Saturday, February 19, 2022

"जगातील तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजीराजे" - युवा लेखक अजय समगीर यांचा शिवजयंती विशेष लेख"

 


"जगातील तरुणाईसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, रयतेचे कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजीराजे"


छत्रपती शिवाजीराजे म्हणजे कुठल्याही क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. सोळाव्या शतकात बऱ्याच राज्यकर्त्यांनी सत्ता गाजवल्या, युरोप फिरताना तिथेही चौकाचौकात महापुरुषांचे पुतळे दिसतात. नेपोलियनने घडवलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. कितीतरी रोमन राज्यकर्ते आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आजही सांगितल्या जातात. 


पण या सगळयात शिवरायांची चमक नेहमी वेगळीच राहिली कारण स्वराज्य हे शून्यातून उभं राहिलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या आणि परक्यांच्या विरोधातून आणि ते ही काही जमीनदारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या पोरांनी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभं केलं. 




स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात हे शेतकरी हंगामी शेती करत आणि पडीच्या काळात स्वराज्यात शिलेदार म्हणून दाखल होत. फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी आपण जन्माला आलो नसून आपला स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे ही शिकवण महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला दिली. दुसरी महत्वाची शिकवण म्हणजे माणसं हाताळण्याची कला, महाराजांना ती एवढी अवगत झाली होती की त्यांचे लोक त्यांच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरायला तयार होते.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


गुलामगिरीत पिचलेल्या समाजाला सर्वबाजूने अन्याय सहन करावा लागत होता. दोन परकीय राजांच्या सत्ता संघर्षात जनेतचा बळी जात होता. कसलेल्या जमिनीतून कमावलेले वतनदाराच्या झोळीत पडत होते. दुष्काळ पडला तरी कर भरावे लागत होते. महाराजांच्या सुराज्यात हे धोरण बदलले. रयत केंद्रबिंदू झाली. 




शेतकरी आणि लष्कर यांना संकटकाळी आरक्षण मिळू लागले जो घटक दुर्लक्षित होता तो मुख्यस्थानी आला आणि हुकमशाहीच्या मातीवर खरी लोकशाही उगवून आली. त्या काळातच काय तर आत्ताच्या काळातही हा फरक जाणवतो. म्हणून महाराज इतर कोणत्याही शासकापासून वेगळे आणि उंच ठरतात. आणि आजही महाराजांचे अनुयायी ज्वलंत आणि जिवंत आहेत.




स्वराज्य उभारताना महाराजांनी पहिला घाव वतनदारीवर घातला. वतनदारांना त्यांनी वेतनदार बनवले. या एका क्रांतीचा स्वराज्याला दुहेरी फायदा झाला. गुलामगिरीत पिचलेली रयत मुक्त झाली आणि वतनदारांनी बंड न करता स्वराज्याच्या वाढीला हातभार लावला. आणेवारी सारखी प्रकिया महाराजांनी राबवली ज्यातून शेतकऱ्यांच्या जमीनी सुरक्षित राहिल्या. ठिकठिकाणी बांधलेले शिवकालीन बंधारे आजही टिकुन आहेत. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


आमच्या शेजारच्या गावात उन्हाळ्यात दरवर्षी दुष्काळ पडत असतो. मागच्या चार वर्षात ओढ्यातला गाळ काढताना चार शिवकालीन बंधारे सापडले त्यानंतर त्या गावात पाण्याचा प्रश्नच मिटला. हे आत्ताचे उदाहरण आहे जे महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. 


एखाद्या गोष्टीचे सुयोग्य नियोजन कसे करावे हे शिकण्यासाठी महाराजांच्या कोणत्याही कर्तुत्वाला उदाहरण म्हणून घेता येईल. आणि आपल्या नेतृत्वाशी आणि कर्तव्याशी एकनिष्ठ कसे राहावे हे शिकण्यासाठी महाराजांच्या कोणत्याही मावळ्याचे उदाहरण देता येईल.




स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि इतर गडकिल्ले हे नेहमीच महाराजांच्या अभियांत्रिकी गुणवत्तेचे साक्षीदार राहिले आहेत. तसेच किल्ले स्वराज्यात घेताना मावळ्यांचे शौर्य, गनिमी कावा, महाराजांच्या नियोजनबद्ध मोहीमा या सगळ्या गोष्टी अचंबित करणाऱ्या ठरल्या आणि त्या नेहमीच लक्षवेधी राहिल्या. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


पण त्याबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराजांचा स्वभावगुण ! 


लोकं महाराजांसाठी मरायला तयार होती आणि त्या मागे फक्त लोकाभिमुख कारभार करणाऱ्या भोसले घराण्याबद्दलचा आदर हे एवढंच कारण नव्हतं. हजारो वर्षांपासून जे रयत भोगत होती त्या जुलमी सत्ता, रूढी परंपरा, चालीरीती यांना महाराजांनी छेद दिला. 




साम, दाम, दंड आणि भेद या तत्वांचा योग्य वेळी वापर करून नवी चळवळ उभारली. महाराजांनी रयतेला केंद्रस्थान मानुन स्वराज्याचे  महान कार्य केले. त्यामुळं महाराज आणि रयत यांच्यात एक भावनिक नातं तयार झालं ज्याचा प्रत्यय आज सुद्धा 350 वर्षानंतर आल्या शिवाय राहत नाही.


औरंगजेब सारखा मुत्सद्दी राज्यकर्ता सुरुवातीच्या काळात महाराजांना "जमीनदाराचा मुलगा" म्हणत. त्याच्या दृष्टीने महाराजांचं राज्य म्हणजे किरकोळ बंड असावं. पण महाराजांनी जेव्हा जावळीत स्वतः खानाचा वध केला तेव्हा आलमगीरासहित संपूर्ण पातशाही हलवली. 


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


खान जावळीत आला तेव्हाच त्याचं मरण निश्चित झालं होतं पण महाराजांनी त्याला स्वतःच्या हाताने मारून एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच केलं ज्यामुळं त्यांच्याकडे बघण्याचा विरोधकांचा दृष्टिकोन बदलला आणि संपुर्ण हिंदुस्थानात महाराजांची जरब बसली. याला grand strategy म्हणतात. खानाच्या वधाबरोबर शास्ताखानाचा बंदोबस्त आणि अशा भरपूर घटना हा याच stategyचा भाग. 


"आग्र्याहून सुटका" हा महाराजांच्या पराक्रमातील कधी न विसरता येणारा भाग. त्याबरोबर एक विशेष बाब मला नमूद करावी वाट्ते ती म्हणजे या घटनेनंतर एका इराणच्या राजाने औरंगजेबला लिहिलेल्या पत्रात त्याने बादशहाची खूप नाचक्की केली. 




"शिवाजी सारखा दख्खनच्या एका छोट्या राज्याचा राजा तुझ्या हातावर तुरी देऊन सटकतो आणि तू स्वतःला आलमगीर म्हणून घेतो" अशा खरमरीत शब्दात त्याने बादशहाचे वाभाडे काढले. या सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे महाराजांची ख्याती त्यांच्या हयातीतच साता समुद्रापार पोचली होती हे अभिमानास्पद आहे.


त्यामुळे महाराज डोक्यात घ्यायचे की डोक्यावर हा विशेष मुद्दा आहे.


महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ज्यातून असा इतिहास उभा राहिलाय आणि तो आपल्यासारख्या अगणित पिढ्यांना जगण्याचा मार्ग दाखवत राहील यात शंका नाही. छ्त्रपती शिवाजीराजे एका जन्मात समजणे सोपे नाही पण त्यांचे विचार योग्यपणे अमलात आणले तर आयुष्यात आपला कधीच पराभव होणार नाही कारण छत्रपतींच्या विचाराचा पराभव होऊच शकत नाही.


जय शिवराय!


लेखक : - आयटी अभियंता, युवा लेखक अजय समगीर



1 comment:

  1. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अजय

    ReplyDelete