Tuesday, March 30, 2021

"फलटण - लोणंद - पुणे रेल्वे सेवेचा" केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाला शुभारंभ; जाणून घ्या 'फलटण - पुणे रेल्वेचे' वेळापत्रक...

 


फलटण, दि.30 : - केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून  फलटण ते पुणे या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून फलटण - लोणंद - पुणे रेल्वेचा शुभारंभ केला. 




पुणे-लोणंद-फलटण दरम्यान डेमु रेल्वे सेवा आज मध्य रेल्वे कडून सुरू करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम मार्गी लागल्याने नागरिकांना मनस्वी समाधान मिळाले. आजपासून सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्व प्रवाश्यांसाठी हा नवीन प्रगतीचा मार्ग खुला झाला असून याचा फायदा शेतकरी, कार्यालयीन लोक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य लोकांना होणार आहे.

 



खासदार प्रकाश जावडेकर,( पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार) यांनी आज  नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

 



या कार्यक्रमा प्रसंगी  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील;  माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीनिवास पाटील,  आमदार चंद्रकांत  पाटील, आमदार दीपक चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, फलटण नगराध्यक्ष  श्रीमती निता नेवासे यासह इतर मान्यवर या प्रसंगी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाले. 




सुनीत शर्मा, (अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड)  पुनेंदू मिश्रा सदस्य (परीचालन व व्यवसाय विकास -ओ अँड बी डी), रेल्वे बोर्ड, नवी दिल्लीहून सामील झाले.  




छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  संजीव मित्तल यांनी स्वागत केले.





खासदार प्रकाश जावडेकर यावेळी बोलताना म्हणाले  " रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री माननीय श्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसतात.  बायो-टॉयलेट्सच्या परिचयामुळे ट्रॅक आणि स्टेशन प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत.  स्वच्छ भारत यांचे हे एक आदर्श उदाहरण आहे.




रेल्वेमंत्री म्हणून श्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात आयआरसीटीसीवरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकिटे जलद मिळण्यास मदत झाली असेही त्यांनी नमूद केले.  सर्वोच्च मानकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित रेल्वेमार्ग क्रॉसिंगचे उच्चाटन, विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण,  रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था व विकासाला चालना मिळाली आहे.  ५००० हून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वर्ल्ड वाईड वेबवर जाता येईल आणि त्यांचे ज्ञानाचे क्षितिज उघडले जाईल."



 फलटण-पुणे डेमू ट्रेन : पार्श्वभूमी : -


फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल.


रेल्वे सर्वात स्वस्त वाहतुकीचा मार्ग आहे आणि पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे.


यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टीवीटी मिळेल.


खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला व अथक प्रयत्नांना मोठे यश आले आहे.  सातारा व माढा मतदारसंघासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने खूप मोठी भेट दिली आहे.


या भव्य शुभारंभ कार्यक्रमाचे आज फलटण रेल्वे स्टेशन येथे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा हिरवा झेंडा दाखवत या प्रगतीच्या मार्गाचे प्रस्थान केले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माढाचे खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय रेल्वे अधिकारी तसेच राज्यातील व सातारा जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी उपस्थितीत होते.


फलटण-पुणे रेल्वेचे वेळापत्रक : - 


31 मार्च पासून नियमितपणे सुरू होणारी सेवा खालीलप्रमाणे असेल


1) 01435 DEMU पुण्याहून सकाळी 5.50 ला निघून रेल्वे लोणंद येथे 7.50 ला पोहोचेल त्यानंतर 8.00 वाजता लोणंदहून निघून सकाळी 9.35 वाजता फलटणला पोहोचेल.


2) 01434 सकाळी 11.00 वाजता फलटणहून निघेल आणि दुपारी 12.20 ला लोणंद येथे पोहोचेल.


3)  01433 दुपारी 3.00 वाजता लोणंदहून निघेल आणि 4.20 वाजता फलटणला पोहोचेल


4) 01436 संध्याकाळी 6.00 वाजता फलटणहून निघेल आणि संध्याकाळी 7.10 वाजता लोणंदला पोहोचेल. 7.20 ला लोणंदहून निघून पुण्यात रात्री 9.35 ला पोहोचेल.


ग्रामीण भाग व पुणे शहराला जोडणारी ही रेल्वेसेवा नक्कीच भविष्यात विकासाची नवीन दिशा नागरिकांसाठी घेऊन येईल.




Monday, March 29, 2021

महाराष्ट्राच्या "या" ध्येयवादी नेत्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केले परखड भाष्य; "मित्रांनो राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका"...



मुंबई, दि. 29 : - महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडत असतात. विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षाची ध्येयधोरणे प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कामाची जाणीव असणारे फार कमी नेते आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात. 




 "मित्रांनो राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केले.




राजकारणाचा स्तर व आजच्या सोशल मीडियाच्या युगातील कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सांगताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की "राजकारण करताना वैचारिक विरोध असावा, वैयक्तिक नव्हे. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावत चालला आहे. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा आहे. परंतु सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगात नविन पिढी ही पक्ष , आवडता नेता यांच्यासाठी लढताना अगदी वैयक्तिक पातळीवर घसरत आहे."




राजकीय कार्यकर्त्यांना मौलिक सल्ला देताना बाळा नांदगावकर म्हणाले की  " मित्रांनो, राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासाठी वैयक्तिक संबंध पणाला लावत आहात तेच अनेकदा "अभद्र आघाडी" करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणतात.




" तसेच कार्यकर्त्यांनी राजकारणात जरूर यावे परंतु आधी आपली पारिवारिक जवाबदारी कशी पार पडेल हे बघावे. कारण कुटुंब हिच पहिली प्राथमिकता असायला हवी.

 
ज्या कार्यकर्त्याच्या जिवावर नेता घडतो त्याच्याबाबद्दल असलेली आपुलकीची ही भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली.




महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणारे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन करत असतात.


Sunday, March 28, 2021

"पुणे शहरात 'कोरोनाचा उद्रेक' आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा ४४०० पार;" कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने चिंता वाढली, २८ जणांचा मृत्यू...


पुणे, दि. 28 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक  झालेला दिसून येत आहे. आज रविवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 4,426 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.




पुणे शहरात 33,123 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 2107 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 28 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.




पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी,जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची धडकी भरवणारी संख्या पाहून महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर दिसत आहे.




  पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.




'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'



Monday, March 22, 2021

" पुणे - वाकड पोलिसांची दमदार कामगिरी;" 'दहा वर्षांपासून पिंपरी येथील बेपत्ता असलेल्या तरुणीचा 'तिच्या प्रियकराने' केलेल्या खुनाचे प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना मिळाले यश'...



पुणे, पिंपरी, दि.२२ : - बेपत्ता व्यक्तींचा शोध लावणे हे नेहमीच पोलिसांसाठी आव्हानात्मक काम असते. पुणे - पिंपरी येथील वाकड पोलिसांनी "पिंपरी येथील दहा वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केलेले प्रकरण उघडकीस आणण्यास यश मिळवुन चांगली कामगिरी केली."




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारी फिर्यादी महिला सविता सत्यवान लांडगे (राहणार बलदेव नगर, पिंपरी,वय वर्ष 45) यांनी त्यांची मुलगी चांदणी सत्‍यवान लांडगे (वय वर्ष 22) ही किशोर लक्ष्मण घारे (राहणार डोणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे) याच्या बरोबर लग्न करायचे आहे असे म्हणून घरातून निघून जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार पिंपरी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.




सदर बेपत्ता तरूणीच्या प्रकरणाबाबत वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना त्यांच्या गोपनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.


सदर बेपत्ता झालेल्या तरुणीचा प्रियकर किशोर घारे सन 2014 पासून डोणे येथील  राहत्या घरातून निघून गेल्याने हरविल्याबाबतची, बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.


पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील हे सदर बेपत्ता तरुणीच्या व बेपत्ता तरुण किशोर घारे यांच्याबाबत अधिकची माहिती काढत असतानाच, त्यांना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की "दोन महिन्यापासून सदर मुलीचा प्रियकर किशोर घारे हा मारुंजी गावात कोठेतरी भाजीचा व्यवसाय करत आहे." त्यानुसार अधिक माहिती घेऊन पोलिसांनी सापळा रचून किशोर घारे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर बेपत्ता तरुणी बाबत चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची व असंबंध उत्तर दिल्याने त्याने सदर तरुणी बाबत घातपात केल्याचा संशय आला. त्यामुळे त्याच्याकडून पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यावर त्याने सदर तरुणीचा दहा वर्षापूर्वी खून केला असल्याचे कबुली दिली.




" सदर आरोपी किशोर घारे यास पुढील कारवाई करता पिंपरी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पिंपरी पोलीस ठाणे येथे गु.र.न. १९१/२०२१ भादंवि कलम ३०२,३६४,२०१  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी किशोर लक्ष्मण घारे यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली दिली.


पोलीस सदर गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना, मिळालेली माहिती अशी की, 'आरोपी किशोर घारे याने प्रेमसंबंधातून बेपत्ता तरुणीबरोबर ठेवलेल्या शारीरिक संबंधातून ती गर्भवती राहिल्याने तिने लग्न करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे तिचा खून केला असल्याचे निष्पन्न होत आहे.' दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरी पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.




सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उपायुक्त परिमंडळ - 2 आनंद भोईटे, साहाय्यक पोलीस आयुक्त - वाकड विभाग - श्रीधर जाधव, वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे)  संतोष पाटील, तपास पथकाचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक  एस. एम. पाटील, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर,  बापूसाहेब धुमाळ, दीपक भोसले, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, आतिश जाधव, नितीन गेंगजे यांच्या पथकाने केली.


Saturday, March 20, 2021

"पुणे शहरात 'कोरोनाचा उद्रेक' आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा ३१०० पार;" कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने चिंता वाढली, १६ जणांचा मृत्यू...



पुणे, दि.20 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक  झालेला दिसून येत आहे. आज शनिवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 3111 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.




पुणे शहरात 20,889 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 1094 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 16 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.




पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.





पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.



'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'





Wednesday, March 17, 2021

"पुणे शहरात आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा २५८० पार;" चिंता वाढली, ११ जणांचा मृत्यू...

 


पुणे, दि.१७ : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. आज बुधवारी पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंता वाढवणारी, मोठी वाढ झाली आहे. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 2587 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.





पुणे शहरात 15,032 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 769 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात अकरा लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.





पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.





पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध केलेला आहे.


लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.


अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.


पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडावा. असे नवीन निर्बंध लागू केले आहेत.





पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.



Saturday, March 13, 2021

"पुरंदर तालुक्यातील 'तोंडल' येथे बागायती गहू पिक कापणी प्रयोग;" विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) बसवराज बिराजदार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन....

 



पुरंदर, तोंडल, दि.१२ : - राज्यातील पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी तसेच पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात उत्पादनाचा अंदाज घेऊन, विमा संरक्षित रक्कम बाबत केंद्र व राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागामार्फत विविध पिकांचे पिक कापणी प्रयोग घेण्यात येत असतात. असाच प्रयोग पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे घेण्यात आला.





"पिक कापणी प्रयोगासाठी रॅन्डम पद्धतीने तालुका, गाव,शेतकरी अशी निवड केली जाते. त्याअनुषंगाने मौजे तोंडल येथे  सचिन तानाजी वणवे या शेतकऱ्याच्या शेतावर गहू पिकाची पिक कापणी प्रयोग घेण्यात आला."




 यावेळी विभागीय कृषी सहसंचालक (पुणे)  बसवराज बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली  पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय तोंडल येथे सरपंच शरद वणवे व ग्रामस्थांनी कृषी अधिकाऱ्यांचे स्वागत केले.




यावेळी मंडळ कृषी अधिकारी संजय फडतरे, कृषी पर्यवेक्षक संदीप कदम, राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक स्वाति यादव, संदेश समगीर, विमा प्रतिनिधी अमोल धुमाळ तसेच तोंडलचे सरपंच शरद वणवे, उपसरपंच निखिल शेडगे व चेतन वणवे, शामकांत वणवे, महादेव वणवे, अश्रू वणवे, संगीता वणवे, सुनिता नागरगोजे, ज्ञानेश्वर कुरपड हे उपस्थित होते.




"पिकांच्या हेक्‍टरी सरासरी उत्पादनाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळस्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्‍टरी उत्पादनाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात." अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संदीप कदम व कृषी पर्यवेक्षक  राजाराम शिंदे (सांख्यिकी पुणे) यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




कृषी विभागातील  अधिकारी  व कर्मचारी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकासंदर्भात, वेगवेगळे शासकीय योजना संदर्भात मार्गदर्शन करत असतात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) बसवराज बिराजदार यांनी केले.







Thursday, March 11, 2021

"असे श्रद्धा ज्याचे उरी, त्यासी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी" - सृजनशील लेखक, पत्रकार शिवदास शितोळे यांचा "श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भक्तीचा महासागर" विशेष सदरातील खास लेख...




असे श्रद्धा ज्याचे उरी, त्यासी दिसे श्रीनाथ जोगेश्वरी....


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाने व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला हा पुणे जिल्हा, आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या संस्काराने समृद्ध झालेला हा परिसर सबंध विश्वाला वंदनीय आहे. आणि याच पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, श्रीक्षेत्र वीर हे गाव भक्तीचे आणि शक्तीचे प्रतीक म्हणून उभ्या महाराष्ट्राला अवगत आहे. 





श्री पूर्ण गंगेच्या काठी असलेले आणि श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले वीरगाव आणि वीर चा म्हस्कोबा म्हटले की कपाळाला गुलाल, गळ्यात देवाची दोरी असं समीकरण ठरलेलं असतं.





खरंतर छत्रपती शिवाजी महाराज कि.. म्हटलं कि.. आपल्या तोंडून आपसूकच जय... येतं अगदी तसंच सवाई सर्जाचं म्हणताच तोंडातून आपसूकच चांगभलं आल्याशिवाय राहत नाही.





 तसं पाहिलं तर हे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज काळभैरवनाथ यांचे अवतार म्हणूनच की कोण्या कवींनी म्हणून ठेवले आहे. 

"खोट्या भ्रष्ट जनावरी, काळभैरव कोप करी,
 अहंकार जो करी, श्रीनाथ त्यावर कोप करी." 

तसं पाहिलं तर कोणीही मनुष्य पूर्ण नाही. प्रत्येक जण काम, क्रोध, द्वेष, मत्सर आणि अहंकाराने ग्रासलेला आहे.





परंतु आपल्याला आत्तापर्यंत अनेक संत, महंत, महात्मे सांगून गेले की जर तुम्हाला परमेश्वराची कृपा व्हावी असे वाटत असेल तर प्रथम तुम्ही नम्र व्हा. सात्विक आहार घ्या. 





सात्विक विचारांच्या लोकांचाच सहवास मिळवा. कानाने चांगले ऐका. डोळ्यांनी चांगले पहा. मनामध्ये सदैव पवित्र आणि निर्मळ विचार ठेवा.





आणि तुमच्या मनाला अहंकाराचा वाराही लागू देऊ नका. पण आपण असे वागतो का. तर मुळीच नाही. आणि म्हणूनच प्रत्येकाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे. 




कधीतरी शांतचित्ताने स्वतःमधील दुर्गुण शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करण्याची गरज आहे. आज अनेक जण पैशाच्या मागे धावत सुटले आहेत. जितका पैसा जास्त मिळेल तेवढीच त्यांची भूक जास्त वाढत आहे. कोणी खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे. स्वतःबद्दल आणि समाजाबद्दल त्याला कुठलाच विचार करायलाच वेळ नाही.





आणि म्हणूनच आज श्रीनाथांच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. कारण देव भक्तीचा भुकेला असतो. त्याला हवे असते तुमचे निर्मळ मन. त्याला हवे असते तुमची प्रेमळ ओढ, प्रेमळ भावना.




 खरंतर संतांनी भक्तीच्या तीन पायर्‍या सांगितल्या आहेत.  पहिली पायरी मूर्तिपूजा की जी आपण सर्वजण करतो. दुसरी पायरी मानव पूजा ज्यांचा अनेकांना गंध नाही की, ज्या मानव पूजेत आपल्याला परमेश्वर दुसऱ्या मनुष्य रूपात दिसायला लागतो. 





पण आपण काम, क्रोध, द्वेष मत्सर आणि अहंकाराने  एवढे भरलेलो असतो की आपल्याला दुसऱ्या पायरीवर भक्तीची कधीच प्रचिती येत नाही. त्यामुळे तिसऱ्या पायरीला आणि आपल्या मरेपर्यंत संबंध येतच नाही. आणि ती भक्तीची तिसरी पायरी म्हणजे स्वतःमध्येच देवत्वाची अनुभूती अनुभवणे. 





तर असो असा हा भक्तीचा मार्ग प्रत्येकाने आपल्या आयुष्यात चालण्याचा प्रयत्न करावा. आणि आपणच आपला उद्धार करून घ्यावा. आणि तशी सुबुद्धी श्रीनाथांनी प्रत्येकाला द्यावी हीच श्रीनाथ चरणी प्रार्थना.


लेखक : - दैनिक पुढारीचे निर्भीड, अभ्यासू पत्रकार, सर्जनशील कवी, प्रतिभावंत लेखक शिवदास शितोळे.