Thursday, February 25, 2021

बारामती तालुक्यातील "वाकी" गावच्या सरपंचपदी किसन बोडरे तर उपसरपंचपदी ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप यांची बिनविरोध निवड...

 


बारामती, वाकी, दि.२५ : - बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किसन बोडरे तर उपसरपंचपदी ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. कांबळे यांनी दिली.



बारामती तालुक्यातील वाकी गावाने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून गावचा एकोपा टिकवून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगले पाऊल टाकले.





वाकी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इंद्रजीत भुजंग जगताप, किसन दशरथ बोडरे, हनुमंत मानसिंग जगताप, सुधीर दिलीप गायकवाड, सुनिता लक्ष्मण जगताप, निकिता अनिल भंडलकर, वर्षाराणी सुनील जगताप, शालन विठ्ठल जगताप, कल्पना गोरख जगताप यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.





" वाकी गावातील ग्रामस्थांनी, नवनियुक्त सदस्यांनी व जेष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार "असल्याची  प्रतिक्रिया वाकी गावचे नवनियुक्त सरपंच किसन बोडरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.




" वाकी गावातील ग्रामस्थांनी दिलेला बिनविरोध निवडीचा कौल  गावातील एकोपा दाखवणारा व गावच्या विकासासाठी दाखवलेला विश्वास आम्हा सर्वांनाच ऊर्जा देणारा आहे. गावासाठी चांगले विकास कार्य करून वाकी गावाला विकासाच्या एका चांगल्या उंचीवर घेऊन जाण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया वाकी गावचे ज्येष्ठ नेते  व नवनियुक्त उपसरपंच हनुमंत जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





" वाकी गावचे बिनविरोध निवड झालेले सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मनापासून अभिनंदन, वाकी गावच्या सर्वांगीण विकासासाठी हे सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करून गावासाठी एकजुटीने चांगलं विकास कार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे." अशी प्रतिक्रिया वाकी गावचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





" वाकी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून जो विश्वास दाखवला आहे तो सार्थकी लावून नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवून एक चांगल्या प्रकारचं विकास कार्य गावामध्ये करून आदर्श गाव निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.





वाकी गावातील सुशिक्षित तरुण वर्गही उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकास कार्यासाठी विशेष लक्ष घालून पाठिंबा देत असतो.

No comments:

Post a Comment