Saturday, January 15, 2022

"पुरंदर - हवेलीच्या विकासाच्या ध्यासाने कार्यमग्न असणारे, कुटुंबवत्सल आमदार श्री संजयजी जगताप" - पुरंदर काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार, पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष विजय कदम यांचा पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख...

 


"पुरंदर - हवेलीच्या विकासाच्या ध्यासाने कार्यमग्न असणारे, कुटुंबवत्सल आमदार – श्री.संजयजी जगताप" 


पुरंदर म्हणजे ऐतिहासिक,शौर्याची,संतांची पवित्र वारसा लाभलेली भूमी आहे.याच भूमीमध्ये अनेक महान व्यक्ती जन्मल्या,वाढल्या,घडल्या, मोठ्या झाल्या आणि आपल्या कर्तुत्वाने त्यांनी या भूमीचे नाव मोठे केले.त्यापैकी सासवड नगरीचे शिल्पकार,शिक्षणप्रेमी,सहकार महर्षी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष स्वर्गीय ना.चंदुकाका जगताप होय. 



अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवित असणारे त्यांचेच सुपुत्र पुरंदरमधील युवकांचे आशास्थान, मार्गदर्शक, लहानथोरांचा आदर्श म्हणजे पुरंदर-हवेलीचे आमदार संजयजी चंदुकाका जगताप होय. पुरंदरच्या भूमीला मिळालेले एक अतुलनीय व्यक्तिमत्व आहे.





“पुरंदर-हवेलीचा विकास हाच ध्यास”  या ब्रीद वाक्याप्रमाणे आमदार संजयजी जगताप अहोरात्र झटत आहेत. अगदी तळागाळातील माणूस सुद्धा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अवाक होत आहे. 




हा सगळा व्याप सांभाळत असताना आमदार संजयजी जगताप हे आपल्या कुटुंबाप्रती कोणता अन्याय होणार नाही, याची सुद्धा दखल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना दिसत आहेत. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


आपल्या कुटुंबाविषयी सांगताना ते नेहमी सांगतात की, माझी आई सासवड नगरीच्या मा.  नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व सौभाग्यवती राजवर्धिनीताई जगताप,चिरंजीव समरादित्य,थोरले बंधू व आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेत कामाने पुरंदरच्या नावाचा लौकिक वाढवणारे डॉ.श्री.राजेंद्र जगताप साहेब यांच्या सुविदय पत्नी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप व दोन्ही विवाहित बहीण एवढ्यापुरतेच माझे कुटुंब नसून माझ्या सर्व संस्थातील कर्मचारी वर्ग आणि पुरंदर-हवेलीचा प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातील आहेत.




मी या कुटुंबाचा प्रमुख किंवा घटक म्हणून काम करत असताना मला जरी कोणाच्या सुखातच नव्हे तर दुःखात मात्र मी त्या व्यक्तीच्या मागे नाही तर बरोबर असेल.  आणि याच भावनेतून आमदार कुटुंबातील व्यक्तीचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी,निरोगी आरोग्यासाठी सतत कार्यशील असल्याचे जाणवते.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


युवकांना रोजगार मिळावा तसेच जागतिकीकरण आणि संगणक युगात अमुलाग्र बदल होत असताना अशा स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दुग्धजन्य संस्था काढून त्या टिकवणे, वाढवणे यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारे, क्षमतेला महत्त्व देऊन घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणारे आमदार मा.संजयजी जगताप हे सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील द्रष्टे युवक आहेत. गुणवत्तेला प्राधान्य देत जे चांगले ते चांगले म्हणणाऱ्या स्पष्ट भूमिकेच्या या युवा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सर्व सहकारी, शैक्षणिक, दुग्ध संस्था प्रगतिपथावर आहेत.




शेतकरी,व्यापारी, बेरोजगार युवक अशा सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन पुण्यनगरीचा आर्थिक विश्वास संपादन करून श्री.संत सोपानकाका सहकारी बँकेची स्थापना केली.आणि आज ५०० कोटी ठेवीचा टप्पा पार करत खऱ्या अर्थाने पुरंदरची व पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी झाली. 




बँकेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना नोकरी, बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला.पुरंदरमधील शेतकरी कष्टाळू आहे,परंतु घाम गाळून तयार केलेल्या शेतमालाला त्यामध्ये फळे,पालेभाजी, फुले यांना बाजारामध्ये मिळणाऱ्या किमतीची अनिश्चितता यासाठी व शेतकरी माल खराब होईल या भितीने कवडीमोल भावाने विक्री करत आहे, हे पाहून संवेदनशील मनाच्या संजयजी जगताप यांनी भव्य असे कोल्ड स्टोअरेज खळद येथे उभे केले आहे, आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची सुरक्षितता मिळवून दिली.




पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून मा.संजयजी जगताप यांनी पुरंदर मिल्क अँन्ड ॲग्रोची स्थापना केली, आणि शेतकऱ्यांची संस्था स्थापनेपूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये होणारी फसवणुकीपासून सुटका केली. 




आज जवळपास ७० च्या आसपास दूध संकलन केंद्र निर्माण करून बेरोजगार युवकांना नोकरीची संधी निर्माण करून शेतकऱ्यांसाठी धवलक्रांती घडविली.



शेतकऱ्यांचा गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे, स्पर्धेच्या युगात त्यांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने स्व.नामदार चंदुकाका जगताप यांनी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना केली.




 आज त्या संस्थेच्या सचिवपदाची धुरा संजय सर अतिशय लिलया पेलताना दिसतात. “ शील घडविते तेच खरे शिक्षण ” या संस्थेच्या बोध वाक्याप्रमाणे आचार-विचार सुसंस्काराने प्रत्येक विद्यार्थी हा परिपूर्ण असला पाहिजे या उदात्त  हेतूने ग्रामीण भागात, डोंगरी दुर्गम परिसरात विद्येचे नंदनवन फुलविले. आज संस्थेच्या अनेक विद्यालयाचे निकाल १०० टक्के लागत आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


पुरंदरचे वैभव असलेले परंतु अलीकडच्या काळात लोप पावत चाललेल्या कुस्ती या मर्दानी खेळास पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, आजची पिढी निरोगी, निर्व्यसनी, बलवान व्हावी यासाठी शिवाजी व्यायाम मंदिराची स्थापना करून अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करून या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पुरंदर कुस्ती, पुरंदर केसरी अशा विविध स्पर्धा आयोजित करून या खेळास सन्मान प्राप्त करून दिला. 




पुरंदरमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्यिक वारसा जतन व्हावा त्याची महती व माहिती तरुण पिढीला समजावी, लोप पावत चाललेल्या दुर्मिळ कलाकृतींचे, ऐतिहासिक वस्तूंचे जतन व्हावे यासाठी सासवड सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली.



सामाजिक कार्य व व्यवसाय करत असताना संजय सरांनी अध्यात्म आणि समाजसेवा यांचा सुंदर मेळ घालत समाजातील गोरगरीब लोकांना मग तो कोणत्याही धर्मातील असो पुरुष, महिला त्यांना कावड यात्रा, अजमेर यात्रा या माध्यमातून बारा ज्योतिर्लिंग यात्रा केल्या, व पुरंदरच्या जनतेच्या मनात श्रावण बाळ म्हणून स्थान मिळविले.या सर्व परिपक्व गुणामुळे त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना लहान वयात पुणे जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.




सासवड नगरपालिकेला मार्गदर्शन करून देशात स्वच्छतेच्या बाबतीत नावलौकिक मिळवून दिला.संपूर्ण जग कोरोना काळात भयग्रस्त असताना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून या पती-पत्नी यांनी तालुक्यातीलच नव्हे तर येणारा प्रत्येक कोरोना ग्रस्त रुग्ण यांना आधार देत खळद येथे उभारलेल्या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचे काम केले.




तालुक्यातील बहिरवाडी सारख्या गावाचे १०० टक्के लसीकरण करून देशात पहिला क्रमांक मिळविला.अशा सगळ्या व्यस्त व्यापातून आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस असो, दसरा-दिवाळी, गणेशोत्सव असे पारंपारिक सण साजरे करत आपली संस्कृती जपण्याचे काम आनंदाने करताना दिसतात.




 “ जे आहे ते समाजाचे नि जे करायचे ते समाजासाठीच ” या समर्पित भावनेने आपल्या पित्याप्रमाणे या युवा नेतृत्वाने मार्गक्रमण केले आहे. त्यांच्या सर्व कार्यात त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी, ज्येष्ठ बंधू श्री.राजेंद्रजी जगताप (भा.प्र.से.), सुविद्य पत्नी सौ.राजवर्धिनीताई जगताप हे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


वर्तमानाकडून भविष्याकडे झेपावणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला सर्वगुणसंपन्न,आधुनिकतेचे भान असणाऱ्या व आपल्या कर्तृत्वामुळे तालुक्याच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या युवक नेत्यास दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना.


लेखक : - पुरंदरचे काँग्रेसचे निष्ठावंत शिलेदार, पुणे जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विजय कदम.




"तरुणाईचे प्रेरणास्थान,एक आधारवड, लोकप्रिय आमदार  संजयजी चंदुकाका जगताप" - सासवड नगरपरिषदेचे मा. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांचा पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख....

 


"तरुणाईचे प्रेरणास्थान, एक आधारवड, लोकप्रिय आमदार  संजयजी चंदुकाका जगताप"...


ज्या पायांना आधीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत थकत नाहीत. गेल्या चार दशकांपासून सासवड आणि चंदुकाका जगताप एक समीकरण झाले आहे. सासवडचा माणूस राज्यात कुठेही गेला आणि सांगितले  की मी सासवडचा आहे तर समोरील जाणकार मनूष्य चंदुकाकांच्या गावचा का? असे लगेच म्हणतो. 


काकांचे व्यक्तिमत्त्वही तसेच त्यांच्या नावाला शोभणारे व नावही असे की त्यातच एक आदरयुक्त दबदबा त्यांनी स्वकर्तृत्वाने,जनतेसाठी केलेल्या प्रामाणिक कार्यातून निर्माण केलेली विकासपुरुष, लोकनेत्याची प्रतिमा.



सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, त्यांना वेळोवेळी हरप्रकारे मदत करणे, वडीलकिच्या नात्याने लक्ष ठेवणे अशी अनेक स्वभाव वैशिष्टये त्यांच्या अंगी दिसत होती . बाहेरगावच्या लोकांच्या मनात काकांविषयी एवढी आपुलकी होती तर सासवडकरांसह पुरंदर मधील असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काका सर्वसामान्य लोकांसाठी एक आधारवडच होते. आमदार संजय जगताप यांना संघर्षाचे बाळकडू वडिलांकडून व संस्काराची शिदोरी आईकडून मिळाली. 


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत ... काकांच्या मागे आता संजय सरच सर्वसामान्य नागरिकांना साठी आधारवड ठरत आहेत. मा.राजेंद्रबापू जगताप, IAS अधिकारी,  वडिलांनंतर मोठ्या भावासारखा दुसरा बापमाणूस  जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे नाते नेहमीच अतूट असते. सासवडच्या विकासामध्ये त्यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभते.




सासवड शहराच्या जडणघडणीत काकांचा फार मोठा वाटा आहे, त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या म्हणजे १९८५ ते १९९२ आणि २००२ ते २००७ या काळात त्यांनी सासवडचा नियोजनबद्ध विकास केला त्यामुळेच सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून नावारूपास आले. शहराचा सर्वांगीण विकास करताना मात्र काकांनी सासवडचे गावपण देखिल अलगद जपले हे विशेष आहे. सासवडसाठी वीर धरणातून केलेली महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेची, तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेतली गेली. 



आताही काकांच्या शिकवणी प्रमाणे आणि गटनेत्या आनंदीकाकी जगताप व आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिका गावपण जपत विकासकामे करीत आहे. काकांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपरिषदेने राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात सातत्याने राज्यात प्रथम क्रमांक ठेवला. 




आताही आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेत केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात २०१८, २०१९, २०२० आणि २०२१ मध्येही सासवड नगरपालिका देशात अव्वल राहिली आहे आणि यातून शहराच्या विकासासाठी भरघोस निधी मिळवित आहे. याप्रमाणेच जेजुरी नगरपालिकाही संजय सरांच्या मार्गदर्शनाखाली देशात नावलौकिक प्राप्त करीत आहे. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


ज्याप्रमाणे काकांचा सर्वत्र एक आदरयुक्त दरारा पहायला मिळायचा, त्याचप्रमाणे संजयसरांचाही आदरयुक्त दरारा पहायला मिळतो. आपल्या आयुष्यात कोणतेही कठीण काम करण्यासाठी आपल्या सर्वांनाच काही प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असे बर्याचदा घडते जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटते तेव्हा आपण ते काम करू शकत नाही असे आपल्याला वाटते. 




अशा परिस्थितीत आमदार नेहमी सगळ्यांना प्रेरणा व  विचारांना प्रोत्साहन देतात. सरांच्या नजरेतून कोणतीही चुक सहसा सुटत नाही हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पालिकेच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेणे, शासनाच्या योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे प्रस्ताव दिले आहेत का, त्यात काही त्रुटी आहेत का, त्यांची पुर्तता केली आहे का आदिंची विचारपूस करतात. आमदार फंडातूनही शहराच्या विकासासाठी सरांची भरीव मदत होते. 




विविध योजना राबविताना त्याबाबत संबंधित विभागाचे वरीष्ठ अधिकारी, गरज पडल्यास त्या विभागाच्या मंत्रीमहोदयांची स्वतः जाऊन भेट घेणे, पाठपुरावा करून शासनाचा निधी मंजूर करून घेऊन हा पैसा शहराच्या विकासासाठी वापरणे अशी काकां प्रमाणेच संजय सरांच्या कामाची पद्धत आहे. नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा न देता अशाप्रकारे शासनाच्या प्रत्येक योजनेतून ते सासवडसाठी निधी मिळवित आहेत. 





सन २००२ मध्ये चंदुकाका जनतेतून थेट आणि विक्रमी मतांनी निवडून येऊन नगराध्यक्ष झाले. २००२ ते २००७ याकाळात वीरची पाणी पुरवठा योजना, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, साळी आळीतिल शॉपिंग सेंटर, शिवसृष्टी, पालखी तळ परिसर विकास, संत सोपानकाका मंदिर परिसर विकास, रस्ते, दुभाजक या आणि यासारखी अनेक महत्वाची कामे या काळात झाली. 




ही कामे होत असताना काकांचा फार मोठा पाठपुरावा आणि लक्ष होते. काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द व विचारांवर असणारा विश्वास त्यांना घडवत गेला. आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भूयारी गटार योजना, घरगुती गॅस लाईन, अतिरिक्त पाणी साठवण टाक्या, अंतर्गत डांबरी रस्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सुरू असलेले अभ्यासिकेचे काम आदी अनेक कामांना संजय सरांकडून आधुनिकतेची जोड मिळत असल्याचे पहायला मिळाले. 




संकटं हि त्या व्यक्तीमधील  शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.आमदार झाल्यानंतर काही दिवसातच कोरोना महामारीचे संकट उभे राहिले. संपूर्ण जगाला या अदृष्य विषाणूने वेठीस धरले.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


परंतु पुरंदरच्या मातीत जन्मलेल्या या सुपुत्राने महापराक्रमी सरदार श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांच्या शौर्याचा वारसा जपत आधुनिक लढाई उभी केली. दोन वर्षे कोविड 19 या महामारीत पुरंदर हवेलीच्या जनतेसोबत कणखरपणे उभे राहून सर्वसामान्य जनतेसाठी मोफत कोविड सेन्टर उभे केले . 




पुरंदर हवेलीच्या महिलांसाठी मोफत जनधन आरोग्य कार्ड सुविधेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत औषध उपचार  उपलब्ध करून दिला .कोरोना महामारीमुळे लोकांची कामधंदे, उद्योग, व्यवसाय बंद झाले .काही दिवसातच आर्थिक दृष्ट्या स्थिर स्थावर मंडळीही अडचणीत येऊ लागली तर सर्व सामान्य आणि हातावर पोट असणाऱ्या मजूर , लहान व्यवसायिक लोकांवर तर उपासमारीची वेळ आली .




या संकटसमयी पुरंदर - हवेली हे आपले जणू कुटुंबच त्याप्रमाणे आमदार संजयजी जगताप धावून आले .आपले कुटूंब अडचणीत पाहून संजय सरांच्या सुविद्य पत्नी सौ राजवर्धिनीताई मागे राहतील कश्या ? राजवर्धिनीताईंच्या सेवाभावी ग्रामीण संस्थे मार्फत संपूर्ण तालुक्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी आनंदी थाळी सुरू केली .




आनंदी थाळी मार्फत पुरंदर हवेलीतील हजारो कुटूंबाला मोफत दोन वेळचे सकस जेवण आणि दूध घरपोच दिले. तसेच हजारो कुटूंबाला किराणा किट त्याच बरोबर वैद्यकीय मदत म्हणून मास्क , सॅनिटीझर , आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्या घरपोच पुरविल्या .




पुरंदर तालुक्यातील माजी राजकारणी विषाणूजन्य दिवसात घरात बसून राहिली परंतु आमदार संजय जगताप संपूर्ण तालुका , गाव, वस्ती अगदी प्रत्येकाची काळजी घेत. सर्वांसाठी सदैव उभे राहिले.




स्वखर्चाने लसीकरण सुविधा उपलब्ध केली. पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम बहिरवाडी या गावाचे संपूर्ण लसीकरण आमदार संजय सर आणि सौ राजवर्धिनी जगताप यांनी स्वतः प्रत्यक्षात जाऊन  100 % लसीकरण करून घेतले .


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


मला अभिमान वाटतो की माझ्या नेत्याने देशात पहिले बहिरवाडी गाव 100% लसीकरण केलं . आमदारांनी नुकतेच महाराष्टातील पहिले वाहिले सहकारी तत्त्वावरील आनंदी मल्टीस्पेशालिटी को-ऑप.हॉस्पिटलची स्थापना केली.




या हॉस्पिटलच्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या जनतेसाठी लवकरच चांगल्या प्रतीच्या आरोग्य सुविधा वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. 




असे अनेक लोकहिताचे निर्णय आणि त्यासोबत लोकहिताची कामे संजय सर सतत करत आहेत . 




समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांना विविध ठिकाणी काम करण्यासाठी आमदार संजय सरांकडून संधी मिळते.




माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक  म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी भेटलेली माणसे.   त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप विश्वासू आणि एकनिष्ठ माणसं मिळाली व ती त्यांनी जपली. अशा हा कल्पक, कार्यकुशल, अभ्यासू, निगर्वी नेत्याकडे सासवडकर नागरिक एक आधारवड म्हणून पाहत आहे. आणि तेवढे स्थान काकांप्रमाणे आमदार संजय जगताप यांनी निर्माण केले आहे....!




आपल्या कर्तुत्वाची वेल जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसोंदिवस खुलणारं, प्रत्येक वर्षी, वाढदिवशी नवं क्षितीज शोधणारं. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा, उंच उंच भरारी घेऊ दे.


अशा या आम्हा तरूणांचे आशास्थान, प्रेरणास्थान असणाऱ्या पुरंदर हवेलीच्या लोकप्रिय आमदार साहेबांना दिर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा

 

लेखक : - मा. नगरसेवक सासवड नगरपरिषद, अध्यक्ष - सासवड शहर केमिस्ट-ड्रॅगिस्ट असोसिएशन, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप.




Wednesday, January 12, 2022

"ऐतिहासिक पुरंदरच्या सासवड नगरीत राजमाता जिजाऊ यांची जयंती "या" कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून; कोरोनाचे नियम पाळून,अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उत्साहात साजरी"....



पुरंदर, सासवड,दि.12 : युगपुरूष छत्रपती शिवाजीराजे यांचे महान प्रेरणास्थान, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती कोरोनाचे नियम पाळून, अखिल भारतीय मराठा महासंघ युवक शाखा पुरंदर यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून, सासवड येथील शिवतीर्थावर उत्साहात पार पडली.




यावेळी डॉ. वृषाली जगताप यांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तहसीलदार पदी नवीन नियुक्ती झालेल्या सौ पूनम शिंदे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशीप 2021 मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सौ. सायली जगताप यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. 




शिक्षक संघटनेच्या सभापती सौ. वैजंता कुंजीर  आणि फडतरे मॅडम यांचा सन्मानही या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आला.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 



 "शहाजी राजांची स्वराज्याची  संकल्पना उराशी बाळगून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या  छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, ज्यांनी स्वराज्याचे रक्षण केले अशा छत्रपती संभाजी महाराजांवर संस्कार केले. अशा थोर जिजाऊसाहेबांना विनम्र अभिवादन करते. राजे पुन्हा या.. म्हणणे सोपे आहे. परंतु त्यासाठी आधी जिजाऊंना जन्म घ्यावा लागेल." असे मनोगत पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डाॅ.वृषाली जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.




 "छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या महान इतिहासातून  आमच्यासारख्या खेळाडूंना खूप प्रेरणा मिळते तसेच धाडसीपणा, साहसी वृत्ती  वाढते, चांगली कामगिरी करण्यासाठी बळ मिळते." अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक पटकावणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू सायली जगताप यांनी दिली.




यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ चे तालुका अध्यक्ष गणेशजी मुळीक, उपाध्यक्ष रामभाऊ बोरकर ,तालुका सचिव संजय पापळ ,युवक तालुका अध्यक्ष स्वप्निल गायकवाड ,उपाध्यक्ष विवेक तळेकर, सासवड शहर अध्यक्ष संदीप जगताप, सामाजिक कार्यकर्ते नंदुबापू जगताप, उपाध्यक्ष दिपक आप्पा जगताप, चिन्मय कुंजीर, सलील महाराज व  कार्यकर्ते उपस्थित होते.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now