Sunday, February 13, 2022

"पुण्यातील प्रसिद्ध 'एकता मित्र मंडळ ट्रस्टचा' विद्यार्थ्यांसाठी,तरुणाईसाठी उपयुक्त अश्या "या" सामाजिक उपक्रमांचा उद्घाटन सोहळा कार्यक्षम नगरसेविका आश्विनी कदम,सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या हस्ते, उत्साहात संपन्न"...



पुणे, दि.13 : पुणे शहरातील अरण्येश्वरनगर, तावरे कॉलनी येथील प्रसिद्ध एकता मित्र मंडळ ट्रस्ट नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून, पुणेकरांचे लक्ष वेधून घेत असते. 




संकष्टी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून एकता मित्र मंडळातर्फे दर गणेश चतुर्थीला अन्नदान कार्यक्रम उत्साहात पार पडत असतो.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


पुणे शहरातील कार्यक्षम नगरसेविका अश्र्विनीताई कदम व सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या हस्ते एकता मित्र मंडळ ट्रस्टचे सीसीटीव्ही कॅमेरा उपक्रम, एकता स्वामी विवेकानंद ग्रंथालय व अभ्यासिका, एकता मित्रा मंडळ ट्रस्ट कार्यालय, आणि एकता बालउद्यान या लोकोपयोगी, तरुणाईसाठी उपयुक्त सामाजिक उपक्रमांचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले. 




पुण्याचे वैभव असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त श्री अक्षयजी गोडसे यांनी सदिच्छा भेट देत एकता मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.




या कार्यक्रमावेळी नगरसेविका अश्‍विनी कदम एकता मित्र मंडळाच्या सामाजिक कामाचे मनभरून कौतुक करताना म्हणाल्या की, "एकता मित्र मंडळाने अनेक नवनवीन समाजपयोगी व आधुनिक संकल्पना अंमलात आणून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. एकता मित्र मंडळाने नागरिकांसाठी डिजिटल वजनकाटा आणि ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी भारत देशाचे संविधान (इंग्रजी-मराठी अनुवाद) श्रीमद भगवद्गीते सह ६०० (ऐतिहासिक, आध्यत्मिक, मनोरंजनात्मक, शासकीय व इतर विषयांवरील पुस्तके) भेट दिली. "




"तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातून व  मेहनतीतून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ अशा एकता  मित्र मंडळ कार्यालय  व बालचमुंसाठी साकारलेल्या बालउद्यानाच्या, तसेच भविष्यात मंडळाला कोणत्याही कार्यात किंवा कधीही कोणतीही मदत-गरज भासल्यास आम्ही एकता मित्र मंडळ ट्रस्ट सोबत कायम सोबत असू." असे त्यांनी आश्वासित केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


यावेळी वीर शिवराज मित्र  मंडळ, गुरुवरपेठचे अध्यक्ष, श्री. किरणजी सोनिवाल, सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोलजी ननावरे यांची विशेष उपस्थित लाभली.




जय गणेश व्यासपीठावरील एका कार्यक्रमात दिलेल्या शब्दाला जागे राहून मंडळातील सर्व बालगोपाळ व अथक मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त अक्षयजी गोडसे यांच्यासोबत नगरसेविका अश्र्विनी कदम आणि नितीन कदम यांनी श्रींच्या महाप्रसादासोबत चतुर्थीचा उपवास सोडला.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


विश्वस्त अक्षयजी गोडसे यांनीही मंडळाचे प्रत्यक्ष स्वरूप, नागरिकांसाठी निर्माण केलेल्या सुविधा व सामाजिक कार्य पाहून शाबासकीची थाप देत भविष्यात एकता मित्र मंडळाला मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती कायम सोबत असेल आणि तसेच एकता मित्र मंडळ ट्रस्टच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!




चतुर्थी निमित्त झालेल्या अन्नदानासाठी मंडळाच्यावतीने करण्यात आलेल्या आव्हान व विनंतीला अनेकजण तसेच महादेव ढमाले, अविनाश खंडागळे, सिद्धार्थ गायकवाड, महेश पडवळ, विनायक इंगवले, सुधीर ढमाले, अनिकेत ढमाले, हिरेन गायकवाड, जयेश ढमाले, दुर्वांकुर ढमाले,




शुभम बाणखिले, संकेत मिरघे, महेश लोभे, संकेत आढाव, यश चावट, आदर्श चावट, योगेश मांढरे, सनी तिवाटणे, आशुतोष अमराळे, आदित्य मिरघे, केशव अमराळे, देवांक करकंडे, हर्षद खंडागळे या देणगीदारांकडून भांडार, वस्तू व आर्थिक स्वरूपात मोठे सहकार्य लाभले.




"हे संपूर्ण कार्य संपन्न होण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली व प्रमुख कार्यकर्ते विनायक इंगवले हे नेहमी आचारी आणि त्यासोबत मंडळात वेगवेगळ्या भूमिका पार पाडत मंडळाच्या सर्व उपक्रमांचा महत्त्वपूर्ण भाग असून, त्यांच्या या आदर्शव्रत कार्याला मंडळाकडून सलाम." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




एकता मित्र मंडळ ट्रस्टचे विविध सामाजिक उपक्रम पुणे शहरातील सर्वच सामाजिक संस्थांना, गणेश  मंडळांना प्रेरणादायी आहेत.


2 comments:

  1. महाराष्ट्र गर्जना न्यूजचे मानावे तेवढे धन्यवाद कमी पडतील... एकता मित्र मंडळाच्या कार्याची दखल त्यांनी स्वतः हुन घेतली व मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये भविष्यातील कार्याची जबाबदारी व उत्साह वाढविला.

    ReplyDelete
  2. Khup chan kam karat ahat. Keep it up.

    ReplyDelete