"माझ्या देशातील जनता गरीब असताना मला ऐषआरामात राहण्याचा काय अधिकार?" निगर्वी व निस्वार्थी शास्त्रीजी...
भारताचा राजकीय इतिहास 'जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक कार्य करून' समृद्ध करणारे भारताचे लोकप्रिय नेते लालबहादूर शास्त्री यांचे जीवनकार्य देशातील सर्व लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे. एकदा त्यांना विचारले," आपण बूट,मोजे का वापरत नाही ?" शास्त्रीजी म्हणाले," माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. माझे कुटुंब मोठे आहे.सर्वांचा खर्च भागविणे आवश्यक आहे.आणि मी जर चैनीने राहू लागलो तर माझ्या कुटुंबाचा खर्च कसा भागणार? माझ्या देशातील जनता गरीब असताना मला ऐषआरामात राहण्याचा काय अधिकार ?"
आपल्या देशातील सामान्य जनतेच्या हिताची काळजी करणारे,चारित्र्यवान,निस्वार्थी,साधी राहणी उच्च विचारसरणी जपणारे ,कणवाळू परंतु प्रसंगी कठोर होणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्री यांची आज जयंती.त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांनी दाखविलेल्या वाटेवर चालण्याचा निश्चिय करुया.
Flipkart...Best Offer... The BIG BILLION DAYS... Upto 80% Off Across Categories.. Limited Time Deal! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
स्वार्थाने भरलेल्या आजच्या या काळात देशाला शास्त्रीजींच्या विचारांची नितांत गरज आहे.निरपेक्ष भावनेने जनसेवेचे व्रत घेतलेल्या लालबहादूर शास्त्रीजींनी आपले आयुष्य लोकांसाठी व्यतित केले.
पंतप्रधान म्हणून जबाबदारी पार पाडताना संपूर्ण देशाने त्यांची निर्णयक्षमता आणि कणखरता अनुभवली आहे. आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा एक महान नेता म्हणून त्यांना देशाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.
२ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशातील मोगलसराई या छोट्याशा गावात शास्त्रीजींचा जन्म झाला.आई रामदुलारी देवी आणि वडील शारदाप्रसाद.छोटे लाल अवघे दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे अचानक निधन झाले.कुटुंबावर प्रचंड मोठा आघात झाला.आई रामदुलारी यांच्या वडीलांनी म्हणजे आजोबांनी त्यांना आपल्या घरी आणून त्यांचा सांभाळ केला.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
बालपणापासूनच शास्त्रीजी शाळेत हुशार होते.आई आणि आजोबांनी केलेल्या संस्कारातून शास्त्रीजी घडले.पुढे याच शास्त्रीजींनी देशाला घडविण्यात मोलाची कामगिरी बजावली.
शास्त्रीजी मॕट्रिकच्या वर्गात शिकत असताना देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते.देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपणही काही तरी केले पाहिजे या विचाराने त्यांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली.
१९४२ साली इंग्रज सरकार विरूध्द झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला.त्यांना त्यावेळी तुरुंगवास झाला.तरीही भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या विचारापासून मागे हटले नाहीत.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांना अनेक पदावर काम करण्याची संधी मिळाली.शास्त्रीजी गृहमंत्री असताना रेल्वे मधून प्रवास करताना पदाचा ऐट ,रुबाब व कोणताही बडेजावपणा न दाखवता अगदी सर्वसामान्य माणसांप्रमाणे तिसऱ्या वर्गातून प्रवास करत. त्यांच्या समस्या जाणून घेत.
"पदे ही स्वतःला मिरवण्यासाठी नसतात तर लोककल्याणासाठी असतात." हा विचार त्यांनी जपला आणि त्याप्रमाणे आपले सदवर्तन ठेवले. त्यांच्या साधेपणाविषयी आजही आदराने बोलले जाते.
शास्त्रीजी सारख्या देशप्रेमाने ओतपोत भरलेल्या माणसाच्या मनात स्वार्थाला किंचतही जागा नव्हती.याबद्दल अनेक प्रसंग सांगितले जातात.सत्तेचा वापर स्वतः साठी अथवा नातेवाईकांसाठी न करणारे पंतप्रधान म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.
शास्त्रीजी रेल्वेमंत्री असताना १९५६ साली पावसाळ्यात प्रचंड पावसामुळे एक रेल्वे अपघात घडला होता.अपघातात अनेक माणसं दगावली.याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
नैतिकता ,प्रामाणिकता ,सचोटी ,निस्वार्थीपणा याचे दुसरे नाव म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.
सत्ता ही जनसामान्यांसाठी असते.त्या सत्तेतून देशातील गोरगरीब जनतेचे हित साधले गेले पाहिजे या विचाराने त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.जनहिताची कामे केले.पंतप्रधान बनून देखील त्यांच्या अंगी कोणताही अहंकार नव्हता.अत्यंत नम्रभावाने देश सेवा करुन त्यांनी लोकांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले.
आपल्या कर्तृत्वाने आणि नेतृत्वाने महान उंची गाठलेल्या भारतमातेच्या या थोर सुपुत्रास विनम्र अभिवादन !
लेखक : - आदर्श शिक्षक, 'आत्मप्रेरणा' पुस्तकाचे लेखक, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जगताप
खूपच छान मांडणी केली आहे ..मनापासून धन्यवाद सर
ReplyDeleteखूपच छान लेख आहे .
ReplyDelete