Saturday, October 14, 2023

"जालन्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या लाखो लोकांची विक्रमी, अतिविराट सभा; मराठ्यांचा लाखोंचा जनसागर, "या" आहेत प्रमुख सहा मागण्या; मराठा आरक्षणाचा एल्गार; 'एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल' - मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा"..


जालना, दि.१४ : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजाची लाखो लोकांच्या उपस्थितीत, मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गाराने विक्रमी अशी अति विराट सभा संपन्न झाली.




"एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल." असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत सरकारला दिला.




आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली व मोठा जनसागर उपस्थित होता.  सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले. त्यांचं भाषण सुरु झालं. "महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत."


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे." असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 




तसंच आता मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या या सभेत सरकारकडे केल्या आहेत.




मनोज जरांगें पाटील यांच्या प्रमुख मागण्या :


१)महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.


२)कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी.


३)मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबियांना सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


४)दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.


५)सारथी संस्थेमार्फत पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.


६)महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे.




"आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा करायची आहे म्हणून आपण इथे सगळे जमलो आहोत. आज मराठा समाजासाठीचा सुवर्णक्षण आला आहे. या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाला आहे. घराघरांतला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणार आहे की मी माझ्या नातवासाठी, मुलासाठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो आहे. आरक्षणासाठी मराठा पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात १० दिवस आहेत. आज जो जनसमुदाय आंतरवालीत आला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करा."




"मराठा समाजाने जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 




मनोज जरांगे पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळी येत आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरु केलं.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आज लाखाने मराठा समुदाय आंतरवाली येथे उसळलाय. त्याचं एकच म्हणणं की राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजाने जो शब्द दिलाय त्या शब्दावर समाज ठाम आहे. 40 दिवस दिले, यात आम्ही एक शब्दही सरकारला विचारणार नाही, असा शब्द दिला होता. 




या काळात एक शब्द विचारला नाही. तुमच्याकडे अजून दहा दिवस आहेत. या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40 व्या दिवशी सांगू."असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.


‘मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार आहे. मराठ्यांची औलाद दिलेला शब्द मोडत नाही. मराठा समाज शांततेत आल्याचं पोलिसांनी बघितलंय. पोलीसच मला सांगतात, की मराठ्यांना मानावं लागेल की ते शांततेत आले, असं ते म्हणाले.’ 




मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, की ‘थोडी गैरसोय झाली आहे पण थोडं सहन करा. आपल्या लेकरांना, पुढच्या पिढ्यांना सुखात बघायचं असेल तर हा संघर्ष केल्याशिवाय आणि सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण मागे हटायचं नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटील इंचभरही मागे हटणार नाही’.




त्यांनी सरकारला विनंती करत म्हटलं, की ‘मराठा समाजासाठी गठित केलेली समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5 हजार पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्याचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि समाजाचा ओबीसीत समावेश करा. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करून सांगतो. या राज्यातला सगळ्यात मोठा मराठा समाज, या समाजाची विनाकारण हालआपेष्टा करू नका."




"या गोरगरिब समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घेऊन, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीत समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.




महाराष्ट्र राज्यसरकारने व केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न गांभीर्याने घेऊन तो लवकर सोडवणे अत्यंत गरजेचे आहे.

Tuesday, October 10, 2023

"महाराष्ट्रात गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणारी "ही"नव्या स्वरूपातील 'लेक लाडकी योजना' राज्य सरकार राबविणार; मुलीच्या जन्मानंतर १ लाख १ हजार रुपयांचा "असा" मिळणार लाभ" वाचा सविस्तर "या" योजनेच्या पात्रता, अटी व लाभ"...


मुंबई, दि. १० : महाराष्ट्रात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



लेक माझी लाडकी योजनेचा लाभ,वैशिष्ट्ये : -

१)पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये मिळणार.

२)इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये मिळणार.

३)सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये मिळणार.

४)१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.



या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.  माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.



लेक माझी लाडकी योजनेच्या अटी, पात्रता निकष : -

१)१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  

२)दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.  

३)१ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.  

४)जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.


राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणांत उपमुख्यमंत्री तत्कालीन वित्त मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ‘लेक लाडकी योजने’ मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते.महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यःस्थितीत सुधारित "माझी कन्या भाग्यश्री" ही योजना दि.१ ऑगस्ट २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेत दरवर्षी सुमारे ५००० लाभार्थी पात्र ठरत होते. त्याकरिता वार्षिक सुमारे १२ कोटी एवढा खर्च येत होता.आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात 'लेक लाडकी योजना’ राबविण्यात येणार आहे.


शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम  लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फ़त करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता तसेच योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. 


त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व तदनुषंगिक प्रशासकीय खर्च भागविण्याकरिता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Tuesday, October 3, 2023

"महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले; अखेर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा "असा" असेल निवडणूक कार्यक्रम,"या" तारखेला मतदान व या तारखेपासून आचारसंहिता लागु"


मुंबई, दि. 3 : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज  केली.




श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम  : -


1)नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. 


2)नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. 




3)नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 


4)5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 


5)मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 




तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

Tuesday, September 26, 2023

"आजी - आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचा बंध समृद्ध करणारा "हा" खास आगळा वेगळा 'आजी - आजोबा दिन' पुरंदरच्या, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे उत्साहात संपन्न"


पुरंदर, वीर, दि.२६ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील,  तीर्थक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराज  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर नेहमीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते.



आजी आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचे नाते समृद्ध करणारा "आजी - आजोबा दिन" जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर येथे सोमवारी अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.




आजी - आजोबा व नातवंडांमधील बंध अधिक घट्ट होण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीर मधील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांवर फुले उधळून त्यांचे स्वागत केले. आजी आजोबांच्या चरणांवर फुले वाहून व त्यांना औक्षण करून आजी-आजोबांप्रती आपले प्रेम व्यक्त केले.




शाळेने आजी-आजोबांसाठी संगीत खुर्ची व फुगे उडवणे या मनोरंजक खेळाचे आयोजन केले. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आजी - आजोबांनी देखील या मनोरंजक खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन  या खेळाचा आनंद लुटला.




या कार्यक्रमामध्ये माधवी धुमाळ, शोभा धसाडे, विमल मोरे या आजींनी आपले मनोगत व्यक्त केले.




या आगळ्यावेगळ्या "आजी - आजोबा दिन" कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका मस्के यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी मर्ढेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी केले.



"विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी आमच्या शाळेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो." अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वीरचे मुख्याध्यापक संजय कुंजीर यांनी दिली.


आजी - आजोबा व नातवंडांमधील प्रेमाचा बंध फुलवणारे, समृद्ध करणारे असे दिन साजरे होणे  गरजेचे आहेत.


Friday, September 22, 2023

"पुण्यातील "या" गणेशोत्सव मंडळाचा नादच खुळा; बाप्पाला पुस्तकांचा नैवद्य व बालचमुंसाठी विज्ञान प्रदर्शन या आदर्श उपक्रमांमुळे जिंकली पुणेकरांची मने"...


पुणे, दि.२२ : पुण्यातील  अरण्येश्वर नगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळाने "बाप्पाला पुस्तकांचा नैवेद्य व अनोखे विज्ञान प्रदर्शन" या आदर्श उपक्रमांमुळे गणेश भक्तांची व पुणेकरांची मने जिंकली.




श्री गणेशा विद्येची देवता आणि पुस्तके हे विद्येचे, ज्ञानाचे माध्यम आहे. पुस्तके छोटी असली तरी संपूर्ण जग त्यात सामावलेले असते. अशी ही पुस्तके आपली ज्ञानाची भूक भागवतात. गणेशोत्सव मंडळे नेहमीच अनेकदा अन्नकोट करत असतात. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


पण यावेळी व गेली अनेक वर्षे जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या वतीने हीच ज्ञानाची भूक भागवण्यासाठी "पुस्तककोट" उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.




याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे पर्वती विभागातून  एकता मित्र मंडळाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि अनेक स्थानिक नागरिकांना या उपक्रमात सहभागी होत, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या विषयांची, गोष्टींची, सामान्य ज्ञानाची पुस्तके एकता मित्र मंडळाच्या लाडक्या बाप्पाला पुस्तकांचा नैवद्य म्हणून अर्पण केली.




स्थानिक मा. नगरसेविका अश्विनी नितीन कदम व सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांनी वेगवेगळ्या विषयावरील ३०० पुस्तके, यशातारा सोसायटीमधील अनंतकाका वाघ १०० पुस्तके, अशोक बाणखेले, धमेंद्र बानगुडे, शिवाजी अमराळे, अविनाश खंडागळे, महादेव ढमाले, शेखर मिरघे, मस्जिद शेख, अनिल ढमाले, मंगेश भुजबळ, अमोल जाधव, 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


ऋषिकेश पांढरकामे, सुधीर ढमाले, विनायक इंगवले, जयेश ढमाले, हिरेन गायकवाड, शुभम बाणखेले, योगेश मांढरे, संकेत मिरघे, गणेश खाडे, सनी तिवाटणे, आशुतोष अमराळे, दुर्वांकुर ढमाले, आदित्य मिरघे, चैतन्य ढमाले, यश चावट, केशव अमराळे, संकेत आढाव, मानव बाणखेले, आदर्श चावट, प्रथमेश शिंदे,  दर्शन खंडागळे, हर्षद खंडागळे, हेरंब ढमाले, आदिनाथ नाईक, सोमनाथ नाईक, तेजस पवार या सर्वांनी पुस्तके अर्पण करून बाप्पाला नैवद्य अर्पण केला.



एकता मित्र मंडळ व ज्ञान प्रबोधिनी यांच्या माध्यमातून  गुरुवारी  सायं ७:०० ते ९:०० या वेळेमध्ये "विज्ञान प्रदर्शन" (उष्णता आणि इलेक्ट्रॉन व विविध विषयांवर ४०-५० प्रयोग व प्रकल्पांसह) आयोजित करण्यात आले होते. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत उपलब्ध सर्व प्रयोगांविषयी सखोल माहिती व प्रश्न विचारत प्रदर्शनकर्त्या सर्व युवकांचे कौतुक केले.




विशेष म्हणजे लहान मुला मुलींनी मोठ्या संख्येने आवडीने पूर्णपणे विज्ञानाची सफर केली. यावेळी पुणे मनपाचे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. नरेंद्र व्यवहारे यांनीही या प्रदर्शनाला भेट देत, "असे स्तुत्य उपक्रम गणेशोत्सवात होत आहेत आणि हे समाजासाठी आवश्यक आहेत... हे नाविन्यपूर्ण कार्य आहे." असे म्हणत एकता मंडळाचे व ज्ञान प्रबोधिनीचे मनभरून कौतुक केले.




 जय गणेश व्यासपीठासोबत संलग्न असलेली वेगवेगळ्या भागातील अनेक मंडळे एकाच दिवशी बाप्पांच्या चरणी पुस्तककोट करत असतात आणि त्यानंतर बाप्पाचा आशीर्वाद व नैवद्य म्हणून या पुस्तकांचे गरजू, वंचित, शहर, ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांमध्ये वाटप करण्यात येणार आहे आणि तसेच श्रींची आरती झाल्यावर मंडळातील स्थानिक सर्व लहान मुलांना बाप्पाचा नैवद्य म्हणून पुस्तके वाटण्यात आली.


"एकता मित्र मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून पुणेकरांची  सेवा करत असते.  यावर्षीही आमचे मंडळ शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.  कृपया आमच्या मंडळाच्या श्रींच्या दर्शनाला येताना हार व फुले सोबत आणण्यापेक्षा एक वही व पेन बाप्पांच्या चरणी अर्पण करावे. सदर  शैक्षणिक वस्तू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य पोहचविण्यात येतील." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर ढमाले  यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुण्यातील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून नेहमीच  लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षीच्या मंडळाच्या  शैक्षणिक उपक्रमाचे व आगळ्यावेगळ्या "शैक्षणिक  उपक्रमरुपी नैवेद्याचे"  पुणेकरांनी कौतुक केलेले आहे.