Friday, February 25, 2022

"सवाई सर्जाचं चांगभलंच्या भक्तिमय गजरात, महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा उत्सवाची "पारंपारिक मारामारीच्या" सोहळ्याने सांगता"


पुरंदर,वीर, दि. 25 :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक  मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपारिक पद्धतीने, सवाई सर्जाचं चांगभलंच्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात, शासनाच्या नियमांचे पालन करून,  मानकरी, सालकरी,दागिनदार, भाविकांच्या उपस्थितीत शाही परंपरा जोपासत, उत्साहात पार पडला. मारामारीच्या  पारंपरिक सोहळ्याने 11 दिवस चालणाऱ्या वीरच्या यात्रेची सांगता झाली.



आज पारंपारिक मारामारीचा( रंगाचे शिंपण)  उत्सव काळातील महत्त्वाचा दिवस. आज पहाटे पाच वाजता देवाची पुजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी देवाला अभिषेक केल्यानंतर साडेदहा वाजता देवाला दहीभाताची पुजा बांधण्यात आली.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


दुपारी बारा वाजता सर्व काठ्या, पालख्या देऊळवाड्यात आल्या. देवाची आरती होऊन छबिन्याला सुरुवात झाली. मंदिराला दोन प्रदक्षिणा होऊन श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची अमृतवाणी(भाकनुक) झाली. तिसऱ्या प्रदिक्षिणेवेळी जमदाडे मंडळीकडून रंगाचे शिंपण करण्यात आले. अशा पद्धतीने पारंपारिक मारामारी (रंगाचे शिंपण) सोहळ्याने  वीर यात्रेची, पारंपारिक उत्सवाची सांगता झाली.




हा पारंपारिक सोहळा शासनाच्या वेळोवेळी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार करण्यात आला. या पारंपरिक यात्रा सोहळ्यासाठी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, मा.जिल्हाधिकारी पुणे, मा. तहसीलदार पुरंदर, सासवड पोलीस प्रशासन, पुरंदर पंचायत समिती, सासवड प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्युत वितरण कंपनी, वीर देवस्थान ट्रस्ट,वीर ग्रामपंचायत,पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव, ग्रामस्थ,भाविक,  मानकरी, स्वयंसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले व या सर्वांच्या सामूहिक नियोजनातून यात्रा उत्सव व्यवस्थित पार पडला.




या पारंपारिक यात्रा उत्सव काळात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा यावर्षी शासनाच्या नियमांचे पालन करून,पारंपरिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी  दिली.




"पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर या ठिकाणी हजारो - लाखो भक्त  भक्तिभावाने दरवर्षी येत असतात. या भक्तांची भक्ती खरच खूप वाखण्याजोगी आहे. पिढ्यानपिढ्या लोक देव दर्शनासाठी येतात. यात्रा उत्सवात मनोभावे देवाची सेवा करतात. अन्नदान करतात. पिढ्यानपिढ्या हा भक्तीचा वारसा जपला जातो अशी संस्कृती महाराष्ट्रात मला श्री क्षेत्र वीर येथे पाहायला मिळते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या चरणी भाविक भक्त भक्तिभावाने नतमस्तक होत असतात." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे भक्त व पुणे जिल्ह्यातील खेडचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"महाराष्ट्रातील अठरापगड जातीचे भाविक भक्त दरवर्षी श्री क्षेत्र वीर येथे देव दर्शनासाठी, यात्रा उत्सवासाठी येत असतात. श्री क्षेत्र वीर हे पुरंदरचे आध्यात्मिक वैभव आहे. आजच्या काळात प्रवासासाठी आधुनिक सुविधा असल्या तरी,  पुरंदर तालुक्यातील भाविक भक्त जुन्या परंपरा जपत, बैलगाडीने आवर्जून देवदर्शनासाठी यात्रा काळामध्ये येत असतात. अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाची, "पारंपारिक मारामारीने" रंगांचे शिंपण होऊन, भक्तिमय वातावरणात सांगता होते."  अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र वीर येथे शासनाच्या नियमांचे पालन करून, सालकरी, दागिनदार, भाविक भक्त व मानकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडून,  ऐतिहासिक मारामारी सोहळा ( रंगाचे शिंपण) पारंपरिक पद्धतीने पार पडला. यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने खूप चांगले नियोजन केले. पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन, मानकरी, वीर ग्रामपंचायत, पत्रकार बांधव, ग्रामस्थ व भाविक भक्त सर्वांनीच यात्रा उत्सवात चांगले सहकार्य केले." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




कोरोना संसर्ग पूर्णपणे नष्ट व्हावा व पुढील वर्षी कुठल्याही शासकीय निर्बंधाविना, पारंपारिक पद्धतीने यात्रा उत्सव साजरा व्हावा. अशा भावना श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भक्तांनी व्यक्त केल्या.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


Saturday, February 19, 2022

"शिवनेरी किल्ल्यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'शिवजन्मोत्सव' उत्साहात,जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न; गडसंवर्धन, मराठा आरक्षण, जुन्नरच्या हापूस आंब्याचे भौगोलिक मानांकन, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली "ही" महत्वपूर्ण भूमिका"....



पुणे, दि.19:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि महान कार्याचा परिचय नव्या पिढीला करून देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा विकास करण्यात येत आहे, त्यांच्या मूळ रचनेला धक्का न लावता हा वारसा जतन करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.




किल्ले शिवनेरीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव  उत्साहात साजरा झाला, त्यावेळी श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार  छत्रपती संभाजीराजे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार  अतुल बेनके,  मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राज्य स्थापन करणारे युगपुरुष होते. त्यांनी अठरापगड जातींना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन केलं. महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपले भाग्य आहे. ४०० वर्षानंतरही शिवाजी महाराजांविषयी नव्या पिढीच्या मनात आदर आणि अभिमान कायम आहे. महाराजांच्या नावाने प्रत्येक पिढीला शौर्याची आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे.




छत्रपती शिवरायांच्या कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी यासाठी गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाची भूमिका असून यासाठी पुरातत्व, पर्यावरण, वन विभाग आदी विभागांच्या माध्यमातून जुन्या बांधकाम रचनेला धक्का न लावता या वारसास्थळांचे जतन करण्यात येईल. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवनेरी किल्ले संवर्धनासाठी २३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यातून किल्ल्याच्या परिसरात विकास कामे सुरू आहेत. किल्ले रायगड  संवर्धनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी दिला असून अनेक विकासकामे तेथे सुरू आहेत.





शिवजयंती ही मराठी माणसांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे किल्ल्यावर काही बंधनात जयंती साजरी करावी लागली. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर सर्व निर्बंध खुले करण्याबाबत विचार केला जाईल.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शिवाजी महाराजांनी जुन्नर येथील हापूस आंबा जपला. या आंब्याचे जतन करण्याचे काम सुमारे साडेतीनशे वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी केले. त्याला भौगोलिक मानांकन (जी.आय.) मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून प्रयत्न केले जातील.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही कायमच राज्य शासनाची भूमिका आहे. मात्र घटनात्मक तरतुदीमुळे आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेता येणार नाही ही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाचे सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासाठी प्रधानमंत्री महोदयांचीही भेट घेऊन कायद्यात बदल करून आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत विनंती केली आहे. कोणतेही राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली.


भारतीय डाक विभागाने केलेल्या 'जुन्नर रत्न' या पोस्टकार्ड संचाचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. १५ सचित्र पोस्ट कार्डाच्या या संचात येथील किल्ले, जैवविविधता, पर्यटन स्थळे, मंदिरे आदींचा समावेश आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर यांची संकल्पना यामागे होती.कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.




छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार स्व. अनिल अवचट यांना जाहीर झाला होता तो त्यांची कन्या मुक्ता पुणतांबेकर यांनी स्वीकारला. तसेच शिवनेर भूषण पुरस्कार प्रा. विनायक खोत यांना प्रदान करण्यात आला.


कार्यक्रमास विभागीय आयुक्त सौरभ राव,  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी सारंग कोडोलकर, माजी जि.प. अध्यक्ष देवराम लांडे, मराठा सेवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र डुबे, यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

"जगातील तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजीराजे" - युवा लेखक अजय समगीर यांचा शिवजयंती विशेष लेख"

 


"जगातील तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजीराजे"


छत्रपती शिवाजीराजे म्हणजे कुठल्याही क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. सोळाव्या शतकात बऱ्याच राज्यकर्त्यांनी सत्ता गाजवल्या, युरोप फिरताना तिथेही चौकाचौकात महापुरुषांचे पुतळे दिसतात. नेपोलियनने घडवलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. कितीतरी रोमन राज्यकर्ते आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही सांगितल्या जातात. 


पण या सगळयात शिवरायांची चमक नेहमी वेगळीच राहिली कारण स्वराज्य हे शून्यातून उभं राहिलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या आणि परक्यांच्या विरोधातून आणि ते ही काही जमीनदारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या पोरांनी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभं केलं. 




स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात हे शेतकरी हंगामी शेती करत आणि पडीच्या काळात स्वराज्यात शिलेदार म्हणून दाखल होत. फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी आपण जन्माला आलो नसून आपला स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे ही शिकवण महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला दिली. दुसरी महत्वाची शिकवण म्हणजे माणसं हाताळण्याची कला, महाराजांना ती एवढी अवगत झाली होती की त्यांचे लोक त्यांच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरायला तयार होते.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


गुलामगिरीत पिचलेल्या समाजाला सर्वबाजूने अन्याय सहन करावा लागत होता. दोन परकीय राजांच्या सत्ता संघर्षात जनेतचा बळी जात होता. कसलेल्या जमिनीतून कमावलेले वतनदाराच्या झोळीत पडत होते. दुष्काळ पडला तरी कर भरावे लागत होते. महाराजांच्या सुराज्यात हे धोरण बदलले. रयत केंद्रबिंदू झाली. 




शेतकरी आणि लष्कर यांना संकटकाळी आरक्षण मिळू लागले जो घटक दुर्लक्षित होता तो मुख्यस्थानी आला आणि हुकमशाहीच्या मातीवर खरी लोकशाही उगवून आली. त्या काळातच काय तर आत्ताच्या काळातही हा फरक जाणवतो. म्हणून महाराज इतर कोणत्याही शासकापासून वेगळे आणि उंच ठरतात. आणि आजही महाराजांचे अनुयायी ज्वलंत आणि जिवंत आहेत.




स्वराज्य उभारताना महाराजांनी पहिला घाव वतनदारीवर घातला. वतनदारांना त्यांनी वेतनदार बनवले. या एका क्रांतीचा स्वराज्याला दुहेरी फायदा झाला. गुलामगिरीत पिचलेली रयत मुक्त झाली आणि वतनदारांनी बंड न करता स्वराज्याच्या वाढीला हातभार लावला. आणेवारी सारखी प्रकिया महाराजांनी राबवली ज्यातून शेतकऱ्यांच्या जमीनी सुरक्षित राहिल्या. ठिकठिकाणी बांधलेले शिवकालीन बंधारे आजही टिकुन आहेत. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आमच्या शेजारच्या गावात उन्हाळ्यात दरवर्षी दुष्काळ पडत असतो. मागच्या चार वर्षात ओढ्यातला गाळ काढताना चार शिवकालीन बंधारे सापडले त्यानंतर त्या गावात पाण्याचा प्रश्नच मिटला. हे आत्ताचे उदाहरण आहे जे महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. 


एखाद्या गोष्टीचे सुयोग्य नियोजन कसे करावे हे शिकण्यासाठी महाराजांच्या कोणत्याही कर्तुत्वाला उदाहरण म्हणून घेता येईल. आणि आपल्या नेतृत्वाशी आणि कर्तव्याशी एकनिष्ठ कसे राहावे हे शिकण्यासाठी महाराजांच्या कोणत्याही मावळ्याचे उदाहरण देता येईल.




स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि इतर गडकिल्ले हे नेहमीच महाराजांच्या अभियांत्रिकी गुणवत्तेचे साक्षीदार राहिले आहेत. तसेच किल्ले स्वराज्यात घेताना मावळ्यांचे शौर्य, गनिमी कावा, महाराजांच्या नियोजनबद्ध मोहीमा या सगळ्या गोष्टी अचंबित करणाऱ्या ठरल्या आणि त्या नेहमीच लक्षवेधी राहिल्या. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पण त्याबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराजांचा स्वभावगुण ! 


लोकं महाराजांसाठी मरायला तयार होती आणि त्या मागे फक्त लोकाभिमुख कारभार करणाऱ्या भोसले घराण्याबद्दलचा आदर हे एवढंच कारण नव्हतं. हजारो वर्षांपासून जे रयत भोगत होती त्या जुलमी सत्ता, रूढी परंपरा, चालीरीती यांना महाराजांनी छेद दिला. 




साम, दाम, दंड आणि भेद या तत्वांचा योग्य वेळी वापर करून नवी चळवळ उभारली. महाराजांनी रयतेला केंद्रस्थान मानुन स्वराज्याचे  महान कार्य केले. त्यामुळं महाराज आणि रयत यांच्यात एक भावनिक नातं तयार झालं ज्याचा प्रत्यय आज सुद्धा 350 वर्षानंतर आल्या शिवाय राहत नाही.


औरंगजेब सारखा मुत्सद्दी राज्यकर्ता सुरुवातीच्या काळात महाराजांना "जमीनदाराचा मुलगा" म्हणत. त्याच्या दृष्टीने महाराजांचं राज्य म्हणजे किरकोळ बंड असावं. पण महाराजांनी जेव्हा जावळीत स्वतः खानाचा वध केला तेव्हा आलमगीरासहित संपूर्ण पातशाही हलवली. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


खान जावळीत आला तेव्हाच त्याचं मरण निश्चित झालं होतं पण महाराजांनी त्याला स्वतःच्या हाताने मारून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं ज्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा विरोधकांचा दृष्टिकोन बदलला आणि संपुर्ण हिंदुस्थानात महाराजांची जरब बसली. याला grand strategy म्हणतात. खानाच्या वधाबरोबर शास्ताखानाचा बंदोबस्त आणि अशा भरपूर घटना हा याच stategyचा भाग. 


"आग्र्याहून सुटका" हा महाराजांच्या पराक्रमातील कधी न विसरता येणारा भाग. त्याबरोबर एक विशेष बाब मला नमूद करावी वाट्ते ती म्हणजे या घटनेनंतर एका इराणच्या राजाने औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात त्याने बादशहाची खूप नाचक्की केली. 




"शिवाजी सारखा दख्खनच्या एका छोट्या राज्याचा राजा तुझ्या हातावर तुरी देऊन सटकतो आणि तू स्वतःला आलमगीर म्हणून घेतो" अशा खरमरीत शब्दात त्याने बादशहाचे वाभाडे काढले. या सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे महाराजांची ख्याती त्यांच्या हयातीतच साता समुद्रापार पोचली होती हे अभिमानास्पद आहे.


त्यामुळे महाराज डोक्यात घ्यायचे की डोक्यावर हा विशेष मुद्दा आहे.


महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ज्यातून असा इतिहास उभा राहिलाय आणि तो आपल्यासारख्या अगणित पिढ्यांना जगण्याचा मार्ग दाखवत राहील यात शंका नाही. छ्त्रपती शिवाजीराजे एका जन्मात समजणे सोपे नाही पण त्यांचे विचार योग्यपणे अमलात आणले तर आयुष्यात आपला कधीच पराभव होणार नाही कारण छत्रपतींच्या विचाराचा पराभव होऊच शकत नाही.


जय शिवराय!


लेखक : - आयटी अभियंता, युवा लेखक अजय समगीर



"तो दिवस सोन्याच्या, तो दिवस रत्नांचा, तो दिवस कौस्थुभाचा,अमृताचा; छत्रपती शिवाजीराजेंच्या जन्माने सगळी सृष्टी उजळली" - प्रसिद्ध लेखिका, इतिहास अभ्यासिका डॉ. सुवर्णा नाईक निंबाळकर यांचा 'जिजाऊंचे मातृत्व व शिवाजीराजेंचा जन्मकाळ' या विषयावरील सुंदर वर्णन करणारा, शिवजयंती निमित्त विशेष लेख...

 


" जिजाऊंचे मातृत्व व शिवाजीराजेंचा जन्म "


शहाजीराजे व जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न साकार होण्यासाठी व महाराज शहाजीराजांना पराक्रमाचा वारस मिळण्यासाठी जिजाऊंना पुत्र हवा होता. जिजाऊंची आस होती एका पुत्राची.शिवरायांच्या वेळी जिजाऊंना कडक डोहाळे लागले होते . 


त्यांना गरोदर अवस्थेत असताना हत्तीवर बसावे , गडावर फिरावे ,शुभ्र छतावरी सिंहासनावर बसावे ,निशान उभारावे,चौर्या ढाळून घ्यावे, धनुष्यबाण,भाला - तलवार- चिलखत धारण करून लढाया कराव्या, गड जिंकावा, विजय मिळवावा. मोठमोठे दानधर्म करावे, धर्मस्थापना करावी, असे नाना प्रकारचे चमत्कारीक डोहाळे होत असल्यामुळे आपल्या गर्भातील बाळ तेजस्वी होईल अशीच जिजाऊंची भावना दृढ झाली होती.




जिजाऊंना सुरक्षेसाठी म्हणून शहाजीराजांनी बाळंतपणासाठी शिवनेरीचे किल्लेदार विजय विश्वासराव यांच्याकडे सोपवले होते.विश्वासराव तर शहाजीराजांनी दाखवलेल्या विश्वासानेच धन्य झाले होते. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


किल्लेदार विश्वासराव स्वतः आणि त्यांचे सारे सहकारी अतिशय काळजीपूर्वक जिजाऊंची व्यवस्था पाहत होते .एका फार मोठ्या तालेवार सरदारांच्या ,साक्षात महाराज शहाजी राजे यांच्या लाडक्या राणीसाहेब खास बाळंतपणासाठी म्हणून या शिवनेरी गडावर आल्या होत्या.जिजाऊंच्या पोटी सहा पुत्र जन्मले होते.परंतु पुढे दोनच पुत्र नावारुपाला आले.



गडावर एका सुरक्षित  खोलीत बाळंतपणाची  सर्व व्यवस्था करण्यात आली होती.भिंतीवर कुंकवाने ठिक ठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यात आली होती. 



बाळबाळंतीणीला आशीर्वाद द्यायला अनेक देव-देवता तत्परतेने भिंतीवर उभ्या होत्या. स्वस्तिक,कमळ ह्यांनी छताला आच्छादून टाकले होते. प्रवेशद्वारापाशी साक्षात ब्रह्मा -विष्णूच पहारेकरी  म्हणून उभे होते. खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते.  आता दाटली होती फक्त उत्कंठा!

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशातल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या.  सगळी सृष्टी उजळू लागली.बालसूर्याच्या स्वागतार्थ स्वर्गाचे देव जणू पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगली. वारा हर्षावला. पाखरे आकाश घुमवू लागली. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई- चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्तअश्व उधळीत उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला!



आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला.  वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झणाणू लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला.नौबत सहस्त्रशः दणाणू लागली. नद्या,वारे ,तारे ,अग्नी सारे  आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचे !  त्या दिवसाला उपमाच नाही.




तीनशे वर्षे शिवनेरीच्या भोवती घिरट्या घालीत होती ! आज त्यांना नेमकी चाहूल लागली ! कोणत्या शब्दात त्या सुवर्ण क्षणाचे मोल सांगू?अहो , केवळ शतकां -शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल !  जिजाबाईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला !( दि.१९ फेब्रुवारी, शुक्रवार, १६३० ).



गडाचे तोंड साखरेहून गोड झाले. आईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि  घागरीतून धो धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघाले. खळाळणारा ओघ वेशीला आला ! ओघ वेशीला आला ,पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला! पुत्र शहाजीराजांना झाला! पुत्र सह्याद्रीला झाला ! महाराष्ट्राला झाला ! भारतवर्षाला झाला ! 




प्रत्येक जलओघ वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरूडजंजिर्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता.तेथल्या मग्रुर सुलतानांना बातमी सांगायला की, आला आला !सुलतानांनो , तुमचा काळ जन्माला आला ! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्तांच्या  चिरफळ्या उडविण्याकरिता कृष्ण जन्माला आला !! 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


शहाजाराजांकडे बातमीची साखरथैली रवाना झाली. या वेळी राजे दर्याखांन रोहिड्यांशी लढण्यात गुंतले होते. गडावर शीतल सुगंधी वारे वाहू लागले .गडाच्या परिसरातील खेड्यापाड्यात ही पुत्रजन्माची बातमी पसरली .थोर मनाच्या शहाजीराजांना व तितक्याच थोर  हृदयाच्या जिजाऊसाहेबांना पुत्रलाभ झाला , हे समजल्यावर जुन्नर मावळ आनंदून गेले.


             "  महाजनहो ! पृथ्वीचे भाग्य उदेले ! 

या भूमंडळाचे ठायी अति थोर सौभाग्यमूहूर्तावर हा कुमार जन्माला आला आहे! त्याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्ययोगांनी परिप्लुत आहे.अहो , हा सुपुत्र दिग्विजय करील!हा परम साहसे करील ! आपली किर्ती दिगंताला पोहोचविल ! हा आपल्या सत्तेत गिरीदुर्ग, जलदुर्ग ,वनदुर्ग, स्थलदुर्ग ठेवील ! श्रांत पृथ्वीस शांत करील ! सकल भूमीचे ठायी हा सुपुत्र यशकिर्तीप्रताप महिमा वाढवून चिरंजीव होईल!"




 हे शुभ भविष्य ऐकून कारभाऱ्यांनी माना डोलावल्या.मुद्रा आनंदल्या .त्यांना धन्य धन्य वाटले.ओंजळी भरभरून दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणांची त्यांनी संभावना केली. इवलेशे बाळ ते ! त्याला अजून धड  रडता सुध्दा येत नव्हते. 


पण त्याच्याकडून अपेक्षा केवढ्या मोठ्या! आईसाहेबांच्या सौम्य मातृद्रृष्टीतही त्याच अपेक्षा दाटलेल्या होत्या. तो सह्याद्री तर आनंदाने खदखदत होता. जणू म्हणत होता ,अरे ह्या  पोराची कुंडली विती दीडवितीच्या अशा चिठोऱ्यावर काय मांडता ! सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या ह्या  अफाट आकाशावर ब्रह्मदेवाने यांची कुंडली केव्हाच मांडून ठेवली आहे!

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


पाचव्या दिवशी धनुष्यबाण, तलवार वगैरे हत्यारे बाळंतघरात पुजण्यात आली. बारावा दिवस उगवला.आज बाळाचे बारसे होते. बारसे मोठ्या थाटामाटाचे झाले. शिवनेरीगड बाळाचे बारसे जेवला. मानपानाच्या मांनकरणी, मायबहिणी,सुईणी , कुळंबिणी जमल्या. पाळणा सजून - सावरून बाळाची केव्हाची आतुरतेने वाट पाहात होता.


आईसाहेबांनी मांडीवर बाळ घेतले.बाळानेही मोठाच थाटमाट केला होता. जरीचे अंगडे.जरीचे कुंचडे.मोठाच रुबाब होता बाळाचा !कुंचड्याला कडेने मोती व मध्यभागी लावलेले सोन्याचे पिंपळपान  बाळाच्या कपाळावर रूळत होते. 




गळ्यात दृष्टीची पोत आणि सोन्यात जडविलेले वाघनख घातले होते.त्याला पाचू जडविले होते.शिवाय सोन्याची जिवती बाळाच्या छातीवर विराजली होती. हातात बिंदल्या, मनगट्या होत्या. पायात लखलखीत चाळवाळे होते .डोळ्यात काजळ घातले होते. कपाळावरती तीठ लावले होते. बाळाचे नाव ठेवण्यात आले. शिवाजी ! शिवाजीराजे ! शिवाजीराजे! बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.


म्हणूनच बाळाचे नाव ठेवले 'शिवाजी'तीनच अक्षरे, शि -वा -जी ! पण त्यातील एका अक्षरात रामायण साठवले होते ! एका अक्षरात  महाभारत साठवले होते! एका अक्षरात शिवभारत साठवले होते! अन तीनही अक्षरात महान भारत घडविण्याचे  चिरंजीव सामर्थ्य साठविलेले होते.




गड शिवनेरी मोठा भाग्याचा. शिवाजीराजाला म्हटली गेलेली अंगाईगीते या गडाने ऐकली होती. शिवाजीराजेही मोठे भाग्याचे. त्यांना पहिले स्नान व पहिले प्राशन घडले ते गंगा - यमुनांचे ! ते कसे ? शिवनेरीवर पाण्याची टाकी आहे. त्यातील एका टाक्याचे नाव आहे 'गंगा 'आणि दुसऱ्याचे नाव आहे' यमुना'! गडकोटांनी, नद्यांनी, देव-देवतांनी, सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांनी आणि मावळच्या खेड्यापाड्यांनी वेढलेल्या गडावर शिवाजीराजांचा जन्म झाला.जन्मतःच  त्यांचे नाते जडले किल्ल्यांशी, तटांशी ,बुरूजांशी.  

     

शिवनेरीवर सह्याद्रीच्या कुशीत रात्रीच्या अंधारात ऊषःकाल झाला! तीनशे वर्षाच्या भिषण काळोखानंतर पूर्वा उजळली ! उषःकाल झाला!


आमच्या या शूर,पराक्रमी छत्रपती शिवाजीराजेंना आमचा मानाचा मुजरा .


               

लेखिका : - इतिहास अभ्यासिका,  ऐतिहासिक विषयांवर लेखन करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर.





"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज" - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध इतिहास अभ्यासक, लेखक श्रीमंत कोकाटे यांचा विशेष लेख....



"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता; रयतेचे कल्याणकारी, जाणते राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज"


धर्मनिरपेक्षता यालाच इंग्रजीमध्ये सेक्युलॅरिझम म्हणतात. ही संकल्पना आधुनिक असून तिचा उदय युरोपमध्ये झाला. आणि वासाहतिक राष्ट्रात तिचा प्रसार झाला. भारत हे ब्रिटिशांचे वासाहतिक राष्ट्र होते. 


पूर्वीपासूनच भारतात बहुसांस्कृतिक समाजरचना आहे. प्राचीन काळापासून अनेक पंथ, संप्रदाय आणि विचारधारा येथे आहेत. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील होत्या.




शिवाजी महाराजांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता. परंतु अनिष्ठ परंपरा, चुकीच्या चालीरीती त्यांनी जाणीवपूर्वक नाकारल्या. 




त्यांनी मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज आणि सनातनी व्यवस्था यांच्याविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, यांच्याविरुद्ध राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


तो धार्मिक कारणांसाठी नव्हे, धार्मिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा संघर्ष सनातनी व्यवस्थेविरुद्ध होता. तो राज्याभिषेकाच्या प्रसंगी प्रकर्षाने पुढे आला. आर्थिक आणि जमीन धारणेसाठी वतनदार - सरंजामदार विरुद्ध त्यांना लढावे लागले. त्यांचा संघर्ष तीन आघाडीवर होता हे स्पष्ट होते.




शिवरायांनी अफझलखान, शाहिस्तेखान यांना धडा शिकवला ते मुस्लीम होते म्हणून नव्हे, तर ते स्वराज्याचे शत्रू होते म्हणून. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


शिवरायांनी ज्याप्रमाणे अफजलखानाला मारले त्याप्रमाणेच त्याचा वकील कृष्णा कुलकर्णी आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजरला देखील मारले. यावरून स्पष्ट होते की शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती. 




तर ती अन्याय - अत्याचाराविरुद्ध होती. याउलट खानाच्या मुलांना प्रेमाने वागवले व त्याची कबर बांधण्याचा मदत केली.


आदिलशाहीत दुष्काळ असताना त्यांनी ज्वारी मदत म्हणून पाठवली. दक्षिण दिग्विजयच्या प्रसंगी शिवाजीराजे गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला  म्हणाले, "तुम्ही माझा मोठा भाऊ, मी तुमचा धाकटा भाऊ." 




यावरून स्पष्ट होते की तत्कालीन संघर्ष हिंदू - मुस्लीम संघर्ष नव्हता. तो तसा असता तर सर्व हिंदू शिवरायांसोबत आणि सर्व मुस्लिम मोगल - आदिलशहा सोबत असायला हवे होते. 


वस्तुस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात व प्रशासनात अनेक मुस्लीम होते. त्यांच्या पदरी 700 पठाणांची फौज होती. त्यांचे काही अंगरक्षक मुस्लिम होते.



पायदळात नूरखान बेग होता. सिद्दी हिलाल, सिद्धी वाहवा होता. दर्यासारंग दौलतखान आरमार दलाचा प्रमुख होता.


शिवाजीराजांचे चित्र रेखाटणारा मीर महंमद होता. शिवरायांनी स्वधर्माप्रमाणेच इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांना व धर्मग्रंथांना अभय दिले. 




सुरत मोहिमेच्या प्रसंगी त्यांनी सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आणि धर्मगुरू यांना इजा पोचणार नाही याची काळजी घेतली. "ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा" ही त्यांची भूमिका होती.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पोर्तुगीज व्हाईसरॉय त्याच्या देशातील राजाला पाठवलेल्या पत्रात कळवतो की, "पूर्वेकडच्या जगातील शिवाजी महाराज हे पराक्रमी, मुत्सद्दी आणि धोरणी राजे आहेत. ते आणि त्यांची प्रजा जरी मूर्तिपूजक असली तरी मूर्तिपूजा न करणाऱ्यांना ते आपल्या राज्यात नांदू देतात.


परधर्मीयांच्या धार्मिक श्रद्धांवर त्यांनी आक्रमण केले नाही. आपल्या धार्मिक संकल्पना इतर धर्मियांवर त्यांनी लादल्या नाहीत. स्वधर्माचा अभिमान बाळगताना बहुसांस्कृतिक धोरणाचा आदर - सन्मान करणारा, मध्ययुगीन काळातील प्रगल्भ राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 




ज्या काळात युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता या संकल्पनेने बाळसंही धरले नव्हतं; त्या काळात शिवाजीराजांच्या स्वराज्यात धर्मनिरपेक्षतेचा वटवृक्ष झालेला होता. त्या सावलीत हिंदू-मुसलमान आनंदाने नांदत होते. असे महाकवी वामनदादा कर्डक एका काव्यात म्हणतात.



लेखक : - शिवचरित्राचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जेष्ठ अभ्यासक, पुरोगामी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, इतिहास अभ्यासक, डॉक्टर श्रीमंत कोकाटे