पुणे, दि.१० : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. आज बुधवारी पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित १३५२ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे'.
पुणे शहरात ७७१९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 646 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेले आहे.
पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरातील निर्बंध वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ पुणे शहरातील कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी विशेष लक्ष घालून, अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment