Tuesday, November 30, 2021

"महाराष्ट्राच्या "या" ऐतिहासिक भूमीतील पुरंदरच्या वीरकन्या, स्त्रियांच्या शिक्षणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी कार्य करणाऱ्या, कोल्हापूर संस्थानच्या पुरोगामी रणरागिणी, राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा इंदूमतीदेवी राणीसाहेब यांचा स्मृतिदिन पुरंदर,सासवडच्या ऐतिहासिक भूमीत उत्साहात संपन्न....



पुरंदर, सासवड, दि.30 : आजचा पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यामध्ये अनेक संत, महापुरुष, समाजसुधारक,ध्येयवादी नेते, विचारवंत, क्रांतिकारक अश्या शेकडो कर्तुत्वान मराठी व्यक्तिमत्वांचे मोठे योगदान आहे. 



महाराष्ट्रातील ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड भूमीतील महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्या  कुळातील सासवडचे शंकरराव पांडुरंग जगताप यांच्या वीरकन्या, महाराष्ट्रातील ऐतिहासिक कोल्हापूरच्या भूमीत स्त्री शिक्षणासाठी व महिला सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी कार्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरोगामी रणरागिनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचा स्मृतिदिन सासवड नगरपालिकेत मान्यवरांच्या उपस्थितीत, इंदुमतीदेवी राणीसाहेबांच्या ऐतिहासिक समाजकार्याच्या आठवणींना उजाळा देत,उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.




या कार्यक्रमासाठी श्री यशवंत काका जगताप, उपनागराध्य सौ पुष्पाताई नंदकुमार जगताप , श्री विजय वढणे, श्री संदीप जगताप , डॉ श्री दीपक जगताप , डॉ सौ वृषाली दीपक जगताप , डॉ श्री प्रवीण जगताप , डॉ सौ अश्विनी प्रवीण जगताप , श्री बंडूकाका जगताप , श्री अनिल तात्या जगताप , श्री हिरामण हिवरकर , श्री संभाजीराजे जगताप , श्री सुनील नाना जगताप ,श्री सागर दत्तात्रय जगताप , सौ विद्या सागर जगताप , श्री नंदूबापू जगताप , सौ उर्मिला नंदकुमार जगताप ,श्री प्रसाद बाप्पूसाहेब जगताप आणि महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानचे  सर्व सन्मानीय सभासद उपस्थित होते.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



श्रीमंत इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान आणि श्रीमंत इंदुमती राणीसाहेब महिला विचार मंच सासवड यांनी केले.


स्वराज्याच्या पहिल्या लढाईत ऐतिहासिक कामगिरी गाजवणाऱ्या सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्यासारख्या पराक्रमी शिलेदारांचा वारसा असणाऱ्या जगताप घराण्यातील इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचा विवाह 6 जून 1917 रोजी  राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्याशी झाला. लग्नानंतर एका वर्षानी शिकार करत असताना प्रिन्स शिवाजी महाराज यांचा अपघाती मृत्यू झाला. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


हे वेदनादायी दुःख पचवून राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमती राणी साहेबांना मुलीप्रमाणे वाढवले. चांगले शिक्षण दिले, योग्य मार्गदर्शन करून एक सुसंस्कृत, कणखर, आदर्श स्त्री व्यक्तिमत्व इंदुमतीदेवी राणी साहेबांच्या रूपात घडवले.



राजर्षी शाहू महाराजांनी इंदुमतीदेवींना सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना आधार दिला, उर्वरीत आयुष्य शैक्षणिक,सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यावे म्हणून प्रोत्साहन दिले.


"इंदुमती राणी साहेबांचे रूप जसे विलक्षण होते, तशीच  बुद्धीमत्ताही  अतिशय विलक्षण होती, दैव जिथे रुपाची खैरात करते तिथे बुद्धीची देणगी द्यायला कंजुषपणा दाखवते परंतु नियमाला अपवाद असतो ना त्याप्रमाणे इंदुमती राणी साहेबांना सौंदर्य, बुद्धी यांचे दान परमेश्वराने मुक्तहस्ते केल्याचे दिसून येते. अभिजात लावण्य व अभिजात बुद्धी यांचे वरदान लाभलेली ही लावण्यवती महाराष्ट्राच्या भाग्यविधाते छत्रपती घराण्यात कुलवधू म्हणून प्रवेश करती झाली."  

"छत्रपती शाहूमहाराज करते समाज सुधारक होते. 'आधी केले आणि मग सांगितले 'या बाण्याचे. त्याप्रमाणे त्यांनी  अतिशय बुद्धिमान  आणि  रूपवान अशी सून आपल्या घरात आणली व त्यांच्या  माध्यमातून समाज सुधारणा केली.जिथे जिथे इंदुमती राणीसाहेब जात तेथे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव पडत होता.त्यांच्या सौंदर्याचा, आदबशिरतेचा, चतुराईचा आणि जिव्हाळ्याचा सौरभ कोल्हापूरपासून गवाल्हेरपर्यंत सर्व मराठामंडळात पसरला होता.अशीही सासवडच्या जगतापकरांची वीरकन्या, लेक तमाम मराठा समाजाची आवडती राणी झाली." अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात सासवड येथील प्रसिद्ध डॉक्टर दीपक जगताप यांनी इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचे महान व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी दिलेले योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


इंदुमतीदेवी राणीसाहेब यांच्या कोल्हापूरच्या भूमीतील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर वृषाली जगताप यांनी इंदुमती राणी साहेबांचे शैक्षणिक कार्य, महिला सक्षमीकरण यासाठी इंदुमती राणीसाहेबांनी केलेले विशेष प्रयत्न यावर मनोगत व्यक्त केले.




इंदुमतीदेवी राणीसाहेब या 1925 मध्ये मॅट्रिक पास झालेल्या त्यावेळेच्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. कोल्हापुरात इंदुमती राणी साहेबांनी 1954 ला ललित विहार संस्था स्थापन करून स्त्री शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.  



"महाराणी शांतादेवी गायकवाड प्रशिक्षण संस्था, महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय, महिला वसतिगृह, मॉडन हायस्कूल फॉर गर्ल्स"  या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य स्त्री वर्गाला  शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम इंदुमतीदेवी राणीसाहेबांनी केले.




महाराष्ट्रातील पहिले औद्योगिक कलाभवन सुरू करून इंदुमती देवी राणी साहेबांनी महाराष्ट्रातील महिलावर्गाला सुशिक्षित व सक्षम बनवण्यासाठी मोठी चळवळ उभी केली.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


"श्रीमंत इंदुमतीदेवी राणीसाहेब यांचे जीवनकार्य व क्रांतिकारी शैक्षणिक कार्य आजच्या तरुण पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे. आपल्या महाराष्ट्राच्या या महान भूमीतील या थोर कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा महान इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार होणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया सासवड येथील सामाजिक कार्यकर्ते, स्वीकृत नगरसेवक नंदू जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



आधुनिक महाराष्ट्र घडवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान असणाऱ्या सर्वच स्त्री कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.




Monday, November 29, 2021

"महाराष्ट्रात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिली पासूनच्या सर्व शाळांना "या" मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार; वाचा सविस्तर शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना"....

 


मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्यासाठीची प्रतीक्षा संपली असून, महाराष्ट्रात 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 



सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले आहे.



शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


शाळांनी पालन करावयाच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना : -


1) संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा.


2) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साठीची 48 तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. 


3) विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. 




4) शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. 


5) शिक्षक-पालक बैठकादेखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. 


6) शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 


7) वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.


8) विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


शाळा सुरू झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांबाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना : -


1) शाळेत व परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखावी.


2) सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात. यासाठी इच्छुक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी. 


3) जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरविण्यात याव्यात. 


4) विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग चाचणी घेण्यात यावी. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


5) सद्यस्थितीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. 


6) विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक व मदतनीस यांचे 100 टक्के लसीकरण झालेले असावे.


7)उपरोक्त सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक तत्वे, सूचना निश्चित करावीत व प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्यात यावे, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. 


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 

सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण : 2021/प्र.क्र.178/एसडी-6, दि. 29 नोव्हेंबर 2021 पाहावे, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातील सर्व शाळांनी, शाळेच्या व्यवस्थापनांनी शासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.






"पुरंदरच्या "या" शिलेदाराचा कोविड काळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी "कोविड योद्धा" पुरस्काराने झाला सन्मान; महाराष्ट्रातील लोकप्रिय मंत्री, आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते होणार प्रहार जनशक्ती पक्षाच्या "या" शिलेदाराच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन...

 


पुरंदर,निरा, दि. 29 :  कोविड काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे, जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे, पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरंदरचे शिलेदार, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांना कोरोना काळातील प्रामाणिक, उत्कृष्ट कामगिरीसाठी माँ भवानी अर्बन मल्टीस्टेट निधी संकलन संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, पुरंदर-हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते कोरोना योद्धा  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 




महाराष्ट्राचे लोकप्रिय मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील,पुरंदर तालुक्यातील नीरा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे व महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन 29 नोव्हेंबरला सायंकाळी होणार आहे.




पुणे जिल्ह्यामध्ये तसेच पुरंदर तालुक्यामध्ये मंगेश ढमाळ यांनी मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तसेच जनसामान्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी केलेल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.




कोरोना काळात मंगेश ढमाळ यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे,   प्रामाणिक कार्यामुळे, पुणे जिल्ह्यातील तरुणाईमध्ये मंगेश ढमाळ चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत. 

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


"सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही जनता कर्फ्यु पासून ड्रायव्हर लोकांना जेवणाचे डबे दिले,कोल्हापूर वरून चालत जाणाऱ्या युवकांना अन्नदान, रक्तदान शिबीर तसेच आरोग्य कर्मचारी,पोलिस कर्मचारी, ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी,रस्त्यांवरील भिकारी,गरजवंत तसेच जे जे कोविड काळात रस्तावर काम करत होते अश्या समाजातील वेगवेगळ्या घटकांना,  नागरिकांना अनेक वेळा  अन्नदान केले." अशी प्रतिक्रिया मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



"जिल्हा सीमेवर माणुसकीच्या भावनेतून, सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामधील पोलिस कर्मचारी यांना 90 दिवस चहा दिला. संपुर्ण नीरा शहरामध्ये कोविड काळात घरोघरी जाऊन sanitizer फवारणी केली,पोलिस कर्मचारी यांना वाहतूक नियंत्रणासाठी सलग 10 दिवस पोलिस मित्र बनून नीरा गावात मदत केली." अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.




"महाराष्ट्रातील आदर्श आमदार,राज्यमंत्री सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रहार जनशक्ती पक्ष समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करत असतो. कोविड काळात आम्ही  1500 रुग्णांना बेड मिळून देण्यात मदत केली."अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.



"150 पेक्षा जास्त प्लाजमा उपलब्ध करून दिले. 370 रुग्णांना ब्लड दिले. कोविड रूग्णांना रेमडिसिवर इंजेक्शन संपुर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना उपलब्ध करून दिले. त्यासाठी पुणे कलेक्टर ऑफिस वर आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना 32000 इंजेक्शन 2 दिवसात मिळाली. 4 हजार नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. तसेच कोल्हापूर,सांगली मधील पूरग्रस्त 550 कुटुंबांना गरजेचे साहित्य पोहोच केले."अशी माहिती मंगेश ढमाळ यांनी दिली.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"प्रहारच्या माध्यमातून शोषित, पीडित नागरिकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच आवाज उठवत  जिल्यातील प्रत्येक ऑफिस मध्ये जाऊन न्याय मिळवून देण्यातही आमचीआग्रही भूमिका असते." अशी प्रतिक्रिया मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




गरीब रुग्णांना रुग्णालयातील उपचारांचा कितीही मोठा खर्च असला तरी हक्काचा माणूस म्हणून पुणे जिल्ह्यात मंगेश ढमाळ यांच्याकडे बघितले जाते.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now




"पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश ढमाळ यांचे निस्वार्थी, प्रामाणिक समाजकार्य प्रहार जनशक्ती पक्षातील सर्वच तरुण पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. रुग्णसेवक म्हणून मंगेश ढमाळ यांचे कार्य मोठे आहेच, त्याचबरोबर समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यासाठी अग्रेसर राहण्याचे काम मंगेश ढमाळ करत असतात." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुणे जिल्हा ग्रामीण भागातील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्ते निस्वार्थी, प्रामाणिक, प्रभावशाली सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 





Sunday, November 28, 2021

"भारतीय समाजात शैक्षणिक व सामाजिक क्रांती करणारे महामानव - महात्मा फुले" : - प्रसिद्ध लेखक, शिक्षक लक्ष्मण जगताप यांचा विशेष लेख...

 


"भारतीय समाजात शैक्षणिक व सामाजिक क्रांती करणारे महामानव - महात्मा फुले"



विद्दे विना मती गेली | मती विना नीती गेली |

नीती विना गती गेली | गती विना वित्त गेले | 

वित्ता विना शूद्र खचले | एवढे सारे अनर्थ, एका अविद्देने केले || 


समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगणारे,स्त्रीयांना शिक्षणाची कवाडे खुली करणारे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी.त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांनी दिलेल्या विचारांचा स्मरण करण्याचा दिवस.  




महात्मा फुले यांचा जन्म  ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते.जोतिबा लहान असताना म्हणजे रांगत होते त्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


त्यांच्या वडिलांचा शेती आणि फुलाचा व्यवसाय होता.त्यामुळे घरची परिस्थिती चांगल्या स्वरुपाची होती.जोतिबा हुशार आणि बुद्धिमान असल्याने त्यांना सातव्या वर्षी पहिल्या वर्गात घातले.हुशार असल्यामुळे अक्षर ओळख होताच त्यांचा शिक्षणातील आनंद आणि हुरुप वाढू लागला.



परंतु त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीमुळे वडिलांनी त्यांची शाळा बंद केली आणि त्यांना शेतीच्या कामात गुंतविले.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत जोतिबांनी चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय सांभाळला.गफार बेग मुन्शी आणि लिजिट या विद्वान गृहस्थांनी जोतिबांची बुद्धिमत्ता पाहून गोविंदरावांची भेट घेऊन त्यांना शाळेत घालण्याचा सल्ला दिला.आणि पुन्हा १८४१ मध्ये त्यांना शाळेत घालण्यात आले. 


जोतिबांनी अनेक ग्रथांचे वाचन केले.त्याचबरोबर सामाजिक,धार्मिक आर्थिक क्षेत्राशी संबंधित विविध पुस्तकांचे  वाचन केले .त्यांचा अभ्यास केला.चिंतन तसेच मनन केले.त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली.जोतिबांना मराठी ,इंग्रजी ,संस्कृत ,हिंदी,मोडी ,उर्दू, या भाषा बोलता लिहिता ,वाचता येत होत्या.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शालेय शिक्षण संपल्यानंतर जोतिबांच्या जीवनात एक वाईट प्रसंग घडला.या प्रसंगाने त्यांच्या मनावर खोलवर आघात झाला.त्यांनी धर्मग्रंथ ,शास्त्र ,पुराणांचा  खूप अभ्यास केला.या सर्व अभ्यासातून सामाजिक विषमतेचे मूळ त्यांच्या लक्षात आले.



अज्ञान ,अंधश्रद्धा ,रुढी परंपरा ,चाली रिती  या सर्वांचा नायनाट करण्यासाठी केवळ शिक्षण हाच उपाय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मान सन्मानाने जगता यावे यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्यांना  समजले.समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची घोषणा केली.त्याची फळे आज आपणांस चाखण्यास मिळत आहेत. 


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


चूल आणि मूल यात अडकलेल्या स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याचे खूप मोठे काम जोतिबांनी केले.अत्यंत कठीण परिस्थितीत  त्यांनी हे काम  जोमाने केले.अनेक संकटे आली. परंतु  स्त्री शिक्षणाचा वसा त्यांनी सोडला नाही. म्हणून त्यांना स्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा काढण्याचा मान जोतिबांनी मिळविला.




मुलगी शिकली तर घरादाराचा उद्धार होतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता.त्यामुळे त्यांनी यात स्वतः ला झोकून दिले. त्यांच्या या कामात हिरीरीने भाग घेऊन पत्नी सावित्रीबाई यांनी  दिलेली अत्यंत मोलाची साथ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदली गेली आहे. फुले दाम्पत्यांनी ख-या अर्थाने स्त्रीयांना सक्षम बनविले.


महात्मा फुले हे भविष्याचा वेध घेणारे महामानव होते.शिक्षण हेच माणसाच्या उन्नतीचे साधन आहे.म्हणून त्यांनी सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला.हंटर कमिशन समोर त्यांनी हे धोरण कसे असावे हे मांडले.समाजाची आणि देशाची प्रगती करायची असेल तर शंभर टक्के साक्षरता गरजेची असल्याचे त्यांना सांगितले.




बंधूभाव समता ही मूल्ये रुजवायची असतील तर माणसाला मानवतावाद शिकविणे आवश्यक आहे हे त्यांनी पटवून दिले आणि आपल्या शाळेतून अशा मूल्ये शिक्षणाची सोय केली.


अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी  समाजजागृती करण्याचे महान कार्य केले.


महात्मा फुल्यांनी  ब्राम्हणाचे कसब ,गुलामगिरी ,शेतकऱ्यांचा आसूड ,इशारा ,सत्सार १ व २ ,अखंडादी रचना ,सार्वजनिक सत्यधर्म अशा मौलिक ग्रंथांचे लेखन केले.लेखक ,संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांनी केलेली  कामगिरी आज अभ्यासण्यासारखी आहे.एक कृतिशील क्रांतिकारक म्हणून जोतिबांची ओळख आहे.



समाजातील वाईट प्रथा चालीरितीवर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला.त्यांच्यावर अनेक वेळा संकटे आली परंतु न डगमगता हाती घेतलेले कार्य जोतिबांनी तडीस नेले.समाजातील दीन दुबळे गरीब यांच्याबद्दल जोतिबांना कणव होती.गोरगरिबांच्या हक्कासाठी ते सतत लढत राहिले.


महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षण ,समाजसुधारणा ,शेती आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रांत दिलेले योगदान आणि केलेले कार्य सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत राहिल  इतके ते महान आहे.


२८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचा मृत्यू झाला असला तरी आजही त्यांच्या विचारांची ज्योत अखंड  तेवत आहे. 


लेखक : - शिक्षक, प्रसिद्ध लेखक, लक्ष्मण जगताप