पुणे, दि.20 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला दिसून येत आहे. आज शनिवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 3111 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.
पुणे शहरात 20,889 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 1094 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 16 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद ठेवण्यात आलेले आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत.
पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.
'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'
Careless people
ReplyDelete