Monday, March 29, 2021

महाराष्ट्राच्या "या" ध्येयवादी नेत्याने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केले परखड भाष्य; "मित्रांनो राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका"...



मुंबई, दि. 29 : - महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक घडामोडी घडत असतात. विविध पक्षांचे कार्यकर्ते पक्षाची ध्येयधोरणे प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक कामाची जाणीव असणारे फार कमी नेते आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतात. 




 "मित्रांनो राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना व्यक्त केले.




राजकारणाचा स्तर व आजच्या सोशल मीडियाच्या युगातील कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सांगताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की "राजकारण करताना वैचारिक विरोध असावा, वैयक्तिक नव्हे. दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर हा खालावत चालला आहे. आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वारसा आहे. परंतु सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगात नविन पिढी ही पक्ष , आवडता नेता यांच्यासाठी लढताना अगदी वैयक्तिक पातळीवर घसरत आहे."




राजकीय कार्यकर्त्यांना मौलिक सल्ला देताना बाळा नांदगावकर म्हणाले की  " मित्रांनो, राजकीय विरोध असावा परंतु वैर नसावे, तुम्ही तुमच्या मित्र, नातेवाईक यांच्यात दुरावा येऊ देऊ नका. तुम्ही ज्यांच्यासाठी वैयक्तिक संबंध पणाला लावत आहात तेच अनेकदा "अभद्र आघाडी" करून कार्यकर्त्यांना अडचणीत आणतात.




" तसेच कार्यकर्त्यांनी राजकारणात जरूर यावे परंतु आधी आपली पारिवारिक जवाबदारी कशी पार पडेल हे बघावे. कारण कुटुंब हिच पहिली प्राथमिकता असायला हवी.

 
ज्या कार्यकर्त्याच्या जिवावर नेता घडतो त्याच्याबाबद्दल असलेली आपुलकीची ही भावना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली.




महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खंबीरपणे साथ देणारे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांना अमूल्य असे मार्गदर्शन करत असतात.


No comments:

Post a Comment