पुरंदर, दि.२७ : शेतकरीराजा व शेती हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. संपूर्ण देशाची भूक भागवणारा शेतकरी राजा कष्ट, मेहनत करून, प्रामाणिकपणे शेती व्यवसाय करून देशाची सेवा करत असतो. आधुनिक शेती करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन, शेतकरी राजाला त्याचा फायदा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कृषी विभाग कार्यरत आहे.
महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्यावतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील, पुरंदर किल्ल्याच्या भोवती असलेल्या मिसाळवाडी, आदिवासी पाडा येथे पुरंदर तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
मिसाळवाडी हे संपूर्ण गाव आदिवासी समाजाचे आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी सहाय्यक दिनेश धायगुडे यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आंबा, सिताफळ, बांबू लागवड , आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान बाबत माहिती दिली.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
या कार्यक्रमात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर , पॉवर टिलर, पावर विडर ,पेरणी यंत्र, कुट्टी मशीन इत्यादीसाठी मिळणारे अनुदान याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.
या शेतकरी हितांच्या योजनांबाबत मार्गदर्शन करून या योजनांचे अर्ज ऑनलाईन महा-ई-सेवा केंद्रावर करण्याविषयी शेतकऱ्यांना सांगितले.
कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी शेतकऱ्यांना भात शेतीमधील "चार सुत्री भात शेती" बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच भात रोपवाटिकेमध्ये जास्त पाणी साठवून देऊ नये .जास्त पाणी झाल्यास पाणी बाहेर काढून द्यावे. रोपवाटिकेत खोडकिडा, खेकडे यांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दाणेदार फोरेट, दहा टक्के, किंवा दाणेदार क्लोरोपायरीफॉस दहा टक्के, प्रती हेक्टरी दहा किलो या प्रमाणात शेतात द्यावे.
रोपवाटिकेत रोपांना करपा, कडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कारबेनडिझीम किंवा हेक्झांकोण्याझोल यासारखे बुरशीनाशक दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात ,मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
मिसाळवाडी आदिवासी पाडा, चिवेवाडी पाडा या ठिकाणी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भाताची रोपे चांगली उगवून आली आहेत.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
इंद्रायणी या तांदळास सरासरी साठ रुपये प्रति किलो भाव मिळत असल्यामुळे या परिसरामध्ये इंद्रायणी या भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
"कृषी विभाग शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेतकऱ्यांनी शासनाच्या आंबा, नारळ, सिताफळ या फळझाड लागवडी सोबतच बांबू लागवड योजनेचाही लाभ घ्यावा." अशी प्रतिक्रिया कृषी पर्यवेक्षक संदीप कदम यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"महाडीबीटी योजनेमधून यांत्रिकीकरण व इतर योजनांचे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज ऑनलाईन करावेत आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा." असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी केले.
"पिकामध्ये रोपांची नियंत्रित लागवड करावी व युरिया ब्रिगेड या खताचा वापर करावा." अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी अनिल धुरगुडे यांनी दिली.
"आत्ता रोपे दहा ते बारा दिवसाची झाली असून ,अजून दहा ते पंधरा दिवसांनी लावणीस योग्य होतील." असे कलिका अंकुश मिसाळ यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत एकात्मिक गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत , नॅशनल सीड कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे ,सूर्यफूल KBSH -८५ या वाणाचे बियाणे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच श्री. नारायण धोंडीबा पवार , माजी सरपंच श्री.अनिल श्रीरंग रांजणे, उद्धव दिवाणजी दरेकर, बाळासो धोंडीबा पवार, ईश्वर झुका दरेकर, अनंता साहेबराव नाईलकर, गणेश मिसाळ, कलिका अंकुश मिसाळ व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
पुरंदर तालुक्यातील आदिवासी पाड्यावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, शेतकरी हिताच्या वेगवेगळी योजनांची माहिती देणे. या उपक्रमाविषयी शेतकऱ्यांकडून पुरंदर कृषी विभागाचे कौतुक केले जात आहे.