"पुरंदरचा उज्वल व विकसनशील भविष्यकाळ - आमदार संजयजी चंदुकाका जगताप"
पुरंदर तालुका नव्हे तर पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातील सहकार, शिक्षण व राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे स्वर्गीय चंदुकाका जगताप होय. स्वर्गीय काका म्हणजे गेली चाळीस पन्नास वर्ष पुरंदर मध्ये सहकार, शिक्षण, क्रीडा, राजकारण अशा अनेक महत्वाच्या क्षेत्रात मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व.काकांच्या कुटुंबातील पीढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल पुरंदर तालुक्याला आहे यात नवल नाही.
मागील काही काळात काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आमदार संजयजी चंदुकाका जगताप यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन अगदी तळागाळातील सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडली. शिक्षण, सहकार, राजकारण, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात काकांच्या पावलावर पाऊल ठेवून गरुडझेप घेत आपले नेतृत्व आणि कर्तुत्व सिद्ध केले.
आपला व्यवसाय सांभाळत संपूर्ण पुरंदर-हवेली मधील जनता माझे कुटुंब आहे,या भावनेतून काम सुरू केले आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला कळून चुकले नात्यागोत्याच्या, गरीब-श्रीमंत या दरीच्या पलीकडे संजय सर आहेत अशी स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केली.
तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतील काही कळत नाही ही गृहीतक मोडीत काढून, त्यांना संजय सरांनी शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तरच शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. स्वर्गीय काकांच्याकडे शेतीविषयक अफाट ज्ञान होते याची चुणूक आमदार संजयसरांशी चर्चा करताना वारंवार जाणवते.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
नुसते स्वतःपुरते न पाहता माझ्या शेतकरी बंधूंचे शेतीतील पीक बाजारभावाच्या अभावी वाया जाऊ नये, या उदात्त हेतूने खळद येथे भव्य असे कोल्ड स्टोअरेज उभारले.
नुसत्या शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदा केला पाहिजे, यासाठी पुरंदर तालुक्यात आनंदी डेअरीच्या माध्यमातून धवलक्रांती घडवून शेतकऱ्यांना शेती बरोबर दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केले.आज आनंदी डेअरीच्या माध्यमातून अनेक शेतकरी, तरुण यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना शेतीमालाबरोबर शेतकऱ्यांना जी.एस.टी मिळत नाही त्यामुळे खत व बियाणे यावरील जी.एस.टी रद्द करावा असे अभ्यासू विधान करतानाचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
घरची परिस्थिती पाहता संजय सरांना परदेशी शिक्षण घेणे सहज शक्य होते. परंतु सासवड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. आपण ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने माझ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने काकांनी अतिशय कष्टाने उभ्या केलेल्या श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची सचिव पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या सर्व शाळातून ई-लर्निंग सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणककक्ष अशा अनेक सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, यासाठी अतोनात प्रयत्न करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
आज त्यामुळे संस्थेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, पोलीस अधिकारी, शिक्षक, देशसेवेसाठी आर्मीमध्ये अशा अनेक नामवंत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच बरोबर एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी अशा विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत.
तालुक्यातील युवक हा शिक्षणाबरोबर आरोग्याने सुद्धा सक्षम असला पाहिजे, पुरंदरच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कुस्ती क्षेत्रामध्ये इच्छा असून सुद्धा तरुणांना आपले भवितव्य घडविता येत नव्हते, तरुणांची ही अवस्था पाहून शिवाजी व्यायाम मंदिर उभे करून स्वतः खर्च करीत तरुणांना एक नवी दिशा देऊन दरवर्षी पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा भरवून कुस्ती क्षेत्रात आपले भवितव्य घडविण्यासाठी तरुणांना एक नवे दालन खुले करून दिले.
युवक,युवती, शेतकरी यांनी नोकरी,शेती बरोबर इतर व्यवसायाकडे वळावे यासाठी संजय सर कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात.नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, अशी भावना त्यामागे आहे.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
त्या सर्वांना व्यवसायासाठी भांडवल पुरंदर नागरी पतसंस्था,संत सोपानकाका सहकारी बँक, यांच्या माध्यमातून उभे करून अनेक कुटुंब संजयसरांनी उभी केली आहेत.
पुरंदर-हवेली मधील लोकांना बारा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांचे दर्शन, मुस्लिम बांधवांना हज यात्रा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा, अशा सर्व गोष्टींमुळे पुरंदरच्या जनतेने त्यांना श्रावणबाळ ही उपाधी दिली.
आमदार संजयसर ही समाजसेवा करु शकले कारण आई मा.आनंदीकाकी जगताप यांची प्रेरणा, थोरले बंधू भारतीय प्रशासन सेवेमधील अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप साहेब यांची भक्कम साथ, आमदार संजयसरांच्या पत्नी सौ. राजवर्धिनीताई जगताप यांचे सहकार्य, सर्व महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी केलेले कार्य या गोष्टी नाकारता येणार नाही.
पुरंदरचे राजकारण हे स्वर्गीय काकांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, राजकारणातून सुद्धा समाजकारण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काका होय. विविध कार्यकारी सोसायटी, सर्वसामान्य शेतकरी यांना विविध सुविधा उपलब्ध करणे, सासवड नगरपालिकेचे अध्यक्षपद,राज्य सहकार मंडळाचे अध्यक्षपद अशा अनेक पदावर काम करून काकांनी कामाचा मोठा डोंगर उभा केला.
काकांची समाजाविषयी असणारी तळमळ आणि कणव हेच गुण संजय सरांच्यामध्ये जाणवतात. दोन वेळा यशाने हुलकावणी देऊन सुद्धा आपल्या ध्येयापासून यत्किंचित न ढळता समाजसेवेचे व्रत चालू ठेवून पुरंदर-हवेलीच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत होऊन सरांनी २०१९ ची पुरंदर हवेलीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला.
पुरंदर-हवेलीच्या जनतेने एक आपला माणूस मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी विधानसभेत संजयसरांच्या रूपाने पाठविला.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
आज पुरंदर-हवेलीमध्ये अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून पुरंदरकडे पाहिले जाते, ही ओळख बदलणे, शेतीसाठी पाणी, जेजुरी एम.आय.डी.सी मधील बंद असलेल्या कंपन्या, विमानतळ, तरुणांना रोजगार, अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, वाहून गेलेले बंधारे, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय, फुरसुंगी कचरा डेपो, पालखीमार्ग, पुणे व मुंबई येथे पुरंदर वसतिगृह उभारणे असे अनेक प्रश्न आमदार संजय सरांच्या पुढे आहेत,परंतु मला खात्री आहे, आपल्या अभ्यासू स्वभावाने सर या सर्व प्रश्नांना लिलया सामोरे जाऊन पुरंदर हवेलीच्या लोकांना योग्य प्रकारे न्याय देतील.
ज्याप्रमाणे सासवडच्या जनतेने सरांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून सासवड नगरपालिकेची सत्ता सरांच्या हातात दिली, अतिशय सुक्ष्म नियोजन करीत सासवड नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक सर्व कर्मचारी यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत भारतामध्ये सासवड शहराचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे, त्याच पद्धतीने जेजुरी नगरपालिकासुद्धा काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
अगदी तसेच पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरवित संजय सर पुरंदर हवेली तालुका सुजलाम सुफलाम करतील यात कोणतीच शंका नाही.
लेखक : - राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य श्री.नंदकुमार सागर. जिजामाता हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज जेजुरी,कार्याध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ.