Saturday, March 13, 2021

"पुरंदर तालुक्यातील 'तोंडल' येथे बागायती गहू पिक कापणी प्रयोग;" विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) बसवराज बिराजदार यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन....

 



पुरंदर, तोंडल, दि.१२ : - राज्यातील पिकांच्या उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी तसेच पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीच्या काळात उत्पादनाचा अंदाज घेऊन, विमा संरक्षित रक्कम बाबत केंद्र व राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारच्या सांख्यिकी विभागामार्फत विविध पिकांचे पिक कापणी प्रयोग घेण्यात येत असतात. असाच प्रयोग पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे घेण्यात आला.





"पिक कापणी प्रयोगासाठी रॅन्डम पद्धतीने तालुका, गाव,शेतकरी अशी निवड केली जाते. त्याअनुषंगाने मौजे तोंडल येथे  सचिन तानाजी वणवे या शेतकऱ्याच्या शेतावर गहू पिकाची पिक कापणी प्रयोग घेण्यात आला."




 यावेळी विभागीय कृषी सहसंचालक (पुणे)  बसवराज बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली  पिक कापणी प्रयोग घेण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय तोंडल येथे सरपंच शरद वणवे व ग्रामस्थांनी कृषी अधिकाऱ्यांचे स्वागत केले.




यावेळी मंडळ कृषी अधिकारी संजय फडतरे, कृषी पर्यवेक्षक संदीप कदम, राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक स्वाति यादव, संदेश समगीर, विमा प्रतिनिधी अमोल धुमाळ तसेच तोंडलचे सरपंच शरद वणवे, उपसरपंच निखिल शेडगे व चेतन वणवे, शामकांत वणवे, महादेव वणवे, अश्रू वणवे, संगीता वणवे, सुनिता नागरगोजे, ज्ञानेश्वर कुरपड हे उपस्थित होते.




"पिकांच्या हेक्‍टरी सरासरी उत्पादनाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्‍चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्‍चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळस्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्‍टरी उत्पादनाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात." अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संदीप कदम व कृषी पर्यवेक्षक  राजाराम शिंदे (सांख्यिकी पुणे) यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




कृषी विभागातील  अधिकारी  व कर्मचारी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकासंदर्भात, वेगवेगळे शासकीय योजना संदर्भात मार्गदर्शन करत असतात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) बसवराज बिराजदार यांनी केले.







No comments:

Post a Comment