Monday, October 30, 2023

"पुरंदरच्या प्रसिद्ध वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागांसाठी "या" प्रभागांमधून ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार; ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी "या" चार प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची व अतितटीचे लढत होणार"...


पुरंदर,वीर,दि.३० : पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्याने उरलेल्या 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर गाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी वीर येथे येत असतात.   पुरंदर मधील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या 2023 मधील पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 5 प्रभागांमधून 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.




वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर गाव हे पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव असून सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय दृष्ट्या या गावाला संपूर्ण तालुक्यात महत्व आहे.


वीर ग्रामपंचायतीची सार्वजनिक पंचवार्षिक निवडणूक 2023 ही अतिशय चुरशीची आणि अतितटीची असणार आहे. 



पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 1)श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे सौ. मंजुषा संतोष धुमाळ, 2)श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे सौ. मिनल भरत धुमाळ, 3)श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलतर्फे सौ. हर्षला ऋषिकेश धसाडे व 4)अपक्ष उमेदवार सौ. कल्पना विलास वाघ यांच्यामध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढत होणार आहे.




वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार  1)सौ. पूनम प्रमोद धुमाळ, 2)सौ. प्रीती मोहन चवरे,  3)अनिकेत राजेंद्र समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)युवराज प्रताप धुमाळ, 2)मोहन अरुण चवरे, 3)सौ.जयश्री अनिरुद्ध धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री रुपेश धुमाळ, 2)प्रतीक अशोक सोनवणे, 3)राहुल कुंडलिक खोमणे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.




वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री सोपान समगीर, 2)सौ. सरिता अमोलराव धुमाळ, 3)सुरज बाळासाहेब समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)विनोद कृष्णाजी चवरे, 2)सौ.गौरी श्रीकांत थिटे, 3)केशव  बाप्पूसो धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)पराग सखाराम साळुंखे, 2)सौ. गौरी सुजित धुमाळ, 3)सौ. योगिता महेश धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.शोभा चंद्रकांत माळवे, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)विशाल सुदाम सोनवणे, 2)सौ.पूजा संग्राम माळवे 3)दीपक दत्तात्रय भांडवलकर हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.



वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनल तर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)चंद्रकांत दत्तात्रय समगीर, प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)स्वप्नील चंद्रकांत धसाडे, 2) सौ.उषा आप्पा धसाडे, 3)तुषार गजानन यादव तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)गणेश लक्ष्मण तांदळे 2)सौ.छाया संतोष धसाडे, 3)सौ.आशा प्रशांत जाधव तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)वैभव बाळू बोडरे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.



वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.पूजा विनोद बुरुंगले, 2)सौ.दिपाली नानसो वाघ, 3)समीर रामदास वचकल हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


वीर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकूण दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.  प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात कमी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, प्रसिद्ध वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तसेच लोकनियुक्त सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"श्रीक्षेत्र वीर येथील ग्रामपंचायत निवडणूक  ही येणाऱ्या काळात विकासाची मुहूर्तमेढ रोवणार आहे.  निवडून येणारी लोकनियुक्त सरपंच महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न व महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच वीरचा चांगला विकास होईल यात  तीळ मात्र शंका नाही. वीर गावचा पाणी प्रश्न,अवैद्य धंदे, आरोग्य सुविधा यावर निवडून येणाऱ्या गावातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुक ही काही दिवसांची असते नंतर पुन्हा प्रत्येकाला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागत असते. याचे भान ठेवून प्रत्येकाने संयमाने, शांततेने, कुठलेही हेवेदावे व मत्सर न करता शांततेत ही निवडणूक पार पाडावी. आणि लोकशाहीच्या या उत्सवाला रंगाचा बेरंग होणार नाही याची वीर मधील प्रत्येक मतदाराने काळजी घेणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर मधील  दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासू पत्रकार व  महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक श्री शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष वेधणारी वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक अतितटीची आणि चुरशीची नक्कीच असेल अशी जनभावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.


वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन वीर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होईन.

Saturday, October 28, 2023

"राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला व प्राईड इंग्लिश स्कुलचे देदीप्यमान यश; महाराष्ट्राच्या संघाने "या" क्रीडा प्रकारात पटकावले सुवर्णपदक"...


पुणे, दि.२८ : पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत पुण्याच्या प्रसिद्ध प्रियदर्शिनी विद्यामंदिर व प्राईड इंग्लिश स्कूल या विद्यालयाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.




राष्ट्रीय स्पर्धेसाठी एकूण 28 खेळाडूंची महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली.त्यामध्ये सहा खेळाडू पुणे जिल्ह्यातून निवडले गेले. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


शिर्डी येथे 14 व 15 ऑक्टोबर रोजी   झालेल्या टेनिस व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पुणे शहराकडून खेळताना सब ज्युनिअर मुली प्रथम क्रमांक व सब ज्युनिअर मिक्स डबल द्वितीय क्रमांक पटकवला.



या विजयामुळे महाराष्ट्राच्या संघामध्ये  पुणे शहराच्या सहा खेळाडूंची निवड झाली.राजवीर भोसले, ओंकार पोळ, श्रेया ढवान, तनुजा रांजणे, प्रांजल सूर्यवंशी, सायली बाटे.




राष्ट्रीय स्पर्धा  शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे 21 ते 24 ऑक्टोंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भारतातून एकूण 18 राज्यातील एकूण 400 खेळाडू सहभागी झाले होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


बालेवाडी येथील  शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल स्टेडियमवर स्पर्धा अतिशय व्यवस्थित पार पडल्या. खेळाडूंसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केलेली होती.


आंतरराष्ट्रीय स्टेडियम असल्यामुळे स्पर्धेचे महत्त्व खूप वाढले होते. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमवर खेळण्यासाठी मिळणे हा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रसंग होता. 


या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन उदगीरचे माजी आमदार गोविंद केंद्रे, महादेव कसगावडे (पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी) टेनिस  व्हॉलीबॉल जनक व्यंकटेश वांगवाड, गणेश माळवे, प्रफुल्ल बनसोडे , दिनेश  सिंगाराम  व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडले. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाने सब ज्युनिअर मुले सुवर्णपदक पटकावले, सब जूनियर मुली रौप्य पदक, सब जूनियर मिक्स डबल रौप्य पदक, जूनियर मिक्स डबल कांस्यपदक  पटकावून  भरीव कामगिरी केली. 

"सब ज्युनियर मुली महाराष्ट्र संघाकडून खेळताना  इतर खेळाडू बरोबरच  प्रियदर्शिनी विद्यामंदिरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून दिले."



"सब जुनियर मिक्स डबल मध्ये राजवीर भोसले प्राइड इंग्लिश स्कूल व प्रांजल सूर्यवंशी प्रियदर्शिनी विद्यामंदिर. या संघाने तेलंगणा, केरला, झारखंड या राज्यांचा पराभव करत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवुन दिले."

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


खेळाडूंना क्रीडामार्गदर्शन संदीप भोसले यांनी केले. खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेल्या भरीव कामगिरीचे कौतुक मुख्याध्यापिका राजश्री दिघे, रूपाली मालुसरे व संस्थेचे सचिव मा. नगरसेवक आप्पासाहेब रेणुसे यांनी केले.

पुण्यातील प्रसिद्ध प्रियदर्शनी विद्यामंदिर प्रशाला तसेच प्राईड इंग्लिश स्कूल या प्रशाला नेहमीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी दाखवत असतात.


Thursday, October 26, 2023

"पुरंदरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर, मराठा आरक्षणासाठी व मराठा योद्धे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी; मराठा क्रांती मोर्चाचा पुन्हा एकदा "बेमुदत ठिय्या आंदोलनाचा" एल्गार"...



पुरंदर,दि.२६,सासवड : संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात गौरवशाली इतिहास असणाऱ्या मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी व मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नांसाठी पुरंदर तालुका सकल मराठा क्रांती मोर्चा नेहमीच आंदोलनाच्या माध्यमातून मराठा आंदोलनाच्या चळवळीसाठी जागरूक असतो.



"महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतमध्येच मराठा कुणबी म्हणून आरक्षण मिळावे आणि मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाकडून गुरूवार  पासून सासवड येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून “बेमुदत ठिय्या आंदोलन” सुरू करण्यात आले आहे. "




यापुर्वीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सासवडच्या शिवतीर्थावर मराठा आरक्षणासाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सलग १०० दिवस ठिय्या आंदोलन करून मराठा आरक्षण मागणीची ज्योत तेवत ठेवण्यात आली होती. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आताही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे पुरंदरच्या मराठा आंदोलकांनी सांगितले.



सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाजाच्या मुलांचा व मुलींच्या शिक्षण व नोकरीचा प्रश्न गंभीर झाला आहे. 




याबाबत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील प्रत्येक भागात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


त्याला प्रतिसाद देत सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर यांच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला मराठा आरक्षण, मराठा - कुणबी म्हणून ५० टक्केच्या आत  ओबीसी प्रवर्गातूनच कायम स्वरुपी मिळण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे पुरंदर तालुक्याच्या तहसीलदार  यांना करण्यात आली.




मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात टिकणारे कायदेशीर, ओबीसी प्रवर्गातील  ५० टक्क्याच्या आत मधील मराठा आरक्षण  मराठा समाजाला  दिले पाहिजे. अशी मागणी मराठा समाजातील लाखो - करोडो तरुणांकडून संपूर्ण राज्यभर करण्यात येत आहे.

Tuesday, October 24, 2023

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांची पारणे फेडणारा "ऐतिहासिक शाही दसरा" सोहळा पारंपरिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न"...


पुरंदर, वीर, दि.२४ :  महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा मंगळवारी पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, उत्साहात संपन्न झाला.




श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या. 




या ऐतिहासिक सोहळ्यावेळी सालकरी, मानकरी, दागिनदार, देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ,भक्त उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळ्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.



श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री 8.30 वाजता मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना  संपन्न झाला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभिकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.




"पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो."




"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला."


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.

Monday, October 23, 2023

"अठरापगड - जातीच्या लोकांना भक्तीच्या धाग्याने एकजूट करणाऱ्या,समृद्ध करणाऱ्या "या" पारंपारिक 'आठव्या माळेला' महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्रोत्सवात; लोटला भक्तांचा जनसागर"...


पुरंदर,वीर,दि.२३ : महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकजूट करणारा व समृद्ध करणारा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्रोत्सव हा पारंपरिक संस्कृतीचे अलौकिक दर्शन घडवतो.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथे ऐतिहासिक नवरात्रोत्सवात अष्टमीला म्हणजेच पारंपरिक आठव्या माळेला, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पालखीची वस्त्र परिधान केलेल्या मानांच्या काठ्यांसह, भक्त कमळाजी भेट सोहळा भक्तीमय वातावरणात रविवारी संपन्न झाला.




या ऐतिहासिक श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीची भक्त कमळाची भेट पारंपरिक सोहळ्यामध्ये सर्व जाती - धर्माचे लोक उत्साहात,आनंदात  सहभागी झाले. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


हा नयनरम्य, अलौकिक, पारंपारिक भक्त कमळाजी भेट सोहळा पाहण्यासाठी वीर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.




सवाई सर्जाचं चांगभलच्या भक्तीमय गजरात, वीर येथील माळावर सर्व पारंपरिक लवाजम्यांसह होणारा हा  अष्टमीचा भक्त कमळाची भेट अलौकिक सोहळा सर्व भक्तांना वर्षभर खूप मोठी ऊर्जा देतो.




रविवारी पहाटे पाच वाजता महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपासकाळात उष्णता वाढते म्हणून देवाचा दाह कमी करण्यासाठी  रिट्याच्या पानाची पूजा करण्यात येते. रिट्याच्या पानांचे अलंकार बनवून देवाला घालण्यात येतात.



श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची रिट्याच्या पानांनी पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व  जोगेश्वरी माता यांचे मुखवटे पालखीत ठेवून छबीना निघाला.



"मंदिराला दोन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी दक्षिण दरवाजाने बाहेर काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठ्या, निशान, अब्दागिरी, छत्री आदी लवाजम्यांसह गुलालाची उधळण करत, सवाई सर्जाचं चांगभलंच्या गजरात मंदिर परिसर दणाणून गेला."



"हा सर्व पारंपारिक लवाजमा पुढे भक्त कमळाजींच्या भेटीसाठी माळावरती आला. पारंपारिक भक्त कमळाची भेट सोहळा हा सर्व भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा अलौकिक सोहळा होता."




या ऐतिहासिक नवरात्रोत्सवात सर्व भक्तांना चांगल्या सोयी सुविधा वीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुरवल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये दोन प्रहर देवाची पूजा, छबिण्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, कीर्तन भजन, गोंधळ, लोकनाट्य कलावंतांची हजेरी असे विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडले.




नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने  चांगले नियोजन केले.




हा पारंपारिक सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त, सल्लागार मंडळ, ट्रस्टचे कर्मचारी, सालकरी, मानकरी, वीर ग्रामस्थ, गुरव, घडशी, गोसावी, आणि सर्व भाविक भक्तांचेही सहकार्य लाभले.



"वीर गावची आध्यात्मिक संस्कृती समृद्ध करणारा "पारंपारिक भक्त कमळाजी भेट" सोहळा हा अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्यात बांधणारा असा अलौकिक व नयनरम्य तसेच हजारो भक्तांना ऊर्जा देणारा  सोहळा असतो."