Sunday, February 21, 2021

वाकी गावच्या "शरद दूध उत्पादक संस्थेला" बारामती तालुका दूध संघाचा 'सर्वाधिक दूध संकलन करणारी संस्था द्वितीय क्रमांक २०१९ - २० चा पुरस्कार' उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान...



बारामती, वाकी, दि.20 : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका दूध संघामार्फत दिला जाणारा "सर्वाधिक दूध संकलन करणारी संस्था द्वितीय क्रमांक २०१९-२०  चा पुरस्कार" वाकी गावातील "शरद दूध उत्पादक संस्था मर्यादित वाकी" या दूध संकलन संस्थेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मिळाला.




बारामती तालुक्यातील सहकारी दूध संघाची वाटचाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे चालू असते. बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.१५ लाख लिटर्स दूध संकलन होत असते. बारामती दूध संघातर्फे तालुक्यातील सर्वच प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा सुविधा, मुरघास प्रशिक्षण, आयुर्वेदिक उपचार पद्धत प्रशिक्षण दिले जाते.




वाकी गावातील शेतकरी वर्ग दूध उत्पादनात अग्रेसर आहे. वाकी गावातील शरद दूध उत्पादक संस्थेला बारामती तालुका दूध संघाकडून मिळालेल्या "सर्वाधिक दूध संकलन करणारी संस्था" पुरस्कारामुळे वाकी गावातील ग्रामस्थांकडून व  पंचक्रोशीतील  नागरिकांकडून संस्थेचे कर्मचारी  पदाधिकारी  व दूध उत्पादक  यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




" बारामती तालुका दूध संघाकडून आमच्या वाकी गावच्या शरद दूध उत्पादक संस्थेला मिळालेला हा पुरस्‍कार  म्हणजे दूध संस्थेसाठी प्रामाणिकपणे कष्ट करणारे कर्मचारी, पदाधिकारी आणि दूध उत्पादक यांचा हा सन्मान आहे. बारामती दूध संघाने वाकी गावच्या शरद दूध उत्पादक संस्थेच्या उत्कृष्ट कार्यासाठी पाठीवरती दिलेली ही पुरस्कार रुपी कौतुकाची थाप दूध संस्थेच्या भावी प्रगतशील वाटचालीसाठी उर्जा देणारी आहे." अशी प्रतिक्रिया वाकी गावचे हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना  न्यूजशी बोलताना दिली.




"बारामती तालुका दूध संघातर्फे सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध संकलन केंद्रांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात आमच्या वाकी गावातील शरद दूध संकलन केंद्राला द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व दूध उत्पादक , दूध संकलन केंद्राचे सर्व कर्मचारी तसेच मा. विलास सोपान जगताप व नितीन भैया जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन अशी प्रतिक्रिया वाकी गावचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी दिली.






" वाकी गावातील कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी वर्ग, शरद दूध उत्पादक संस्थेचे सर्व कर्मचारी, सर्व पदाधिकारी या सर्वांच्या कष्टाचा सन्मान बारामती दूध संघाकडून मिळालेल्या पुरस्काराच्या रुपात झालेला आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन. हा पुरस्कार म्हणजे दूध संस्थेच्या व वाकी गावच्या प्रगतशील वाटचालीसाठी मिळालेली एक प्रेरणा आहे, एक ऊर्जा स्त्रोत आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक अजित जगताप यांनी दिली.




बारामती तालुका दूध संघाकडून तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दूध संकलन संस्थांना दिला जाणारा हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी व  प्रगतशील  वाटचालीसाठी  पाठिंबा देणारा आहे.







No comments:

Post a Comment