Wednesday, May 19, 2021

"महाराष्ट्राच्या 'या' पोलीस शिलेदाराने जिंकली तरुणाईची मने; सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी; पुरंदर तालुक्यातील "वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपये व वैद्यकीय साहित्य देऊन दिला मदतीचा हात"...

 


पुरंदर, वीर, दि. 19 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीने समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक नकारात्मक, गंभीर विषयांवरील पोस्ट, बातम्या वाचून मन निराश होते, सुन्न होते. पण समाजात  दिलासादायक, प्रेरणादायी कार्य करणाऱ्या लोकांकडे, ग्रुपकडे,  संस्थांकडे पाहून वाटते की माणुसकी जिवंत आहे. 




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या सामाजिक उपक्रमाला सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा  वीर" या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मदत केल्याने,श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व वीर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील श्रीनाथ म्हस्कोबा भक्तांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रूपच्या माध्यमातून 'श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यात वीर येथे सुरू केलेल्या श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपयाचा मदतनिधी देऊन व 50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर्स व परिचारिका यांना लागणारे वैद्यकीय साहित्य देऊन, सामाजिक बांधिलकी जपत, मदतीचा हात पुढे करून सोशल मीडियावरील व्हाट्सएप ग्रूप "श्रीनाथ म्हस्कोबा  वीर" यांनी समाजात एक चांगला आदर्श सामाजिक उपक्रम राबविला. 




यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन  संतोष धुमाळ, विश्वस्त अभिजीत धुमाळ, सल्लागार विशाल धुमाळ, माजी विश्वस्त दिलीप धुमाळ, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र धुमाळ, "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" ग्रुपचे ऍडमिन, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार  बापूसाहेब धुमाळ, श्रीनाथ ग्रुपचे सदस्य अमोल चंद्रकांत धुमाळ, सागर नढे, अशोक बुरुंगले, अरुण धुमाळ, डॉक्टर सुनील धुमाळ,  भरत धुमाळ, गिरीश क्षीरसागर, अमोल धोंडीबा धुमाळ, देविदास चवरे, पांडुरंग धुमाळ, अरुण धुमाळ, माऊली कुंभार,  संतोष थिटे व श्रीनाथ ग्रुपचे सदस्य व देवस्थानचे पदाधिकारी  व मान्यवर उपस्थित होते.




मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर, प्रामाणिक भक्तिभावाच्या उद्देशाने लोकांना घरी बसून महाराष्ट्रातील कुलदैवतांचे, आराध्य दैवतांचे दर्शन व्हावे यासाठी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपचे ऍडमिन बापूसाहेब धुमाळ त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने भक्तीचे चांगले उपक्रम राबवत आहेत.




"सोशल मीडियावर फक्त पोस्ट वाचणे व फॉरवर्ड करणे यापेक्षाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील, वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला मदत करण्याच्या भावनेतून 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या आमच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऍडमिन या नात्याने कोविड सेंटरला मदतनिधी या  सामाजिक उपक्रमासाठी  मदतीचे आवाहन केले.  प्रत्येकाने 100 रुपये मदतनिधी दिला तरी 16000 रुपये मदतनिधी जमा होईन तो मदतनिधी श्रीनाथ कोविड सेंटरला देऊयात. ही पोस्ट ग्रुपवर शेअर केल्यावर श्रीनाथ म्हस्कोबा वीर या ग्रुपमधील सदस्यांनी या सामाजिक उपक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला. 



वीर देवस्थान ट्रस्ट, वीर ग्रामस्थ यांनी या उपक्रमाला खूप चांगले सहकार्य केले. महाराष्ट्रातील सर्व श्रीनाथ म्हस्कोबा भक्त परिवार, ताईसाहेब ग्रुप, महिला वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीतच 55 हजार 555 रुपये मदतनिधी जमा झाला. कामटे ऑटोमोटिव्हचे उद्योजक अमित कामठे व विशाल कामठे यांनी  50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर व परिचारिकांना लागणारे वैद्यकीय साहित्यांचे किट मदत दिली. आमच्या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या माध्यमातून 55 हजार 555 रुपये मदतनिधी व वैद्यकीय साहित्य, कोविड सेंटर उत्तम चालवणाऱ्या वीर देवस्थान ट्रस्टला सुपूर्त करून कोविड सेंटरला मदत करण्याचा आमच्या ग्रुपचा संकल्प पूर्ण झाला." अशी प्रतिक्रिया 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपचे ऍडमिन,इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. "सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबविलेला सामाजिक उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे व इतर ग्रुपलाही प्रेरणा देणारा आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी दिली.



"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यामातून सामाजिक कार्य कसे करु शकतो? याचे  अतिशय उत्तम उदहारण  समाजासमोर ठेवले आहे . सर्व ग्रुप व ग्रुपबाहेरच्या मंडळींनीही यामध्ये चांगले सहकार्य केले. त्याबद्दल बापूसाहेब व सर्वांचे हार्दिक अभिनंदन. अशा सहकार्यामुळे काम करणार्‍या लोकांचाही उत्साह शतपटीने वाढतो. असेच कार्य आपण कायम सुरु ठेवावे. श्रीनाथ साहेबांच्या छत्रछायेखाली अजुन मोठी कामे होतील. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर सुनील धुमाळ यांनी दिली.



"बापूसाहेब  करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे. आपण कायमच गावातील प्रत्येक सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक तसेच गावाच्या विकासासाठी सदैव तन, मन, धनाने तत्पर असता. त्याच बरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तुमची सचोटी वाखनण्याजोगी आहे. येणाऱ्या काळात अशीच सामाजिक सेवा आपल्या हातून घडो अशी प्रतिक्रिया पुरंदरचे शिवसेनेचे युवा नेते समीर जाधव यांनी दिली.



"'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून राबवलेला हा  सामाजिक उपक्रम हा समाजातील सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आणि चांगला उपक्रम आहे. बापूसाहेब यांचे कार्यही नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  लोकहिताच्या उपक्रमांसाठी पुढाकार घेऊन  सर्वांनीच मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते भरत धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"समाजामध्ये चांगले सामाजिक उपक्रम राबवणारे सोशल मीडियावरील फार कमी ग्रुप बघायला मिळतात. 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबवलेला सामाजिक उपक्रम समाजातील सर्वच घटकांसाठी प्रेरणादायी व चांगली शिकवण देणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रसह्याद्रीच्या पत्रकार सविता शितोळे यांनी दिली.




"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रामाणिक भक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून समाजात एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवून, श्रीनाथ म्हस्कोबा ग्रुपच्या माध्यमातून  कोविड सेंटरला केलेली मदत ही सामाजिक जबाबदारीचे भान जपणारी व तरुणाईसाठी हा प्रेरणादायी उपक्रम आहे. जनसामान्यांना भक्तीच्या माध्यमातून जोडून सामाजिक बांधिलकी जपत चांगले सामाजिक उपक्रम राबवणे हा माणुसकी समृद्ध करणारा प्रवास आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाचा विधायक कार्यासाठी, सामाजिक उपक्रमांसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो? हे आदर्श उदाहरण "श्रीनाथ म्हस्कोबा वीर, या व्हाट्सएप ग्रुपने समाजासमोर कृतीतून दाखवून दिलेले आहे.


No comments:

Post a Comment