माजलगाव, दि.९ : - महाराष्ट्रात पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या न्याय - हक्कांसाठी नेहमी प्रामाणिकपणे लढत असते. त्यासोबतच समाजात नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील दुर्लक्षित घटकाला मदत करण्याचे काम करत असते.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची संघटना आहे. चौथ्या स्तंभाच्या हक्काचं रक्षण करणे, गरजू पत्रकारांना आर्थिक मदत करणे आदि कामं परिषद करते. परिषदेच्या मार्फत गेल्या दोन वर्षात पत्रकारांना जवळपास ५५ लाखांची मदत करण्यात आली आहे.
एका विशिष्ट वर्गाची ही संस्था असल्याने त्या वर्गासाठी काम करणे हे परिषदेचे ध्येय असले तरी अनेकदा आपल्या कार्यक्षेत्रा बाहेरच्या लोकांना देखील परिषदेने मदत केलेली आहे..
"माजलगाव येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी श्रीमती पार्वतीबाई शंकरराव मुळे यांच्या कुटुंबाची झालेली वाताहत आणि सध्या त्यांची सुरू असलेली परवड वाचून आणि पाहून प्रत्येकाचे मन व्यथित होईल. कुटुंबात 88 वर्षांच्या पार्वतीबाई आणि 60 वर्षाची त्यांची विधवा मुलगी यांच्या शिवाय कोणीच नाही.
स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणाऱ्या पेन्शनवर त्यांची कशी तरी उपजिविका सुरू असतानाच पार्वतीबाई पडल्या.. मांडीचे हाड मोडले.दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली.. त्यांच्याकडे ना सरकारचे लक्ष, ना समाजाचे, ना नातेवाईकांचे.. एकाकी माय-लेकिंना काही मदत करावी अशी विनंती माजलगावच्या पत्रकारांनी परिषदेला केल्यामुळे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मुळे माय-लेकिंना 11,000 रूपयांची मदत देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी केली आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली.
"पार्वतीबाई मुळे यांची व्यथा समोर आल्यानंतर अनेकांनी मदत देण्याची विचारणा केली होती. ज्या कोणाला या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करायची आहे त्यांच्यासाठी खालील प्रमाणे बॅंक डिटेल देत आहोत .पार्वतीबाई यांना आर्थिक आणि वैद्यकीय मदतीची गरज आहे..
नाव :पार्वतीबाई शंकरराव मुळे रा. माजलगाव.
बॅंकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा माजलगाव
खाते क़मांक :52179662001
IFSC coad:sbin0020035
अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार व अखिल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिली.
समाजातील दुर्लक्षित, पीडित घटकाच्या मदतीला सर्वांनी धावून आले पाहिजे.
No comments:
Post a Comment