Sunday, November 12, 2023

महाराष्ट्राचे "प्रेरणादायी शिलेदार" मिलिंद माने - जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय,असामान्य प्रवास... वाचा फक्त महाराष्ट्र गर्जना न्यूज पोर्टलवर...


महाराष्ट्राचे "प्रेरणादायी शिलेदार" मिलिंद माने - जगभरात महाराष्ट्राचे, भारताचे नाव अभिमानाने उंचावणारे भारताचे एल.आय.सी.ऑफ इंडियाचे प्रसिद्ध अधिकारी मिलिंद माने यांचा प्रेरणादायी,संघर्षमय,असामान्य प्रवास... 

जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या महान पराक्रमाने, महान कार्याने पावन झालेली ही महाराष्ट्राची महान भूमी. महाराष्ट्राला जशी महान संतांची,महापुरुषांची, क्रांतिकारकांची,समाजसुधारकांची परंपरा लाभली तशीच आजच्या प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटचालीत सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा,साहित्य, विज्ञान,शिक्षण, तंत्रज्ञान यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महान कर्तृत्ववान मराठी व्यक्तिमत्वांनी  महाराष्ट्राला प्रगतीच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. सचिन तेंडुलकर, शरद पवार, लता मंगेशकर यांच्यासारखी कर्तृत्ववान, लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बहूसंख्य लोकांना माहिती असतात.


पण महाराष्ट्राचे, भारताचे नाव आपल्या कर्तृत्वाने जगभर गाजवणारी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अश्या लोकप्रियतेपासून लांब राहून देखील आपल्या कर्तृत्वाने,प्रभावशाली कार्याने, संघर्षमय प्रवासाने तरुण पिढीला प्रेरणा देत असतात.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार TOT - TOP OF TABLE, COT - COURT OF TABLE, MDRT - MILLION DOLLAR ROUND TABLE शेकडो व्यक्तिमत्वांना मिळवून देण्याची अनमोल कामगिरी करणारे एल.आय. सी. ऑफ इंडियाचे, महाराष्ट्राचे,भारताचे प्रसिद्ध,कर्तृत्ववान विकास अधिकारी मिलींद माने यांचा संघर्षमय, प्रेरणादायी प्रवास तरुण पिढीसाठी खूप मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. 


जगभरातील अमेरिका, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जीवन विमा, आर्थिक नियोजन यासारख्या महत्वाच्या विषयावर जगभरातून आलेल्या विमा, आर्थिक क्षेत्रातील प्रोफेशनल लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या मिलिंद माने यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. 


सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शालेय जीवन जगत असतानाच महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर पुणे येथे  उच्च शिक्षणासाठी जायचे असे ठरविले असल्याने मिलिंद माने यांनी घरच्यांचा विरोध असतानाही दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी थेट पुणे गाठले.ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने घरच्यांचा विरोध डावलून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून पुण्यासारख्या मोठया शहरात 1970 - 80 च्या दशकात उच्च शिक्षणासाठी जाणे हा धाडसीच निर्णय होता.फर्ग्युसन महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षणाला प्रारंभ झाला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


अनेक अडचणींना तोंड देत, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत मिलिंद माने यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातुन विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातुन MSC - Statistics ही पदवी पूर्ण केली. यानंतर MBA - Marketing and Finance ही व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेऊन मुंबई येथील हिंदुस्तान लिवर लिमिटेड या नामांकित कंपनीत व्यस्थापकीय मोठया पदावर रुजू झाले. यानंतर 1987 - 88 मध्ये Volta's LTD Mumbai या नामांकित कंपनीत काम करत असताना मिलिंद माने यांच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले. 


लोणावळा येथिल एका आलिशान हॉटेलमध्ये मिलिंद माने यांच्या कंपनीचा खास कार्यक्रम होता आणि त्याच हॉटेलमध्ये एल. आय.सी.ऑफ इंडियाचे देशभरातील वेगवेगळ्या अधिकारी लोकांची टीम आली होती. यामधील पुणे येथील एका अधिकाऱ्याचा त्या हॉटेलमध्येच दुर्दैवाने हृदयविकाराने निधन झाले होते. देशभरातील हे सर्व अधिकारी खूप घाबरले होते कारण मृत्यू झालेल्या या पुण्याच्या अधिकाऱ्याला त्याच्या घरी कोण,कसे घेऊन जाणार,काय सांगणार,कुणाला व्यवस्थित पत्ताही माहिती नव्हता अश्या संकट काळी मिलिंद माने या सर्व अधिकारी वर्गाच्या मदतीला धावून आले.मिलिंद माने यांनी मृत्यू झालेल्या त्या पुण्यातील अधिकाऱ्याची सर्व माहिती मिळवून त्यांना पुण्यातील घरी पोहचवण्यासाठी स्वता ते सर्व अधिकाऱ्यांबरोबर पुण्याला गेले, त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन पुढील सर्व व्यवस्था लावून मार्गक्रमण झाले. 


या घटनेमुळेच मिलिंद माने यांची एल.आय.सी. ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली आणि यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मिलिंद माने यांना एल.आय. सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या विकास अधिकारी या महत्त्वाच्या पदाविषयी माहिती व महत्व सांगून त्यासाठी तयारी आणि अर्ज करण्यास सांगितले पण मिलिंद माने यांनी प्रथम साफ नकार दिला.




कारण त्यावेळी ते एका मोठया खासगी कंपनीत चांगल्या पदावर,मोठया पगाराची नोकरी करत होते. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे पुन्हा ज्यावेळेस पुणे शहरात काम असे त्यावेळेस ते मिलिंद माने यांना भेटत आणि त्यांच्यातील सकारात्मक संवादामुळेच मिलिंद माने यांनी 1989 ला मोठया पगाराची Voltas LTD या नामांकित खासगी कंपनीतील नोकरी सोडून एल.आय.सी.ऑफ इंडिया या सरकारी कंपनीच्या पुणे डिव्हिजनला विकास अधिकारी म्हणून रुजू झाले. खासगी कंपनीतील मोठया पगारापेक्षा  मिलिंद माने यांना  विकास अधिकारी या पदावर कमी पगार मिळणार होता हे माहिती असून देखील त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला.


जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, ध्येयवादी दूरदृष्टी असलेल्या मिलिंद माने यांनी पहिल्याच वर्षी पुणे येथे एल.आय. सी.ऑफ इंडियाचे विकास अधिकारी म्हणून विमा क्षेत्रात दमदार,उल्लेखनीय,उत्कृष्ट कामगिरी करून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.पुढील वर्षी आपल्या विमा क्षेत्रातील दमदार,विशेष कामगिरीने मिलिंद माने यांनी पुणे विभागात विकास अधिकारी म्हणून प्रथम स्थान पटकावले. यानंतर मिलिंद माने यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.जिद्दीने,चिकाटीने, निष्ठेने, प्रचंड मेहनतीने यशाची नवनवीन शिखरे गाठतच गेले. अवघ्या काही वर्षातच मिलींद माने या महाराष्ट्रातील प्रभावशाली वरिष्ठ विकास  अधिकाऱ्याने जीवन विमा क्षेत्रात दमदार, विशेष कामगिरी करत भारताच्या All India Ranking Top 5 - सर्वोत्कृष्ट 5 अधिकाऱ्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


कारण एल.आय.सी.ऑफ इंडियाच्या विकास अधिकाऱ्याला एखादया शहरातील शाखेत दमदार काम करून देखील शाखेत कामगिरीच्या बाबतीत प्रथम क्रमांक मिळवणेही अवघड असते. मग जिल्हा, राज्य,देश पातळीवर विमा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून मोठे स्थान मिळवणे तर खूप कठीण गोष्ट असते. पण मिलिंद माने या प्रचंड ध्येयवादी दृष्टिकोन असलेल्या,प्रामाणिक, मेहनती,बुद्धिमान,कर्तृत्ववान मराठी माणसाने आपल्या प्रभावशाली कार्याने महाराष्ट्राचे नाव देशभरातच नाही तर जगभर उंचावले. 


2005 मध्ये विमा क्षेत्रातील जगातील सर्वोच्च पुरस्कार MDRT हा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतातील त्यांच्या टीममधील अनेक व्यक्तींना मिळवून देण्याची अनमोल विक्रमी कामगिरी करणाऱ्या मिलिंद माने यांचा विशेष सन्मान MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी केला. खरं तर ही प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. विमा क्षेत्रातील MDRT या  जगातील एवढया मोठया संस्थेचा अध्यक्ष मिलिंद माने यांचा भारतातील विमा क्षेत्रातील  विशेष, विक्रमी कामगिरीमुळे विशेष सन्मान करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.


जीवन विमा, आर्थिक नियोजन, या विषयावरील मिलिंद माने यांचा एवढा दांडगा अभ्यास आहे की देशभरातील दिल्ली, बंगलोर, कलकत्ता, मुंबई यासारख्या मोठया शहरातील हजारो अधिकाऱ्यांना मिलिंद माने मार्गदर्शन करत असतात. मिलिंद माने यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते जीवन विमा, आर्थीक नियोजन याविषयी नवीन दृष्टिकोन देत असतात. 

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


मिलिंद माने नेहमी सांगतात, "जीवन विमा ही लोकांना विकायची वस्तू नाही तर लोकांना आर्थिक साक्षर करायची मोहीम आहे. जीवन विम्याच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचे नियोजन, रिटायरमेंट नियोजन, मुलींच्या लग्नाच्या खर्चाचे नियोजन,कुटुंबाची आर्थिक सुरक्षा, पेंशन नियोजन कसे करता येते याविषयी लोकांना साक्षर करा."


2006 ला मिलींद माने यांना अमेरिकेत MDRT या जागतिक संस्थेने आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून विशेष सन्मानित केले. जगभरातील विमा क्षेत्रातील प्रोफेशनल व्यक्तींना मार्गदर्शन करणारे मिलिंद माने यांचा जीवनप्रवास तरुण पिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. MDRT या विमा क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जेव्हा मिलिंद माने भारताचे प्रतिनिधित्व करत असताना ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचा झेंडा घेऊन अभिमानाने फडकवत असतात ते मनाला आनंद देणारे दृश्य पाहून वाटते की हा महाराष्ट्राचा,भारताचा प्रेरणादायी योद्धा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन देखील शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या जोरावर जगभरात देशाचे नाव उंचावतोय ही तरुणांसाठी खूप विलक्षण आणि प्रेरणादायी यशोगाथा आहे.


2006 मध्येच भारतातील प्रसिद्ध लेखक,प्रेरणादायी वक्ते शिव खेरा यांच्या हस्ते मिलिंद माने यांना भारतातील विमा क्षेत्रातील विशेष कामगिरी, योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 2006 नंतर सलग अनेक वर्षे जगभरातील विविध देशांमध्ये मिलिंद माने यांना आंतरराष्ट्रीय विमा परिषदेसाठी आमंत्रित केले जायचे. 2012 ला पुन्हा एकदा मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीममधील 17 व्यक्तींना विमा क्षेत्रातील MDRT हा जगातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळे MDRT या जागतिक संस्थेच्या अध्यक्षांनी मिलिंद माने यांचा  विशेष सन्मान केला.


मिलिंद माने यांचे जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था यावरील अभ्यासपूर्ण विश्लेषण सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना समजेल अश्या सोप्या भाषेतील, प्रभावशाली आणि मनाला विचार करायला भाग पाडणारे आहे. देशभरातील एल.आय. सी.ऑफ इंडियाच्या हजारो वरीष्ठ विकास अधिकाऱ्यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी जी All India Sr Business Associate Forum  या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे स्थापना केली त्याचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत.


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रातील यशाची एवढी मोठी शिखरे गाठल्यानंतरही शिक्षणाचा ध्यास काही सोडला नाही. 2018 ला MBA - Insurance and Financial Planning ही व्यस्थापन शास्त्राची पदवी मिळवली. 

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


मिलिंद माने यांनी विमा क्षेत्रात काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार,विमा सल्लागार यांच्या प्रगतशील वाटचालीसाठी जीवन विमा या विषयावरील आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रेनिंग प्रोग्राम बनवला आहे. नुकताच मिलिंद माने यांनी जीवन विमा विषयावरील शोधनिबंध PHD साठी विद्यापीठात सादर केला आहे. 


मिलिंद माने यांची भारतीय समाजाशी नाळ खूप घट्ट निर्माण झालेली आहे.2003 साली स्थापन केलेल्या Lend a Hand India या सामाजिक संस्थेचे मिलिंद माने संस्थापक सदस्य आणि सल्लागार आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीब, गरजू मुलांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास,रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाते. आयुष्यात माणूस कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठा झाला, यशस्वी झाला तरी त्याचे पाय जमिनीवर पाहिजे. सर्वांशी नम्रतेने आणि माणुसकीने वागले पाहिजे. या साऱ्या गोष्टींची प्रचिती मिलिंद माने यांना भेटल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील,भारतातील तरुण पिढीसाठी  प्रेरणादायी असणाऱ्या मिलींद माने यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. 

लेखक : - अजित श्रीरंग जगताप, पत्रकार, संपादक - महाराष्ट्र गर्जना न्यूज.


Monday, November 6, 2023

"पुरंदरमधील प्रसिद्ध वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या व चुरशीच्या लढतीत मंजुषा संतोष धुमाळ यांचा मोठा विजय; ऐतिहासिक "वीर" ग्रामपंचायतीवर फडकला काँग्रेसचा झेंडा, वीर ग्रामपंचायत निवडणुकीतील "या" रोमहर्षक लढतींचा निकाल वाचा सविस्तर"...



पुरंदर,वीर, दि.6 :  महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा अतितटीच्या लढाईत 350 च्या मताधिक्याने मोठा विजय झाला.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे नऊ उमेदवार वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवून काँग्रेसने वीर ग्रामपंचायतीवर या निवडणुकीत झेंडा फडकवला.




महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र वीर.


पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.




पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेल्या गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे होते.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रमुख तीन उमेदवारांमध्ये चुरशीची व अतितटीची लढत झाली. 


काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुषा संतोष धुमाळ यांचा वीर गावच्या सरपंच पदासाठीच्या चुरशीच्या लढतीत 350 च्या मताधिक्याने  मोठा विजय झाला. ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा संतोष धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1541 मते मिळाले.





वीर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या  पराभूत झालेल्या उमेदवार हर्षला ऋषिकेश धसाडे यांना गावातील सर्व प्रभागांमधून  एकूण 1191  मते मिळाली. वीर गावच्या सरपंच पदाच्या अतितटीच्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या मंजुषा संतोष धुमाळ यांनी भाजप पुरस्कृत पॅनलच्या हर्षला ऋषिकेश धसाडे यांचा 350 मतांनी पराभव केला.


श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या पराभूत झालेल्या उमेदवार मिनल भरत धुमाळ यांना गावातील सर्व प्रभागांमधून एकूण 1052 मते मिळाली.


वीर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अपक्ष उमेदवार कल्पना विलास वाघ यांना एकूण १४६ मते मिळाली.




वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत  नोटाला( वरीलपैकी कोणीही नाही) 13 जणांनी मतदान केले.


ऐतिहासिक वीर गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी गावातील एकूण 3943 नागरिकांनी मतदान केले.


"ऐतिहासिक वीर गावातील नागरिकांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत माझ्यावरती विश्वास ठेवून मला भरघोस मतांनी  विजयी केले त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन." अशी प्रतिक्रिया ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच मंजुषा धुमाळ यांनी दिली.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर गावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वीर ग्रामपंचायतीच्या 15 जागांपैकी काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलने 8 जागांवरती विजय मिळवला. भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलने 3 जागांवरती विजय मिळवला.  श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलने 2 जागांवरती विजय मिळवला  तसेच श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलने एका जागेवरती विजय मिळवला. एका जागेवरती अपक्ष उमेदवार निवडून आला.


"पुरंदर तालुक्यामध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या जनसेवकांना निवडून दिले. पुरंदर मधील मोठया असलेल्या वीर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले. वीर गावच्या जनतेने विकास कामांना पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केलेली  विकास कामे तसेच आमदार फंडाच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात आम्ही केलेल्या विकास कामांना हा जनतेने दिलेला कौल आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




काँग्रेस पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलचे 8 विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे  


प्रभाग क्रमांक 1  : - विजयी उमेदवार 

1) पुनम प्रमोद धुमाळ - 429  

2) अनिकेत राजेंद्र समगीर - 333 


प्रभाग क्रमांक 2 : - विजयी उमेदवार

3) मोहन अरुण चवरे - 349

4) जयश्री अनिरुद्ध धुमाळ - 348

5) युवराज प्रताप धुमाळ - 341


प्रभाग क्रमांक 5 : - विजयी उमेदवार

6) प्रतीक अशोक सोनवणे - 479

7) जयश्री रुपेश धुमाळ - 348

8) राहुल कुंडलिक खोमणे - 361




भाजप पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलचे विजयी 3 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 3 : - विजयी उमेदवार

1) गणेश लक्ष्मण तांदळे - 335

2) छाया संतोष धसाडे - 332

3) आशा प्रशांत जाधव - 310


श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलचे विजयी 2 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 4 : - विजयी उमेदवार

1) पूजा विनोद बुरुंगले - 501

2) दिपाली नानासो वाघ - 375


शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलचा विजयी 1 उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


प्रभाग क्रमांक 1 : -

1) जयश्री सोपान समगीर - 410


प्रभाग क्रमांक 4 मधील विजयी झालेला 1 अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली एकूण मते खालील प्रमाणे


1) एकनाथ उत्तम वचकल : - 434



"श्रीक्षेत्र वीर येथील सरपंच पदाची निवडणूक अतिशय चुरशीची व प्रत्येकालाच थरारक अनुभव देणारी ठरली. या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार  सौं.मंजुषाताई संतोष धुमाळ  सरपंच पदावरती विराजमान झालेल्या आहे. त्यामुळे प्रथमता त्यांचे अभिनंदन. आणि या तिरंगी निवडणुकीत बाजी मारणं इतकं सोपं नव्हतं परंतु त्यांचे पती वीर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष बापू धुमाळ यांचा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत असलेला संपर्क,तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस घेतलेली मेहनत या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून हा अवघड वाटणारा विजय सोपा झाला आहे. हेही विसरून चालणार नाही. म्हणून या विजयाचे शिल्पकार सर्व ज्येष्ठ मंडळी,सर्व कार्यकर्ते,श्रीक्षेत्र वीर मधील विकासासाठी मतदान करणारा सुजाण नागरिक होय. येणाऱ्या काळात संतोषबापू धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ मंजुषाताई धुमाळ या गावातील सर्व घटकांना समान न्याय देऊन गावाचा विकास करावा आणि गावाचं गावपण टिकवण्यासाठी वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जावे." अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीचे निर्भीड पत्रकार व महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे   संपादक  शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"ऐतिहासिक वीर गावच्या जनता जनार्दनाने या ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेला हा कौल वीर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे पाऊल असेल. वीर गावातील पाण्याचा गंभीर प्रश्न, गावच्या सर्व गंभीर समस्या, चांगल्या आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, चांगल्या शैक्षणिक सुविधा यावरती लोकनियुक्त सरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चांगले काम करतील व समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.



पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच एकजुटीने प्रयत्न करतील अशीच नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Friday, November 3, 2023

"पुरंदरच्या प्रसिद्ध 'वीर' गावची 'जनताजनार्दन' ठरवणार ऐतिहासिक "वीर" गावचा सरपंच; जनतेच्या "मनातील" सरपंच कोण?



पुरंदर,वीर, दि.3 : महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांचे श्रद्धास्थान व अठरापगड जातीतील लोकांना भक्तीच्या धाग्याने जोडणारे प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वीर.श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या दर्शनासाठी राज्यातून लाखो भाविक - भक्त क्षेत्र वीर  येथे प्रत्येक वर्षी येत असतात.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गाव हे सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेची श्रीमंती असलेले वैभवशाली, ऐतिहासिक गाव आहे.


पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेले गाव तसेच सामाजिक, आध्यात्मिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीकडे आहे.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील सरपंच पदाच्या प्रमुख चार उमेदवारांनी या निवडणूकीच्या  काळात आपले जाहीरनामे, वचननामे,गावातील गंभीर समस्या, गावातील विकास कामे यासंदर्भात निवडणुकीतील प्रचार काळात आपापली भूमिका मांडलेली आहे.



"महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील सुजाण व जागरूक नागरिकाला वाटत असते "आपले गाव आदर्श गाव व्हावे. आपले गाव विकसित, समृद्ध व्हावे. आपल्या गावातील गंभीर समस्या सुटल्या पाहिजेत. तसेच आपल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे." अशी भावना प्रत्येक गावातील  सुजाण नागरिकांची असते.महाराष्ट्राच्या आदर्श गावांमधील तरुण पिढी ही प्रस्थापित स्वार्थी राजकारणाला तिलांजली देऊन गावातल्या समस्या सोडवण्यावरती तसेच गावचा सर्वांगीण विकास करण्याच्या भूमिकेवरती प्रामाणिकपणे काम करत असते."


सामान्य माणसाला लोकशाहीत, राजकीय व्यवस्थेत, संविधानाने विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी कायदेशीर अधिकार बहाल केलेले असतात.




"गावची जनता ही लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असते. गावच्या विकासाची दिशा जनतेच्या हातात असते त्यामुळेच आदर्श गावांमध्ये निवडणूक काळात सरपंच पदाचा उमेदवार निवडत असताना गावातील जनता उमेदवाराचे शिक्षण, पार्श्वभूमी, सामाजिक कार्य, लोकसंपर्क, गावातील प्रमुख समस्यांची जाण, समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, विकास निधी आणण्यासाठी प्रशासकीय कौशल्य, गावच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन या सर्व गोष्टी गांभीर्याने पाहत असते."




वीर गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, अवैध धंदे, व इतर समस्यांवरती वीर गावचे सुजाण नागरिक व पुरंदर मधील पुढारीचे निर्भीड,अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी प्रामाणिकपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.


Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"वीर गावातील सर्वच गंभीर समस्या सोडवण्यासाठी गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय राजकीय नेते, सर्व विश्वस्त, गावातील सुजाण नागरिक तसेच सर्व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.वीर गाव हे पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील एक आदर्श गाव घडण्यासाठी तसेच वीरगावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी, योगदान देणे गरजेचे आहे.वीर गावातील सर्व गंभीर समस्या सोडवून, वीर गावाचा सर्वांगीण विकास करून, गावाला विकासाच्या एका नव्या उंचीवर घेऊन जाणारे व आदर्श वीरगाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील सरपंच असेल."


महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जात, धर्म, पंथ, गावकी, भाऊकी, प्रस्थापित स्वार्थी नेत्यांचे गलिच्छ राजकारण, जेवणावळी, दारूच्या पार्ट्या, पैशातुन मतविक्री यासारखे समाजाचे अतोनात नुकसान करणारे घटक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


महाराष्ट्रातील गाव संस्कृतीला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर "माझा गाव माझा अभिमान माझे व्हिजन" या संकल्पनेप्रमाणे गावातील प्रत्येक सुजाण नागरिकांनी गावच्या विकासाच्या प्रक्रियेत आपले योगदान गांभीर्याने दिले पाहिजे.



"वीर गावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, मुबलक पिण्याचे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, बंदिस्त गटार योजना, दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा, सरकारी शाळेत व सरकारी दवाखान्यात दर्जेदार सुविधा, उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तरुणांना रोजगार संधीसाठी मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, तरुणांना उद्योग - व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे यासारखे समाज हितवादी उपक्रम राबवणारे व समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे नेतृत्व जनतेच्या मनातील सरपंच असेल." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली."


"लोकशाहीच्या प्रक्रियेत जनता जनार्दन निवडणुकीत मतदानाद्वारे गावचा कारभारी ठरवत असते. पण गावातील प्रमुख समस्या सोडवणारे तसेच गावचा सर्वांगीण विकास करणारे, राज्यात आदर्श गाव निर्माण करणारे नेतृत्वच जनतेच्या मनातील  सरपंच असेन."

Monday, October 30, 2023

"पुरंदरच्या प्रसिद्ध वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागांसाठी "या" प्रभागांमधून ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार; ऐतिहासिक वीर गावच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी "या" चार प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची व अतितटीचे लढत होणार"...


पुरंदर,वीर,दि.३० : पुरंदर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्याने उरलेल्या 12 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर गाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी वीर येथे येत असतात.   पुरंदर मधील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या 2023 मधील पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 5 प्रभागांमधून 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.




वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत.


Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


वीर गाव हे पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे गाव असून सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय दृष्ट्या या गावाला संपूर्ण तालुक्यात महत्व आहे.


वीर ग्रामपंचायतीची सार्वजनिक पंचवार्षिक निवडणूक 2023 ही अतिशय चुरशीची आणि अतितटीची असणार आहे. 



पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वीर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी 1)श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे सौ. मंजुषा संतोष धुमाळ, 2)श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे सौ. मिनल भरत धुमाळ, 3)श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनलतर्फे सौ. हर्षला ऋषिकेश धसाडे व 4)अपक्ष उमेदवार सौ. कल्पना विलास वाघ यांच्यामध्ये सरपंच पदासाठी चुरशीची लढत होणार आहे.




वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा ग्रामविकास पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार  1)सौ. पूनम प्रमोद धुमाळ, 2)सौ. प्रीती मोहन चवरे,  3)अनिकेत राजेंद्र समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)युवराज प्रताप धुमाळ, 2)मोहन अरुण चवरे, 3)सौ.जयश्री अनिरुद्ध धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री रुपेश धुमाळ, 2)प्रतीक अशोक सोनवणे, 3)राहुल कुंडलिक खोमणे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.




वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा युवाशक्ती परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)सौ. जयश्री सोपान समगीर, 2)सौ. सरिता अमोलराव धुमाळ, 3)सुरज बाळासाहेब समगीर तसेच प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)विनोद कृष्णाजी चवरे, 2)सौ.गौरी श्रीकांत थिटे, 3)केशव  बाप्पूसो धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)पराग सखाराम साळुंखे, 2)सौ. गौरी सुजित धुमाळ, 3)सौ. योगिता महेश धुमाळ तसेच प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.शोभा चंद्रकांत माळवे, तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)विशाल सुदाम सोनवणे, 2)सौ.पूजा संग्राम माळवे 3)दीपक दत्तात्रय भांडवलकर हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.



वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ म्हस्कोबा वीर विकास पॅनल तर्फे प्रभाग क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 1)चंद्रकांत दत्तात्रय समगीर, प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार 1)स्वप्नील चंद्रकांत धसाडे, 2) सौ.उषा आप्पा धसाडे, 3)तुषार गजानन यादव तसेच प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार 1)गणेश लक्ष्मण तांदळे 2)सौ.छाया संतोष धसाडे, 3)सौ.आशा प्रशांत जाधव तसेच प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार 1)वैभव बाळू बोडरे हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.



वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्रीनाथ जोगेश्वरी समाज परिवर्तन पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 4 चे अधिकृत उमेदवार 1)सौ.पूजा विनोद बुरुंगले, 2)सौ.दिपाली नानसो वाघ, 3)समीर रामदास वचकल हे सर्वजण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


वीर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तसेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकूण दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.  प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वात कमी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, प्रसिद्ध वीर गावच्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी 15 जागांसाठी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तसेच लोकनियुक्त सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now


"श्रीक्षेत्र वीर येथील ग्रामपंचायत निवडणूक  ही येणाऱ्या काळात विकासाची मुहूर्तमेढ रोवणार आहे.  निवडून येणारी लोकनियुक्त सरपंच महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न व महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य दिले जाईल तसेच वीरचा चांगला विकास होईल यात  तीळ मात्र शंका नाही. वीर गावचा पाणी प्रश्न,अवैद्य धंदे, आरोग्य सुविधा यावर निवडून येणाऱ्या गावातील लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुक ही काही दिवसांची असते नंतर पुन्हा प्रत्येकाला एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागत असते. याचे भान ठेवून प्रत्येकाने संयमाने, शांततेने, कुठलेही हेवेदावे व मत्सर न करता शांततेत ही निवडणूक पार पाडावी. आणि लोकशाहीच्या या उत्सवाला रंगाचा बेरंग होणार नाही याची वीर मधील प्रत्येक मतदाराने काळजी घेणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर मधील  दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासू पत्रकार व  महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजचे संपादक श्री शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.



संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष वेधणारी वीर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक अतितटीची आणि चुरशीची नक्कीच असेल अशी जनभावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.


वीर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन वीर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होईन.