Tuesday, October 24, 2023

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांची पारणे फेडणारा "ऐतिहासिक शाही दसरा" सोहळा पारंपरिक पद्धतीने,भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न"...


पुरंदर, वीर, दि.२४ :  महाराष्ट्रातील महान सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथे डोळ्यांचे पारणे फेडणारा, ऐतिहासिक 'शाही दसरा' सोहळा मंगळवारी पारंपारिक पद्धतीने व भक्तिमय वातावरणात "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात मंत्रमुग्ध होऊन, उत्साहात संपन्न झाला.




श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक विजयादशमीनिमित्त, श्रीनाथ म्हस्कोबा देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या व फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठया, छबिन्यासह निशाण, छत्री, अब्दागिरी या लवाजम्यासह सायंकाळी पाच वाजता भक्तिमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी निघाल्या. 




या ऐतिहासिक सोहळ्यावेळी सालकरी, मानकरी, दागिनदार, देवस्थानचे सर्व विश्वस्त, ग्रामस्थ,भक्त उपस्थित होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्रीनाथ म्हस्कोबा श्री क्षेत्र वीर येथील शाही दसरा सोहळ्याची भक्त मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीचा ऐतिहासिक शाही दसरा सोहळा भक्तिमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.



श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने तुकाई देवीची भेट घेऊन पारंपारिक पद्धतीने शाही दसऱ्याचे सीमोल्लंघन करून, गावाच्या वेशीवर विधिवत आपटा पूजन केले.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीने पारंपारिक पद्धतीने गाव प्रदिक्षणा पूर्ण करून रात्री 8.30 वाजता मंदिरात आल्यानंतर, भक्तिमय वातावरणात छबीना  संपन्न झाला.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


या ऐतिहासिक शाही दसऱ्याच्या सोहळ्यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तवर्ग खूप आतुरतेने व आनंदाने या उत्सवात सहभागी होत असतो.




श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पालखीला फुलांची केलेली आकर्षक सजावट तसेच आकर्षक विद्युत रोषणाई, आनंदमय वातावरणात फटाक्यांची केलेली आतिषबाजी, सुशोभिकरण केलेला पालखी मार्ग, फुलांची उधळण व "सवाई सर्जाचं चांगभलं" या जयघोषात संपूर्ण भक्तवर्ग आनंदमय व भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध झाला.




"पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्र उत्सव व शाही दसरा, ऐतिहासिक वीर गावच्या भक्तिमय संस्कृतीचे दर्शन घडवतो."




"प्रत्येक वर्षी सर्व भक्तगण या ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याची भक्तिभावाने वाट पाहत असतो. यावर्षी पारंपारिक पद्धतीने, उत्साहाच्या वातावरणात,खुप आनंदाने शाही दसरा सोहळा पार पडला."


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र वीर येथील "ऐतिहासिक शाही दसरा सोहळा" अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकत्र जोडणारा व ऐतिहासिक वीर गावच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. श्री क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसऱ्याची वैभवशाली परंपरा सर्व भक्तगण अभिमानाने व भक्तिभावाने जोपासत असतात."अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान क्षेत्र वीर येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळा प्रत्येक वर्षी भक्तांसाठी आनंदमय वातावरणात, भक्तिमय संस्कृतीने समृद्ध करणारा असतो.

Monday, October 23, 2023

"अठरापगड - जातीच्या लोकांना भक्तीच्या धाग्याने एकजूट करणाऱ्या,समृद्ध करणाऱ्या "या" पारंपारिक 'आठव्या माळेला' महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्रोत्सवात; लोटला भक्तांचा जनसागर"...


पुरंदर,वीर,दि.२३ : महाराष्ट्रातील अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने एकजूट करणारा व समृद्ध करणारा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक नवरात्रोत्सव हा पारंपरिक संस्कृतीचे अलौकिक दर्शन घडवतो.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथे ऐतिहासिक नवरात्रोत्सवात अष्टमीला म्हणजेच पारंपरिक आठव्या माळेला, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पालखीची वस्त्र परिधान केलेल्या मानांच्या काठ्यांसह, भक्त कमळाजी भेट सोहळा भक्तीमय वातावरणात रविवारी संपन्न झाला.




या ऐतिहासिक श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीची भक्त कमळाची भेट पारंपरिक सोहळ्यामध्ये सर्व जाती - धर्माचे लोक उत्साहात,आनंदात  सहभागी झाले. 


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


हा नयनरम्य, अलौकिक, पारंपारिक भक्त कमळाजी भेट सोहळा पाहण्यासाठी वीर पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती होती.




सवाई सर्जाचं चांगभलच्या भक्तीमय गजरात, वीर येथील माळावर सर्व पारंपरिक लवाजम्यांसह होणारा हा  अष्टमीचा भक्त कमळाची भेट अलौकिक सोहळा सर्व भक्तांना वर्षभर खूप मोठी ऊर्जा देतो.




रविवारी पहाटे पाच वाजता महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपासकाळात उष्णता वाढते म्हणून देवाचा दाह कमी करण्यासाठी  रिट्याच्या पानाची पूजा करण्यात येते. रिट्याच्या पानांचे अलंकार बनवून देवाला घालण्यात येतात.



श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची रिट्याच्या पानांनी पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व  जोगेश्वरी माता यांचे मुखवटे पालखीत ठेवून छबीना निघाला.



"मंदिराला दोन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी दक्षिण दरवाजाने बाहेर काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या मानाच्या काठ्या, निशान, अब्दागिरी, छत्री आदी लवाजम्यांसह गुलालाची उधळण करत, सवाई सर्जाचं चांगभलंच्या गजरात मंदिर परिसर दणाणून गेला."



"हा सर्व पारंपारिक लवाजमा पुढे भक्त कमळाजींच्या भेटीसाठी माळावरती आला. पारंपारिक भक्त कमळाची भेट सोहळा हा सर्व भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा अलौकिक सोहळा होता."




या ऐतिहासिक नवरात्रोत्सवात सर्व भक्तांना चांगल्या सोयी सुविधा वीर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पुरवल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी दिली.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये दोन प्रहर देवाची पूजा, छबिण्यासह पालखीची मंदिर प्रदक्षिणा, कीर्तन भजन, गोंधळ, लोकनाट्य कलावंतांची हजेरी असे विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडले.




नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे व चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने  चांगले नियोजन केले.




हा पारंपारिक सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ व सर्व विश्वस्त, सल्लागार मंडळ, ट्रस्टचे कर्मचारी, सालकरी, मानकरी, वीर ग्रामस्थ, गुरव, घडशी, गोसावी, आणि सर्व भाविक भक्तांचेही सहकार्य लाभले.



"वीर गावची आध्यात्मिक संस्कृती समृद्ध करणारा "पारंपारिक भक्त कमळाजी भेट" सोहळा हा अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्यात बांधणारा असा अलौकिक व नयनरम्य तसेच हजारो भक्तांना ऊर्जा देणारा  सोहळा असतो."

Saturday, October 14, 2023

"जालन्यात आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या लाखो लोकांची विक्रमी, अतिविराट सभा; मराठ्यांचा लाखोंचा जनसागर, "या" आहेत प्रमुख सहा मागण्या; मराठा आरक्षणाचा एल्गार; 'एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल' - मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा"..


जालना, दि.१४ : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी, मराठा समाजाची लाखो लोकांच्या उपस्थितीत, मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गाराने विक्रमी अशी अति विराट सभा संपन्न झाली.




"एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल." असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत सरकारला दिला.




आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली व मोठा जनसागर उपस्थित होता.  सकाळी १०.३० च्या सुमारास मनोज जरांगे पाटील हे भाषणाच्या ठिकाणी आले. त्यांचं भाषण सुरु झालं. "महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही ४० दिवसांची मुदत दिली होती, त्यातले ३० दिवस संपले आहेत."


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


आज आम्ही शेवटची विनंती करतो आहोत की आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या. तुमचं आणि आमचं ठरलं होतं की महिनाभराच्या वेळात आरक्षण देऊ. आता सरकारने शब्द पाळला पाहिजे." असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 




तसंच आता मनोज जरांगे पाटील यांनी काही महत्त्वाच्या मागण्या या सभेत सरकारकडे केल्या आहेत.




मनोज जरांगें पाटील यांच्या प्रमुख मागण्या :


१)महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.


२)कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यात यावी.


३)मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांच्या कुटुंबियांना सांगितलेला निधी, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी द्यावी.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


४)दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.


५)सारथी संस्थेमार्फत पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत.


६)महाराष्ट्रातील मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण आम्हाला टिकणारं आरक्षण हवं आहे.




"आज आपल्याला महत्त्वाच्या विषयांवर  चर्चा करायची आहे म्हणून आपण इथे सगळे जमलो आहोत. आज मराठा समाजासाठीचा सुवर्णक्षण आला आहे. या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झाला आहे. घराघरांतला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणार आहे की मी माझ्या नातवासाठी, मुलासाठी ऐतिहासिक सभेचा साक्षीदार झालो आहे. आरक्षणासाठी मराठा पेटून उठला आहे. महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे, तुमच्या हातात १० दिवस आहेत. आज जो जनसमुदाय आंतरवालीत आला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे राहिलेल्या दहा दिवसात मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर करा."




"मराठा समाजाने जो शब्द दिला आहे त्यावर मराठा समाज ठाम आहे. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले आहेत. त्यात आम्ही ४० दिवसांत आम्ही काहीही विचारणार नाही हे सांगितलं होतं आम्ही तो शब्द पाळला आहे. आता सरकारच्या हातात आणखी १० दिवस आहेत या दहा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर आरक्षण दिलं नाही तर काय होईल ते ४० व्या दिवशी सांगू असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 




मनोज जरांगे पाटील यांनी आज कार्यक्रम स्थळी येत आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरु केलं.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आज लाखाने मराठा समुदाय आंतरवाली येथे उसळलाय. त्याचं एकच म्हणणं की राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजाने जो शब्द दिलाय त्या शब्दावर समाज ठाम आहे. 40 दिवस दिले, यात आम्ही एक शब्दही सरकारला विचारणार नाही, असा शब्द दिला होता. 




या काळात एक शब्द विचारला नाही. तुमच्याकडे अजून दहा दिवस आहेत. या दहा दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40 व्या दिवशी सांगू."असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.


‘मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत घरी जाणार आहे. मराठ्यांची औलाद दिलेला शब्द मोडत नाही. मराठा समाज शांततेत आल्याचं पोलिसांनी बघितलंय. पोलीसच मला सांगतात, की मराठ्यांना मानावं लागेल की ते शांततेत आले, असं ते म्हणाले.’ 




मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले, की ‘थोडी गैरसोय झाली आहे पण थोडं सहन करा. आपल्या लेकरांना, पुढच्या पिढ्यांना सुखात बघायचं असेल तर हा संघर्ष केल्याशिवाय आणि सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आता आपण मागे हटायचं नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटील इंचभरही मागे हटणार नाही’.




त्यांनी सरकारला विनंती करत म्हटलं, की ‘मराठा समाजासाठी गठित केलेली समितीचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारित करतो. 5 हजार पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्याचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि समाजाचा ओबीसीत समावेश करा. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


"देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यवधी मराठा समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करून सांगतो. या राज्यातला सगळ्यात मोठा मराठा समाज, या समाजाची विनाकारण हालआपेष्टा करू नका."




"या गोरगरिब समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राने आणि राज्याने तातडीने निर्णय घेऊन, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसीत समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.




महाराष्ट्र राज्यसरकारने व केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न गांभीर्याने घेऊन तो लवकर सोडवणे अत्यंत गरजेचे आहे.

Tuesday, October 10, 2023

"महाराष्ट्रात गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करणारी "ही"नव्या स्वरूपातील 'लेक लाडकी योजना' राज्य सरकार राबविणार; मुलीच्या जन्मानंतर १ लाख १ हजार रुपयांचा "असा" मिळणार लाभ" वाचा सविस्तर "या" योजनेच्या पात्रता, अटी व लाभ"...


मुंबई, दि. १० : महाराष्ट्रात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.



लेक माझी लाडकी योजनेचा लाभ,वैशिष्ट्ये : -

१)पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये मिळणार.

२)इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये मिळणार.

३)सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये मिळणार.

४)१८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.



या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती.  माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून १ एप्रिल २०२३ पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबविण्यात येईल.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.



लेक माझी लाडकी योजनेच्या अटी, पात्रता निकष : -

१)१ एप्रिल २०२३ नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.  

२)दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.  मात्र आई किंवा वडिलांनी कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक राहील.  

३)१ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.  

४)जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.


राज्यात मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्यमुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राज्यात सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणांत उपमुख्यमंत्री तत्कालीन वित्त मंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ‘लेक लाडकी योजने’ मध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते.महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यात सद्यःस्थितीत सुधारित "माझी कन्या भाग्यश्री" ही योजना दि.१ ऑगस्ट २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेत दरवर्षी सुमारे ५००० लाभार्थी पात्र ठरत होते. त्याकरिता वार्षिक सुमारे १२ कोटी एवढा खर्च येत होता.आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात 'लेक लाडकी योजना’ राबविण्यात येणार आहे.


शासनामार्फ़त थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम  लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


या योजनेची अंमलबजावणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फ़त करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता तसेच योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयस्तरावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. 


त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या व तदनुषंगिक प्रशासकीय खर्च भागविण्याकरिता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

Tuesday, October 3, 2023

"महाराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले; अखेर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा उडणार धुरळा "असा" असेल निवडणूक कार्यक्रम,"या" तारखेला मतदान व या तारखेपासून आचारसंहिता लागु"


मुंबई, दि. 3 : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्य पदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज  केली.




श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम  : -


1)नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. 


2)नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. 




3)नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 


4)5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 


5)मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. 


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


मात्र, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. 




तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.