखील नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या मित्रांना आधार देऊन, त्यांच्या शेतातून पाणी आणून त्यांची पाण्याची समस्या सोडवली. कॉलेजमध्ये बाहेर गावचे, बाहेरच्या जिल्ह्यातील भरपूर मुले असल्यामुळे त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये, पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था तसेच कुठलीही जरी अडचण आली तरी नंदकुमार जगताप मित्रांना मदत करत होते.

तरुण पिढीमध्ये नंदकुमार जगताप लोकप्रिय असण्याचे कारण त्यांच्या कॉलेज जीवनातील जडणघडणीमध्ये दिसून येते. शिक्षण घेत असतानाच मित्रांच्या मदतीला धावून जाणे. 

महाविद्यालयातील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे, कॉलेज संपले तरी बत्तीस वर्षानंतरही कॉलेजच्या सर्व मित्र परिवाराच्या संपर्कात राहून, त्यांच्या सुख दुःखामध्ये सामील होणे. यामुळेच नंदकुमार जगताप सर्व मित्र परिवारांमध्ये व तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. 


सासवडमध्ये डी- फार्मचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1995 ला नंदकुमार जगताप यांनी पुण्यातील हडपसर येथील प्रसिद्ध रोहित मेडिकलमध्ये दोन वर्ष फार्मासिस्ट या पदावरती प्रामाणिकपणे काम करून अनुभव घेतला. डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स करणे आणि मेडिकल चालवणे यात खूप फरक असतो याची अनुभूती नंदकुमार जगताप यांना तिथे आली. नंदकुमार जगताप यांचे मेडिकल क्षेत्रातील गुरु विजय चंगेडिया  यांनी त्या कालावधीमध्ये नंदकुमार जगताप यांना योग्य मार्गदर्शन करून, चांगला फार्मासिस्ट, (औषध विक्रेता) बनण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींचे ज्ञान दिले. 

"एक फार्मासिस्ट म्हणून, औषध विक्रेता म्हणून रुग्णांची सेवा कशी करायची? प्रामाणिक रुग्णसेवेतून फार्मासिस्टला कसे यश मिळते? मेडिकलचा व्यवसाय कसा करायचा? याचे धडे विजय चंगेडिया सरांनी खूप चांगल्या प्रकारे दिल्याने तसेच मेडिकल क्षेत्रातील सर्व अनमोल मार्गदर्शन त्यांनी दिल्यामुळे मला पुढच्या प्रवासात त्याचा खूप फायदा झाला." असे नंदकुमार जगताप सांगतात.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पुण्यातील प्रसिद्ध मीरा मेडिकल येथे नंदकुमार जगताप फार्मासिस्ट म्हणून काम करत असताना मेडिकलमधील औषधांचा प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करून, प्रत्येक औषधाची वैद्यता, त्यातले घटक, त्याची किंमत या सगळ्या गोष्टी बघून त्यांचा अभ्यास करून रुग्णसेवा चालू होती."सुरुवातीला मेडिकलमधील प्रशिक्षण काळात औषधांचा प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करताना वाईट वाटले परंतु एक चांगला फार्मासिस्ट बनण्यासाठी या प्रशिक्षणाच्या काळात तुम्हाला  मेडिकलमधील प्रत्येक कप्पा नी कप्पा साफ करून, संपूर्ण दुकान हाताखालून गेले पाहिजे, तिथे असलेली औषधे, त्या औषधातील घटक, कुठल्या औषधांची वैद्यता संपलेली आहे? सर्व औषधांच्या किमती, औषधांचे उपयोग या सर्वांची माहिती व्यवस्थित मिळते व  या सर्व प्रक्रियेतून गेल्यामुळेच एका फार्मासिस्टची चांगली जडणघडण होते." असे नंदकुमार जगताप सांगतात.

पुण्यातील प्रसिद्ध मेडिकलमध्ये फार्मासिस्ट या पदावरती तीन-चार वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर नंदकुमार जगताप यांनी गंगाधरअण्णा जगताप यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाखाली सासवड येथे 1998 ला माधुरी मेडिकलच्या माध्यमातून नवीन व्यावसायाची सुरुवात केली. 

नंदकुमार जगताप यांचे चुलते व मार्गदर्शक गंगाधरअण्णा जगताप यांनी माधुरी मेडिकल सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांची भांडवलासाठी मदत व एक लाख रुपयाची फर्निचर साठी मदत त्याकाळी केली. नंदकुमार जगताप यांचे थोरले बंधू विजय जगताप यांनी त्याकाळी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे दुकान(गाळा) माधुरी मेडिकल साठी उपलब्ध करून दिले हे योगदान ही खूप महत्त्वाचे आहे.


त्याकाळी जगताप कुटुंबासाठी आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्वच मुलांना, पुतण्यांना व्यावसायासाठी मदत करून, मार्गदर्शन करून, कुटुंबाची एकजूटता व्यावसायिक प्रगतीसाठी किती महत्त्वाची आहे हे कृतीतून दाखवून दिले. ही खरंच सर्वांसाठीच प्रेरणादायी गोष्ट आहे.


1998 ला सासवड येथे माधुरी मेडिकलचे उद्घाटन त्याकाळातील पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध, नामांकित डॉक्टर वाघोलीकर, डॉक्टर रावळ, डॉक्टर खळदकर, डॉक्टर वसाळे, डॉक्टर खाडे यांच्या हस्ते झाले.तसेच नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत, आनंददायी वातावरणात हा माधुरी मेडिकलचा उद्घाटन सोहळा पार पडला. सासवड शहरात त्याकाळी आठ मेडिकल्स होते. सासवड मधील जगताप परिवारांमधील माधुरी मेडिकल हे नंदकुमार जगताप यांनी सुरू केलेले त्याकाळचे पहिले मेडिकल होते.


व्यवसाय काय असतो? व्यवसाय कसा करायचा? व्यवसायातला प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा? याचे धडे गंगाधरअण्णा जगताप यांनी नंदकुमार जगताप यांना दिल्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे, सचोटीने, माधुरी मेडिकलच्या माध्यमातून सासवडमध्ये, पुरंदर तालुक्यातील रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करण्यास सुरुवात केली. त्याकाळी माधुरी मेडिकलच्या परिसरात कोणतेही मोठे हॉस्पिटल नसताना देखील, माधुरी मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडे फक्त ग्राहक म्हणून न पाहता, आपल्या कुटुंबातील व्यक्ती,सदस्य म्हणून, प्रामाणिकपणे रुग्णसेवा करण्याच्या, योग्य मार्गदर्शन करण्याच्या नंदकुमार जगताप यांच्या कार्यशैलीमुळे, स्वभावामुळे अल्पावधीतच माधुरी मेडिकल  सासवड मधील लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. 

गंगाधर अण्णा जगताप यांचे माधुरी मेडिकलमध्ये विशेष लक्ष असायचे. जगताप कुटुंबियांचा आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे, सहकार्यामुळे माधुरी मेडिकलची प्रगतशील वाटचाल सुकर झाली.

गंगाधरअण्णा जगताप यांचा जनसंपर्क व मार्गदर्शन, शेती उद्योग भंडाराचे विश्वासू ग्राहक, जगताप कुटुंबाची एकजूटता, सर्व भावंडांचे सहकार्य व नंदकुमार जगताप यांची प्रामाणिक कार्यशैली,जिद्द,चिकाटी यामुळे माधुरी मेडिकल अल्पावधीतच संपूर्ण पुरंदर तालुक्यात हजारो लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. सासवड शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सात-आठ वर्ष नंदकुमार जगताप यांनी खूप प्रभावशाली काम केलेले आहे. औषध विक्रेत्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून तसेच औषध विक्रेत्यांना सर्व प्रकारचा पाठिंबा, अडचणीच्या काळात मदत करून नंदकुमार जगताप यांनी औषध विक्रेत्यांच्या संघटनेच्या कार्यामध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे.


ऑनलाइन फार्मसी तसेच भरमसाठ सवलती देऊन औषध विक्री करणाऱ्या मोठ्या कंपन्या यांच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध, सामान्य औषध विक्रेत्यांच्या हिताच्या दृष्टीने नंदकुमार जगताप यांनी पुरंदर तालुका केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून तसेच सासवड शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार जगताप यांनी सामान्य औषध विक्रेत्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा आवाज उठवलेला आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून जी चुकीच्या पद्धतीने औषध विक्री केली जाते त्याचे खूप भयानक दुष्परिणाम आहेत. ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून काही रुग्णांना बनावट औषध विक्री केली जाऊन त्यांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम झालेल्या घटना घडलेल्या आहेत. यामुळेच ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वेळा मेडिकल व्यवसायीकांनी तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून भारत बंद करून या गंभीर समस्येवरती लक्ष वेधायला लावून, सरकारला कडक कारवाई करण्यास भाग पाडले. 

रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती ही डॉक्टरांना व औषध विक्री करणाऱ्या फार्मासिस्टला खूप चांगली  अवगत असते. फार्मासिस्ट (औषध विक्रेता) त्या रुग्णाला, त्या आजारावरील औषध कशा पद्धतीने घ्यायचे, या औषधांचा नक्की उपयोग काय? परिणाम काय? औषधे घेताना काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती देत असतो. औषध विक्रेता ज्या प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करतो,मार्गदर्शन करतो तसे ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून घडताना दिसत नाही." असे नंदकुमार जगताप सांगतात.


"ऑनलाइन फार्मसीच्या माध्यमातून गर्भपाताच्या गोळ्याही कुठल्याही निर्बंधाविना विक्री केल्यामुळे याचा समाजात खूप गंभीर परिणाम झालेला आहे. या गंभीर विषयासंदर्भातही ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनने तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून कडक भूमिका घेऊन सरकारला बेकायदेशीर औषध विक्री व्यवस्थे विरोधात कारवाई करायला भाग पाडले आहे. ऑनलाइन औषध विक्रीमध्ये आता कडक निर्बंध आणले गेलेले आहेत. यासाठी आमच्या औषध विक्रेता संघटनेच्या कार्याचे खूप मोठे योगदान आहे" असे नंदकुमार जगताप सांगतात.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

पुरंदर तालुक्यातील हजारो कुटुंबांना नंदकुमार जगताप यांनी माधुरी मेडिकलच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा दिलेली आहे. औषधे कशी घ्यायची इथपासून ते गंभीर आजार रुग्णांना होऊ नये तसेच आजारातून लवकर मुक्त होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? याची माहिती देऊन निरोगी स्वास्थ्य कशाप्रकारे जपले पाहिजे? याचे मार्गदर्शन नंदकुमार जगताप सर्व रुग्णांना करतात. यामुळेच पुरंदर तालुक्यात माधुरी मेडिकलने 26 वर्ष रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन, हजारो लोकांच्या हृदयात विश्वासाचे व आदराचे स्थान निर्माण केलेले आहे.


"सासवड शहरात तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारे नंदकुमार जगताप कधी "आपल्या हक्काचा माणूस नंदूबापू" म्हणून प्रसिद्ध झाले झाले  हे कळले सुद्धा नाही. सासवड शहर, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण पिढी नंदकुमार जगताप यांच्या ध्येयवादी विचारांशी आणि सामाजिक कार्याशी जोडली गेलेली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे गंभीर प्रश्न,आरक्षणाचा प्रश्न, गोरगरीब तरुणांचे गंभीर प्रश्न पोटतिडकेने व अभ्यासपूर्ण मांडणारा प्रामाणिक,सच्चा कार्यकर्ता म्हणून नंदकुमार जगताप यांची ओळख फक्त पुणे जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा चळवळीतील तरुणांपर्यंत पोहोचली."


मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नासाठी जेवढी - जेवढी आंदोलने झाली पुरंदर तालुक्यात, सासवड शहरात तसेच पुणे जिल्ह्यात त्या प्रत्येक आंदोलनामध्ये नंदकुमार जगताप यांनी समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांचे प्रामाणिक योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गरीब मराठा तरुणाईला न्याय मिळण्यासाठी कितीही आंदोलने करावी लागली, कितीही वेळा लढा द्यावा लागला तरी या लढ्यात निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे सहभागी होऊन न्याय मिळण्यासाठी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे  काम करणे ही नंदकुमार जगताप यांचे खासियत तरुण पिढीला भिडते.


अठरापगड जातीतील सर्व तरुणांना कुठल्याही गंभीर प्रश्नासाठी तसेच मोठ्या अडचणीच्या वेळेस मदत करण्यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच निस्वार्थ वृत्तीने धावून येत असतात. सासवड शहरातील तसेच पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नंदकुमार जगताप यांचा सक्रिय सहभाग असतो. 


महागाई, बेरोजगारी तसेच जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीच्या आंदोलनातही नंदकुमार जगताप यांचा सक्रिय सहभाग असतो तसेच लोकांच्या हिताच्या विषयासाठी ते आपली परखड भूमिका मांडतात.


नंदकुमार जगताप यांचे प्रामाणिक सामाजिक कार्य तसेच समाजातील सर्व घटकांशी असणारा संपर्क, समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रामाणिक मदत करण्याची भावना यामुळेच कोरोना काळात 2020 ला नंदकुमार जगताप यांना सासवड नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळाली. 


पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी नंदकुमार जगताप यांच्यामधील निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, अभ्यासू, ध्येयवादी कार्यकर्ता, समाजासाठी तळमळीने कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता पाहून नंदकुमार जगताप यांना  स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊन सासवड  मधील नागरिकांची सेवा करायची संधी दिली.

कोरोना काळात संपूर्ण जग बंद असताना फार्मासिस्ट, औषध विक्रेत्यांनी जी हजारो - लाखो रुग्णांची प्रामाणिक सेवा केली ते योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. नंदकुमार जगताप यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात कोरोनाचा महाभयंकर काळ चालू असताना पुणे जिल्ह्यातील शेकडो - हजारो रुग्णांना हॉस्पिटलला कोरोनावरील उपचारांसाठी भरती करणे, ऑक्सीजन बेड मिळवुन देणे, कोविड सेंटरमध्ये बेड मिळवुन देणे, रुग्णांना धीर देऊन, आधार देऊन औषध पुरवठा करून हॉस्पिटलला भरती करणे यासाठी प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने, खूप मोठे काम केलेले आहे.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


कोरोनाच्या भयंकर काळात पुरंदर तालुक्यातील खाजगी हॉस्पिटल्स, सरकारी दवाखाने तसेच कोविड सेंटरला औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी  पुणे जिल्हाधिकारी, जिल्हा औषध निरीक्षक व आमदार संजय जगताप यांच्या टीममध्ये नंदकुमार जगताप यांनीही महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.



"कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन तसेच इतर अनेक औषधांचा तुटवडा असताना, पुरंदर तालुक्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा औषध निरीक्षक व पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्याबरोबर पुरंदर तालुक्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल, सरकारी दवाखाने व कोविड सेंटरला सुरळीतपणे औषध पुरवठा करण्याच्या कामामध्ये तसेच ऑक्सिजन सिलेंडरचा हॉस्पिटल्स व कोविड सेंटर्सना सुरळीतपणे पुरवठा होण्याच्या कामांमध्ये मला मदत करता आली याचे खूप समाधान आहे. कोविड खूप दृष्ट होता, वाईट होता परंतु प्रामाणिक रुग्ण सेवा करणे हे आमचे व्रत असल्यामुळे कधीच मला मृत्यूची भीती वाटली नाही." असे नंदकुमार जगताप सांगतात.


"छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा पाठीशी असल्यामुळे कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णसेवा करताना कधीच भीती वाटली नाही. समाजातील विविध घटकांची सेवा करण्याची संधी मला या कोरोनाकाळात मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.

कोरोनाच्या महाभयंकर लाटेत नंदकुमार जगताप यांनी कोवीड योद्धा म्हणून केलेले प्रामाणिक, सेवाभावी वृत्तीने केलेले रुग्णसेवेचे कार्य पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील शेकडो - हजारो रुग्ण कधीच विसरू शकणार नाही. कोरोना काळात शेकडो - हजारो लोकांचा मृत्यू झालेला  काळ फार भयानक होता. अशा काळात नंदकुमार जगताप पुणे जिल्ह्यातील,पुरंदर तालुक्यातील, सासवड शहरातील कोरोना रुग्णांना धीर देऊन, आधार देऊन त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करणे, सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करणे तसेच कोविड सेंटरला जाऊन भरती करणे, कोविड सेंटरला स्वतः जाऊन औषधांचा पुरवठा करणे हे जिकीरीचे काम सर्व प्रकारचा धोका पत्करून, प्रामाणिकपणे व आपली सर्व माणसं लवकरात लवकर बरी झाली पाहिजेत या भावनेने त्यांनी मनापासून कार्य केले.

नंदकुमार जगताप यांच्या मित्र परिवारातील एका मित्राच्या वडिलांना कोरोना झाल्यानंतर नंदकुमार जगताप यांनी सासवड येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या त्यांची पुतणी डॉक्टर माधुरी जगताप यांच्या सहकार्याने बेडची व्यवस्था केली. परंतु ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यावेळेस नंदकुमार जगताप यांनी आमदार संजय जगताप यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करून,  पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मित्राच्या वडिलांना कोरोना उपचारासाठी बेड मिळवून दिला.


त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मित्राची कोरोना चाचणी केल्यानंतर तेही कोरोना पॉझिटिव्ह आले तसेच त्यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, त्यांची मुले कोरोना चाचणी केल्यानंतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यामुळे ते कुटुंब प्रचंड घाबरले होते. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


खूप भयभीत झाले होते अशा परिस्थितीत नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या मित्राच्या संपूर्ण परिवाराला आधार देऊन,धीर देऊन त्यांच्या मित्राला पुन्हा पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सासवडमधील हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारांसाठी भरती केले. काही दिवसानंतर सासवड येथील कोविड सेंटर मध्ये सर्व लोकांना भरती करून ते कुटुंब पूर्णपणे कोरोना मुक्त झाले. या महाभयंकर संकटाच्या काळातही लोकांचा जीव वाचवण्यासाठीचा ध्यास,त्यासाठी केलेली प्रामाणिक रुग्णसेवा कुठलेच कुटुंब आयुष्यभर विसरत नसते. अशा प्रकारच्या शेकडो कुटुंबांना नंदकुमार जगताप यांनी कोरोना काळात प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने मदत केलेली आहे.


"कोरोनाच्या महाभयंकर लाटेत संपूर्ण जग बंद असताना फार्मासिस्ट, (औषध विक्रेता) यांनी निर्भीडपणे, प्रामाणिकपणे रुग्णसेवा करून अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावलेले आहे. डॉक्टर,आरोग्य कर्मचारी यांचे योगदान हे महत्त्वाचे आहेच परंतु फार्मासिस्टला, (औषध विक्रेत्याला) कोरोना रुग्ण आल्यानंतर त्याला सामोरे जाऊन, त्याच्याशी संवाद साधून, त्याला धीर देऊन त्याला योग्य औषध देऊन, पुढच्या उपचारासाठी मार्गदर्शन करणे व मदत करणे हे आव्हानात्मक काम देशातील सर्वच फार्मासिस्ट समूहाने प्रामाणिकपणे केलेले आहे. कोरोना काळातील फार्मासिस्टचा संघर्ष दुर्लक्षित राहिला असला तरी फार्मसिस्टचे  या काळातील योगदान खूप महत्त्वाचे होते." असे नंदकुमार जगताप सांगतात.


कोरोना काळात काही रुग्ण तर नंदकुमार जगताप कोविड सेंटरला भरती करायला स्वतः येत असतील तरच कोविड सेंटरला उपचार घेण्यासाठी भरती होतो असे सांगत होते. अशा रुग्णांनाही नंदकुमार जगताप यांनी प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने सेवा दिलेली आहे. 


कोरोना रुग्णांच्या घरचे नातेवाईक कोविड सेंटरला घरातील रुग्णाला घेऊन जायला घाबरायचे   परंतु नंदकुमार जगताप सर्वच कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये निर्भीडपणे घेऊन जाऊन, तिथे कोरोना उपचारांसाठी त्या रुग्णांना भरती करून, त्यांना लागणारा औषध पुरवठा, त्यांना लागणारे जेवणाचे डबे तसेच सर्व प्रकारची मदत माणुसकीच्या भावनेने करायचे. 

कोरोना काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी, पांढरपेशावर्ग, श्रीमंत वर्ग, अनेक लोकप्रतिनिधी,राजकीय नेते कोरोनाची भीती मनात घेऊन घरी बसलेले असताना नंदकुमार जगताप यांच्यासारखे कार्यक्षम नगरसेवक शेकडो - हजारो कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी रस्त्यावरती उतरून निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, सेवाभावी वृत्तीने मदत करत होते, लोकांचा जीव वाचवत होते. हे कोरोना काळातील त्यांचे माणुसकीच्या भावनेने केलेले महत्वपूर्ण योगदान कोणही विसरू शकणार नाही.


2005 ला सासवडच्या ऐतिहासिक भूमीत स्वर्गीय सहकारमहर्षी चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, जगताप परिवारातील ज्येष्ठ मंडळी व तरुण मंडळी यांच्या प्रयत्नातून महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे प्रतिष्ठानचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभरात मोठे होण्यासाठी जगताप परिवारातील अनेक शिलेदारांचे त्यात योगदान आहे. त्यामध्ये नंदकुमार जगताप यांनीही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगताप परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांना एकत्र जोडून, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. 


या प्रतिष्ठानतर्फे वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिरे तसेच कर्तुत्वान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. 

(महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांचा कोल्हापूर येथे तयार करून घेतलेला पुतळा)

स्वराज्याच्या ऐतिहासिक पहिल्या लढाईत सरदार गोदाजीराजे जगताप यांनी आदिलशाही सरदार मुसेखानाचा वध (खंद्यापासून कमरेपर्यंत उभा चिरला)   करून या लढाईत महापराक्रम केला होता, या विजयी दिनाची आठवण म्हणून महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सासवड येथे शौर्य दिन साजरा केला जातो.


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच संपूर्ण भारतभरातील व जगभरातील जगताप परिवारातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तिमत्व  डॉक्टर, फार्मासिस्ट, इंजिनीयर, मॅनेजर, प्रगतशील शेतकरी, प्रगतशील उद्योजक,पत्रकार, आमदार,खासदार, मंत्री, शास्त्रज्ञ,कलाकार, खेळाडू यासारखी वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व कर्तुत्वान व्यक्तिमत्व या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकत्र आणून, समाज हिताचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून करत आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  पुरंदर तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे सासवडच्या ऐतिहासिक भूमीतील, शिवतीर्थावर सलग शंभर दिवस झालेले मराठा समाजाचे ऐतिहासिक ठिय्या आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर गाजले. या ऐतिहासिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनातही नंदकुमार जगताप यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून हे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी त्यांच्या सहकारी बांधवांच्या बरोबरीने महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. पुरंदरच्या या ऐतिहासिक आंदोलनाने मराठा आरक्षणाची ज्योत पेटती ठेवली व संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला एक चांगली दिशा दिली. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पुरंदरच्या या ऐतिहासिक आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा देऊन, कौतुक केलेले आहे.


"महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांना न्याय मिळण्यासाठी शिक्षणात व नोकरीत मराठा समाजाला आरक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने प्रामाणिक नेता मिळालेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे मराठा आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रातील करोडोच्या संख्येने असणारा मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढणारे सर्वसामान्य लाखो मराठा कार्यकर्ते, एकजुटीने मराठा आरक्षणाची ही लढाई नक्कीच जिंकतील." असे नंदकुमार जगताप सांगतात.


सासवड नगरपालिकेच्या शाळेतील मुलांना स्वच्छ व शुद्ध पाणी  मिळावे यासाठी नंदकुमार जगताप यांनी स्वखर्चाने वॉटर फिल्टरही शाळांना भेटवस्तू म्हणून दिलेले आहेत. गणेश विसर्जन काळातील नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून राबवलेल्या मूर्तीदान उपक्रमातही नंदकुमार जगताप यांनी गणेश मंडळांचे प्रबोधन करून, उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पुरंदर तालुक्याचा दुष्काळी भाग मागील अनेक वर्षांपासून पाण्याच्या टंचाईच्या समस्येशी झगडत आहे. जगताप कुटुंबियांचे मार्गदर्शक, आधारस्तंभ गंगाधरअण्णा जगताप 2004 सालापासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चातून टँकरद्वारे पिण्याचे पाणी लोकांची तहान भागवण्यासाठी देऊन, सत्कार्य करत आहेत. 2004 साली गंगाधरअण्णा जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील एखतपुर, मुंजवडी या गावात दोन - तीन महिने रोज पिण्याच्या पाण्याचे टँकर देऊन त्या गावातील लोकांची तहान भागवण्यासाठी, माणुसकीच्या भावनेतून, प्रयत्न केलेले आहेत. शेती उद्योग भंडारचे संचालक विलासकाका जगताप यांनी हा सामाजिक वारसा जपलेला आहे. विलास काका जगताप यांनी 2024 च्या या दुष्काळी परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील पिंपळे व सोनवडी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केलेला आहे.

आपण ज्या समाजात लहानाचे मोठे होतो, प्रगती करतो, त्या समाजाच्या प्रति आपली प्रामाणिक जबाबदारी म्हणून समाजासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही गंगाधर अण्णांची शिकवण जगताप कुटुंबियातील प्रत्येक सदस्याने कृतीतून दाखवलेली आहे. नंदकुमार जगताप सासवडमध्ये माधुरी मेडिकलच्या माध्यमातून 26 वर्ष व्यावसायिक जबाबदारी पार पडत असताना सामाजिक उपक्रमातही मोलाची भूमिका बजावण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात.

नंदकुमार जगताप यांनी 2023 ला रुग्णांना चांगल्या प्रकारच्या, दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सासवड येथे माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटर चालू केले. माधुरी मेडिकलच्या माध्यमातून पंचवीस वर्ष नंदकुमार जगताप यांनी पुरंदरमधील हजारो रुग्णांची प्रामाणिक सेवा केलेली आहेच परंतु रुग्णांना गंभीर आजार झाल्यानंतर त्यांच्या तपासण्या व निदान खूप महत्त्वाचं असतं यामुळेच अपोलो सारखा देशातील प्रख्यात ब्रँड त्यांनी सासवड येथे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आणला ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे.


माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरला दर्जेदार आरोग्यसेवा, अचूक तपासणी, अचूक निदान यामुळे पुरंदर तालुक्यातील हजारो रुग्णांनी अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद दिला. 


नंदकुमार जगताप यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील हजारो रुग्णांनी, माधुरी डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून, आरोग्य शिबिरातून मोफत आरोग्य तपासणी करून लाभ घेतलेला आहे. माधुरी डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून रुग्णांच्या घरी जाऊन ही रक्ताचे सॅम्पल आरोग्य तपासणीसाठी घेतले जाते. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवारी माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सवलतीच्या दरात रुग्णांची आरोग्य तपासणी केली जाते.


पॅथॉलॉजी लॅब ही नंदकुमार जगताप यांनी फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून न चालवता सामाजिक दृष्टिकोनातूनही हजारो रुग्णांना वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी करून निरोगी आरोग्यासाठी प्रेरित केलेले आहे. माधुरी मेडिकल, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सेवा घेणाऱ्या हजारो रुग्णांसाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल, सवलतीच्या दरात रुग्णांची आरोग्य तपासणी कशी करता येईल. रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी जास्तीत जास्त कशी उत्तम सेवा देता येईल? यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच धडपडत असतात. प्रत्येक रुग्णाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानून त्याची प्रामाणिकपणे, माणुसकीच्या भावनेतून सेवा करण्याचा प्रयत्न नंदकुमार जगताप करत असतात.



"पुण्यातील दर्जेदार आरोग्य सेवा, आरोग्य सुविधा, माझ्या पुरंदर तालुक्यात, माझ्या सासवडमध्ये आमच्या हजारो रुग्णांना देण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातूनही अजून खूप मोठे काम करायचे आहे. आमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या हजारो रुग्णांना एकाच ठिकाणी दर्जेदार आरोग्यसेवा, दर्जेदार औषधे, दर्जेदार आरोग्य तपासणी, योग्य निदान व योग्य उपचारांसाठी भविष्यामध्ये काम करणार आहे" असे नंदकुमार जगताप सांगतात.

शेतकरी राजाची सेवा करणे हे जगताप कुटुंबियांचे व्रत असल्यामुळेच नंदकुमार जगताप यांनी 2023 ला माधुरी डिस्ट्रीब्युटर्स या नावाने पशुऔषधालय चालू केले. पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना स्वस्त दरात जनावरांची औषधे मिळावीत या उद्देशाने चालू केलेल्या माधुरी डिस्ट्रीब्युटर्सलाही हजारो शेतकऱ्यांनी अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद दिला. माधुरी मेडिकलच्या माध्यमातून मोफत घरपोच दर्जेदार औषधे देण्याच्या सेवेमुळे माधुरी डिस्ट्रीब्युटर्सलाही पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


नोकरीच्या मागे धावणाऱ्या मराठी तरुणांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून व्यावसायिक प्रगती कशी केली पाहिजे? हे नंदकुमार जगताप यांनी त्यांच्या व्यावसायाच्या प्रगतशील वाटचालीतून सर्वांनाच दाखवून दिलेले आहे. पुरंदर तालुक्यात तरुण पिढीमध्ये लोकप्रिय असणारे नंदूबापू जगताप त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक तरुणाला अडचणीच्या काळात मदत करतातच परंतु वेगवेगळ्या व्यावसायामध्ये यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे? हा देखील सल्ला, मार्गदर्शन खूप आत्मीयतेने आणि आपुलकीने करत असतात.

"आजच्या काळात मराठी तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी भरपूर संधी आहेत. कृषी प्रक्रिया, कृषी पर्यटन, हॉटेल, दर्जेदार कृषी मालाची निर्यात यासारखी अनेक क्षेत्र तरुणांसाठी काम करण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रामाणिकपणा, सचोटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठल्याही क्षेत्रात तरुण मोठे ध्येय ठेवून, योग्य मार्गाने प्रयत्न करून यशस्वी होऊ शकतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.


"कोरोना काळात शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली. यामुळे मला एक फार्मासिस्ट, एक औषध विक्रेता म्हणून खूप अभिमान आहे. रुग्णांना दर्जेदार व प्रामाणिक सेवा देण्याचा जो आनंद आहे तो अनमोल आहे." असे नंदकुमार जगताप सांगतात.

ऐतिहासिक सासवड भूमीत जन्म झाल्याचा नंदकुमार जगताप यांना फक्त अभिमानच नाहीतर पुरंदरचा, सासवडचा ऐतिहासिक वारसा जपत सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी यशस्वी भरारी घेतलेली आहे."केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सासवड शहर देशात नंबर वन आलेले आहे याचा आम्हाला सासवडकर म्हणून खूप अभिमान आहे. यासाठी सासवडचे सर्व नागरिक, सासवड नगरपरिषद व पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असते.पालखी ज्यावेळेस सासवड मधून पंढरपूरला जाण्यासाठी निघते त्यानंतर चार तासात संपूर्ण सासवड शहर स्वच्छ झालेले असते." असे नंदकुमार जगताप सांगतात.


सासवड शहराबद्दलचे प्रेम, आपुलकी,ओढ व इतिहास, वारसा जपणारे नंदकुमार जगताप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून सासवडची संस्कृती जगत असतात. पुरंदर तालुक्याचे लोकनेते सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी चंदुकाका जगताप यांचे सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रभावशाली कार्य तसेच सहकार क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील लोकहिताचे केलेले प्रभावशाली कार्य देखील नंदकुमार जगताप यांच्या मनाला खूप भिडते व प्रेरणा देते."लोकनेते, सहकारमहर्षी चंदुकाका जगताप यांचे मार्गदर्शन सासवड मधील सर्व तरुण पिढीला असायचे. माझ्या सामाजिक व व्यावसायिक वाटचालीमध्ये काकांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले हे माझे भाग्य आहे. पुरंदर तालुक्यातील आपल्या माणसांनी कष्ट, मेहनत करून खूप प्रगती करावी. यासाठी काकांचा नेहमीच पाठिंबा व मार्गदर्शन सर्वांनाच असते." असे नंदकुमार जगताप सांगतात.


"पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांचा देखील तरुण पिढीला सामाजिक उपक्रमांसाठी तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी खूप पाठिंबा व मार्गदर्शन असते. आपल्या हक्काचा माणूस आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे ही भावना खूप ऊर्जा देते." असे नंदकुमार जगताप सांगतात.


माधुरी मेडिकल, माधुरी डिस्ट्रीब्युटर्स, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटर यांच्या माध्यमातून नंदकुमार जगताप हजारो रुग्णांना सेवा देत असताना त्यांचा उत्तम कर्मचारी वर्ग ही महत्वपूर्ण कामगिरी बजावत असतो. या कर्मचारी वर्गाला शिस्त, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे यासाठी नंदकुमार जगताप नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत फार्मासिस्टचे,औषध विक्रेत्यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. बऱ्याच वेळा अनेक रुग्ण डॉक्टरकडे जाण्याऐवजी, विश्वासू मेडिकलमध्ये जाऊन त्यांच्या आजारांवरचे औषध घेत असतात. परंतु मागील 26 वर्षांपासून माधुरी मेडिकलचे माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणारे नंदकुमार जगताप हजारो रुग्णांना चांगल्या डॉक्टरांकडून चांगले उपचार मिळण्यासाठी तसेच त्यांना दर्जेदार औषधे देऊन रुग्ण लवकर बरा होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात.



जगताप कुटुंबियांचे आधारस्तंभ असणाऱ्या गंगाधरअण्णा जगताप यांनी 2007 ला कुटुंबातील संपत्तीची समान वाटणी केली. परंतु त्या अगोदर या जगताप कुटुंबातील सर्व सहा भावंडांना आर्थिक सक्षम करून, त्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करून,मोठा पाठिंबा देऊन, योग्य मार्गदर्शन केले. 


2008 ला जगताप कुटुंबातील विजय जगताप यांनी जेजुरी येथे शेती उद्योग भांडार शेतकऱ्यांच्या सेवेसाठी चालू केले. सासवड येथील शेती उद्योग भांडारचा एक मोठा वारसा आणि अनुभव असल्यामुळे या जेजुरीतील शेती उद्योग भांडारलाही अल्पावधीतच शेतकरी वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. विजय जगताप यांनी आई-वडिलांच्या नावाने शिक्षण संस्था स्थापन करून, सुशील गंगा या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून  जेजुरी येथे शिक्षण क्षेत्रात खूप चांगले पाऊल टाकलेले आहे. या शिक्षण संस्थेला जेजुरी शहरातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.



पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विजय जगताप यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत. डॉक्टर माधुरी जगताप एमएस इन सर्जन (MS - Surgon)आहेत. डॉक्टर मनाली जॉर्जिया येथे एमबीबीएसचे वैद्यकीय  शिक्षण घेत आहेत.

या ध्येयवादी जगताप कुटुंबातील कृष्णा जगताप व सचिन जगताप यांनी 2011 ला सुरू केलेल्या श्री सद्गुरु सीड्स या व्यवसायालाही शेतकरी वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आधुनिक बी - बियाणे, औषधे, कीटकनाशके व शेतकरी वर्गाची प्रामाणिक सेवा यामुळे श्री सद्गुरु सीड्स या ब्रॅंडने अल्पावधीतच पुणे शहर व जिल्ह्यात चांगला नावलौकिक मिळवला. 


कृषी क्षेत्रातील 35 मोठ्या कंपन्यांचे जिल्हा पातळीवरचे श्री सद्गुरु सीड्स वितरक आहेत. 2020 ला पुण्यातील फुरसुंगीला मोठे गोडाऊन घेऊन तेथूनच संपूर्ण महाराष्ट्रात  कृषी क्षेत्रातील बी - बियाणे,औषधे, कीटकनाशके होलसेल माल वितरित होत असतो.

या ध्येयवादी जगताप कुटुंबातील रोशन जगताप यांनी सासवड येथे आपल्या शेतात,पुरंदर तालुक्यातील ग्राहकांच्या व खवय्यांच्या सेवेसाठी हॉटेल आस्वाद चालू केलेले आहे .


या हॉटेल आस्वादलाही चविष्ट व स्वादिष्ट भोजनामुळे तसेच  ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेमुळे अल्पावधीतच सासवड शहर व पुरंदर तालुक्यातील ग्राहकांची पसंती मिळाली.


या ध्येयवादी जगताप कुटुंबातील सहा भावंडांना त्यांच्या आवडीच्या व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गंगाधरअण्णा जगताप यांचे सहकार्य व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे होते. कुठल्याही कुटुंबाचा एक मोठा आधारस्तंभ येणाऱ्या सर्व प्रगतशील पिढ्या घडवत असतो.

कुठल्याही व्यावसायात प्रगती साधण्यासाठी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याची व मदतीची खूप आवश्यकता असते. नंदकुमार जगताप यांनी 1998 ला सुरू केलेले माधुरी मेडिकल मागील 26 वर्षांमध्ये हजारो रुग्णांना दिलेल्या प्रामाणिक व दर्जेदार आरोग्य सेवेमुळे, पुरंदर तालुक्यातच नाही तर पुणे जिल्ह्यात एक ब्रँड झालेले आहे. या माधुरी मेडिकलच्या प्रगतशील वाटचालीमध्ये नंदकुमार जगताप यांच्या पत्नी उर्मिला जगताप यांचेही खूप महत्त्वाचे योगदान आहे. उर्मिला जगताप यांनी फार्मसीचे उच्च शिक्षण घेतल्यामुळे, माधुरी मेडिकलच्या व्यवस्थापनात नंदकुमार जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून त्या साथ देत आहेत. नंदकुमार जगताप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये व्यस्त असताना उर्मिला जगताप माधुरी मेडिकल खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात.


गंगाधर अण्णा जगताप यांनी त्या काळात त्यांच्या सुनेला मेडिकलच्या व्यावसायिक क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा व प्रेरणा दिली. त्या संधीचे उर्मिला जगताप यांनी सोने करून दाखवले. 


नंदकुमार जगताप यांची मुलगी अनुजा जगताप फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत आहेत. अनुजा जगताप या लक्झरी ब्रँड मॅनेजमेंट या क्षेत्रातील उच्च शिक्षण इटलीमध्ये घेत आहे तसेच मुलगा अर्जुन जगताप शिक्षण घेत आहे.

आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टर, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक यांचे खूप महत्त्वाचे योगदान आहे."सरकारी हॉस्पिटल्स, सरकारी दवाखाने, वेगवेगळ्या सरकारी संस्था येथे उच्चशिक्षित फार्मासिस्टची नेमणूक केली तर आरोग्य व्यवस्था भक्कम होण्यासाठी याची खूप मदत होईल. चांगला,अनुभवी फार्मासिस्ट सरकारी नियंत्रणातील आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी चांगले योगदान देऊ शकतो." असे नंदकुमार जगताप सांगतात.

"आजच्या काळात मेडिकल क्षेत्रात कितीही स्पर्धा वाढलेली असली तरी तुमचा प्रामाणिकपणा, मेहनत, सचोटी, विश्वास व रुग्णांना दिली जाणारी प्रामाणिक सेवा तुमच्या व्यावसायात तुम्हाला मोठे यश देते. रुग्णांना नेहमी दर्जेदार औषध देऊन, निरोगी स्वास्थ राहण्यासाठी मार्गदर्शन केले पाहिजे." असे नंदकुमार जगताप सांगतात.

ऐतिहासिक सासवड भूमीचा इतिहास, पुरंदरचा इतिहास व महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणारे नंदकुमार जगताप सांगतात "सासवड येथे साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक जयंती महाराष्ट्रातील दोन नंबरची मोठी शिवजयंती आहे. शिवजयंती हा सोहळा, सण आमच्या शिवभक्तांना प्रेरणा व ऊर्जा देणार असतो."


1952 ला सासवड येथे श्री छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ स्थापन झाले. सासवडचे माजी नगराध्यक्ष श्री दत्तानाना जगताप यांनी ही शिवजयंती महाराष्ट्रात दोन नंबरची मोठी, एवढी भव्य दिव्य साजरी केली. तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब अजितदादा पवार  या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवात अवश्य भेट देऊन, उपस्थित राहत होते.

"एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला तरुण पुरंदर तालुक्यात 26 वर्ष माधुरी मेडिकलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिकपणे, दर्जेदार आरोग्य सेवा देतो. कोरोना काळात शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरून कोरोना महामारीशी संघर्ष करणारा सामाजिक कार्यकर्ता. कोरोना काळात लोकांचा जीव वाचवण्याचा ध्यास घेऊन झपाटून, निर्भीडपणे, माणुसकीच्या भावनेतून काम करणारा कोवीड योद्धा. गरीब मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सच्चा,प्रामाणिक कार्यकर्ता. कोरोना काळात पुरंदर तालुक्यात तसेच सासवडमध्ये नागरिकांच्या मदतीला धावून येणारा, नागरिकांच्या समस्या सोडवणारा हक्काचा माणूस स्वीकृत नगरसेवक. माधुरी मेडिकल, माधुरी डिस्ट्रीब्युटर्स, माधुरी अपोलो डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना प्रामाणिक सेवा देणारा ध्येयवादी,प्रेरणादायी योद्धा नंदकुमार जगताप यांचा हा  हृदयस्पर्शी प्रवास, "जगताप कुटुंबियांचा" हा प्रगतशील प्रवास  महाराष्ट्रातील  तरुण पिढीसाठी ऊर्जा देणारा व प्रेरणादायी आहे.


पुणे जिल्ह्यात,पुरंदर तालुक्यात तरुणांमध्ये लोकप्रिय असणारे यशस्वी व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, मा. स्वीकृत नगरसेवक नंदकुमार जगताप यांच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...

लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


Saturday, May 18, 2024

"मराठी माध्यमामध्ये शिकून सामान्य कुटुंबातील आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा तरुण डॉक्टर ते जगाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद करून जागतिक विक्रम करणारे निष्णात डॉक्टर ते हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने"


"मराठी माध्यमामध्ये शिकून सामान्य कुटुंबातील आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा तरुण डॉक्टर ते जगाला दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" नोंद करून जागतिक विक्रम करणारे निष्णात डॉक्टर ते हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर  यशस्वी उपचार करणारे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ, महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने"

ध्येयवेडी माणसं आयुष्यात कितीही संकटे, अडचणी आल्या तरी जिद्दीने,चिकाटीने, प्रयत्न करून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. जगाला आपल्या प्रामाणिक सामाजिक कार्याची दखल घ्यायला लावणाऱ्या डॉक्टर सागर माने यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, फलटणमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. डॉक्टर सागर माने यांचे वडील कै.सूर्यकांत श्रीपतराव माने यांचा आपल्या सर्व मुलांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे हा  ध्यास होता. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत असताना स्वतःला उच्च शिक्षण घेता आले नाही तरी आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या आवडत्या क्षेत्रात चांगली कामगिरी करावी असा ध्यास सूर्यकांत माने यांचा होता.


डॉक्टर सागर माने यांच्या आई कै.अंजनादेवी सूर्यकांत माने या गृहिणी होत्या तर वडील सूर्यकांत माने फलटणमधील एका माध्यमिक विद्यालयात क्लार्क या पदावरती कार्यरत होते. चार भावंडांच्या असलेल्या या कुटुंबात डॉक्टर सागर माने यांचे मोठे बंधू यशवंत माने इंजिनियर झाले. दोन नंबरचे बंधू अनिलकुमार माने डॉक्टर झाले आणि बहीण संगीता गोरखनाथ काकडे/ माने शिक्षिका झाल्या. 


एका सर्वसामान्य कुटुंबातील ही चारही भावंड त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्याकाळात उच्च शिक्षण घेतात ही खरंतर सोपी गोष्ट नाही. 1983 ते 2011 या 28 वर्षात डॉक्टर सागर माने यांच्या कुटुंबातील सर्व भावंडे उच्च शिक्षण घेत होती. त्यामुळे साहजिकच डॉक्टर सागर माने यांचे वडील सूर्यकांत माने यांच्यावरची ही जबाबदारी खूपच कठीण व आव्हानात्मक होती.


आजच्या काळातील सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या मुलाला डॉक्टर करायचे म्हटलं तरी लाखो  रुपयांचा खर्च येतो. सर्वसामान्यांसाठी हे आर्थिक नियोजन करणे खूप कठीण गोष्ट आहे. 1983 ते 2011 या 28 वर्षांमध्ये दोन मुलांना डॉक्टर करणे. एका मुलाला इंजिनियर करणे आणि एका मुलीला शिक्षिका करणे हे खरंच खूप आव्हानात्मक कार्य सूर्यकांत माने यांनी जिद्दीने, चिकाटीने, पार पाडले.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


डॉक्टर सागर माने यांचे बालपण फलटणमध्येच आई-वडिलांच्या कडक शिस्तीत व चांगल्या संस्कारात, चांगल्या वातावरणात गेले. डॉक्टर सागर माने यांचे माध्यमिक शिक्षण फलटण मधील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात, मराठी माध्यमामध्ये झाले. "आयुष्यात प्रगती करायची असेल तर शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी ही खूप महत्त्वाची आहे. अशी शिकवण डॉक्टर सागर माने यांना लहानपणापासूनच त्यांच्या आई-वडिलांनी दिलेली होती. आपल्या आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण ज्या समाजात जन्माला आलो. लहानाचे मोठे झालो त्या समाजासाठीही चांगलं कार्य केले पाहिजे ही वडिलांचे शिकवण डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कारकिर्दीतून दाखवून दिली.

(डॉक्टर सागर माने यांना युथ आयकॉन या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले तो क्षण)

डॉक्टर सागर माने यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असतानाच शाळेत खूप अभ्यास करायचे  त्यावेळेस त्यांचे शिक्षक त्यांना म्हणायचे "तू खूप हुशार आहेस, अभ्यासू आहेस तू डॉक्टर बनले पाहिजे." त्यांच्या आई-वडिलांचेही हे स्वप्न होते आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच मार्गदर्शन व पाठिंबा दिला. डॉक्टर सागर माने इयत्ता दहावीला चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यानंतर मुधोजी हायस्कूलमधून अकरावी - बारावी विज्ञान शाखेतून फलटणमध्येच शिक्षण घेतले.


मराठी माध्यमातून शिकलेल्या डॉक्टर सागर माने यांना बारावीला सायन्सला 90% पेक्षा अधिक चांगले मार्कस मिळाले. डॉक्टर सागर माने यांना बारावीला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात बीएएमएस - BAMS या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर होणाऱ्या डिग्री साठी धुळे येथे  ऍडमिशन मिळाले. पण त्यांना एमबीबीएस - MBBS या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीसाठी प्रवेश हवा होता.

(जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी, फलटण येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर सागर माने)

डॉक्टर सागर माने यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला (MBBS) त्यावर्षी प्रवेश  मिळाला नसल्यामुळे ते खूप निराश झाले. त्यांच्या घरातील भावंडांनी व आई-वडिलांनी त्यांना त्यावेळेस आधार देऊन आपण तुझ्या एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न करूयात असे सांगून त्यावेळेस धीर दिला. डॉक्टर सागर माने यांना वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस या पदवीसाठी प्रवेश मिळण्यासाठी त्यांचे वडील सूर्यकांत माने यांनी त्यावेळेस खूप कष्ट, मेहनत घेतले. खूप प्रयत्न केले. सूर्यकांत माने यांनी त्यावेळेस मुलाच्या उच्च शिक्षणासाठी दिल्ली गाठली. दिल्लीतील विविध खासदारांना भेटल्यानंतर डॉक्टर डी. वाय. पाटील यांच्या माध्यमातून आपल्या मुलाला नेपाळला एमबीबीएसला प्रवेश मिळू शकतो हे समजल्यानंतर त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला एमबीबीएस करायचे आहे आणि बारावीलाही खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत. त्या मुलाच्या आई-वडिलांचा ध्यास पाहून डॉक्टर डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या नेपाळमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी माने कुटुंबीयांना संपूर्ण सहकार्य केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने नेपाळला जाऊन वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणे ही खरंच त्यावेळेस खूप दुर्मिळ गोष्ट होती.

डॉक्टर सागर माने यांना नेपाळमधील नेपाळगंज वैद्यकीय महाविद्यालयात 1997-98 ला एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर ज्यावेळेस ते फलटण मधून नेपाळला जाण्यासाठी निघाले त्यावेळेस दौंड येथून रेल्वेतून सागर माने यांना पुढील प्रवासासाठी कुटुंबीयांनी बसवून दिले. खरंतर नेपाळपर्यंत संपूर्ण कुटुंबियांनी जाऊन त्या महाविद्यालयात आपल्या मुलाला पोहोचवावे यासाठी लागणारे पैसे ही त्या काळात माने कुटुंबियांकडे नव्हते. अशा कठीण परिस्थितीत डॉक्टर सागर माने यांनी खचून न जाता, निराश न होता आपल्या आई-वडिलांचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते नेपाळला एमबीबीएस पदवी पूर्ण करण्यासाठी गेले.

नेपाळ म्हणजे नवीन देश, नवीन प्रांत, नवीन संस्कृती तरी देखील डॉक्टर सागर माने त्या नेपाळमधील वैद्यकीय महाविद्यालयात गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने तेथे रुळण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यावेळेस एमबीबीएसच्या 75 मुलांच्या बॅचेस मध्ये महाराष्ट्रातील फक्त दोन मुले होती. उत्तर भारतातील निम्मी मुले व निम्मी नेपाळची मुले त्यावेळेस नेपाळमध्ये एमबीबीएससाठी शिक्षण घेत होती.

(पॅथॉलॉजी या विषयात विशेष प्राविण्य मिळाल्यामुळे नेपाळमधील काठमांडू विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या हस्ते डॉक्टर सागर माने यांचा सन्मान)

डॉक्टर सागर माने यांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी केलेला संघर्ष त्यांच्या डोळ्यासमोर ठामपणे उभा होता. त्यामुळे एमबीबीएससाठी सर्वस्व झोकुन देऊन अभ्यास करायचा हे त्यांनी त्यावेळेसच ठरवले होते. कॉलेजमध्ये अल्पावधीतच डॉक्टर सागर माने यांची आपल्या भारतातील विविध राज्यातील मित्रांशी व नेपाळमधील मित्रांशी घट्ट मैत्री झाली."आपण सर्वजण भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून एकत्र राहून येथे चांगलं शिक्षण घेऊ." ही भावना डॉक्टर सागर माने यांनी आपल्या भारतातील नेपाळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विविध राज्यातील सर्व भारतीय मित्रांच्या मनामध्ये पेरली.

सागर माने यांचा प्रेमळ, मनमिळावू, बोलका स्वभाव त्यांच्या मित्रांना भावला. डॉक्टर सागर माने नेपाळला एमबीबीएससाठी शिक्षण घेत असतानाच त्यांच्यातील नेतृत्व गुण चांगले विकसित झाले. नेपाळमधील त्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्टर सागर माने भरघोस मताने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले व साडेचार वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामगिरीही  उत्तम बजावली. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


डॉक्टर सागर माने एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला असताना पॅथॉलॉजी या अवघड विषयात पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी फक्त 35 गुण मिळाले त्या विषयात नापास झाले. त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना सल्ला दिला की "हा विषय सहा महिन्यानंतरच तुम्हाला सोडावावा लागेल त्यामुळे तुम्ही दुसऱ्या विषयांचा अभ्यास चालू करा." परंतु डॉक्टर सागर माने यांनी मुख्य परीक्षेच्या अगोदरच्या पंधरा दिवसांमध्ये त्या विषयाचा अभ्यास चांगला केला तसेच सर्व विषयांचा अभ्यास चांगला करून त्यांनी युनिव्हर्सिटीच्या मुख्य परीक्षेत, ज्या विषयात ते पूर्व परीक्षेत नापास झाले होते त्या विषयातच सर्वांपेक्षा जास्त मार्कस मिळवून  युनिव्हर्सिटीत प्रथम क्रमांक आला व त्यात विशेष प्राविण्यही मिळाले.
             (नेपाळगंज वैद्यकीय महाविद्यालय - नेपाळ)
सागर माने जेव्हा वर्ष - दीड वर्षातून घरी यायचे त्यावेळेस पुन्हा फलटण वरून नेपाळला जाण्यासाठी  फलटण ते मुंबई एसटी बसने प्रवास, त्यानंतर मुंबईवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन ते लखनौ ट्रेनचा 25 तासाचा प्रवास त्यानंतर लखनौ ते नेपाळमधील  वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यासाठी सात ते आठ तासाचा प्रवास. संपूर्ण प्रवासात त्यांचे दोन दिवस जायचे असा धकाधकीचा प्रवास करून त्यांनी त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष केला.

"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासातुन, महान कार्यातून मला खूप प्रेरणा मिळते. प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती, शिवाजी महाराजांचा लोकसंग्रह,निर्भीड लढाऊ वृत्ती, समता,न्याय, दूरदृष्टी, कडक शिस्त,शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती यासारखे शेकडे गुण मला माझ्या आयुष्यात प्रेरणा देतात." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर राज्याचे माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर व लोकप्रिय नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांची कौतुकाची थाप)

डॉक्टर सागर माने नेपाळमध्ये एमबीबीएस करत असतानाच 2001 ला नेपाळच्या राजघराण्यात मोठे हत्याकांड झाले होते त्यावेळेस संपूर्ण वैद्यकीय महाविद्यालयात भीतीचे वातावरण पसरलेले होते. भारतीय विद्यार्थी खूप भयभीत झालेले होते. त्यावेळेस डॉक्टर सागर माने यांनी आपल्या सर्व भारतीय मित्रांना एकत्र करून धीर दिला तसेच नेपाळची राजधानी काठमांडू येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व भारतीय मुलांना सुरक्षा मिळण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. 

त्यावेळेसचा काळ खूप कठीण होता. कॉलेजमधील खोलीच्या बाहेर कोणी पडत नव्हते परंतु डॉक्टर सागर माने सांगतात "मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमितील असल्यामुळे मी निर्भीडपणे बाहेर पडून माझ्या सर्व मित्रांना आधार दिला. तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून तसेच भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी बोलून आम्हाला सुरक्षा मागवुन घेतली. आमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातही निर्भीडपणे आम्ही वावरायला लागलो." भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यावेळेस नेपाळच्या प्रशासनाशी संपर्क साधून भारतीय मुलांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याची विनंती केली.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर  माढ्याचे लोकप्रिय खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची कौतुकाची थाप)

आयुष्यात येणारे कठीण प्रसंग माणसाला घडवतात असाच हा चित्तथरारक प्रसंग डॉक्टर सागर माने यांच्या आयुष्यात घडल्यामुळे साहजिकच पुढील आयुष्यामध्ये हा निर्भीडपणा, प्रामाणिकपणा, मदत करण्याची वृत्ती खूप काही शिकवून जाते. डॉक्टर सागर माने यांचे मोठे बंधू डॉक्टर अनिलकुमार माने, प्राध्यापक यशवंत माने यांनीही त्यांच्या एमबीबीएसच्या काळात आर्थिक सहकार्य केलेले होते. सर्वसामान्य कुटुंब असले तरी कुटुंबातील सर्वजण उच्च शिक्षण घेत असल्यामुळे आर्थिक अडचणी चालू असल्या तरी डॉक्टर सागर माने यांच्या सर्वच भावंडांनी, बहिणीने व नातेवाईकांनी त्यांना एमबीबीएस साठी तसेच पुढील शिक्षणासाठी चांगली मदत केली.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now

"आपला भाऊ मोठा झाला पाहिजे. आपल्या भावाने उच्च शिक्षण घेऊन चांगली कामगिरी केली पाहिजे." खरं तर ही माने कुटुंबियांची भावना सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. डॉक्टर सागर माने  नेपाळमध्ये साडेपाच वर्षे एमबीबीएसचे शिक्षण घेऊन ज्यावेळेस घरी फलटणला आले त्यावेळेस काही कालावधीनंतर निकालाची वाट पाहत होते. एमबीबीएसच्या निकालाची माहिती घेण्यासाठी पुन्हा नेपाळला जाण्यासाठी ते फलटण वरून निघाले परंतु ज्या वेळेस रेल्वेने प्रवास करत असताना जळगाव मधील भुसावळ स्टेशनला उतरले त्यावेळेसच त्यांनी नेपाळला कॉलेजमध्ये फोन केल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की ते एमबीबीएसची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. क्षणभर त्यांना त्या गोष्टीवरती विश्वास बसला नाही परंतु मागील काही वर्षांचा संघर्षाचा, प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याचा सर्व काळ त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता.

वडिलांचे कष्ट, मेहनत, संघर्ष याचे फळ मिळाल्याची अनुभूती त्यांना त्यावेळेस मिळाली. सातारा जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील फलटणमधील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून नेपाळमध्ये जाऊन एमबीबीएसचे शिक्षण घेऊन 2003 ला डॉक्टर झाला होता. ही बातमी डॉक्टर सागर माने यांच्या कुटुंबीयांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला खूप सुखावणारे होती.


डॉक्टर सागर माने यांचे 2003 ला एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर ते डॉक्टर झाले. त्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी  त्यांना युरोपमध्ये शिक्षण घ्यायची इच्छा होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते होऊ शकले नाही. परंतु याच दरम्यान डॉक्टर सागर माने यांनी डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड या पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री साठीची प्रवेश परीक्षा दिली होती आणि या परीक्षेत ते देशांमध्ये 31 वे आले. ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. डॉक्टर सागर माने एमबीबीएस झाल्यानंतर त्यांनी फलटण तालुक्यातील बीबी या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी पुढे अडीच वर्ष प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले.

ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून केलेल्या प्रामाणिक कामामुळे डॉक्टर सागर माने यांची चांगली जडणघडण झाल्याचे ते सांगतात. "ग्रामीण आरोग्य व्यवस्था, ग्रामीण अर्थव्यवस्था मला खूप जवळून बघता आली तसेच महिला आरोग्य हा किती गंभीर व महत्त्वाचा विषय आहे हे मला माझ्या त्यावेळेसच्या कारकिर्दीतच समजले त्यामुळेच पुढील स्पेशलायझेशन मी स्त्रियांचे आरोग्य, स्त्रीरोग या महत्त्वाच्या विषयावरच करण्याचे ठरवले." असे डॉक्टर सागर माने यांनी सांगितले. ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकातून येणारे रुग्ण, त्या रुग्णांचे वेगवेगळे आजार, त्यांच्या समस्या ह्या प्रत्येक डॉक्टरला खूप काही शिकवून जातात.


डॉक्टर सागर माने यांना एमबीबीएस नंतरच्या पुढील उच्च शिक्षणासाठी स्त्रीरोगतज्ञांच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीसाठी त्यांना केरळमधील एडप्पल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. केरळ राज्यात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था खूप चांगली आहे. "केरळमध्ये माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण खूपच कमी आहे. तेथील आरोग्य व्यवस्थेमधील सर्वच लोक आरोग्य शिक्षणावरती खूप जास्त भर देतात. आपल्या महाराष्ट्रात  आरोग्य व्यवस्थेतही आरोग्य शिक्षणावरती जास्त भर दिला तर अनेक समस्या कमी होतील. आपली आरोग्य व्यवस्था जास्त भक्कम होईल." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(एडप्पल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय - केरळ)

डॉक्टर सागर माने यांनी केरळमधील ग्रामीण भागात जाऊन तिथली सरकारी आरोग्य व्यवस्था तसेच त्यातील दर्जेदार आरोग्य सुविधा देणारी व्यवस्था समजून घेतली. देशभरात केरळमधली आरोग्य व्यवस्था का सर्वोत्तम आहे? याचाही अभ्यास त्यांनी त्यावेळेस केला. केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना ज्यावेळेस डॉक्टर सागर माने यांना शिकवणारे त्यांचे प्राध्यापक, वरिष्ठ डॉक्टर्स यांनी  वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरती केलेल्या उपचारामुळे  ज्या लग्न झालेल्या जोडप्यांना अनेक वर्ष मुलं होत नव्हती  त्यांच्यावरती वंध्यत्व उपचार केल्यानंतर ते यशस्वी झालेल्यानंतर त्या जोडप्यांना मूल झाल्यानंतर त्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झालेला प्रसंग पाहिल्यानंतर, त्या कुटुंबाला झालेला आनंद पाहून डॉक्टर सागर माने यांना असे वाटले की आपणही वंध्यत्व उपचार या विषयावरती  भविष्यामध्ये काम करू. खरं तर तिथूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

डॉक्टर सागर माने यांनी केरळमध्ये स्त्रीरोगतज्ञांची गायनॅकॉलॉजिस्ट  या पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ञ म्हणून सहा महिने सेवा दिली. या सहा महिन्यात डॉक्टर सागर माने यांनी महिला आरोग्याशी संदर्भातील विविध गंभीर केसेस उत्तमपणे हाताळल्या. पुण्यातील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये सेवा देत असताना मावळ भागातील कमी वयातील एका मातेचा झालेला मृत्यू पाहिल्यानंतर गरोदर मातेचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य किती गंभीर व महत्त्वाचा विषय आहे व या विषयावरती प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे. याची जाणीव त्यांना झाली.


डॉक्टर सागर माने यांनी याच दरम्यान फलटण येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयात देखील सहा महिने स्त्रीरोगतज्ञ म्हणून चांगली सेवा दिली. ग्रामीण भागातून वेगवेगळ्या गावांमधून येणारे रुग्ण त्यांच्या वेगवेगळ्या समस्या व त्यांच्यावरती केले जाणारे उपचार, रुग्णांनी दिलेल्या सकारात्मक व आनंददायी प्रतिक्रिया हा सगळा अनुभव डॉक्टर सागर माने यांना भविष्यातील त्यांच्या कारकीर्दीसाठी खूप फायदेशीर ठरला.

डॉक्टर सागर माने यांचे मोठे भाऊ डॉक्टर अनिलकुमार माने यांचे मार्गदर्शन व पाठिंबा असल्यामुळे तसेच वैद्यकीय अधिकारी म्हणून फलटण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये केलेले अडीच वर्षाचे प्रामाणिक काम यामुळे डॉक्टर सागर माने यांनी 2012 ला सुरू केलेल्या श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इनफर्टिलिटी सेंटरला स्त्रीरोगतज्ञ म्हणून सुरू केलेल्या कारकिर्दीला फलटण तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातुनही ही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 


डॉक्टर सागर माने यांचे संवाद कौशल्य, नेतृत्वगुण रुग्णांच्या समस्या आपुलकीने समजून घेण्याची वृत्ती, रुग्णांना दिले जाणारे उत्कृष्ट उपचार, वंध्यत्व उपचारामुळे रुग्णांना मिळालेले समाधान, आनंद तसेच महिला आरोग्य, कुपोषण, गरोदर मातेचे आरोग्य यावरती त्यांच्याकडून केले जाणारे मार्गदर्शन व प्रबोधन यामुळे अल्पावधीतच सातारा जिल्हा तसेच जवळपासच्या विविध जिल्ह्यांमध्ये डॉक्टर सागर माने यांच्या प्रामाणिक सेवेमुळे शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी यायला लागले.

"माता मृत्यू रोखण्यासाठी, कुपोषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. खूप गंभीर आणि महत्त्वाचे हे विषय आहेत . आरोग्य क्षेत्रातील गंभीर आजार,समस्या निर्माण होण्यापेक्षा अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करून तो गंभीर आजार, समस्या निर्माण होणार नाही याची जर काळजी घेतली तर नक्कीच  याचा आरोग्य व्यवस्था सक्षम करायला उपयोग होईल. आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग लोककल्याणासाठी झाला पाहिजे." असे डॉक्टर सागर माने सांगतात.


फलटण तालुक्यातील, ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील विवाहित जोडप्याच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हते त्यांनी डॉक्टर सागर माने यांच्याकडे वंध्यत्व उपचार घेतले त्यानंतर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार घेऊन त्यांना तीन मुले झाली. सातारा जिल्ह्यातील ही खूप दुर्मिळ घटना होती. डॉक्टर सागर माने यांनी माणुसकी, प्रामाणिकपणा दाखवून त्या सामान्य कुटुंबासाठी खूप कमी खर्चामध्ये वैद्यकीय उपचार करून त्या कुटुंबाचं अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. 

पंचवीस वर्ष मूल नसणाऱ्या विवाहित जोडप्याला एकाच वेळेस तीन मुलं होणे आणि त्यांची उपचार पद्धती यशस्वी करून ती 3 बालकं व्यवस्थित, सुखरूप आयुष्य जगण्यासाठी पुढील उपचार यशस्वीपणे करणे  हे खूप आव्हानात्मक,कठीण काम डॉक्टर सागर माने यांनी त्यावेळेस पेललं. "विवाहित जोडप्याला पंचवीस वर्षानंतर बाळ झालेल्याचा आनंद, आई-वडील झालेल्याचा आनंद  पाहत असताना एक डॉक्टर म्हणून आपण केलेल्या प्रामाणिक सेवेमुळे एखाद्याच्या आयुष्यात मिळालेला जो आनंद  असतो तो खूप अनमोल आणि ऊर्जा देणारा असतो." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर त्यावेळेसच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची कौतुकाची थाप)

डॉक्टर सागर माने ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असतानाच ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य समस्या, बालकांचे कुपोषण समस्या पाहायला मिळाल्यानंतर त्यावरती त्यांनी काम करायला  सुरुवात केली. गरोदर मातेचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, बालकांचे कुपोषण या महत्त्वाच्या विषयांवरती  डॉक्टर सागर माने यांनी गावोगावी शेकडो व्याख्याने देऊन जनजागृती करून,  सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.

(जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी, फलटण येथे क्षयरोग रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर सागर माने)

"डॉक्टर सागर माने यांना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच आव्हानात्मक काम करायला आवडते. त्यामुळेच त्यांनी बालकांचे कुपोषण या गंभीर विषयावरती सातारा जिल्ह्याच्या, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून, विविध प्रकारच्या फोटोंच्या माध्यमातून बालकांचे कुपोषण या विषयावरती जनजागृती करून, या महत्त्वाच्या विषयासंदर्भात प्रबोधन करून हजारो लोकांपर्यंत या विषयाचे गांभीर्य सामाजिक संदेशाच्या माध्यमातून पोहोचण्याच्या मोहिमेत ते यशस्वी झाले या  उल्लेखनीय,असामान्य कार्याची जगाला दखल घ्यायला भाग पाडली व त्यांच्या या सामाजिक कार्याची  2015 ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली."

(डॉक्टर सागर माने यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल 2015 ला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिलेले हे प्रमाणपत्र)
               
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सामाजिक विभागात बालकांचे कुपोषण या विषयावरती मोठ्या प्रमाणावर, जनजागृती करून, प्रबोधन करून जागतिक विक्रम करणारे डॉक्टर सागर माने जगातले पहिले व्यक्ती ठरले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्रात डॉक्टर सागर माने यांच्या आईंच्या नावाचा विशेष उल्लेख आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून तसेच एक भारतीय म्हणून अभिमानास्पद कामगिरी करून डॉक्टर सागर माने यांनी आपल्या शिरपेचात मानाचा तोरा रोवला. 

           (कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा माने परिवार)

"कुपोषण म्हणजे कमी पोषण व अति पोषण, बालकांच्या कुपोषणाची विविध कारणे आहेत. कमी वयातील मुलींची लग्न, आरोग्य शिक्षणाचा अभाव, आरोग्य सुविधांचा अभाव यासारखी अनेक कारणे बालकुपोषणासाठी कारणीभूत असली तरी कुपोषित बाळ जन्मालाच येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच ही समस्या कमी होईल. गरोदर मातेच्या आरोग्यावरती लक्ष दिले तर, बाळ पोटात असताना व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच जन्म घेणारे बाळ सुदृढ बालक असेल." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


ज्या विवाहित दांपत्यांना लग्न होऊन अनेक वर्ष होऊन देखील मुलं होत नाही त्यांच्या अडचणी, समस्या खूपच संवेदनशील असतात. त्यांची दुःख खूप मोठी असतात. यामुळेच डॉक्टर सागर माने यांनी वंध्यत्व उपचार या विषयासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिले. नैसर्गिकरित्या गर्भधारणा झालेल्या महिलांवरती उपचार करणे सोपे असते परंतु ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मूल नाहीये त्यांचा आजार शोधून  त्यांच्यावरती यशस्वी उपचार करणे खूपच आव्हानात्मक काम असते. वंध्यत्वाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांवरती डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत.

सातारा जिल्ह्यातील, फलटण येथील प्रसिद्ध श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इन्फर्टिलिटी सेंटरला  डॉक्टर सागर माने यांच्या प्रामाणिक वैद्यकीय सेवेला मिळालेल्या, चांगल्या प्रतिसादामुळे डॉक्टर सागर माने यांनी फलटणला 2016 ला आयव्हीएफ सेंटर, टेस्टट्यूब बेबी सेंटरची सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयव्हीएफ सेंटरची सुरुवात करणे हे खर तर खूपच कठीण आणि आव्हानात्मक पाऊल होतं परंतु ते डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या दोन्ही मोठ्या भावंडांच्या मदतीने हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलले. त्या काळात लाखो रुपयांचे कर्ज काढून आयव्हीएफ सेंटर चालू करणे खूपच जोखमीचं काम होते. 

(पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सागर माने यांचे श्रीराधाकृष्ण हॉस्पिटल अँड इन्फर्टिलिटी सेंटर, फलटण, सातारा)

सुरुवातीच्या काळात आयव्हीएफ तंत्रज्ञान व टेस्टबेबी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, विविध तालुक्यातील वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर सातारा,पुणे, सोलापूर अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्णांवरती या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केले.

ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मुलं होत नव्हती त्यांच्यावरती या आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने डॉक्टर सागर माने यांनी यशस्वी उपचार केले व अश्या शेकडो कुटुंबांचे बाळाचे आई-वडील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. डॉक्टर सागर माने यांच्या या आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रवासात त्यांचे आई-वडील, मोठे भाऊ-बहीण तसेच त्यांच्या पत्नीचेही खूप महत्त्वाचे सहकार्य लाभले. डॉक्टर सागर माने यांच्या पत्नी वाणीश्री माने यादेखील डॉक्टर आहेत आणि आयव्हीएफ तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये देखील त्या तज्ञ आहेत. राधाकृष्ण हॉस्पिटलच्या उत्तम व्यवस्थापनामध्ये त्यांची ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतशील वाटचालीसाठी खांद्याला खांदा लावून प्रमाणिकपणे त्या साथ देत आहेत.


पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व टेस्टट्यूब बेबी तज्ञ डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय  कार्याबद्दल त्यांना "युथ आयकॉन" हा देशातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर सागर माने व डॉक्टर वाणीश्री माने यांच्या प्रामाणिक व निष्ठेने केलेल्या कार्यामुळे  अल्पावधीतच 500 टेस्टट्यूब बेबींचा टप्पा पार केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. 


डॉक्टर सागर माने यांच्या राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे हजारो रुग्ण समाधानाने त्यांचे अनुभव अनेक लोकांना सांगतात. आपल्या देशाच्या बॉर्डर वरती आपल्या देशाचे रक्षण करणारे आर्मी, बीएसएफ मधले जे सैनिक आहेत त्यांच्यासाठी डॉक्टर सागर माने खास विशेष सवलत देऊन उपचार करतात. व त्यांची विशेष काळजी घेतात.

डॉक्टर सागर माने हे समाजातील सामान्य घटक, आर्थिक अडचण असणाऱ्या घटकातील रुग्णांवरती कमी खर्चामध्ये उपचार करून त्यांना पुढील मोफत उपचारांसाठी योग्य ते मार्गदर्शन करतात. 

कोरोनाच्या काळाच्या अगोदर एक वंध्यत्वग्रस्त विवाहित जोडपं डॉक्टर सागर माने यांच्याकडे आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी आले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील त्या व्यक्तीचे हे दुसरे लग्न होते तसेच त्यांना किडनीचाही आजार होता परंतु डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करून त्यांची पुरुष बीजं  घेऊन गर्भ तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी पुढील उपचार आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू केले होते. दोन महिन्यानंतर तयार झालेला गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेसाठी त्या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आले. परंतु त्यावेळेस फक्त ती महिला तिच्या सासू- सासऱ्यांबरोबर  उपस्थित होती. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्या महिलेच्या पतीचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते. डॉक्टर सागर माने यांनी त्या कुटुंबाला धीर देऊन पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असला तरी त्या व्यक्तीच्या पुरुष बीजांपासून तयार केलेला गर्भ त्या आयव्हीएफच्या प्रयोगशाळेमध्ये व्यवस्थित होता. त्या कुटुंबाला व्यवस्थित मार्गदर्शन करून तसेच त्या कुटुंबांच्या परवानगीने पुढील आयव्हीएफ प्रक्रियेसाठी डॉक्टर सागर माने यांनी सुरुवात केली. त्या महिलेच्या गर्भाशयात तो निरोगी गर्भ हस्तांतरित करण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडली. त्या कुटुंबात मूल जन्माला आल्यानंतर जो आनंद होता तो खूप मोठा होता आणि ऊर्जा देणार होता. असे डॉक्टर सागर माने सांगतात.

कोरोनाच्या काळात अशाप्रकारे महाराष्ट्रात घडणारी ही खूपच दुर्मिळ घटना आहे. डॉक्टर सागर माने व त्यांच्या संपूर्ण टीमने त्या कुटुंबाला धीर देऊन, व्यवस्थित मार्गदर्शन करून त्या कुटुंबाचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले व त्याला चांगले यश मिळाले. एका विवाहित जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल नाहीये व त्यांचे आयव्हीएफ च्या माध्यमातून उपचार चालू असताना पुरुष बीज  घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालू असतानाच ज्यावेळेस त्या पुरुषाचा मृत्यू होतो त्यानंतरची पुढची संपूर्ण आयव्हीएफची प्रक्रिया पूर्ण करणे खूपच कठीण आणि आव्हानात्मक असते. परंतु डॉक्टर सागर माने यांच्या टीमने ही संपूर्ण प्रक्रिया त्या कुटुंबाला आधार देऊन, व्यवस्थित मार्गदर्शन करून यशस्वीरित्या पूर्ण केली ही खरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे.


"आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान या विषयासंदर्भात समाजामध्ये खूप गैरसमज आहेत बऱ्याच सुशिक्षित लोकांमध्ये देखील या विषयासंदर्भात गैरसमज पाहायला मिळतात. ज्या विवाहित जोडप्यांना अनेक वर्षांपासून मुलं होत नाही त्यांच्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान खूप वरदान आहे. वंध्यत्व या समस्येवरती योग्य उपचार घेतले तर आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या विवाहित जोडप्याला त्यांचेच पुरुषबीज व स्त्रीबीजापासून आयव्हीएफच्या माध्यमातून एका चांगल्या गर्भाची निर्मिती होऊन त्यांना त्यांच्या बाळाचे आई-वडील होण्याचे समाधान नक्कीच मिळू शकते. आयव्हीएफ तंत्रज्ञान, टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञान याविषयी समाजामध्ये प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे." असे डॉक्टर सागर माने सांगतात.

डॉक्टर सागर माने यांनी राष्ट्रीय पोषण कार्यक्रम, कुपोषण निर्मूलन, पौगंड अवस्थेतील शिक्षण, लैंगिक शिक्षण, गरोदर महिलांचे आरोग्य या विषयावरती शेकडो - हजारो व्याख्याने ग्रामीण भागात दिलेली आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकार, जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण यांनी त्यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध प्रमाणपत्रे, पारितोषिके देऊन गौरवलेले आहे.

(बालकांचे कुपोषण या विषयावरती ग्रामीण भागात जाधववाडी, फलटण येथे डॉक्टर सागर माने यांनी केलेले जनजागृती अभियान)

पंढरपूरच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील एका विवाहित जोडप्याला अनेक वर्षांपासून मूल नव्हते त्यांनी अनेक ठिकाणी वंध्यत्वावर उपचार घेतले होते परंतु त्यांच्या उपचारांना यश मिळत नव्हते. डॉक्टर सागर माने यांनी त्या विवाहित जोडप्यावरती आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साह्याने यशस्वी उपचार केले व त्यांना मूल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले. पंढरपूरमधील त्या कुटुंबाने पंढरपूर मधील मोठा तुळशीहार घेऊन फलटणमध्ये डॉक्टर सागर माने यांचा विठ्ठलाला अर्पण केला जाणारा हा  तुळशीहार घालून मोठा सत्कार केला. हा हृदयस्पर्शी प्रसंग डॉक्टर सागर माने यांना खूप ऊर्जा देतो. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला आमच्या पुढील आयुष्यसाठी खूप ऊर्जा,प्रेरणा देणारा असतो. असे डॉक्टर सागर माने सांगतात.


ज्या विवाहित जोडप्यांना मूल होत नाही अशा वंध्यत्वाच्या समस्याने ग्रस्त 1000 पेक्षा जास्त रुग्णांवरती डॉक्टर सागर माने यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टर सागर माने यांनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या वैद्यकीय कारकीर्दीत वंध्यत्वग्रस्त  असणाऱ्या दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांवरती यशस्वी उपचार केलेले आहेत. असे त्यांनी सांगितले.पुढील पाच - दहा वर्षांमध्ये खूप कमी खर्चामध्ये, आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याचे, प्रामाणिक सेवा देण्याचे  डॉक्टर सागर माने यांचे स्वप्न आहे.


"वैद्यकीय क्षेत्रात एक चांगला डॉक्टर बनण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा,चिकाटी, चारित्र्य व रुग्णांची प्रामाणिक सेवा या गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत." असे डॉक्टर सागर माने सांगतात. डॉक्टर सागर माने यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना आरोग्य शिक्षण, आरोग्य विमा, कुपोषण मुक्ती, माता मृत्यू, बालमृत्यू या महत्वाच्या विषयांवर ते मनापासून मार्गदर्शन करतात.

स्त्रियांच्या आरोग्याच्या गंभीर समस्यांवरील उपचार, वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरील उपचार करणे, कुपोषण निर्मूलन,आयव्हीएफ तंत्रज्ञान यावर प्रबोधन करणे हा डॉक्टर सागर माने यांचा  ध्यास आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील, ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला एक सामान्य मुलगा, मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेऊन, पुढे नेपाळला जाऊन एमबीबीएसचे शिक्षण घेऊन  डॉक्टर होतो आणि आपल्या आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ म्हणून हजारो वंध्यत्वग्रस्त रुग्णांवरती यशस्वी उपचार करून त्या हजारो कुटुंबाला अनमोल आनंद देतो, कुपोषण निर्मूलन या गंभीर विषयावरती उल्लेखनीय,विशेष कार्य करून त्याची जगाला दखल घ्यायला भाग पाडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद होऊन त्यांच्या प्रामाणिक सामाजिक कार्याचा जागतिक विक्रम होतो. यानंतरही महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रामाणिक सेवा देतात हा असामान्य प्रवास खरंच सर्व तरुणांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे.


महाराष्ट्राचे प्रेरणादायी शिलेदार डॉक्टर सागर माने यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भावी प्रगतशील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा...

लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.