Friday, December 24, 2021

"हा शिवतारे बापू पुरंदरचा पुढचा 100% आमदार असणारय; आपल्याला ह्यांच्या बरोबरच जायचं आहे; 2007 ला कोपऱ्यात बसणारी माझ्यासारखी साधी शेकडो पोरं विजयबापू नावाच्या दैवतामुळं राजकारणात सन्मानाने वाटचाल करतायत" - पुरंदरचे निष्ठावंत शिवसैनिक सोपान राऊत यांचा 'माजी राज्यमंत्री' पुरंदरचे लोकप्रिय नेते विजयबापू शिवतारे यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख...

 


"हा शिवतारे बापू पुरंदरचा पुढचा 100% आमदार असणारय; आपल्याला ह्यांच्या बरोबरच जायचं आहे; 2007 ला कोपऱ्यात बसणारी माझ्यासारखी साधी शेकडो पोरं विजयबापू नावाच्या दैवतामुळं राजकारणात सन्मानाने वाटचाल करतायत"



साधारण साल २००८ मधील ऑगस्ट महिना चालु होता. श्रावणातील उन्ह पावसाचा खेळ चालु  असल्याने  वातावरण छान अलाहादायक  होते. त्या महिन्यात एका माघे एक येत असलेल्या सणांमुळे सर्व आनंदी आनंद होता. हयातच पवित्र " गोकुळ जन्माअष्टमीचा दिवस उजाडला. त्याच्या  दुसऱ्या दिवसी म्हणजेच ' दहिहंडीच्या' दिवशी परिंचे येथील तरुण मित्रांनी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 



त्यासाठी मोठी बक्षिसे ठेवण्यात आली होती. तसेच प्रथमताच डि .जे . साऊंड सिस्टीम हा प्रकार पाहण्यास मिळणार होता. कार्यक्रमाची जाहिरात मोठया प्रमाणात झाल्याने स्टँडचा परिसर तरुणाईने भरून गेला होता.



विविध गावची मंडळे ही  हंडी फोडण्यासाठी आली होती. मित्रांच्या बरोबर मी देखील हा जल्लोष पाहण्यासाठी गेलो होतो. थराथरक चढाओढीत " हरणी ' येथील तरुण मंडळाने ही हंडी फोडली होती. त्यानंतर बक्षीस वाटपाचा कार्यक्रम पार पडणार होता . 


व्यासपीठावर गावातील आयोजक तरुण व गाव पुढाऱ्यांच्या मधोमध एक व्यक्ती बसली होती .. पांढरा शुभ्र खादीचा हाफ शर्ट .. शुभ्र पांढरी पॅन्ट .. प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, भारदस्त व्यक्तीमत्वाचा माणुस माझ्यासह सर्वांचे लक्ष वेधुन घेत होता.



मी आमच्या मित्रांबरोबर पाठीमाघे एका कोपऱ्यात इतर चेष्टा मस्करीचे विषय काढुन उभा होतो. प्रास्ताविक व गावातील इतरांची भाषणे झाल्यावर ही भारदस्त व्यक्ती बोलण्यासाठी उभी राहिली ... उजव्या हातात माईक पकडुन आपणा सर्वांना विजय सोपानराव शिवतारेचा नमस्कार .. असे भारदस्त आवाजातील शब्द निघाले आणि मैदानात चालु असलेला गोंधळ क्षणात शांत झाला.




संयोजकांचे कौतुक करुन ह्या साहेबांनी पुरंदरच्या पवित्र मातीचा इतिहास सांगायला सुरूवात केली. हिंदवी स्वराज्याच्या स्थापने नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मोघलांविरुध्दची पहिली लढाई याच मातीतील बेलसर येथे झालेली. धर्मवीर छत्रपतींचा जन्म आपल्याच पुरंदर मध्ये.. थोर समाजसुधारक  महात्मा फुले   येथील खानवडी गावचे .. प्रसिध्द लेखक प्र.के अत्रे ह्याच भुमीतले .. रामायण ज्या वाल्मीक ऋषीनी  लिहिले त्यांची समाधी ह्याच भुमीत .. सोपानकाका , जेजुरीचा खंडोबा , वीरचा म्हस्कोबा .. भूलेश्वर मंदिर येथेच का ? पुरंदरच्या मातीतच का गोड अंजीर व सिताफळ पिकतात ?.. 




असे बरेच दाखले देत  पुणे शहरालगत असुनही पुरंदरचा रखडलेला विकास , दुष्काळी परिस्थिती , औद्योगिक क्षेत्रातील पिछेहाट ..रस्त्यांची अवस्था .. बाजुच्या बारामती तालुक्यात विकास कामांच्या बाबतीत सोन्याचा धुर निघतोय आणि पुरंदर वर अन्याय का ?? मला पुरंदरच्या उज्वल भविष्यासाठी  संघर्ष करायचाय..


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


हक्काचे  "गुंजवणीचे" पाणी पुरंदरच्या शिवारात फिरवायचे आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे ... असे सर्वांना आव्हान केले.




हे सर्व ऐकत असताना  त्या उभ्या असण्याऱ्या ठिकानीच बरोबरच्या मित्रांना सांगितले "हा शिवतारे बापु पुरंदरचा पुढचा १०० % आमदार असणार आहे .. आणि आपल्याला ह्यांच्या बरोबर जायचे आहे." ... त्यानंतर बरेच दिवस विजय शिवतारे हे व्यक्तीमत्व डोळ्यासमोरुन जात नव्हते.   आणि तेथुन पुढे चालु झाला ह्या वादळाचा झंझावात मुंबईत झालेला शिवसेना पक्षातील  प्रवेश.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


गावोगावची वाडया वस्ती वरील असंख्य दुर्लक्षित परंतु समाजासाठी काही तरी वेगळ करायचं हया ध्येयाने झपाटलेली गरीबाघरची  तरुण पोरं  " शिवसेनेत " सामील होऊ लागली. गावा गावात शाखा उघडू लागल्या. हयाचे फलित २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. भल्या भल्या राजकिय विश्लेषकांचे अंदाज मोडित काढुन  हा शेंबढ्या पोरांचा नेता महाराष्ट्राच्या  विधानसभेवर आमदार म्हणुन पोहचला होता.




अल्पावधीत आपल्या कामाची झलक , अभ्यासपुर्ण तेवढीच पक्षाला  प्रेरित असलेली आक्रमक भाषणे  सभागृहात  गाजायला लागली आणि पुरंदरच्या जनतेला पहिल्यांदाच आपला माणुस टि .व्ही वरील बातम्यात दिसु लागला.


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासु शिलेदार म्हणुन प्रसिद्धी होत गेली. मतदार संघात आता विकास कामांची गंगा वाहु लागली होती. निवडणुकीपुर्वी लोकांना माहिती नसलेले गुंजवणी धरणाचे बंद काम चालु करण्यासाठी,  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  सासवडला झालेले आमरण उपोषण, पुणे शहरात गेलेली जल दिंडी .. मुंबई येथील मोर्चा  .. हया गोष्टीने तालुका ढवळुन निघाला. परंतु त्या काळच्या  सरकारला मात्र हयाचा काही परिणाम झाला नाही.


परंतु नियतीच्या मनात वेगळच होतं. त्याच काळात संपुर्ण हिंदुस्थानात राजकीय बदलाचे वारे वाहु लागले होते. आणि त्याचा प्रत्यय आगामी २०१४  ला दिसला  देशात व महाराष्ट्रात " शिवशाही " चे सरकार आले होते .व महाराष्ट्राच्या सरकार मध्ये पुरंदरच्या " विजय बाप्पु शिवतारे या सरदाराचा " मंत्री म्हणुन राज्यभिषेक झाला होता... आणि खाते होते " जल संपदा व जलसंधारण "   





आता ख- या अर्थाने पुरंदरचा कित्येक वर्षाचा दुष्काळ हटायला सुरुवात झाली होती. ओढ्या नाल्यावर शेकडो सिमेंट बंधारे तयार होऊ लागले होते. हजारो विक्रमी  शेततळी तयार होऊ लागली.


ज्या खरबडीत रस्त्यामुळे पुरंदर मध्ये गाडी आल्याची जाणीव होत होती ते सर्व रस्ते आता गुळगुळीत व भले मोठे झाले होते. ज्या वाडी वस्ती वर कधी तरी ३ , ४ लाख रुपये आमदार फंड देऊन बोळवण केली जात होती त्या गावातील पाणी योजना, रस्ते , व्यायामशाळा इ . विकास कामांसाठी करोडो  रुपये येऊ लागले. पुरंदर मधील सर्व प्रसिध्द तिर्थक्षेत्रांना शासनाचा दर्जा मिळवुन देऊन अपुर्ण कामे चालु झाली होती.




दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मरणार मात्र नाही .. ही प्रतिज्ञा पुर्ण होत होती .. जगाच्या नकाशावर पुरंदर तालुक्याचे नाव पोहचण्यासाठी "महत्वकांक्षी " आंतरराष्ट्रीय  विमानतळ मंजुरी  मिळवली होती.



हया विकासकामाबरोबरच शेकडो गरीबाच्या लेकींचे हात पिवळे करण्याचे पवित्र कार्य बापूंच्या माध्यमातुन होत आहे. जनतेच्या सुख दुखाच्या प्रसंगी उभे राहुन आधार देणे असो .. अथवा काळ्या रात्रीस एखादयाला मदत असो सर्वांना बापूंचा चेहारा आठवतो. राजकीय बेरजेच्या वजाबाकीच्या खेळात भले बापु हारले असतील. परंतु लाखो लोकांच्या मनात मात्र  आज ही तेच " राजा " म्हणुन आहेत. 




आजही बांधावर बसलेला सामान्य शेतकरी गेलेली  लाईट चालु करण्यासाठी वायरमनच्या अगोदर बापुना हक्काने  फोन लावतो. तर माझ्या मुलीला सासरचे लोक त्रास देतायत म्हणुन गरीब मायमाऊली पोलीसांच्या अगोदर आपल्या बापुला निरोप देते. २००७ ला कोठे तरी कोपऱ्यात  बसणारी  माझ्या सारखी शेकडो साधी पोरं आज रस्त्याने येता जाता  प्रत्येकाचा नमस्कार स्विकारत आहे. आज समाजात स्वताची वेगळी ओळख निर्माण करून नेतृत्व करीत आहे. ह्या माघे फक्त हया माझ्या " विजयबापु " नावाच्या दैवताचे आर्शिवाद... आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना पांडुरंग त्यांना  उदंड आयुष्य देवोत....


लेखक : - पुरंदर मधील निष्ठावंत शिवसैनिक, माजी सरपंच परिंचे, शिवसेना पदाधिकारी सोपान राऊत.





3 comments:

  1. खूप छान लेख👌👌 पुरंदर मधील तरुणाईच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणजे विजयबापू शिवतारे.🚩🚩🚩

    ReplyDelete
  2. खुप छान काका जुने दिवस आठवले बापू बरोबर दहा बारा वर्ष मध्ये शेंबडी गावातील पोर कधी गावातील नेते झाली ही किमया फक्त बापू मुळे वाढदिवसाच्य मनापासुन हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  3. खूप छान लेखन मामा..
    अन बापूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete