Monday, May 31, 2021

'पुणे शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल'; "कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, तुम्हा सर्वांच्या साथी शिवाय शक्य नाही" - महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे, दि. 31 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आल्यामुळे, दिलासादायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध  शिथिल करण्यात आलेले आहेत. 



"पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथी शिवाय शक्य नाही. त्यामुळे बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या." असे आवाहन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले.




आज सोमवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून आली. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 180 नवे रुग्ण आढळल्याने, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासनाला व नागरिकांनाही दिलासा मिळताना  दिसत आहे.



पुणे शहरात 6,020 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज   751 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 24 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत असल्यामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. पुणे शहरातील शिथिल झालेले निर्बंध खालीलप्रमाणे...




उद्यापासून पुणे शहरात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु.

2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु असणार.

3. बार व रेस्टॉरंट हे फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील.

4. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या सर्व दिवशी सुरु राहतील.

5. महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने सर्व दिवस सकाळी 7 ते २ दुपारी वाजेपर्यंत सुरु राहतील.

6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु कर करण्यास मुभा.




पुणे शहरात काय बंद असणार?


1. जिम, मंगल कार्यालय, उद्याने, मैदान, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार.

2. पुणे मनपा हद्दीत नव्या आदेशानुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत.

3. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद असणार.

4. दुपारी 2 नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.

 



पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.  




पुणे शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.



'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'


No comments:

Post a Comment