Sunday, March 7, 2021

" उघड दार देवा आता अंत पाहू नको " सृजनशील कवी, लेखक, पत्रकार शिवदास शितोळे यांची "श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या भक्तीचा महासागर" रविवार विशेष सदर.. खास कविता...



" उघड दार देवा आता अंत पाहू नको "

उघड दार देवा आता अंत पाहू नको...
तुझ्या माझ्या नात्यांमध्ये दुरावा आता नको...


कसं सांगू देवा तुला विरह आता सहन होत नाही...
मी तुझा बाळ आणि तू माझी आई...
रडून रडून थकले डोळे, तरी तुला का पान्हा फुटत नाही...





लांबूनच माझ्यावरती कटाक्ष टाकू नको...
उघड दार देवा आता अंत पाहू नको...


देवा कधी संपेल आयुष्य कोणी सांगू शकणार नाही...
आता आयुष्याचा अंत कोणी थांबवू शकणार नाही...




सोने-नाणे नको मला,  इंद्राचेही पद नको...
एकदा तरी दर्शन दे रे देवा, तुझ्याशिवाय कुठला छंद मला नको...
उघड दार देवा आता अंत पाहू नको...






ऐकलं होतं देवा तू राक्षस खूप मारले होते...
त्यावेळच्या लोकांना देवा तूच तर तारले होते...


आत्ताच्या कोरोना नावाच्या राक्षसाला कधी मारणार आहेस...
कलियुगातील या माणसाला कधी तारणार आहेस...





तुझ्या माझ्या भेटीची वेळ आता लांबवु नको...
उघड दार देवा आता अंत पाहू नको....


कवी : - दैनिक पुढारीचे अभ्यासू, निर्भीड पत्रकार, सृजनशील लेखक शिवदास शितोळे





No comments:

Post a Comment