पुणे, दि.१ : वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सामाजिक संघटना छावा स्वराज्य सेना यांच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान इतिहासातील प्रमुख घडामोडींना नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून खास उजाळा देऊन इतिहासाचा प्रसार करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न करणाऱ्या "दिनदर्शिका २०२१" चे प्रकाशन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले.
छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील)यांच्या व प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष श्री आरिफ शेख, प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी सौ शितलताई हुलावळे,प्रदेश संघटक श्री.विवेक अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली,पुणे जिल्हा,पुणे शहर कार्यकारिणीने आज छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य वतीने करण्यात आलेल्या, ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देणारी "दिनदर्शिका २०२१" प्रकाशनानंतर तरुण पिढीच्या, शिवभक्तांच्या, अनेक लोकांच्या पसंतीस उतरली.
छावा स्वराज्य सेनेने केलेल्या दिनदर्शिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच त्या काळातील ज्या ज्या सरदारांनी अथवा मावळ्यांनी जो काही इतिहास घडविला त्या सगळ्या घडामोडी तारखांनुसार मांडण्याचा प्रयत्न करून इतिहास कसा लोकांपर्यंत पोहचविता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या संघटनेने केला आहे. अशी प्रतिक्रिया छावा स्वराज्य सेना संस्थापक, अध्यक्ष राम घायतिडक पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ही दिनदर्शिका पाहिल्यावर त्यांना ही आगळी वेगळी संकल्पना आवडली. युगपुरुष शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. छावा स्वराज्य सेनेने ऐतिहासिक घडामोडींना उजाळा देण्याचा चांगला प्रयत्न या दिनदर्शिकेच्या माध्यमातून केला अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.
सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन होत असताना छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक(पाटील),प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पडवळ,कार्याध्यक्ष अरीफभाई शेख,प्रदेश संघटक विवेक अत्रे,प्रदेश महिला अध्यक्षा सौ.शितलताई हुलावळे , जिल्हा कार्यकारिणी, शहर कार्यकारिणी तसेच छावा स्वराज्य सेनेचे बरेच सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment