Saturday, May 15, 2021

पुरंदरच्या "या युवा शिलेदारांनी" छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त "हा खास सामाजिक उपक्रम" राबवून, 'छत्रपती संभाजीराजे यांना खास अभिवादन' करून जिंकली तरुणाईची मने; वीर गावच्या सुपुत्रांचा "आदर्श, प्रेरणादायी उपक्रम"....

 

पुरंदर, वीर, दि. 15 : - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आहे, गंभीर परिस्थिती आहे अश्या गंभीर परिस्थिती मध्ये सामूहिकरित्या छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करता येणार नाही याचे भान राखून पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर गावचे तरुण शिलेदार, संगणक अभियंता अजय समगीर व वैभव समगीर या तरुण शिलेदारांनी पुरंदर किल्ल्याच्या जवळच्या परिसरातील, किल्ल्याच्या उपरांगातील चार मोठे डोंगर निवडून तिथे 1657 बीजगोळे बीजांकुरणासाठी रोपण करून, या आगळ्या वेगळ्या वृक्षसंवर्धनाच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श उपक्रम राबवून छत्रपती संभाजीराजे यांना खास अभिवादन केले. 





सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि झाडांची पानगळ होऊन चैत्र पालवी फुटलेली असते. त्यामुळे कोणत्याही झाडाखाली गेलं तरी त्या झाडाच्या बिया आणि गळलेल्या पानांचा सडा पडलेला असतो. युवा शिलेदार अजय समगीर व वैभव समगीर यांनी कडुलिंब, सुभाबळ आणि चिंचेच्या  साधारण 3000 बिया गोळा केल्या. माती, कंपोस्ट खत आणि राख यांच्या मिश्रणाचे गोळे करून प्रत्येकी 3-4 बिया घालून बीजगोळे बनवले.




पुरंदर किल्ला जेवढा उंच आहे तेवढाच विस्तृत आहे आणि या किल्ल्याला भरपूर उपरांगा आहेत. अशा उपरांगांमधून या युवा शिलेदारांनी 4 मोठे डोंगर निवडले. जिथे जवळपास कोणतेही गाव किंवा मनुष्य वस्ती नसेल अशा ठिकाणी जाऊन या युवा शिलेदारांनी 1657 बिजगोळे पेरले.




"1657 हा आकडा निवडण्याचे कारण म्हणजे छ्त्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 साली झाला होता. पुरंदर किल्ल्याच्या नैऋत्य बाजूचा काळूबाई डोंगर, दक्षिणेला काळभैरव डोंगर, पूर्वेला हरेश्र्वर मळा (पांगारे घाट), आग्नेय दिशेला हरणी महादेव डोंगर या डोंगरावर पहाटेच्या वेळी जाऊन आम्ही वनखात्याने आखलेल्या रेषा किंवा वृक्षारोपण करण्यासाठी घेतलेले खड्डे या ठिकाणी हे बीजगोळे पेरले. अशी प्रतिक्रिया संगणक अभियंता अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"साधारण आठवडाभर आम्ही लॉकडाऊन चे सर्व नियम पाळून हा उपक्रम राबवला आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ऑक्सीजन अभावी लोकांचा जीव जाणे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या विषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती होत असते पण आता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची वेळ आलेली आहे. काल पर्यंत हसत खेळत असलेली आपली माणसं आज अचानक नाहीशी होत आहेत.




आज पर्यंत  निसर्ग वाचवा म्हणून भरपूर आवाहने करण्यात आली पण आत्ता सध्याच्या परिस्थितीत माणूस वाचवावा लागत आहे आणि त्यासाठी निसर्गसंपत्ती वाढली पाहिजे. आम्ही 1657 सिडबॉल पेरले आहेत आणि महाराजांची ही 364 वी जयंती आहे त्यामुळे पुरंदरच्या कुशीत 1657 पैकी 364 झाडे जगली आणि वाढली तरी आमची जयंती साजरी झाली असे आम्ही मानू. अशी प्रतिक्रिया अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने हा उपक्रम सुरू केला आहे आणि  असाच चालू राहील. आपणही असा उपक्रम नक्की राबवू शकता कोणत्याही खर्चा शिवाय. निसर्गातून घेऊन निसर्गाला अर्पण करण्याचा हा खूप सोपा मार्ग आहे." असे वैभव समगीर यांनी सांगितले.




"युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे यांच्या महान इतिहासातून प्रेरणा घेऊन अजय समगीर व वैभव समगीर यांच्यासारखे युवा शिलेदार पर्यावरण संवर्धनासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा, वृक्षसंवर्धनाचा चांगला सामाजिक संदेश देत आहेत. हा आदर्श उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी जागरूक होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.






16 comments:

  1. प्रेरणादायी, खुप चांगला उपक्रम👌👍

    ReplyDelete
  2. Wow Amazing!... Keep up the good work...God bless you

    ReplyDelete
  3. Ajay samgir khup chan upkram..

    ReplyDelete
  4. अतिशय अभिमानास्पद उपक्रम केला आहे.
    निसर्ग संवर्धन हि भविष्य काळाची गरज असल्याची शिकवण छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आगोदरच दिली आहे,
    त्यांची शिकवण आजही आपण पुढे नेत आहोत हेच या उपक्रमावरुन साध्य होत आहे.
    पुनच्छ एकदा अभिनंदन....

    आपला,
    सचिन शिंदेपाटील

    ReplyDelete
  5. Awesome Ajay ��������
    Well done ����

    ReplyDelete
  6. खूपच सुंदर

    ReplyDelete
  7. Khup Chan Ajay and team, ashech upkram suru rahudya.

    ReplyDelete
  8. अतिशय चांगले काम केले आहे अशीच कामे करत रहा.

    ReplyDelete
  9. छ. संभाजीराजे यांना हिच खरी मानवंदना.
    या वीरच्या सुपुत्रांना मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

    ReplyDelete