Monday, January 3, 2022

"ज्ञानज्योती, युगप्रवर्तक, भारतीय शिक्षणाची प्रकाशज्योती सावित्रीबाई फुले" - प्रसिद्ध स्थंभलेखक, आत्मप्रेरणा पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मण जगताप यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख..."

 


"ज्ञानज्योती, युगप्रवर्तक, भारतीय शिक्षणाची प्रकाशज्योती सावित्रीबाई फुले"


स्त्री जीवनातील अंधकार दूर  करणारी एक युगप्रवर्तक प्रकाशज्योती, धाडसी स्वावलंबी, महिला म्हणजे सावित्रीबाई .




नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घराण्यात ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई जन्मल्या.पित्याचे धडधाकट शरीर व आईचे सुंदर रुप घेऊन ही सुलक्षणी जन्मास आली.


BIG BAZAAR BIG SHOPPING FESTIVAL :  Upto 50% Off on Electronics & Appliances + Free Delivery... 2 Hour Home Delivery...  Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                 Buy Now 


सावित्रीबाई  दिसामाजी वाढत होत्या तसे एक एक गुण दिसून येत होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे आपल्या भावी आयुष्यातील समाजसेवेचे धडे सावित्रीबाई  लहानपणापासून गिरवत होत्या.धीटपणा ,सेवाभावी वृत्ती ,सतत कामाची आवड,जिद्द,चिकाटी हे सावित्रीबाईंचे गुण त्यांच्या कृतीतून दिसून येत होते.




पुढे १८४० मध्ये ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा विवाह झाला.सुस्वरुप ,गुणी ,कर्तृत्ववान ज्योतिबा आणि सावित्री एकत्र आले.दोन अदभूत शक्ती एकत्र आल्या.दोन समविचारी ,दोन कर्तृत्ववान आणि दिव्यशक्ती असणाऱ्या व्यक्तीचा मिलाप झाला आणि येथूनच ख-या अर्थाने युगप्रवर्तक क्रांतीकार्याचा प्रारंभ झाला.




स्त्री म्हणजे गुलाम आहे ,स्त्री म्हणजे दासी आहे .तिला शिक्षणाचा हक्क नाही .या बुरसटलेल्या विचारसरणीला छेद देण्याचे महान कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांनी केले.


Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                              Buy Now


१ जानेवारी १८४८ या दिवसाची इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंद झाली.खरं तर हा स्री मुक्तीचा दिवस.याच दिवशी पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून महात्मा ज्योतीराव आणि सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.समस्त स्री वर्गाच्या आयुष्यात उगवलेली नवी पहाटच होती. जी स्रियांना चूल आणि मूल या चाकोरीतून बाहेर घेऊन जाणार होती.




ज्योतीराव आणि सावित्रीबाई काळ्या मातीत घाम गाळून कष्ट करत.दुपारच्या जेवणाच्या वेळी आंब्याच्या झाडाखाली काळ्या आईची पाटी करुन ,वाळक्या काडीची पेन्सिल करुन ज्योतीराव सावित्रीबाईना शिक्षणाचे धडे देत होते. आपणही शिकावे ही सावित्रीबाईंची इच्छा पूर्ण होत होती.




एकदा सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्या दिशेने एक दगड भिरभिरत येऊन कानशिलावर आदळला.सावित्रीबाई कळवळल्या.हात कानशिलावर ठेवला. तो हात रक्ताने माखला.पण तशाही अवस्थेत त्या शाळेत येऊन पोहचल्या.आणि मुलींना आई शब्द शिकवायला सुरूवात केली. मुली 'आई' शब्द गुणगुणायला लागल्या तशा सावित्रीबाईच्या डोळ्यात अश्रूंनी दाटी केली.एक मुलगी म्हणाली "बाई, तुम्ही का रडता ? 


Myntra Big Fashion Festival...Best Offer... 50-80% Off  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                Buy Now 


तेव्हा सावित्रीबाई म्हणाल्या "नाही गं ! तुमच्या हाताच्या बोटांतून शब्दांचे धुमारे फुटताना पाहून मला आनंद वाटला.हे आनंदाश्रू आहेत.तुमच्या हातातील पेन्सिलीने स्रीजातीचं भाग्य लिहायला तुम्ही सुरूवात केली,आता अंधःकाराची राञ जाऊन संपूर्ण ज्ञानप्रकाश तुमच्या घरांना उजाळा देईल".




आज सावित्रीच्या लेकी आपले कर्तृत्व गाजवत आहेत.सर्व क्षेत्रात आपली क्षमता आणि ताकद सिद्ध करत आहेत.गावच्या सरपंचपदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री कर्तृत्वाचा झेंडा फडकला आहे. 




यामागे शिक्षणातून आलेले बळ आहे.हे बळ देण्याची किमया सावित्रीबाई यांनी केली.सावित्रीबाई म्हणजे अनेक आघाड्यावर कार्यरत झालेलं एक वादळ होतं .विधवाविवाह ,बालहत्या प्रतिबंधगृह ,स्रियांसाठी शाळा ,राञशाळा,अनाथ बालिकाश्रम,दुष्काळ निवारण ,प्लेगची साथ ,अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी खूप दैदिप्यमान कार्य केले.


Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now


सावित्रीबाईंनी केलेले कार्य महिला वर्गासाठी आणि समाजातील प्रत्येकासाठी प्रेरक आहे.


लेखक : - प्रसिद्ध स्तंभलेखक, शिक्षक व आत्मप्रेरणा या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक लक्ष्मण जगताप






1 comment: