पुणे, दि.4 : पुणे शहरातील विकासापासून वंचित राहिलेल्या आंबेगाव पठार या भागात नवीन जलवाहिनीचे काम सुरू झाले असून, पुणे महानगरपालिका स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी आंबेगाव पठार येथील सर्व्हे नंबर १६, १५ या ठिकाणी चालू असलेल्या नवीन जलवाहिनीच्या कामाची पाहणी केल्यानंतर येथील नागरिकांना नवीन जलवाहिनीचे काम चालू असताना जुन्या पाण्याची जोडणी तुटल्यास पुणे महानगरपालिकेतर्फे जोडून देण्यात येईल, संपूर्ण सहकार्य केले जाईल व काही अडचणी आल्यास संपर्क करण्याचे आव्हान स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी केले.
महानगरपालिके तर्फे समाविष्ट ११ गावांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून पाणी पुरवठा मुख्य विभागा तर्फे सर्वे नं १५/१६ येथील नागरिकांसाठी १८” पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या सुरू असलेल्या कामास महापालिकेच्या अधिकार्यांसमवेत युवराज रेणूसे यांनी भेट दिली व सदर पाण्याच्या लाईनच्या नियोजनाविषयी सविस्तर चर्चा केली.
तळजाई पासून सुरू झालेले लाईनचे काम हे चिंतामणी ज्ञानपीठ पर्यंत होणार आहे व त्यानंतर सर्वे नं १५/१६ मधील सर्व लेन मध्ये पाण्याच्या लाईन टाकण्यास सुरुवात होणार आहे.
सर्वे नं १५/१६ मधील नागरिकांबरोबरच आंबेगाव पठार वरील नागरिकांना देखील या पाण्याच्या लाईन मुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
"सदर ठिकाणी खोदकाम करत असताना जुनी पाण्याची कनेक्शन तुटत आहेत ती कनेक्शन महापालिकेतर्फे जोडून देण्यात येत आहेत,या कामासाठी नागरिकांकडे कोणी पैसे मागितले तर ८३९०७८६६७६ या नंबर वर संपर्क करावा." अशी प्रतिक्रिया स्वीकृत नगरसेवक युवराज रेणूसे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
आंबेगाव पठार येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. या जलवाहिनीचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर आंबेगाव पठार येथील नागरिकांची पाणी समस्या सुटायला नक्कीच मदत होईन.
No comments:
Post a Comment