पुणे, दि.18 : महाराष्ट्रातील गरीब घटकातील लोकांना, सर्वसामान्य लोकांना वेगवेगळ्या रुग्णालयात सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'तुन अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा दुर्दैवाने राज्यातील गोरगरीब जनतेला फायदा मिळत नसल्याचे चित्र सर्वच रुग्णालयात पाहायला मिळत असून, राज्यातील गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी तसेच गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी आम्ही मंत्रालयावरती धडक देऊन गोरगरीब रुग्णांच्या गंभीर प्रश्नांसाठीच्या आंदोलनाच्या माध्यमातून गरीब रुग्णांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया प्रहारचे रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ते नयन पुजारी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
पुणे जिल्ह्यातील रुग्णसेवक नयन पुजारी आणि रुग्णसेवक संजय गायखे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 22 नोव्हेंबर) गोरगरीब रुग्णांच्या गंभीर प्रश्नांसाठी थेट मंत्रालयावर धडक देण्यात येणार आहे.
प्रहार पक्षाचे रुग्णसेवक नयन पुजारी, संजय गायखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील काही रुग्णालयांमध्ये जाऊन याठिकाणच्या रुग्णांशी तसेच आरोग्य योजना कार्यालयाशी संपर्क साधला असता अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत.
यावेळी रुग्णसेवक उमेश महाडिक, रुग्णसेवक नौशाद शेख, रुग्णसेवक अमोल मानकर, रुग्णसेवक संतोष साठे, संतोष अभंग, शुभम शहा, साई शेवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL : Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery... Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यावेळी त्यांनी रुग्णांची कागदपत्रे तपासली असता अनेक रुग्णांचा योजनेत समावेश होत असतानाही रुग्णालयांकडून नियमांवर बोट ठेवून किंवा कागदपत्रांच्या पुर्ततेच्या नावाखाली त्यांना या योजनांचा लाभ मिळून देत नसल्याचे पाहून नयन पुजारी यांनी संताप व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर सोमवारी थेट मंत्रालयावर धडक देत यासंदर्भात मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाला भेट देऊन संबंधीत अधिकाऱ्यांकडे याचा जाब विचारण्यात येणार असल्याचे व मुख्यमंत्री कार्यालयालाही गोरगरीब रुग्णांच्या या गंभीर विषयासंदर्भात अगोदरच इमेल केला असल्याचे रुग्णसेवक नयन पुजारी यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरीब रुग्णांना सर्व शासकीय योजनांचा व मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास, नयन पुजारी यांनी व्यक्त केला.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
"महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा रुग्णालय प्रशासन सहकार्य करत नाहीत. तसेच गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी धर्मादाय आयुक्त देखील सहकार्य करत नाहीत असा आमचा अनुभव आहे." अशी प्रतिक्रिया पुण्यातील प्रहारचे रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ते उमेश महाडिक यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
"प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना सरकारी योजनेच्या माध्यमातून उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु अनेक वेळा रुग्णालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करतात. पुणे शहरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना मदत मिळत नाही. गरीब रुग्णांचे प्रश्न सोडवण्यासाठी, गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी आमचा प्रहार जनशक्ती पक्ष सदैव तत्पर असतो." अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात चांगले उपचार मिळण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरीब रुग्णांना मदत मिळण्यासाठी सरकारने या गंभीर विषयात विशेष लक्ष घालून, गोरगरीब रुग्णांना न्याय मिळण्यासाठी चांगली धोरणे राबवून योग्य पाऊल टाकणे गरजेचे आहे.
Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
सर्व सामान्य नागरिक अरोग्या सेवे पासून वंचित होत चालला आहे प्रशासन कोणती ही काळजी किवा मदत घेण्यासाठी असमर्थ आहे जो पर्यन्त हे प्रशासन अरोग्या विषई योग्य निर्णय घेत नाही तो पर्यन्त रुग्णसेवक म्हणून आम्ही शांत राहणार नाही ....🙏
ReplyDelete