Wednesday, March 17, 2021

"पुणे शहरात आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा २५८० पार;" चिंता वाढली, ११ जणांचा मृत्यू...

 


पुणे, दि.१७ : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. आज बुधवारी पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंता वाढवणारी, मोठी वाढ झाली आहे. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 2587 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.





पुणे शहरात 15,032 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 769 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात अकरा लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.





पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.





पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध केलेला आहे.


लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.


अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.


पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय निवडावा. असे नवीन निर्बंध लागू केले आहेत.





पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.



No comments:

Post a Comment