Wednesday, March 10, 2021

"श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची 46 वर्ष प्रामाणिकपणे आमच्या कुटुंबाने केलेली भक्ती आणि नाथांच्या कृपाआशीर्वादाने आमच्या कुटुंबाची झालेली प्रगती" - बारामतीचे यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते शरद पांडुरंग पवार यांचा भक्तीचा अनुभव सांगणारा खास लेख...



काशीखंडाचे "काळभैरवनाथांचे अवतार श्रीनाथ म्हस्कोबा महाराज" यांची महती खूप मोठी आहे, आणि भक्त  संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. आयुष्यात  कितीही संकटे आली तरी  वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे  दर्शन घेतल्यानंतर  संकटांशी लढण्याचे एक मोठं बळ मिळतं. आमची आत्या वीरची धुमाळांची असल्यामुळे 1975 पासून वीरला आमचे संपूर्ण कुटुंब देवदर्शनासाठी, भक्तीभावाने जाणे-येणे चालू झाले.



माझे वडील पांडुरंग पवार शिक्षक होते. त्यांची वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांवर खूप मोठी श्रद्धा होती. त्यामुळेच जोपर्यंत ते होते तोपर्यंत त्यांनी एकही अमावस्या दर्शनवारी चुकवली नाही. मागील 46 वर्षात आमच्या कुटुंबाने एकही अमावस्या वारी चुकवली नाही. आमचे कुटुंब निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे देवाची भक्ती करत आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला काहीच कमी पडत नाही.



देवाच्या कृपेने हळू हळू आमच्या कुटुंबाची प्रगती होत गेली. मी व माझ्या भावंडांनी वीरला देवाला अमावस्या व यात्रेला दर्शनासाठी येण्यासाठी कधीच चुकवले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करायचे ठरवले. "कुठला व्यवसाय करायचा झाला तरी पहिले वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांना प्रसाद लावायचा, प्रसाद उजवा आला तरच तो व्यवसाय करायचा." असा सल्ला माझे वडील आम्हाला नेहमी द्यायचे.




आमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात  श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादाने झाली. 1993 ते 2003 पर्यंत सलग दहा वर्ष "शरद इलेक्ट्रोप्लेटिंग" या नावाने आमचा व्यवसाय यशस्वीपणे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या आशीर्वादामुळे करू शकलो. 



सुरवातीच्या काळात अडचणी आल्या तरी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. त्यामुळे कुठल्याच  गोष्टीची कमी पडली नाही. दिवसेंदिवस आमच्या व्यवसायाची प्रगती होत गेली.




पुढे आमच्या व्यवसायाला श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे नाव द्यायचे ठरले, मग "श्रीनाथ पावडर कोटिंग" या नावाने व्यवसाय सुरू केला आणि तो 2003 ते 2021 पर्यंत यशस्वी चालू आहे. वीरला अमावस्येला, यात्रेला देवाच्या दर्शनासाठी आले की मन अगदी प्रसन्न होऊन जाते. आयुष्याला एक नवीन ऊर्जा मिळते.




श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या चरणी दर्शनासाठी आल्यानंतर जी अनुभूती मिळते ती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. श्रीनाथांच्या  कृपेने "श्रीनाथ इंजिनियर्स" हा नवीन व्यवसाय सुरू केला. 




तो यशस्वीपणे  आज  चालू आहे. या व्यवसायात माझे बंधू रुपेश पवार खूप चांगला हातभार लावत आहेत.






 "श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर नाथ महाराज भक्ताला काहीच कमी पडू देत नाही याची प्रचिती आमच्या कुटुंबाला वेळोवेळी येत होती आणि आजही येत आहे." कुठल्याही महिन्यातली अमावस्या जवळ आली की आमच्या कुटुंबाला ओढ लागायची श्रीनाथांच्या दर्शनाची. 





2016 - 17 साली आम्ही काही मित्रांनी मिळून जमीन खरेदी-विक्री व बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले. नवीन कामाला सुरुवात केली. श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आम्हाला प्रत्येक नवीन व्यवसायात चांगली बुद्धी आणि आशीर्वाद देत आहेत.





"श्रीनाथ डेव्हलपर्स" या नावाने चालू केला बांधकाम व्यवसाय, आज "श्रीनाथ मॅजिक होम" या दुसऱ्या नावानेही यशस्वीपणे हा व्यवसाय चालू आहे. "श्रीनाथांची कृपा, आमच्या वडिलांची भक्ती व आमची श्रद्धा यामुळे श्रीनाथांनी आम्हाला भरभरून दिले. देवाचा महिमा खूप मोठा आहे. "




आज मी एक उद्योजक, बिल्डर, समाजात प्रतिष्ठित स्थान ही सर्व देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेने घरदार, गाडी, कारखाना, जमीन, शेती इतके भरभरून देवाने आम्हाला दिले आहे की आज सगळी सुख आमच्या घरात नांदतात.




पैसा तर सगळेच कमावतात. व्यवसायात प्रगती ही अनेक जण करतात. परंतु कुटुंबातील सुख, समाधान, शांती, आरोग्यदायी वातावरण फार महत्वाचे आहे आणि श्रीनाथांच्या कृपेने आम्हाला काहीच कमी नाही. "देवाची भक्ती प्रामाणिकपणे केली तर देव काही कमी पडू देत नाही व अडचणी ही येऊ देत नाही. याचा अनुभव मला अनेक वेळा आला आहे."




आमच्या बांधकाम व्यवसायातील एका प्रोजेक्टला जोगेश्वरी पार्क असे नाव देण्यात आले आहे. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे नाव व कृपा आशीर्वाद  आमच्या प्रत्येक व्यवसायासाठी  असावा असे आमच्या कुटुंबाला मनापासून वाटते.





"वीरचे मंदिर असेल, घोडेउड्डाण मंदिर असेल तिथे गेल्यानंतर मनाला जो आनंद मिळतो तो अवर्णनीय." यात्रेतील छबिना, देवाची भाकणूक, देवाचा लग्न सोहळा, मारामारी उत्सव (रंगाचे शिंपण) हे सारे उत्सव मनाला आनंद देणारे आणि उर्जा देणारे आहेत.




देवाच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला शेतीव्यवसायातही  खुप चांगली प्रगती करता आली. "आयुष्यात खूप चढ-उतार आले. अडचणी आल्या, पण देवाचे नाव घेतले कि सर्व अडचणी, अडथळे दूर झाले." श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे माझे कुटुंब सुखी आणि समाधानी आहे. 

सवाई सर्जाचं चांगभलं....
श्रीनाथ म्हस्कोबाच्या नावानं चांगभलं...


लेखक : - बारामती येथील यशस्वी उद्योजक, श्रीनाथ भक्त - शरद पांडुरंग पवार


No comments:

Post a Comment